मागच्या आठवड्यात राजगड ला जाऊन आलो..वेळेअभावी वर्णन लिहित नाहीये.
शिवजयंती निमित्त काही छायाचित्र.
सूर्योदय !
पद्मावती माचीवरून दिसणारा बालेकिल्ला
सुवेळा माची
देवी पद्मावती.
पद्मावती माचीवरून दिसणारा तोरणा
पाली दरवाजा-पद्मावती माचीवरून. ह्याच दरवाजाने आम्ही गडावर प्रवेश केला.
अंबरखाना
तेहळणी बुरुज.
संजीवनी माची
संजीवनी माचीवरून दिसणारा बालेकिल्ला.
सुवेळा माचीवरील नेढ.
सुवेळा माची
सुवेळा माचीमाचीवरून दिसणारा बालेकिल्ला आणि महादरवाजा.
पाली दरवाजा.
पाले गावातून दिसणारा राजगड.
परतीच्या वाटेवर फक्कड Maggi .
प्रतिक्रिया
20 Feb 2011 - 7:06 pm | प्रचेतस
महाराजांच्या चरणी नतमस्तक.
सुंदर छायाचित्रे.
संजीवनी माचीच्या चिलखतामध्ये फिरलात का? एकदम अविस्मरणीय अनुभव आहे तो.
20 Feb 2011 - 9:31 pm | स्वतन्त्र
धन्यवाद !
होय, संजीवनी माचीच्या चिलखतात देखील फिरलो होतो.
छायाचित्रांची संक्या पाहता टाकले नव्हते.त्याबद्दल दिलगिरी वयक्त करतो.
पण आता आपल्या आग्रहास्तव इथे टाकत आहे.
20 Feb 2011 - 7:14 pm | सुनील
छान फोटो (शेवटचा म्यागीचा टाकला नसतात तरी चालले असते!)
आता वेळात वेळ काढून प्रवास वर्णनदेखिल लिहा.
21 Feb 2011 - 1:19 pm | गणपा
अगदी असेच म्हणतो.
20 Feb 2011 - 8:51 pm | भास्कर केन्डे
राजगडाचे दर्शन दिल्याबद्दल आभार!
आपला,
(शिवभक्त) भास्कर
21 Feb 2011 - 1:24 am | चिंतामणी
राजांचा गड. गडांचा राजा. राजगड.
आठवणी जाग्या झाल्या.
बालेकील्याची चढण (दगडातील खाचा) आणि चोर दरवाजाची वाट याचे फोटो टाकले असते तर अजून बहार आली असती.
राजांचा गड. गडांचा राजा. हे शब्द आहे गोनीदांचे.
आत्त्तापर्यन्त ४-५ वेळा गडांच्या राजाचे दर्शन झाले आहे.
एका भेटीत दस्त्रुरखुद्दा गोनीदांचा सहवास लाभला होता. त्यांच्या मुखातुन गडाची महती, आजुबाजुच्या परिसराची माहिती इत्यादी ऐकुन धन्य झालो.
या धाग्यामुळे
राजगड
http://www.misalpav.com/node/14832
सिंहगड ते राजगड... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...
http://www.misalpav.com/node/12316
राजगड... गुंजवणे दरवाज्याने
http://www.misalpav.com/node/11195
या धाग्यांची आठवण झाली.
22 Feb 2011 - 10:41 am | स्वतन्त्र
धन्यवाद !
खरच तुम्ही धन्य झाला आहात !
वल्ली ह्यांच्या विनंतिस मान देऊन फोटो टाकले..तसेच राजगड बालेकिल्ल्याचे देखील फोटो लवकरच टाकण्यात येतील.
ते दुसर्या मित्राच्या कॅमेर्यात असल्यामुळे ते मिळायला थोडा विलंब होत आहे.
21 Feb 2011 - 7:33 am | ५० फक्त
मजा आली फोटो पाहुन, आता नक्किच सुरु करावे लागेल गड किल्ल्यांवर फिरणे.
21 Feb 2011 - 8:32 am | अवलिया
शेवटचा फोटो सोडून सर्व उत्तम !!
21 Feb 2011 - 9:46 am | अमोल केळकर
असेच म्हणतो
अमोल
21 Feb 2011 - 12:28 pm | कच्ची कैरी
राजगडाची सैर करुन आणल्या बद्दल धन्यवाद ! वेळ मिळाल्यास वर्णनही लिहा वाचण्यास उत्सुक आहोत .
21 Feb 2011 - 10:01 pm | गणेशा
मस्त फोटो
23 Feb 2011 - 12:57 am | मनराव
मस्त, पुन्हा एकदा जाऊन आलो, चित्रां मधुन.......... :)
3 Mar 2011 - 10:17 pm | मॅन्ड्रेक
मि मागच्या शनिवारी गेलो होतो, फोटु टाकतोच.