महाराष्ट्र राज्यातील gazetteer's ची माहिती असलेला दुवा

सुकामेवा's picture
सुकामेवा in जनातलं, मनातलं
11 Mar 2011 - 11:34 am

ह्या दुव्यावर महाराष्ट्र राज्यातील gazetteer's ची माहिती आहे.
तसेच महाराष्ट्र : भुमि व लोक, इतिहास प्राचीन काळ (खंड-1), स्थापत्य व कला (खंड-1,भाग-2),औषधी वनस्पती व महाराष्ट्रातील वनस्पतीशास्त्र आणि वनसंपदा या संबंधी सुद्धा माहिती उपलब्ध आहे.

समाजमाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Mar 2011 - 11:52 am | प्रचेतस

gazetteer's मध्ये नेहमीच बहुमूल्य माहिती मिळत असते. लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.

जातीवंत भटका's picture

11 Mar 2011 - 5:08 pm | जातीवंत भटका

वल्लीशी सहमत .. धन्यवाद ...

निनाद's picture

13 Mar 2011 - 1:31 pm | निनाद

उत्तम दुवा, धन्यवाद!
महाराष्ट्र : भुमि व लोक यातील प्रस्तावना वाचली. एकुण लेखन चांगले वाटले. अनेक विधाने केलेली आढळली मात्र त्यांचे संदर्भ आढळले नाहीत. महाराष्ट्राच्या इ.स.पूर्व वसाहतींविषयी कालनिर्णय देणारी ठाम विधाने दिसली, कार्बन टेस्ट झाली वगैरे वाक्ये आहेत पण ती कधी कुणी प्रसिद्ध केली याविषयी काहीच संदर्भ नाहीत. संदर्भ सूची पाहतांना संदर्भ सापडणे व्यवस्थित शक्य झाले नाही. कारण त्यात संदर्भीत ग्रंथांचे पान क्रमांक दिलेले नाहीत.
तसेच अनेक संदर्भ अप्रकाशित प्रबंधाचे आहेत. अनेक संदर्भ जुने म्हणजे इ.स १९२० किंवा तत्पूर्वी झालेल्या संशोधनांचे ही आहेत. त्यामुळे लेखनाच्या 'करंसी' विषयी काहीसा संभ्रम उभा राहिला आहे. मात्र पूर्ण वाचना शिवाय नेमके विधान करता येणार नाही.

हा दुवा युनिकोड मध्ये नाही. मजकूर पाहण्यासाठी मिलेनियमवरूणवेब हा टंक आवश्यक आहे.
तरीही ही माहिती जालावर उपलब्ध झाली हेच महत्त्वाचे!