शुभ्लग्न

साबुदाणा खिचडी's picture
साबुदाणा खिचडी in जनातलं, मनातलं
13 Feb 2011 - 11:11 am

शुभलग्न
व्यक्तिगत जीवन व सामाजिक जीवन ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे कुटुंबव्यवस्था असे म्हणता येईल .दोन व्यक्ती कुटुम्ब व्यव स्थे मुळेएकत्र होतात .अशी अनेक कुटुंबे एकत्र होऊन समाज बनतो .

शुभलग्न
व्यक्तिगत जीवन व सामाजिक जीवन ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे कुटुंबव्यवस्था असे म्हणता येईल .दोन व्यक्ती कुटुम्ब व्यव स्थे मुळेएकत्र होतात .अशी अनेक कुटुंबे एकत्र होऊन समाज बनतो .त्यामुळे
कुटु म्ब व्यवस्था हा समाजाचा एक आधारस्तंभच असतो .कुटुंबाचा मुख्य पाया म्हणजे विवाहसंस्था .चार अस्रामापैकी गृह्स्थास्रम हा हिंदुधर्मानुसार माणसाच्या आयुष्याचा एक मोठा भाग .
माझ्या लहानपणी 'शुभलग्न ' किंवा 'शुभविवाह' लिहिलेली गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका घेऊन मुलाचे अगर मुलीचे आई वडील येत .आई ठेवणीतल लुगड नेसून तर वडील कोटटोपी घालून येत
व निमंत्रणपत्रिकेवर अक्षता ठेवून ती माझ्या वडिलांच्या हातात देत .वडीलही डोक्यावर टोपी चढवून ती स्वीकारत असत . नंतर आईचहापाणी करून त्या बाईंची खणानारळाने ओटी भरतअसे .
असा रिवाज असायचा .ह्यावरूनच या शुभकार्याची पवित्रता आपल्या लक्षात येते . विवाहाच्या शास्त्रोक्तविधीनुसार प्रत्यक्ष विवाहाच्या शुभमुहूर्तावर 'मंगलाष्टकेम्हटली जातात .त्यांत वधुवरांसाठी
देवदेवतांचे आशीर्वाद मागितले जातात व हि मंगलकार्याची 'शुभ वेळ 'त्यांच्याआयुष्यात 'मंगलमय 'ठरो हि मागणी देवाकडे केली जाते .नंतर होमहवन सप्तपदी यासारख्या विधीन्वये वधूवरांना
एकमेकाबद्दलची कर्तव्ये ,प्रतिज्ञा वगैरेची जाणीव दिली जाते . परंतु ह्या सर्व सोपस्कारात वधुवरांची मानसिकता लक्षात घेता संपूर्ण विधीमागील मतितार्थ एक चित्ताने श्रवण करण्याची त्यांची विवेकबुद्धी
किती जागृत असावी ह्याचा आपल्या मनाशी विचार करूया .वाचकांपैकी कित्येक जणह्या प्रवाहातून गेले असतीलच . कांही सुज्ञ लोकांच्या आणि हे कार्य संपन्न करणाऱ्या उपाध्यायांच्या के लक्षत
आल्यावर त्यांनी विधीबरोबरच त्याचे तात्विक महत्व वधूवरांना समजावून देण्यास सुरुवात केली .पण पुढे हे वेळेनुसार होत गेले तर वेळेअभावी वगळले गेले व कार्यात सोनंना ण,वरती ,झगमगाट,ह्याचेच
महत्व अधिक झाले .व तो एक 'प्रेस्टीज इशु'होऊ लागला .'कर्ज काढून सण करा 'अशी वधूवर पक्षाची स्थिती झाली . ह्या सर्वाला उपाय म्हणून सुधारित समाजाने 'रजिस्टरपद्धती 'सुरु केली
ह्या सर्व गोष्टींचा सविस्तर उहापोह करण्याचा माझा हेतू हाच कि अशा प्रवाहात वाहून गेलेल्या समाजात विवाहासारख्या शुभकार्याची 'नैतिकता 'कितीतरी 'ढेपाळलेली'होऊ लागली
त्याचेच परिणाम कुटुंबसंस्थेवर व कालांतराने समाजावर झालेले दिसून येत आहेत .अत्याधुनिक युगात व्यक्तिगत विकास प्रचंड वेगाने होऊ लागला .शिक्षणाच्या 'अर्थार्जनाच्या संधी वाढत गेल्या .
अविवाहित 'घटस्फोटीत 'मुलामुलींची संख्या वाढत आहे . अनेक कुटुंबात 'कुठेतरी ',कांहीतरी 'खटकतंय असे वाटू लागले आहे .'सुखी माणसाचा सदरा शोधावा 'असे कुटुबंच्या बाबतीत दिसतेय .
जिकडे तिकडे प्रचंड चढाओढ 'असंतुष्टता 'गळचेपी ,भ्रष्टाचार याचेच वातावरण आणि म्हणून कुठेतरी मन;शांतीच्या वाटा शोधाव परत येऊन त्याच विषचक्रात पडा.अशी हि समाजाची घुसमट पहिली
कि असे कुणाचे 'कसे ',कुठे,'केव्हा ,'आणि 'काय 'चुकतेय म्हणून अशी उलथापालथ दिसते ,माणूस माणसाला नकोसा का होतोय ?प्रत्येक जण स्वार्थीच का होतोय ?आईवडील -मुल ,भाऊ-बहिण ,
पतीपत्नी हि जिवाभावाची नाती एव्हढी तणावाची का वाटतात ?
ह्या सर्व परिस्थितीच्या मुळाशी कुटुंबव्यवस्था किंवा विवाहसंस्था आहे का ?जी आपल्या धर्मशास्त्राच्या नितीमुल्यांवर आधारित आहे .असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे किती योग्य आहे ?
याचा विचार माझ्या मनात येतो .तुमच्या येईल का?

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

13 Feb 2011 - 11:25 am | आजानुकर्ण

अविवाहित 'घटस्फोटीत 'मुलामुलींची संख्या वाढत आहे

हे कसे शक्य आहे याबाबत अधिक जाणून घ्यायला आवडेल.

पिवळा डांबिस's picture

13 Feb 2011 - 11:55 am | पिवळा डांबिस

अविवाहित आणि घटस्फोटित एकाच वेळेस? हे काय गौडबंगाल आहे?
:)
आणि दर वेळेस "घटस्फोटित" या शब्दासरशी अंग काढणे आता पुरे....
गाडी अगर चलती नही ठीकसे तो रखनेमें क्या मतलब?

(खुद के साथ बकवासः आयला,पिडां कर्णाबरोबर सहमत? हा म्हणजे कपिलाषष्ठीचा योग झाला!!!!:))

काय हो पिडाकाका, अहो विरामचिन्ह गायब असल्याने अर्थाचा अनर्थ करु नका. मिपाच्या आद्य संस्थापकांच्या आत्माला वेदना होतील. मिपावर शुद्धलेखनाचे प्रस्थ माजु नये याकरता ते कायम प्रयत्नशील होते. :-)

लेख चांगला आहे. अजुन काही प्रगल्भ प्रतिसाद हवे असतील तर अजुन एका संस्थळावर हा लेख टाकावा अशी मी धागाकर्त्यांना विनंती करतो. :-)

पिवळा डांबिस's picture

13 Feb 2011 - 12:18 pm | पिवळा डांबिस

मिपाच्या आद्य संस्थापकांच्या आत्माला वेदना होतील.
अहो ते आहेत अजून!!! काय हे!!!!!
:(
(खुद के साथ बकवासः आयला, आमची विरामचिन्हे काढतायत हे सहजबुवा!!!!)
हा प्रतिसाद अवांतर ठरू नये म्हणूनः लेख चांगला आहे. अजुन काही प्रगल्भ प्रतिसाद हवे असतील तर अजुन एका संस्थळावर हा लेख टाकावा अशी मी धागाकर्त्यांना विनंती करतो.

सहज's picture

13 Feb 2011 - 12:21 pm | सहज

त्यामुळे जीवीत व्यक्तीमधेही आत्मा असतो यावर आमचा विश्वास आहे. असो आधीक विषयांतर नको म्हणुन इथे थांबतो. यावर आधीक चर्चा खरड-व्यनिमधे.

पंगा's picture

13 Feb 2011 - 12:26 pm | पंगा

लेख चांगला आहे. अजुन काही प्रगल्भ प्रतिसाद हवे असतील तर अजुन एका संस्थळावर हा लेख टाकावा अशी मी धागाकर्त्यांना विनंती करतो.

सहमत.

लेख चांगला माहितीपूर्ण आहे. अन्यत्र टाकला, तर त्याचे चीज होऊ शकेल असे वाटते. लेखकाने गंभीरपणे विचार करावा, ही विनंती.

आजानुकर्ण's picture

13 Feb 2011 - 12:33 pm | आजानुकर्ण

अन्यत्र टाकला, तर त्याचे चीज होऊ शकेल असे वाटते.

चीज करण्याची प्रक्रिया औटसोर्स करून, मिपावर फक्त विरजणच टाकून मिळते काय?

पंगा's picture

13 Feb 2011 - 12:36 pm | पंगा

जेथे जे काम उत्तम प्रकारे होऊ शकते, तेथेच ते केले जावे, नाही का?

आजानुकर्ण's picture

13 Feb 2011 - 12:38 pm | आजानुकर्ण

सहमत. तुकोबांनी म्हटलेच आहे. 'तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे'. शिवाय मिपावर जातीय लेखनाला बंदीही आहे.

पंगा's picture

13 Feb 2011 - 12:50 pm | पंगा

तुकोबांनी म्हटलेच आहे. 'तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे'.

सहमत. शिवाय, "कचरा कोंडाळ्यातच टाकावा" असेही कोणीतरी, कधीतरी, कुठेतरी म्हटलेले आहे, त्याचीही या निमित्ताने आठवण झाली.

आजानुकर्ण's picture

13 Feb 2011 - 12:52 pm | आजानुकर्ण

:)

पंगा's picture

14 Feb 2011 - 7:22 am | पंगा

जेथे जे काम उत्तम प्रकारे होऊ शकते, तेथेच ते केले जावे, नाही का?

"आणि तेही स्वस्तात, किंबहुना फुकटात!" हा भाग विसरलोच!

कृपया आपल्या प्रतीत सुधारणा करून घ्यावी.

धन्यवाद.

आजानुकर्ण's picture

14 Feb 2011 - 9:47 am | आजानुकर्ण

'फुकटात' हा शब्दप्रयोग आपण केवळ पैशाची देवाणघेवाण या दृष्टिकोणातून वापरला आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. जेथे कुठे हे काम उत्तम प्रकारे होऊ शकते तेथे काम करणारे लोक वेळेचा, विजेचा आणि ब्यांडविड्थचा अपव्यय करतातच. त्यासाठीच 'वेळ खर्च केला' वगैरे दावे केले जातात. किंबहुना तो केल्याशिवाय हे काम होऊच शकत नाही. त्यामुळे हे काम फुकटात होण्याचा आपला दावा आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खरा नाही असे वाटते. क्लिंटन किंवा थत्ते यांसारखे मिपावरील अर्थतज्ज्ञ याबाबत अधिक माहिती देऊ शकतील.

पंगा's picture

15 Feb 2011 - 10:04 am | पंगा

...पास-ऑन होत नाही. सबब शून्य आहे.

अवांतर: अतिरिक्त वीज, वेळ आणि ब्यांडविड्थ तूर्तास तेथे मुबलक असावी, अशी अटकळ आहे. आणि म्हणूनच तिचा आकार न लावता काम करता येणे तेथे शक्य असावे. 'अती तेथे माती' या उक्तीप्रमाणे, या राशी - विशेषतः वेळ - तेथे बहुधा मातीमोल असाव्यात. पण असोत किंवा नसोत, या राशींचे मूल्य जोपर्यंत आकारले जात नाही, तोपर्यंत त्याचा विचार करण्याची येथे आवश्यकता आहे, असे वाटत नाही.

या राशींचे मूल्य आकारले जाऊ लागून त्याने या 'विशिष्ट सेवे'ची किंमत वर गेल्यास - थोडक्यात लई बिल वाढल्यास - त्यांची सेवा काँपिटीटिव राहणार नाही. त्या प्रसंगी या एकंदर आउटसोर्सिंग भानगडीचा पुनर्विचार करता येईल - त्यात अवघड असे काही नाही. पण तूर्तास तशी आवश्यकता वाटत नाही.

तसेही, या व्यवहारात सेवाउपभोक्त्यापेक्षा सेवादात्याची गरज कायमच अधिक असल्याकारणाने, तशी वेळ कधी येईल असे वाटत नाही.

नरेशकुमार's picture

13 Feb 2011 - 12:36 pm | नरेशकुमार

काही म्हणा ही चीज (पक्षी:लेख) आहे बडी मस्त मस्त.

मिपावर नुसते विरजण टाकून मिळत नाही अजूनही बरेच काही मिळते

गोगोल's picture

13 Feb 2011 - 12:34 pm | गोगोल

पण अजून जरा चांगला करता आला असता.
पहीला प्रयत्न सुन्दर.

आजानुकर्ण's picture

13 Feb 2011 - 12:36 pm | आजानुकर्ण

साबुदाणा खिचडी यांनी उपवासाला एकेरी अवतरणचिन्हासोबत इतर विरामचिन्हेही चालतात हे जाणून घ्यावे असे वाटते.

आत्मशून्य's picture

13 Feb 2011 - 4:01 pm | आत्मशून्य

ह्या सर्व परिस्थितीच्या मुळाशी कुटुंबव्यवस्था किंवा विवाहसंस्था आहे का ?जी आपल्या धर्मशास्त्राच्या नितीमुल्यांवर आधारित आहे .असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे किती योग्य आहे ? याचा विचार माझ्या मनात येतो .तुमच्या येईल का?

स्त्रीमूक्तीच्या दीशाहीन कल्पनांनी आज ही वेळ आली आहे. कोणत्याही पूरूशाच्या मनात असलेल्या कौटूंम्बीक आपलेपणाच्या तरल भावनेला, आज तथाकथीक सबल बनण्याच्या दावा करणार्‍या परंतू सदोष मनोव्यवस्थेला बळी पडलेल्या हेकेखोरपणे मी माझे आणी माझ्या भौतीक सूखाच्या मालकत्वाच्या आड येणार्‍या प्रत्येकाला नमोहरम करण्याची/ झीडकारण्याची अथवा तूछ्च लेखायची अत्यंत तीरस्कारणीय पध्दत अनुसरणार्‍या परंतू ध्येयाचा पत्ता नसलेल्या चाचपडणार्‍या जीवांप्रमाणे जीवनाला कवटाळण्याची आस बाळगून, होरपळून काढणार्‍या स्त्रीयांच्या जीवन जगण्या बद्दलच्या चूकींच्या संकल्पनांचा हा परीपाक आहे. बाकी ये तो साला ट्रेलर हय, पूरी पीक्चर तो अभी बाकी है रे मेरे डोस्ट.

अविनाशकुलकर्णी's picture

14 Feb 2011 - 10:45 am | अविनाशकुलकर्णी

ह्या सर्व परिस्थितीच्या मुळाशी कुटुंबव्यवस्था किंवा विवाहसंस्था आहे का ?

ज्यांना विवाह संस्था नको त्यांना आता लिव्ह इन रिलेशन चा पर्याय पण आहे व त्याला मान्यता आहे..ते ट्राय करुन बघण्याचा पर्याय उपलब्ध आहे..

पर्याय आहे त्याचा वापर करा व विवाहसंस्थेस दोष देणे थांबवा,....

नविन अंगिकारायचे धैर्य नाहि.....जुन्याच्या चुका काढुन काय होणार आहे?