पहिला पहिला क्रश ......

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
2 Mar 2011 - 10:45 am

पहिला पहिला क्रश ......

प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत्तोच (अपवाद वगळता)
आमच्याही आयुष्यात हा दिवस तसा जरा लवकरच आला असेच म्हणावे लागेल .
त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते )
त्यामुळे काही मुली माझ्यावर नेहमी खार खाऊनच असायच्या
वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलीन मधला बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या !
म्हणजे तमुक तमुक मुलगा दिसला कि चोरून चोरून स्मैलींची देवाणघेवाण.......
चोरून चोरून चिठ्या - चपट्या, गाणी गुणगुणन, ...
(मुलींसाठी )सक्तीची दोन वेण्या आणि काळी रिबीन असताना हि कधीकधी पोनी बांधन, दोन चार केसांची बट मुद्दाम गालावर रुळवन, आणि म्याड्मचे वेणी का नाही घातली ? म्हणून बोलणे खाण.....
आणि विशेष ज्यां -ज्यां कबुतरांच्या जोड्या जमल्या होत्या ती टाळकी आम्हाला नेहमी टाळायचे ......खेळायला पण आणि अभ्यासाला पण .....
गम्मत अशी कि ज्या मुलींशी आमची खुन्नस होती त्या बाकी मला जरा टरकायाच्या जरा नरमाईने वागायच्या ...
(मी कधी त्यांच्या घरी पचकले (त्यांच्या प्रेमप्रकरणावर )तर नसती पंचाईत !म्हणून बहुतेक )
मला आणि कपूला (कल्पिता ) इंटरेस्ट, त्याना चिडवण्यात वाटायचा
वर्गाच्या खिडकी जवळच बेंच होता आमचा ,बाहेर येणारे जाणारे आणि विशेष आत डोकावणारे या सर्वावर आमचा डोळा असायचा
" ए गौरे......................देखो तेरा शाहरुख जा .... रहा हे हे हे ....
हि हि हि हु हु हु ...
गौरी लगेच बद्कासारखी मान उंचावून पहायची ...........
काय पण सोल्लिड मजा यायची
त्यांना चिडवायला .........

शाळेच्या रस्त्यावरच एका छोटस कॅन्टीन होत आणि त्या शेजारीच एक मावा(मटका) कुल्फी , सरबत ,रॉयल कुल्फीची गाडी लागलेली असायची भर दुपारी उन्हात मावा कुल्फी खाणे म्हणजे अहा अहा सारा थकवा पळून जायचा ......पण सध्या आम्हाला फुकट मध्ये मावा कुल्फी मिळायची कारण ओळखीची एक दोन कबुतरांची जोडी तिथे लुडबुडत असायची आणि आम्ही त्यांना पाहिलं हे
(त्यांच्या मुद्दाम लक्षात आणून द्यायचं )

लक्षात आल कि लगेच आम्हाला फुकटात कुल्फी नाहीतर सरबत फ्री फ्री फ्री ......................
नंतर स्पोर्ट days आले
आम्ही रनिंग मध्ये भाग घेतला होता नेमकी जिंकायच्या बेतात असताना मध्येच माझा टांगा कल्टी झाला बाकीच्या म्याडम धावत आल्या त्यांनी मला हाताला धरून साईडला घेतले ,पाणी पाजले, आणी त्यात ते पण होते विनय सर ......

आमच्या फुटलेल्या ढोपराणा त्यांनी हळुवार मलम लावले आणि तिथून पुढे......... माझ आयुष्य काही दिवसासाठी प्रेमाच्या झोक्यावर बसून हिंदोळ्या खाऊ लागल
मला काय झाल हे मलाच समजत नव्हत न अभ्यासात मन लागेना ना खेळण्यात
मला पण अचानक प्रेमाचा साक्षात्कार झाला होता ...
आणि तो हि आमच्या विनय सरांवर (अरे बाप रे)
विनय सर , २४-२५ वर्षाचे ,जोग्रोफी शिकवायचे ,गोरा रंग ,कुरळे केस ,नाजूकसा चष्मा , बोलणे हि अगदी मृदू !
(त्यामुळ मुली फार मरायच्या त्यांच्यावर ,आणि मुल जळायचे त्यांच्यावर )
वर्गात आले कि पहिला सुविचार वाचणार (लिहिणारी मीच ) ...मग तासाला सुरुवात ....
शिकवण पण कित्ती छान ,मधेच एखाददुसरा विनोद करून सर्वाना हसवणार मधेच एखाद्या झोपाळू ला टपली मारणार
त्यांना त्यांची खुर्ची नेहमी स्वच्छ हवी असे ,एकदा त्यावर धूळ दिसली तर त्यांनी " बोरसे (मुलांचा monitar ) ला बोलावले
"ये बोरसे ये खुर्चीवर बैस ...लाजू नको बैस बैस ....त्याला सुरुवातीला काही कळलेच नाही सर का अस म्हणताय ?
तो लाजत लाजत खुर्चीवर बसला आणि त्याची प्यांट
मागून खडूच्या धुळीन पांढरी झाली तेव्हा सर्व वर्गात हास्याचे तुषार उडाले होते
बिचारा ..........
सर ;-"बोरसे समजले ना तुला काय ते ?" उद्यापासून धूळ दिसली नाही पाहिजे ओके ...monitar ना तू?
त्यांच्या अश्या गमती -जमती मूळ हसून हसून वाट लागायची
त्यांचा तास संपूच नये असे वाटायचे मला !
आता रोज सकाळी आम्हाला " खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे ", " "शेजार्यावर प्रेम करा" "

"तुम्ही जेवढे प्रेम जगाला द्याल ,त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल"

हेच सुविचार आठवायचे
सगळ्यां जोडप्यांना चीडवणारी मी आता मला त्यांची अवस्था समजत होती...........
मला कुठलाही पिक्चर पहिला कि विनय सरच हिरो म्हणून दिसायचे भले तो, सलमान असो कि शाहरुख .....
मन अगदी पिसासारख अलगद, " कभी इस क्लास में, कभी उस क्लास मे" त्यांना शोधायचं
ते दिसले कि पाहून गोड हसायचं, ते पण हसायचे ........
वर्गात त्याचंपण सारख पियू आज सुविचार छान लिहिला ,अक्षर छान आहे तुझ !
"तू टेस्ट मध्ये छान स्कोर केला ह ! कीप इट up गुड ........"

आमची स्वारी एकदम हवेत ..................
असेच आमचे आयुष्यातले मोरपिसा सारखे सुंदर दिवस मजेत चालले होते
होते पण पण
अचानक तो दिवस आला ....
"पियू जरा इकडे ये ....काय सर '"
सर ; -आग त्या प्रभा म्याडम बरेच दिवस झाले आजारी आहेत त्यांना भेटलीस का तू ?
(मी अन तिला भेटेन अशक्य ! एक नंबरची खडूस,पण ह्यांना काय पडलाय तीच )
मी ;नाही हो सर, का?
सर : तुला माहित आहे त्या कुठ राहतात?
(डोम्बल तुमच कशाला भेटताय ? दाल मे कुच्छ काला तो नही)
मी ; अज्जिबात माहिती नाही हो सर मला त्या कुठ राहत्तात!
सर ; होका जाऊदे अग मला कुणीतरी सांगितलं कि पियू त्यांच्या घरी
डान्स प्र्याक्टीस ला जायची म्हणून सहज विचारलं !(कुणी काडया केल्या कुणास ठाऊक )
शाळा सुटली तरी तेच विचार
विनय सर कशाला चालले तिकडे मरायला नसता खुराक डोक्याला माझ्या .........
दुसर्या दिवशी सकाळी सकाळी आधी विचारले "भेटले का हो सर प्रभा म्याडम्ला......"
सर ; नाही ग वेळ नाही मिळाला आणि तश्यापण त्या आल्या आहेत शाळेत आज !
हो क्का (हुष श .......................बर झाल )मरून दे ..
आम्हाला अस सुखी बघन देवाला खटकल जाने
आम्हाला चिकन pox (कांजण्या )झाल्या आणि सर्व चेहरा भर पसरल्या
डॉक्टरांनी त्या बर्या होई पर्यंत शाळेत जाऊ नको ह !नाहीतर दुसर्यानाही होतील असा प्रेमळ सल्ला दिला
म्हणजे काय १०-१५ दिवस घरी .....नही............बोंबला...............
कांजण्या पेक्षा विनय सर दिसणार नाहीत भेटणार नाहीत ह्या विचाराण गलबलून आल
एक एक दिवस कसा कसा गेला मला विचारू नका !
आणि शेवटी तो दिवस आला आणि आम्ही सायकलवरून शाळेकडे
प्रस्थान केले
८.१५ ची शाळा असून एरवी आम्ही ८.२५ पोहचून ग्राउंडला दोन राउंड मारायचो

आणि आज चक्क ८ ला पोहचून आम्ही विनय सरांची आतुरतेने वाट पाहत बसलो ........प्रार्थना झाली,वर्गात जाउन बसलो
सुदैव माझ पहिला तास भूगोलाचाच होता माझ सर्व लक्ष दाराकडे आत्ता येतील मग येतील १० मिनिट झाली ....
मध्येच सायन्स च्या म्याडम टपकल्या आणि सायन्सचा तास सुरु झाला
मी वेळापत्रक तीनदा चेक केले अरेच्या हे कस काय बुवा ?
मी कपुला कोपराने ढूसनी दिली " हे काय ग कपू म्याडम भणजाळली का ?
भूगोलाचा तास आहे ना?
काय ग विनय सर कुठाय ?
आले नाही का आज ? बर नाही का त्यांना ?
कपू हळूच ;"ए बावळे जस काय तुला माहितच नाहीं"
मी : आईशपथ सांग कि क्काय क्काय ?सांग न प्लीज ?
आग त्याचं लग्न झाल ५-६ दिवसापूर्वी प्रभा म्याड्मशी ...
क्काय ?कधी? कस? केव्हा ?

(कपू अक्ख्या वर्गाची नव्हे शाळेची जेम्स बोन्ड होती अस म्हटल तरी चालेल पट्ठीला सर्व खबरबात असायची )

"छुपे रुस्तुम होते दोघ पण, लव्ह म्यारेज केल त्यांनी आता १५ दिवस रजेवर!

हे ऐकून माझ्या डोक्यात हजार घण्टा वाजू लागल्या टन टन टन..........

"प्रभा sss ती दात फारुळी ,सश्यासारखे दोन दात पुढ आलेली खडूस, ती आवडली ?

क्काय पण चोइस आहे विनय सरांचा .....

कुठ विनय सर अन कुठ ती ? बाकीच्या मुली (मी ) मेल्या होत्या का ?

कपू ;" जाऊ दे ना ती म्हण आहे ना " दिल आया गधी............."अपनेको क्या फरक पडता हे ?

(फरक तो पडता हे भाई तुम नहीं समझोगी ")

"देवा तू मला ५ -६ वर्ष आधी जगात पाठवलं असत तर तुझ क्काय बिघडल असत का रे ?"

(हे बालिश विचार तेव्हाचे ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे ):)

कथाअनुभव

प्रतिक्रिया

सूर्यपुत्र's picture

2 Mar 2011 - 11:02 am | सूर्यपुत्र

गेल्या किती जन्मातले आमचे पाप असते, की असे देखणे मास्तर शिकवायला येतात... :( अगदी कॉलेजात सुद्धा. च्यायला, तोंड दाबून बुक्क्यांचा मार... :( बुकलून काढावासा वाटतो मास्तर.

(हे बालिश विचार ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे ) :)

-सूर्यपुत्र.

मी ऋचा's picture

2 Mar 2011 - 11:09 am | मी ऋचा

मस्त!

पैसा's picture

2 Mar 2011 - 11:11 am | पैसा

मस्त लिहिलंय!

महेश-मया's picture

2 Mar 2011 - 11:30 am | महेश-मया

प्रेमात पडल्यावर आयुष्य काही दिवसासाठी प्रेमाच्या झोक्यावर बसून हिंदोळ्या खाऊ लागते, खरच असं असते का ?

टारझन's picture

2 Mar 2011 - 11:31 am | टारझन

विणय काकांनी एका बालिश काकुंची णिवड ण करता सुयोग्य निवड केल्याबद्दल विनय काकांचे अभिणंदण :) चॉइस केलेल्या प्रभा म्याडम नक्कीच सुंदर असाव्यात हे लेखिकेच्या बालिष आयुसेवरुन स्पष्ट होते.
शेवटी लिहील्याप्रमाणे लेखाप्रमाणे भाषा ही बालिष आहे. :) बर्‍याच ठिकाणी अनुस्वार नसल्याने , तोडकी वाक्यरचना आणि भरपुर डॉट्स असल्याने आख्यान वाचल्यासारखे वाटले.

- चिन्मय सर
प्रोफेसर (शारिरिक शिक्षण, भुगोल,इतिहास ) , सेंट हेलेना काँन्व्हेंट स्कुल, कँप.

१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?
प्रेषक टारझन दिनांक गुरुवार, 10/02/2011 - 12:23
अ‍ॅज यु वॉल णो
एक जनहितार्थ धागा काढावा अशी हाक मला अंतर्मनातुन आली
उमेद्वार इतपर्यंत ..

हे काय आहे रे टार्या
तुझ आपल अस आहे "दुसर्या शिकवे ब्रम्ह ....................";)

टारझन's picture

2 Mar 2011 - 12:51 pm | टारझन

उगी उगी बाळ उगी उगी :)

कुजकट सल्ला : शुद्धलेखन आणि बालिषपणा ह्यातला समजवायला कोणी विनय सर भेटतो का बघा जालावर :)

-(खाऊ की) गिळुशा

आम्हि कुनाला सल्ला मागितला नाहि
शुद्धलेखन तुझ कस आहे हे बघ कि आधि तुच शोध एखादि मड्ड्म अन्तरजालावर तुला शिकवनारि
उगि उगि टारुबाळ

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Mar 2011 - 10:06 am | श्री गावसेना प्रमुख

पण जरा गुरु शिष्याच अन्तर असाव म्हनतोय
(टिप्;आपल्या प्रायवेट गोष्टी जालावर आनु नये)
आदेश

प्राची's picture

3 Mar 2011 - 8:01 pm | प्राची

तुम्हीच विनय सर का हो?

गेंडा's picture

22 Mar 2011 - 1:03 am | गेंडा

बाये तु ह्ये करायचे धैर्य कसे केलेस ह्यो मपल्याला सांग.

(अब संबभलके रहो. तुम्हारी टक्कर किसेक साथ है ह्ये समज लो)

सुत्रधार's picture

2 Mar 2011 - 11:44 am | सुत्रधार

छान सुरुवात.

प्रकाश१११'s picture

2 Mar 2011 - 11:49 am | प्रकाश१११

पियुषा - छान आणि मस्त. थोड्याशा भाषिक चुका आहेत. त्या सुधरवता येतील.
भाषेला छान लय आहे.हे महत्वाचे. गौरी लगेच बद्कासारखी मान उंचावून पहायची ...........
हे छान लिहिले आहे. त्तुम्ही एवढे लिहिता हे महत्वाचे. लिहित रहा.लय आहेच.
खूप शुभेच्छा .

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Mar 2011 - 11:53 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त मस्त.... एकदम आमची शाळा आठवली. आणि आमच्या सोनाली खरे (असच नाव होत त्या म्याडमचे!!) नजरेसमोर तरळुन गेल्या!!!
जाऊ दे.... गेले ते दिन गेले......

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Mar 2011 - 11:53 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त मस्त.... एकदम आमची शाळा आठवली. आणि आमच्या सोनाली खरे (असच नाव होत त्या म्याडमचे!!) नजरेसमोर तरळुन गेल्या!!!
जाऊ दे.... गेले ते दिन गेले......

प्यारे१'s picture

2 Mar 2011 - 11:59 am | प्यारे१

>>>>

आता रोज सकाळी आम्हाला " खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे ", " "शेजार्यावर प्रेम करा" "

"तुम्ही जेवढे प्रेम जगाला द्याल ,त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल"

हेच सुविचार आठवायचे<<<

>>>(हे बालिश विचार तेव्हाचे ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे )<<<

चान चान

- इ. ९वी ला सायन्स टिचर आवडणारा.
(मॅडमना टिचर म्हणायचो आणि मास्तरांना सर)

अविनाशकुलकर्णी's picture

2 Mar 2011 - 11:59 am | अविनाशकुलकर्णी

लेख व शैली आवडली..मजा आ गया वाचताना....

वाहीदा's picture

2 Mar 2011 - 12:18 pm | वाहीदा

पियुशा ,
लेख अगदी मनापासून आवडला. आमची मुलींची शाळा होती, दुर्दैवाने आम्हाला शिकवणार्‍या सर्वच मॅडम होत्या कोणी सर कधीच नव्हते त्यामुळे शाळेत असे काही अनुभव कधीच आले नाहीत. पण कॉलेजात असताना असे infatuations चे अनुभव बरेच आले. एखाद्या मुलाने अगदी मनापासून विचारले तरी ही मुस्लिम असल्याने मुर्खासारखे मी त्याला धुडकावून हि लावलेले आठविले . :-(
कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षी आमच्या वर्गातल्या चक्क ८ जोड्याचा विवाह संपन्न झाला . बहुतेकांनी फिल्मी श्टाईलमध्ये घरातून पळून जाऊन जाऊन लग्न केले होते. " उनके सर पें प्यार का भूत जो सवार था .." अन मग त्यांच्या लग्नात इतरांचे "क्या खयाल है ? हो जाए ???? " वाले लुक्स ही आठविले :-)
जुन्या गोष्टी आठवून दिल्याबध्द्ल मनापासून धन्यवाद ..
तू तुझी completely carried away होणारी मनाची अवस्था छान मांडली आहेस .

परिकथेतील राजकुमार's picture

2 Mar 2011 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार

एखाद्या मुलाने अगदी मनापासून विचारले तरी ही मुस्लिम असल्याने मुर्खासारखे मी त्याला धुडकावून हि लावलेले आठविले .

हे सगळे खोटे आहे :P

वाहीदा's picture

2 Mar 2011 - 1:09 pm | वाहीदा

तूला रे काय माहित चोच्या ??

परिकथेतील राजकुमार's picture

2 Mar 2011 - 1:20 pm | परिकथेतील राजकुमार

तुला प्रपोज करण्यापेक्षा तो आत्महत्या करणे जास्ती पसंत करणार नाही का? ;) रोज भांडुन भांडुन जीव घेशील त्याचा.

स्पा आपल्या पेक्षा थोरला आहे काय रे पर्‍या ? :)

-परेशां
जिंदगी से मजा लुंगा

वाहीदा's picture

2 Mar 2011 - 1:32 pm | वाहीदा

त्याचा जीवजाण्या आधी तुझ्या कैफेत आणून सोडेन मग तू त्याला जीवदान दे हां :-)
(आता उरले-सुरलेले विचार खरडवहीत व्यक्त करा, नाहीतर या धाग्याचे काश्मिर होईल )

वेताळ's picture

2 Mar 2011 - 12:19 pm | वेताळ

मला तर आता शिक्शक म्हटले कि बार ची व तीनपत्ती क्लबाची आठवन होते.

नगरीनिरंजन's picture

2 Mar 2011 - 12:20 pm | नगरीनिरंजन

लै भारी. आम्हालाही आमच्या चाबुकस्वार बाई आठवल्या!

इंटरनेटस्नेही's picture

2 Mar 2011 - 12:31 pm | इंटरनेटस्नेही

मस्त लेख पियु, आवडला मनापासुन.

>>>(हे बालिश विचार तेव्हाचे ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे )<<<

हे पण आवडलं. :) शाळेत वगैरे असताना आपल्य टीर्चस बद्दल असा विचारपण करणे म्हणजे फार वाईट आहे.

वेताळ's picture

2 Mar 2011 - 12:35 pm | वेताळ

हे पण आवडलं. शाळेत वगैरे असताना आपल्य टीर्चस बद्दल असा विचारपण करणे म्हणजे फार वाईट आहे.

हा इनोद तर खुप आवडला.
शाळेत असताना बर्‍याच पोरी पोराना भाव देत नाहित, त्याना समवयस्क पोर लिंबुटिंबु वाटतात. त्यामुळे त्याना शिक्षकाच्यावरच ज्यादा भरवसा वाटतो.

हॅहॅहॅहॅहॅहॅ
सोल्लिड विनोद करता "वेताळ्"साहेब

त्याना समवयस्क पोर लिंबुटिंबु वाटतात कारण मुलिंचे विचार मुलांपेक्षा उच्च असतात म्हणून त्यांच्या अपेक्षा ही उच्चच असतात ;-)

टारझन's picture

2 Mar 2011 - 12:53 pm | टारझन

=)) =)) आज काय विनोदाची लाट आलीये काय =))

- निच्च

=)) =)) आज काय विनोदाची लाट आलीये काय =))

विनोद च आलाय...........................

मज्जा करा........

लाटेच्या पल्याड काही लिहणार का ?? का लाटेत वाहून जाणार ? ;-)

टारझन's picture

2 Mar 2011 - 1:11 pm | टारझन

हो .. लिहीणार ना ... चिऊ काउ च्या गोष्टी आणि प्रतिसाद =))) =)) =)) आपण ना गडे .. अस्सं करु .. आपण ना त्याला खुप रागवु .. अय्या गडे .. बय्या गडे ..

पिस्तुल से काट डालुंगा //`;`''''''''

आरारारारारा ... =)) =)) =)) काय डायलॉग आहे .. इथुन पुढे ह्याचे "एन " विडंबण पाडण्याचा विडा उचलतो =)) =)) जबरा ..

- पिटीउषा
घंटी से तंबोरा बजाऊंगा

वेताळ's picture

2 Mar 2011 - 1:15 pm | वेताळ

हॅ।अ‍ॅहॅहॅहॅहॅ
तुला ही सही सुचली कशीरे?

वपाडाव's picture

2 Mar 2011 - 6:01 pm | वपाडाव

येका चित्रपटातला डायलॉग आहे.
कदाचित गोलमाल-२ मध्ये वसुली मारतो.

गन है चिर के रख दुंगा.

वेताळ's picture

2 Mar 2011 - 1:15 pm | वेताळ

हॅ।अ‍ॅहॅहॅहॅहॅ
तुला ही सही सुचली कशीरे?

VINODBANKHELE's picture

2 Mar 2011 - 1:00 pm | VINODBANKHELE

आपले ते उदात्त प्रेम..........................

आणि दुसर्याचे लफडे.................

प्रीत-मोहर's picture

2 Mar 2011 - 1:03 pm | प्रीत-मोहर

मस्त ग आवल्डा लेख

गवि's picture

2 Mar 2011 - 1:16 pm | गवि

उत्तम..

आवडले...

अतिशय सुंदर लिहिले आहे.. वाचतच रहावे असे वाटते ...
मन हळुच मागच्या काळाचा वेध घेते अआणि पुढील लिखान पियुषाचे नसुन आपलेच आहे असे वाटते ..
भुतकाळतील पानेच आपल्या पुढे फडफड करतायेत असे वाटते

मन हळुच मागच्या काळाचा वेध घेते अआणि पुढील लिखान पियुषाचे नसुन आपलेच आहे असे वाटते ..

काय गणेशा , आपण पण विणय सरांवर लाईन मारायचात काय ? अबब :) ऐकावे ते णवलच्चे :)

- जांभय सर
इतिहास के लेक्चर मे मॅथ्स लुंगा

लिखान आपलेच आहे असे वाटते .. म्हणजे तो काळ .. ती वर्गातील मस्ती .. सगळे तसेच असे बोलायचे होते ..
आणि त्या मस्तीत आपल्याला ही कश्या मॅडम आवडायच्या ते ही आठवले ....
ती मस्ती ते सगळे लिहिण्याची येथे गरजच पडली नाही यीतके ओघवते लिखान आहे , सर्वांना त्यांच्या भुतकाळात घेवुन जाणारे
असा अर्थ होता ..
आता येव्हडे लिहिताना चुकुन आले असतील काही शब्द कमी तर चु.भु.दे.घे.

अवांतर एक उदाहरण
: आता तुम्ही तुमचा अल्बम पाहत आठवणी काढत बसला आहे हे वाचल्यावर , आम्हाला पण असेच वाटते एकदम माझ्या मनातील लेख असा रिप्लाय दिला.
तर आम्ही ही असेच अल्बम पाहुन आठवणीत रमुन जातो असा अर्थ होतो .. ना की आम्ही पण तुमचा अल्बम पाहुन आठवणीत हरवतो एकदम मनातलेच बोलला असा अर्थ लावु नये असे वाटते .

अवलिया's picture

2 Mar 2011 - 1:24 pm | अवलिया

शाळेत गेला होतात तर... ब्वॉर्रर्र.

सुहास..'s picture

2 Mar 2011 - 2:02 pm | सुहास..

शाळेत गेला होतात तर... ब्वॉर्रर्र. >>>

=)) =))

हाण्ण !!

कच्ची कैरी's picture

2 Mar 2011 - 1:42 pm | कच्ची कैरी

हे पियु तुस्सी तो छा गये !
तुझ्या विनय सरांची गोष्ट वाचुन आमचे केमिस्ट्रीचे सोनवने सर आठवले मला ते अजिबातच आवडत नव्हतेभोकर्या डोळ्यांचे !(गुरुंचे स्थान आदरणीय आहेच पण त्यांचे एक विशेषण सांगितले )पण बाकी वर्गातल्या मुली नेहमी त्यांच्याच गप्पा करत असायच्या ,त्यांना पुन्हा पुन्हा काहीतरी अडचणी विचारायला जायच्या पण हे सगळ आम्ही अकरावीत असतांना मग आम्ही १२ वीत गेल्यावर त्यांचे लग्न झाले आणि सगळ्यांना अडचणी येण बंद झाल .

आम्ही १२ वीत गेल्यावर त्यांचे लग्न झाले आणि सगळ्यांना अडचणी येण बंद झाल .

बापरे !

मी ऋचा's picture

2 Mar 2011 - 1:56 pm | मी ऋचा

:)))))))) :))))भावना पोचल्या!

@ कच्ची कैरी : ताई जरा सपश्ट लिवा की

टारझन's picture

2 Mar 2011 - 3:01 pm | टारझन

प्रेषक अवलिया दिनांक Wed, 02/03/2011 - 13:44.
आम्ही १२ वीत गेल्यावर त्यांचे लग्न झाले आणि सगळ्यांना अडचणी येण बंद झाल .
बापरे !

अरे अरे अरे ... विवेकानंद .. रामानंद .. सच्चिदानंद .. . देवानंद .. काय आहे हे ? मिपाचा प्रगल्भ महिलावर्ग अशा अडचणी उघड्यावर सांगायला लागला .. हे पाहुन "गैरसोय " झाली .. आवरा !!
वर परत खालचा खुलासा पाहुन " मी नाही त्यातली आणि अडचण बंद झाली " ही म्हण आठवली नाही तर नवलंच !!

- अडचणींवर मात कर डालुंगा

कच्ची कैरी's picture

2 Mar 2011 - 5:28 pm | कच्ची कैरी

ए बायल्या गडु कशाला उगाच बायकांमध्ये तुझे नकटे नाक खुपसतो आहेस रे !नोज खुप्सेकर कुठला !

वाहीदा's picture

2 Mar 2011 - 2:08 pm | वाहीदा

कसला हलकट्ट आहेस .. नको ते विचार कसे काय तुझ्या मनात येतात ??

कच्ची कैरी's picture

2 Mar 2011 - 2:29 pm | कच्ची कैरी

>कसला हलकट्ट आहेस .. नको ते विचार कसे काय तुझ्या मनात येतात ??
जाउ दे ग वाहीदा जसी दृष्टी तसी सृष्टी
यापेक्षा जास्त काय बोलनार ?

अवलिया's picture

2 Mar 2011 - 3:01 pm | अवलिया

>कसला हलकट्ट आहेस .. नको ते विचार कसे काय तुझ्या मनात येतात ??

सवय.
बोललेल्या, लिहिलेल्या शब्दांचे अर्थ काय होतात हे पहाण्याची जुनाट सवय. स्वतःलाही कधी सोडलं नाही. :)

>>>जाउ दे ग वाहीदा जसी दृष्टी तसी सृष्टी
>>यापेक्षा जास्त काय बोलनार ?

सहमत आहे. :)

मृगनयनी's picture

2 Mar 2011 - 5:11 pm | मृगनयनी

पियुशा! मस्त आहे गं "क्रश"!... अजून कुणाचे असतील असे क्रशेस.. तरी लिहि... जास्त मजा येइल! ;) ;)

___

आणि अवलिया नाना!..... त्या परा'च्या कवितेतल्या काश्मीरा'ची आग थन्ड होण्याचं रहस्य मला आता कळलं हो! ;)
बिच्चारा कृष्णा!

मुलूखावेगळी's picture

2 Mar 2011 - 1:54 pm | मुलूखावेगळी

पियु, मस्त ग क्रश.
सगळे क्रश लिहि ना ;)

आम्हाला १ सर होते जानवळे पी.जी. ला तर आम्ही त्यांना जानु म्हनायचो.
आम्ही त्यांना शिकवताना मुद्दाम क्वेरीज विचारायचो आनि उत्तर देताना लाजायचे . मज्जा यायची त्यांची

खादाड अमिता's picture

23 Mar 2011 - 9:21 pm | खादाड अमिता

पियुषा, सगळ्यांचेच असे क्रश असतील ग असे! (आमचे पण बायोलोजी चे सर...) छान लिहिलयेस.

स्पंदना's picture

2 Mar 2011 - 1:55 pm | स्पंदना

काय पियु? अजुन सलतात का ग सर मनात? की हसु येत स्वतःचच?
होता है । होता है ।
मला काय वाटत सांगु? जीवंत माणस , माणुस असलेली माणस प्रेम करु शकतात. बाकि सारे कट्टर! अन ते मरे पर्यम्त कट्टरच रहातात. तुझा अनुभव मात्र तु अगदी गाण्या बिण्या सकट प्रामाणिक पणे उतरवला आहेस.

५० फक्त's picture

2 Mar 2011 - 1:58 pm | ५० फक्त

ह्या असल्या भानगडींमुळे आमच्या शाळेत फक्त विवाहित शिक्षक शिक्षिका असायच्या. तरी पण दहावीत असताना (आम्ही) सोलापुरातल्या बिएड कॉलेजच्या एक दोन मॅड्म आल्या होत्या लेक्चर साठी, त्या काळजात थोड्या हुरहुरी पेटवुन गेल्या होत्या.

बाकी, पियुशा लिखांण एकदम मस्त झालंय. आता कुठे असतात विनयप्रभा काही पत्ता काढलास काय ?

'शाळा' चे ट्रेलर पाहिलेत का, अम्रुता खानविलकर काय जबरा दिसते मॅडम म्हणुन., मी तर पुन्हा इ. ७ वी मध्ये अ‍ॅडमिशन घ्यायला तयार आहे.

वपाडाव's picture

2 Mar 2011 - 6:02 pm | वपाडाव

म्हंजे मिलिंद बोकिलांच का?
त्यात अम्रुता खानविलकर वैनी !!!!!
मी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करुन ठेवावं म्हंतोय ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Mar 2011 - 2:00 pm | बिपिन कार्यकर्ते

छान आठवण.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2011 - 7:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान आठवण.

-दिलीप बिरुटे

पाषाणभेद's picture

2 Mar 2011 - 2:16 pm | पाषाणभेद

अनुभव मजेशीर आहे.
अवांतरः "शिक्षक" अन "गुरू" यात गल्लत होते आहे.

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही वाचनीय...:)
मला आमच्या संस्कॄतच्या बाई आठवल्या !!! ;) गोर्‍यापान...देखण्या,आमच्या मुलांच्या भाषेत सांगायच झालं तर...क्या पीस कट पीस. ;) स्लीवलेस ब्लाउज घालुन आल्या की लयं तर्रास्स्स्स व्हायचा च्यायला. ;) त्यांच्या दंडावरचं देवीच्या इंजेक्शनच चिन्ह लयं ग्वाड दिसायचं बघा !!! ;)
जाउ दे इथेच थांबतो कसा... ;)
महत्वाचे वाक्य रिपीट मारतो :--- गुरूंचे स्थान आदरणीय आहे.

( अभ्यासु) ;)

वपाडाव's picture

2 Mar 2011 - 6:05 pm | वपाडाव

मदणबाण -आपण कोण्त्या शाळेचे?
कारण आम्च्या संस्कृतच्या बाई पण अग्गाग्ग्गा!!! तुफ्फ्फान कटपिस होत्या असं आठवतंय.

स्लीवलेस ब्लाउज घालुन आल्या की लयं तर्रास्स्स्स व्हायचा च्यायला

हेच म्हंतो बघा. ;-)

कोणिही कोण्त्याही शाळेचे असा , संस्क्रुतच्या बाई ह्या गो-यापानच असणार. आम्ही मार्कांसाठी पुर्ण संस्क्रुत घेतलं होतं ८-९-१० त. ह्या बाई नेमक्या त्याच वर्षी जॉईन झाल्या. स्लिवलेस वगैरे घालायच्या नाहीत पण छान दिसायच्या.

आमच्या सगळ्या मास्तर आणि बाईंप्रतिच्या भावना सार्वजनिक मुतारीत शुद्धलेखानाच्या रुपाने व्यक्त व्हायच्या, त्याची अंमळ आठवण झाली.

असो, गेले ते दिवस, आता पुन्हा गेलो की सगळ्यांना भेटुन येतो परत एकदा. संस्क्रुतच्या बाईपण आता म्हाता-या दिसायला लागल्या असतील आता.

आत्मशून्य's picture

2 Mar 2011 - 11:37 pm | आत्मशून्य

आमच्या सगळ्या मास्तर आणि बाईंप्रतिच्या भावना सार्वजनिक मुतारीत शुद्धलेखानाच्या रुपाने व्यक्त व्हायच्या, त्याची अंमळ आठवण झाली.

आमच्या इथे म्हर्‍हाठी शूध्द लेखनाची बोंब पहील्या पसूनच असल्याने कल्लाकार लोक्सच ह्या जागी बाजी मारून जायचे. लेखन फक्त त्याच्या कलेला शब्दरूपाने योग्य ओळख देण्या इअतपतच मर्यादीत र्‍हाईलं.

सहज's picture

2 Mar 2011 - 3:19 pm | सहज

आपल्या लेखाने संमिश्र भावना जागृत केल्या. अंबळ हळवा व हॅपी एन्डींग.

अंबळ हळवा - हम जिनपे मरते थे वो उनके गुरुपर मरते थे!
हॅपी एन्डींग - त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर फाटले. (हॅ हॅ हॅ आपल्याला ह्याचा लै लै आनंद आहे ;-) खोटे कशाला बोला!)

रमताराम's picture

21 Mar 2011 - 3:11 pm | रमताराम

अच्रत.

एकदम मस्त लिहलयस ग... मला पण आमचे कॉलेज चे दिवस आठवले. पण आमच्या कॉलेज मधले आमचे सर एकदम मेंगळट होते. एकतर काय शिकवायचे, ते काही झेपायचे नाही. त्यात तो त्यांचा मोठ्या भिंगांचा चश्मा आणि क्लास मधल्या सुंदर मुलींकडे बघुन सारखी smile करणे. आम्ही त्यांना चम्या हे नाव ठेवल होतं. खुप मस्ती केली होती कॉलेज मधे. सगळे दिवस आठवले. धन्यवाद.

आमच्या इथे एका देखण्या मास्तरांवर पोरी लाईन मारत होत्या,त्यात एका नव्या शिक्षिकेने देखिल लाईन मारायला सुरुवात केली. मग काय सरानी आणि तिने बोभाटा झालेवर लग्न केले.सहा महिने सर गावा कडे आले नाहित म्हणुन त्याची बायको दोन मुलाना घेवुन शाळेत आल्यावर काय झाले ते विचारु नका.पुढे काय लिहता येत नाही कारण .............................गुरूंचे स्थान आदरणीय आहे.

कुसुमिता१२३'s picture

2 Mar 2011 - 6:23 pm | कुसुमिता१२३

ए मस्त लिहीलयस पियुशा! झक्कास!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Mar 2011 - 12:35 am | निनाद मुक्काम प...

एकदम भारी अनुभव आहे .
विषय मांडण्याची शैली आवडली . .
एक गमतीदार किस्सा आठवला .

दहावी नंतर डोंबिवलीतून मुंबापुरीत उच्च का काय ते म्हणतात ते शिक्षण घेण्यासाठी कॉलेज सोबत कोचिंग क्लास लावला .( पंत म्हणाले तसे '' महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही ह्या उक्तीचा प्रत्यय आला .
सिंधी आणी पंजाबी समूहात मी एकटा अल्पसंख्यांक त्यांचे पॉश रहाणे/वागणे आम्हाला संभ्रमीत करायचे .एका मैत्रिणीला क्लास मधील एक सर जाम आवडायचे .
तिला इतरांनी ते सुध्धा तुझ्यावर कटाक्ष टाकतात .....
त्यामुळे ती प्रेमात दिवाणी झाली .
पहिल्या बाकावर बसून एकटक त्यांच्याकडे पहायची .
तरीही काहीच प्रतिसाद मिळत नाही म्हणून तिने मेनकेने जो मार्ग स्वीकारला तो स्वीकारला .
नटण्या मुरडणे वैगरे प्रकार करून झाले . प्रतिसाद मिळत नाही हे पाहून ती बिथरली .
स्वताच्या आधीच लो कट असणाऱ्या टोप ची बटणे खुली सोडून पहिल्या बाकावर बसली
पहिल्यांदा सरांनी तिला पेन्सिलीने खुणेने सर्वांसमोर सांगितले .( ते हि जरा तिच्यावर कावले होते .)
मग परत माझ्या टंक लेखाना प्रमाणे काहीच सुधारणा नाही हे पाहील्यावर त्यांनी सर्व क्लास समोर तिला'' बटणे लाव असे सांगितले .
तिने त्यावर'' मला कम्फर्टेबल वाटते'' असे सांगितले .
ह्यावर तिला क्लास बाहेर जायला सांगितले .तर तिने ''मी क्लास बाहेर तुमची वाट पाहीन असे सांगितले''
तिच्या पालकांना निरोप धाडला त्यांनी गाडीतून येऊन फार काही झाले नसल्याच्या अविर्भावात तिला घेऊन गेले .
ह्यामुळे क्लास मधील प्रेम प्रकरण दीर्ध काळा पर्यत तहकूब झाली .
.

आत्मशून्य's picture

2 Mar 2011 - 9:16 pm | आत्मशून्य

हा या कथेचा सारांश मनाला एकदम हळवा बनवून गेला.

अतुल पाटील's picture

3 Mar 2011 - 3:51 am | अतुल पाटील

आठवणी जाग्या झाल्या!!! सहिच आहे हे.

सर्व वाचकान्चे मनापासुन आभार :)

विजुभाऊ's picture

3 Mar 2011 - 1:40 pm | विजुभाऊ

आमच्या शाळेत एक मास्तर आणि बैंचे असेच काहीसे होते.
चं. पा शिंदे नावाच्या एका महा नाठाळ मुलाने ( सातवी क) त्या मास्तरांना " मास्तर त्या बै ना लै चालू आहेत" अशी गुप्त माहिती पुरवली. आणि त्या बदल्यात बुक्क्यानी अंग रगडून घेतले होते. ( मार खाऊन)
नंतर त्या मास्तरांचे आणि बैंचे षुभमंगल झाले.
गुरुचे स्थान अढळ्च आहे

प्रास's picture

3 Mar 2011 - 6:27 pm | प्रास

आवडलं..... एकदम आवडलं.....

अप्पा जोगळेकर's picture

3 Mar 2011 - 6:47 pm | अप्पा जोगळेकर

अले अले अले. कित्ती कित्ती गोग्गोड. डैबीटीस झाला.
यश चोप्रानंतर पियुषाच.

नरेशकुमार's picture

4 Mar 2011 - 9:30 am | नरेशकुमार

लेख शेर तर परतिकिरिया सव्वाशेर !

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Mar 2011 - 12:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मला पन सरव परतिकिरिया कुपच आवल्ड्या ;-)

Antarang's picture

21 Mar 2011 - 2:40 pm | Antarang

हम हम...

काही होत नाही ....पुन्हा एकदा...

धाग्याचे नाव आणि त्याचा शेवट बघता मला असे वाटते की पुढचा भाग येणार आहे.

तेंव्हा पुढील(अथवा पुढचे) भाग येण्याची आणि वाचण्यासाठी उत्सुक आहे.

'परा'कोटीचा उत्सुक (चिंतामणी)

विनायक बेलापुरे's picture

22 Mar 2011 - 1:54 am | विनायक बेलापुरे

पहिला पहिला क्रश ???

वयाच्या टीन एजमध्ये ...
वाई-पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावर माला'ज चा
स्ट्रॉबेरी क्रश....

नंतर अनेकदा घेतला पण पहिली चव अजुन तोंडात घोळते आहे.

:)

येका प्रतिसादाचे महाण रसग्रहण करना-या लेखनसम्राट लंबुटांग यांनी या लेखाचे रसग्रहण करावे. त्यांना मार्गदर्शन करनेची माजी लायकी नाय. पन काई नमुने तेंच्या समोर ठिवतो.

त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते )

वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलीन मधला बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या !

(मुलींसाठी )सक्तीची दोन वेण्या आणि काळी रिबीन असताना हि कधीकधी पोनी बांधन, दोन चार केसांची बट मुद्दाम गालावर रुळवन, आणि म्याड्मचे वेणी का नाही घातली ? म्हणून बोलणे खाण.....
(वाक्यात पुर्णविरामा ऐवजी स्वल्प विरामाचा वापर करने)

गम्मत अशी कि ज्या मुलींशी आमची खुन्नस होती त्या बाकी मला जरा टरकायाच्या जरा नरमाईने वागायच्या ...

(वाक्यात येकही चिन्ह न वापरणे)

आम्ही रनिंग मध्ये भाग घेतला होता नेमकी जिंकायच्या बेतात असताना मध्येच माझा टांगा कल्टी झाला बाकीच्या म्याडम धावत आल्या त्यांनी मला हाताला धरून साईडला घेतले ,पाणी पाजले, आणी त्यात ते पण होते विनय सर ......

(मराटी भाषेला नवा लेहजा देणे)

" खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे ",

(शब्द जोडुन नवा अर्थ निर्मान करने)

नगरीनिरंजन's picture

23 Mar 2011 - 3:56 pm | नगरीनिरंजन

गेंडाभौ, एकाच हाताची सगळी बोटं सारखी नसताऽऽत. शिवाय डाव्या हाताची वेगळी, उजव्या हाताची वेगळी. कसं कळत नाही तुम्हाला? मिपावर नवीन दिसताय. अभ्यास वाढवा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Mar 2011 - 9:08 pm | निनाद मुक्काम प...

हेच म्हणतो मी
किंवा डू आयडी
एका महिलेने स्वतःचा अनुभव मांडला हे तुम्हाला फारसे रुचले नाही .
तुमच्यासाठी एक कंपू वाट पाहत आहे .

महेश काळे's picture

12 Jan 2012 - 3:17 pm | महेश काळे

मस्त लिहिलंय!

अविनाशकुलकर्णी's picture

13 Jan 2012 - 12:06 am | अविनाशकुलकर्णी

लेख आवडला......शैली पण..