एक अनुभव

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 Feb 2011 - 11:21 am

सातारच्या रोटरी क्लबच्या साप्ताहीक मिटींग्ज दर शुक्रवारी संध्याकाळी कन्या शाळेत होतात.
शाळेच्या अंगणात धोन्डो केशव कर्वेंचा प्लास्टरचा पूर्णाकृती पुतळा .
एकदा मिटींगला थोडा लवकरच गेलो होतो.
मी एकटाच होतो बाकीचे मेंबर यायचे होते.
का कोण जाणे कर्व्यांचा पुतळा जवळून पहावा असे मला वाटले. पुतळा करणाराने तो फार सुंदर रीतीन एकेला आहे. चेहेर्‍यावरच्या रेषा न रेषा व्यवस्थित रेखाटल्या आहेत.
कर्वेंचे धारदार नाक. किंचीत करारी डोळे , गोल चष्म्याची फ्रेम . कोटाच्या घड्या चुण्या .कर्व्यांचे थोडे खुले पुढे आलेले सुरकुतलेले हात.
अचानक मला त्या कर्व्यांच्या पुतळ्याशी शेकहॅन्ड करावेसे वाटले.
मी कर्व्यांच्या पुतळ्याचा शेकहॅन्ड करण्याच्या पावित्र्यातला पुतळ्याचा हात हातात घेतला.
त्या हाताचा स्पर्ष एखाद्य अखरोखरीच्या वृद्धाच्या हाताच्या स्पर्षासारखा होता.
क्षणभर मी माझ्या आजोबांचा हात हातात घेतोय असेच वाटले. थोडासा सुखावलो.
त्या अंगणात मी एकटाच आणि कर्व्यांचा पुतळा आहे हे मी विसरलो. लहानपणी आजोबाना हाताला धरुन फिरायला जायचो त्ती आठवण झाली.
भानावर आलो तेंव्हा एका पुतळ्याचा स्पर्ष खर्‍याखुर्‍या माणसाच्या स्पर्षाप्रमाणे लागतोय हे जाणवले.
मनात काय आले कोण जाणे पण कर्व्यांचा पुतळा जिवंत होऊन आपल्याशी बोलु लागल तर असे वाटुन गेले.
मी घाबरलो अंगावर भर उन्हाळ्यात काटा उभा राहिला. पुतळ्याच्या हातातला सोडवुन घेणे विसरलो. अक्षरशः तिथेच थिजलो. तोंडातून शब्द फुटत नव्हते.
तेवढ्यात कोणीतरी क्लबचे सदस्य आले. त्यानी माझी अवस्था पाहिली. मला पाणी पाजले . खुर्चीत बसवले.
मग त्यानी देखील माझ्यासारखा अनुभव घेतला

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

23 Feb 2011 - 11:51 am | निवेदिता-ताई

खरच का????

विश्वास नाही बसत.....

वपाडाव's picture

23 Feb 2011 - 11:57 am | वपाडाव

काहीतरी नवीनच !!!
भयावह...

जायच्या आधी क्वार्टर घेतली होती की खंबा?

पाषाणभेद's picture

23 Feb 2011 - 11:58 am | पाषाणभेद

तुमचे मन त्यांच्या स्मृतीत गुंतले होते त्यामुळे तुम्ही अनुभव घेवू शकला.
इतर सदस्यांनाही तसाच अनुभव आला ही मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

घाबरण्यासारखं काही नाही. ते खूप चांगले होते. उलट भेटले असते तर देवदर्शन झाल्याचा आनंद झाला असता.

वपाडाव's picture

23 Feb 2011 - 12:13 pm | वपाडाव

आनंद कुणाला झाला असता कर्व्यांना की विजुभौंना ??

गवि's picture

23 Feb 2011 - 12:38 pm | गवि

अर्थात कर्व्यांना..

काय पण प्रश्न.. !?

नगरीनिरंजन's picture

23 Feb 2011 - 12:02 pm | नगरीनिरंजन

मूर्तिपूजेचा अतिरेक झाला की होतं असं कधी कधी. हा पण एक (अंध)श्रद्धेचाच भाग.

थंडीमुळे कर्व्यांचा पुतळा गारठला असावा
आणि विजुभौंच्या अंगावर, त्या गार स्पर्शाने शहारा आला असावा ;)

आत्मशून्य's picture

23 Feb 2011 - 1:47 pm | आत्मशून्य

.

टारझन's picture

23 Feb 2011 - 1:57 pm | टारझन

परवाच मी पुण्याला चाललो होतो .. बाईकवर .. तोच रस्त्यात मला एक गाय दिसली , तिने मला हाय केले .. पण मला घाई असल्याने मी तिला बाय म्हंटले , म्हणतात ना "जिसका टोपी उसका डिजे " . पण झाले काय ते माहित नाय , तिला आला राग .. तिने उगारली शिंगं माझ्यावर पण मी ही तयारीतंच होतो , तिला समोरुन चाल करुन येताना पाहुन मी माझं जॅकेट काढलं , आणि जरा वॉर्म अप केलं , शेवटी म्हंटलं च आहे "आंधळा दळतो आणि गणपा चिकन तंदुरी बनवतो " . तो गाय अजुंनंच चेकाळली आणि जोरात माझ्या रोखाने येऊ लागली .. मग मी सुमारे २०१ जोर आणि बैठका आलटुन पलटुन मारल्या , आता माझी बॉडी दबंग मधल्या सलमान खान सारखी फुगत होती नव्हे फुगलीच .. माझं टिशर्ट अगदी फाटलाच जसे "भित्र्या पाठी ब्रम्हराक्षस आणि नाना पाठी संपादक " तसेच अगदी . एक हवेचा झोका आला तोच मला चौकट राजा ह्या अप्रतिम सिनेमातले "एक झोका ... एक झोका .. चुके ... काळजाचा ठोका एक झोका " हे बालगीत आठवले त्यावरुन मला कोणीतरी नुकताच बालगितांचे आवाहन करणारा धागा काढल्याचे आठवले , हे सगळं मला एका सेकंदाच्या एक हजार दोनशे चाळीस (अंकी १२४१) वेळा आठवलं पण अक्षरात माझा एक लिहायचा राहिल्या , त्यामुळे बँकेने मला ५० रुपये चार्ज केले आणि माझी घोर अशी फसवणुक केली . त्याबद्दल मी बँका कशी फसवणुक करतात या धाग्यावरचा एक प्रतिसाद आठवुन हसत सुटलो तशी ती गाय मला वेडा समजली आणि ह्याच्या शी पंगा घेण्यात आपलंच नुसकान हाय हे तिला उमगले .... पण तोवर उशीर झाला होता ... म्हणतात ना " काळ आला होता पण नळाला पाणी नव्हतं ! " तसंच काहीसं . गायी चे अँटिलॉक डिस्क ब्रेकिंग फेल झाले आणि ती माझ्या अंगावर येउन आदळनार तोच मी पटकन मागे जाऊन तिचं शेपुट धरलं आणि अशी हॅलिकॉप्टर सारखी फिरवली .. अशी फिरवली ... की तिला चश्मा च लागला , म्हणतात ना "काखेत कळसा आणि गाई ला चश्मा " . तसं तोच गाई चा मोबाईल वाजला .. मोबाईल वर आलं "दुबैचा शेख कॉलींग .. दुबैचा शेख कॉलींग .. " गाई ने मला माझ्या आयडी चा वास्ता दिला तेंव्हा माझा राग मी आवरता घेतला , पण तरीही तिला मी असं सोडणार नव्हतो .. " डोक्यात शिंग असणारी ... " ह्या नव्या लेखमालेत तिच्यावर लेख पाडणारंच होतो .. शेवटी तिने ही मान्य केले संत कोदाराम आपल्या अभंगांत म्हणतात तेच सत्य .
"दुबैचा मित्र बोले तास भर ..
बोले भारंभर ... कोदा म्हणे "

असा अनुभव कोणाला आला असेल तर बोला , त्याच्या खरडवहीत " तुम्ही जोहार आहात " असं मोठ्या अक्षरात लिहील्या जाईल . :)

- विडीफुकु

मी ऋचा's picture

23 Feb 2011 - 2:22 pm | मी ऋचा

बचाआआआआआआआआओ!

___/\___

हे वाचून मेंदूवर परिणाम झाला.

मग त्याच चौकट राजा चित्रपटातले "मी असा कसा...वेगळा वेगळा.." आठवले.

वपाडाव's picture

23 Feb 2011 - 2:56 pm | वपाडाव

बा$$$$बौ....
मा$$$$यो...
मेलो....

विजुभौंचा धागा हॅक करण्याचा क्षीण प्रयत्न जमलाय ;)

प्यारे१'s picture

23 Feb 2011 - 3:38 pm | प्यारे१

'फिगर बदललेल्या मैत्रिणी' वाचलंस ना???

तरी सांगितले होते ना तुला, एवढा सीरियस घेऊ नको लेख म्हणून...

शरदिनी ताईंची कविता आल्याशिवाय हे नॉर्मलला यायचं नाही आता.

भय़ंकर ताई आपलं अभ्यंकर ताई...

या लवकर
सोडून गद्दाफी लिबियेच्य त्रिप्लोली
कैरो होस्नी मुबारक होऊन
काय करेल तो बाहरीन
लढ नाहीतर जाशील हरुन

असं काहीतरी ऐकवा त्या टापु (टारु पुणेरी) ला

मितभाषी's picture

23 Feb 2011 - 3:53 pm | मितभाषी

टार्‍या. =)) =))
मेलोरे भो!
आता जगतच नाही.
अगागाआआआआआआआ.

गजुभौ.

चिगो's picture

23 Feb 2011 - 5:09 pm | चिगो

अबे मारशील का साल्या? ऑफिसातली लोकं बघत हायत माझ्याकडं मी त्या येडबोग्यांन्ना मी काय सांगु पण शकत नाय. (ते अहोमिया हैत)..
इचिभन... मेलो रे बॉब्ब्ब्बो...

मिंटी's picture

23 Feb 2011 - 6:33 pm | मिंटी

__/\__

इन्द्र्राज पवार's picture

23 Feb 2011 - 6:36 pm | इन्द्र्राज पवार

टारझनभाऊ.....मी वाचून मेलो आहे. त्यामुळे जास्त लिहू शकत नाही. फक्त एकच सांगतो, 'लोकमंगल' बॅन्केने आमच्याकडून ५० नाही ५५ रुपये दंड घेतला होता.

जातो वर आता...!!!!!

टारोबांच्या खांद्यावरून वरच्या इन्द्राकडे जात असलेला इथला इन्द्रा

नरेशकुमार's picture

24 Feb 2011 - 8:56 am | नरेशकुमार

मी वाचून मेलो आहे. त्यामुळे जास्त लिहू शकत नाही.

टार्‍याचा प्रसाद वाचुन मेलेला देखिल एक ओळ लिहितो याचे,
आनि इंद्रा साहेब मेल्यानंतर सुद्धा लिहितात या दोन्हि गोष्टिन्चे आष्चर्य वाटले नाही.

दोन्हि साहेबांनी हळुवार घेने.

इन्द्र्राज पवार's picture

24 Feb 2011 - 9:28 am | इन्द्र्राज पवार

अहो नरेशकुमार जी....माणूस मेल्यावर डॉक्टरचे प्रमाणपत्र असल्याशिवाय घाटावरील कर्मचारी त्याच्या दफनास परवानगी देत नाही....म्हणजेच त्या काळापुरता तो 'मेलेला' नसतो असे कायदा सांगतो, त्याचाच फायदा मी घेतला आणि प्रतिसादाच्या त्या दोन ओळी टंकल्या. [अजूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने नव्याने इथे आलो आहे असे समजा !]

हळुवारपणेच घेतली पाहिजे टारझनभौची प्रेमळ तलवारबाजी....म्हणजे रक्तबंबाळ होण्याची भीती नसते.

इन्द्रा

मराठे's picture

23 Feb 2011 - 7:12 pm | मराठे

!!!! आवरा !!! :D :-D :lol:
___/\___

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Feb 2011 - 7:28 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Feb 2011 - 11:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

पैसा's picture

23 Feb 2011 - 11:54 pm | पैसा

hehe

शिल्पा ब's picture

24 Feb 2011 - 12:12 am | शिल्पा ब

हॅ हॅ हॅ

Nile's picture

24 Feb 2011 - 1:57 am | Nile

मेलो.. मेलो... मेलो.....

नरेशकुमार's picture

24 Feb 2011 - 6:45 am | नरेशकुमार

चित्र प्रसंग डोळ्यासमोर आनून हसुन हसुन येडा झालोय.
आजुबाजुचे म्हनु र्‍हायले असतिल कि मी पागल झालोय.

४ धाग्यावरचा प्रसाद एकाच ठिकानी देउन तु आपला मलबद्धकोष्ट( का काय ते) मोकळा केलासच शेवटी.
धन्य आहेस रे.

बादवे

हे सगळं मला एका सेकंदाच्या एक हजार दोनशे चाळीस (अंकी १२४१) वेळा आठवलं

one मिसिंग हे काही वेळानी लक्षात आले. आनि अजुन हसुन हसुन मेलो.

गुंडोपंत's picture

24 Feb 2011 - 8:48 am | गुंडोपंत

खल्लास आहेस लेका तू!

वारकरि रशियात's picture

24 Feb 2011 - 2:28 pm | वारकरि रशियात

टारझना, अरे पुढच्या वेळेसाठी कांही शिल्लक ठेवशील की नाही लेका !

बाबा रे!! इथे भेटलास वर भेटू नकोस!!!
आइ गं! मरेन हसून हसून..!

प्रीत-मोहर's picture

24 Feb 2011 - 9:07 am | प्रीत-मोहर

=)) =)) =)) =)) टार्‍या अशक्य आहेस रे ...हसुन हसुन पोटात दुखतय ...

रमताराम's picture

24 Feb 2011 - 12:09 pm | रमताराम

"आंधळा दळतो आणि गणपा चिकन तंदुरी बनवतो "
"भित्र्या पाठी ब्रम्हराक्षस आणि नाना पाठी संपादक "
" काळ आला होता पण नळाला पाणी नव्हतं ! "
"काखेत कळसा आणि गाई ला चश्मा "

=)). आयला पोट दुखायला लागलं बे. आता तू 'टारगट म्हणी' असा धागाच काढ लेका. किंवा तुझ्या सह्यांमधे आयडी विडंबनाऐवजी अशा म्हणींची मेजवानी दे आम्हाला. कसं म्हंता?

परिकथेतील राजकुमार's picture

24 Feb 2011 - 2:31 pm | परिकथेतील राजकुमार

टार्‍या सध्या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे. मजा आला बर्‍याच दिवसांनी.

बाकी कर्वे आजोबांनी आयुष्यात छोटेसे का होईना एखादे पाप अथवा चुक केली असावी त्यामुळे त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला.

महर्षि कर्व्यांनी महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहिणीला मराठा म्हणून शिक्षण संस्थेत प्रवेश नाकारला होता (असा आरोप त्यांच्यावर होतो. तो सत्य असावा असं माहितीवरुन दिसतं..)

असो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Feb 2011 - 3:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गवि, काय पण विषय काढलात !!!
आता "शब्दांची रत्ने" कशी उधळली जातील बघा.

गवि's picture

24 Feb 2011 - 3:48 pm | गवि

एका ब्रिगेडी साईटवर मी वाद घालत असता या वाक्याने गप्प व्हावे लागले होते.

नंतर चौकशी केली असता घटना खरी असल्याचे कळले. पण ती घटना त्यांच्या चरित्रातही आहे आणि श्री शिंदे यांना विश्वासात घेऊन ते केले गेल्याचे कळते.

कारण काहीही असले तरी तेवढे एक चुकलेच. अन्यथा त्यांचे कार्य अत्यंत महानच आहे आणि त्याविषयी काडीमात्र शंका नाही.

तसाही मी याने अस्वस्थ झालोच होतो. ही माहिती चुकीची आहे हे सिद्ध झालं तर चांगलेच वाटेल. अर्थात तो या धाग्याचा विषय नव्हे.

कच्ची कैरी's picture

23 Feb 2011 - 2:21 pm | कच्ची कैरी

>>कर्व्यांचा पुतळा जिवंत होऊन आपल्याशी बोलु लागला तर...
ह्या विषयावर एक धागा काढुन टाका ना मग !

होउ शकत!! कन्या शाळा त्यांचीच ना?

विजुभाऊ मला विश्वास आहे तुम्ही अशीच कहाणी नाही रचणार यावर.

श्रीराम गावडे's picture

23 Feb 2011 - 3:09 pm | श्रीराम गावडे

टारझनच्या मेंदुला काहि वायरि वेगेरे जोडुन त्याचा चलत चित्रपट पहायला मला आवडेल.
पण नंतर नॉर्मल जगणं मुश्किल होइल अस वाटतय.

पण प्रतिसाद भन्नाट आहे. सात सक्कं त्रिचेळिस सारखा.

पण विजुभाउ...........

योगप्रभू's picture

23 Feb 2011 - 3:40 pm | योगप्रभू

पुतळ्यांना अजाबात घाबरायचं न्हाई इजुभौ
समजा यकांदा पुतळा जिवंत झालाच तर त्यो पयला प्रश्न इच्यारेल
'काय रं? यवडा का निरखून बगतुयास?'
त्यावर आपन बिनधास्त सांगायचं, 'आमची कटर लाऊन पुतळ्याचे पाय तोडायची एजन्सी हाय. तुमचा बी अंदाज घेत व्हतो.'
मंग गंमत बगा. कोनचाबी पुतळा आसला तरी कसा धूमचकाट पळतुया.

(बरं झालं. तळमजल्यावरच थांबलात. त्या कन्याशाळेत तिसर्‍या मजल्यावर भूत असल्याचे लहानपणापासून ऐकिवात आहे.)

धमाल मुलगा's picture

23 Feb 2011 - 6:13 pm | धमाल मुलगा

लै दिवसांनी 'धुमचकाट' शब्द सापडला राव! :) मंडळ आपलं काच्चकन आभारी आहे!

विजुभौ,
म्हणुन म्हणतो, वयोमानानुसार जरा बेतानं घ्या राव.... :P

अवलिया's picture

23 Feb 2011 - 5:29 pm | अवलिया

:)

मुक्तसुनीत's picture

23 Feb 2011 - 7:32 pm | मुक्तसुनीत

लेख अतिशय आवडला. प्रामाणिकपणे लिहिला आहे असे वाटले. आपण निबर, संवेदनाहीन झालोत असं आपलं आपल्याला वाटत असतानाही केव्हातरी असा अनुभव येऊ शकतो.

टारु , बाबू , शिसानविवि आहे तुला. इथे भेटलास. वर नका भेटू !

आंसमा शख्स's picture

24 Feb 2011 - 8:23 am | आंसमा शख्स

अनोखा अनुभव आहे. आप्ल्यावर कुणाची तरी कृपा आहे असे वाटून गेले.

विजुभाऊ's picture

24 Feb 2011 - 2:11 pm | विजुभाऊ

मला तरे काय हौस आली होती.....मी कशाला कर्व्यांच्या पुतळ्याला शेकहॅन्ड करायला गेलो.
( बहुतेक कर्वे टारुच्या रुपात प्रतिसाद देवून गेले असावेत)

विजुभौ टर्‍याने तुमच्या श्रीखंडाच पार पियुष केल की हो .
केल तर केल, वर ते एकट्यानेच गट्टं पण केल. =)) =))

विजुभाऊ's picture

24 Feb 2011 - 3:27 pm | विजुभाऊ

खरे आहे. आलीया भोगासी ,असावे सादर ,ओढूनी चादर