मराठी व इंग्रजी रंगभूमीवरचे एक ज्येष्ठ कलावंत विहंग नायक यांचे अपघाती निघन झाल्याची बातमी आत्ताच कळली. बारामती येथे चित्रिकरणासाठी जाताना पनवेल येथे कळंबोलीजवळ हा अपघात झाला.
अत्यंत डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व असलेला, रंगभूमीवरचा एक हरहुन्नरी आणि अतिशय गुणी कलाकार अकाली हरपला आहे.
संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे या थोर कलावंताला विनम्र आदरांजली!
तात्या.
प्रतिक्रिया
9 Jun 2008 - 11:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रंगभूमीवरचा हरहुन्नरी कलाकाराला भावपुर्ण आदरांजली !!!
9 Jun 2008 - 11:38 am | यशोधरा
ओह!! :(
रंगभूमीवरील हरहुन्नरी कलाकाराला भावपूर्ण आदरांजली !!!
9 Jun 2008 - 2:01 pm | केशवराव
७०/ ७१ साली आलेले 'पाहिजे जातीचे ' हे विजय तेंडुलकरांचे नाटक पाहिले होते. त्यातला विहंग अजून आठवतो.[ आणि नानाचा बबन्या.] मनःपूर्वक आदरांजली.
10 Jun 2008 - 9:13 am | हेरंब
'पाहिजे जातीचे' छबिलदासला पाहिल्यानंतर 'विहंग नायक आणि नाना ही व्यक्तिमत्वे कायमची लक्षांत राहिली. अतिशय दु:खद घटना.
9 Jun 2008 - 7:35 pm | प्रमोद देव
विहंग नायकांना माझीही विनम्र आदरांजली.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
9 Jun 2008 - 7:53 pm | अविनाश ओगले
माझीही विनम्र आदरांजली.
9 Jun 2008 - 8:05 pm | मुक्तसुनीत
.. मीदेखील शोकात सामील आहे.
9 Jun 2008 - 8:10 pm | नंदन
विहंग नायकांना माझीही नम्र आदरांजली. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांची भूमिका असलेले 'स्थळ: स्नेहसदन' हे गोवा हिंदू असोसिएशनचे
नाटक पाहिले होते. बायकोशी भांडणार्या, व्यायामात टाळाटाळ करणार्या वृद्धाची त्यांची भूमिका टिपीकल असली, तरी प्रेक्षकांची दाद घेऊन गेली होती.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
9 Jun 2008 - 8:11 pm | चतुरंग
फारच वाईट झाले. हतबल.
चतुरंग
9 Jun 2008 - 9:05 pm | सर्वसाक्षी
एक हरहुन्नरी कलावंत हरपला
9 Jun 2008 - 9:56 pm | प्रभाकर पेठकर
विहंग नायक, एक सक्षम कलाकार, अकाली काळाच्या पडद्याआड गेला. धक्कादायक बातमी. मन सुन्न झाले.
9 Jun 2008 - 10:20 pm | विसोबा खेचर
भडकमकर मास्तरांकडून विहंग यांच्यावर काही विशेष वाचायला मिळेल अशी आशा करतो..
तात्या.
12 Jun 2008 - 12:19 am | भडकमकर मास्तर
... हा धागा उशीराच पाहिला...आणि काल ही आठवण लिहू शकलो नाही...
,,...
"पाहिजे जातीचे " या तेंडुलकर लिखित आणि " अरविन्द देशपांडे दिग्दर्शित नाटकात विहंग नायक आणि नाना पाटेकर काम करत असत...
या नाटकासंदर्भात त्यांची आठवण...... त्यांच्याच शब्दांत...
नाटकातील सर्वात कठीण प्रसंग ... मी नानाच्या श्रीमुखात भडकावतो तो...पपांनी ( अरविंद देशपांडे) हा प्रसंग बसवताना नानाला गालावर हात ठेवायला सांगितला, परंतु नानाच्या बेरड प्रकृतीला हे बरे वाटेना...आणि पहिल्या प्रयोगापासून तो डायरेक्ट गालावर मारून घेऊ लागला...जराही बेअरिंग न सोडता मी प्रत्येक वेळी ओठातल्या ओठात "सॉरी नाना " म्हणत राहिलो .. हे प्रकरण बराच काळ चाललं ... मागाहून नाना गालावर हात ठेवू लागला आणि माझं सॉरी म्हणणं पण बंद झालं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
12 Jun 2008 - 12:19 am | भडकमकर मास्तर
... हा धागा उशीराच पाहिला...आणि काल ही आठवण लिहू शकलो नाही...
,,...
"पाहिजे जातीचे " या तेंडुलकर लिखित आणि " अरविन्द देशपांडे दिग्दर्शित नाटकात विहंग नायक आणि नाना पाटेकर काम करत असत...
या नाटकासंदर्भात त्यांची आठवण...... त्यांच्याच शब्दांत...
नाटकातील सर्वात कठीण प्रसंग ... मी नानाच्या श्रीमुखात भडकावतो तो...पपांनी ( अरविंद देशपांडे) हा प्रसंग बसवताना नानाला गालावर हात ठेवायला सांगितला, परंतु नानाच्या बेरड प्रकृतीला हे बरे वाटेना...आणि पहिल्या प्रयोगापासून तो डायरेक्ट गालावर मारून घेऊ लागला...जराही बेअरिंग न सोडता मी प्रत्येक वेळी ओठातल्या ओठात "सॉरी नाना " म्हणत राहिलो .. हे प्रकरण बराच काळ चाललं ... मागाहून नाना गालावर हात ठेवू लागला आणि माझं सॉरी म्हणणं पण बंद झालं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Jun 2008 - 12:47 am | बिपिन कार्यकर्ते
विहंग नायक यांना माझीही आदरांजली. एक सहज अभिनय करणारा कलावंत हरपला. लहानपणी दूरदर्शन वर 'गजरा' नावाचा कार्यक्रम होत असे. त्यात पहिल्यांदा या गुणी कलावंताची ओळख झाली होती. मराठी कलावंतांच्या मागे अपघाती किंवा अकाली मृत्यूचा काय शाप आहे हे कळत नाही. जयराम हर्डीकर, शांता जोग, अरूण सरनाईक, भक्ति बर्वे आता विहंग नायक...
बिपिन.
10 Jun 2008 - 2:03 am | विसोबा खेचर
मराठी कलावंतांच्या मागे अपघाती किंवा अकाली मृत्यूचा काय शाप आहे हे कळत नाही. जयराम हर्डीकर, शांता जोग, अरूण सरनाईक, भक्ति बर्वे आता विहंग नायक...
हम्म! ही गोष्ट मात्र खरी आहे. हा एक विचित्रच योगायोग म्हणावा लागेल!
आपल्या सगळ्यांनाच एकाच गोष्टीपुढे नेहमी मान झुकवावीच लागते आणि ती गोष्ट म्हणजे नियती! अपघाताचे निमित्त साधून नियतीने ही अतिशय उमदी लोकं आपल्यातून उचलली आहेत!
सिंहासन सिनेमात मुख्यमंत्र्याच्या भूमिकेचं अतिशय उत्तम रितीने बेअरिंग सांभाळणार्या अरूण सरनाईकासारख्या एका देखण्या आणि उमद्या नटाचा असाच अपघाती अंत व्हावा, ही गोष्ट आज इतक्या वर्षांनंतरही तेवढीच चटका लावून जाते! माझा अत्यंत आवडता कलाकार होता तो!
आपला,
(नियतीपुढे हतबल) तात्या.
10 Jun 2008 - 7:26 am | धोंडोपंत
बातमी वाचून आम्हांला जबरदस्त धक्का बसला.
आमची श्री. विहंग नायक यांना भावपूर्ण आदरांजली.
आपला,
(खिन्न) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
10 Jun 2008 - 9:29 am | चित्रा
खूपच बोलका चेहरा असलेले विहंग नायक दूरदर्शनमुळे चांगलेच आठवतात. तसे दूरदर्शनवर अनेक चेहरे दिसतात, काही विसरले जातात, पण विहंग नायक आपल्या वैशिष्ट्यांमुळे लक्षात राहिले.
10 Jun 2008 - 10:31 am | आनंद घारे
एक आदर्शवादी कर्तव्यदक्ष शिक्षक, प्रेमळ व भाबडा बाप आणि अत्यंत सज्जन गृहस्थ अशा भूमिकेतून ते गेले कांही महिने रोज टीव्हीवर दिसत असत. त्यांनी आमच्या मनात घर केले होते. अशा गुणी कलावंताचे असे अकाली निधन फारच दु।खदायक आहे. त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली.
10 Jun 2008 - 4:05 am | शरुबाबा
एक आदर्शवादी कर्तव्यदक्ष शिक्षक, प्रेमळ व भाबडा बाप आणि अत्यंत सज्जन गृहस्थ अशा भूमिकेतून ते अवघाची संसार या मालीकेत दिसत असत
11 Jun 2008 - 4:46 pm | जयवी
विहंग नायक यांना माझीही आदरांजली.
अमीरखान सोबतच्या जाहिरातीत त्यांच्या फक्त चेहेर्यावरचे भावच सगळं बोलून गेले होते. धक्काच बसला ही बातमी ऐकून :(
11 Jun 2008 - 5:56 pm | शितल
हे वाचुन मन सुन्न झाले आणि त्या॑नी केलेले अभिनय माझ्या डोळ्यासमोरून गेले , खर्॑च गुणी अभिनेता होता.
विह॑ग नायक या॑ना माझीही आदरा॑जली.