मागील भाग - http://misalpav.com/node/16707
***
अॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय यात साम्य काय आहे आणि यावर काहीतरी लिहा असे जर सांगितले तर आपल्यापैकी किती जणांचे डोके चालेल हे मला माहित नाही. किमान मी तरी असे काही लिहू शकणार नाही हे नक्की. लिहिल्यानंतर लोकांना ते आवडेलच याची खात्री नाही. पण काही जण मात्र आरामात अशा वरवर एकमेकांशी संबंध नसलेल्या शब्दांच्या शीर्षकाचा लेख लिहितात आणि तो वाचला की आपल्याला वाटते "अरे हो यार ! आपण पण असे लिहू शकलो असतो !! " पण आपण लिहू शकत नाही आणि तो लेखक लिहू शकतो हा फरक कायम रहातोच.
वाचा तर -
इराण म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा मला आठवतो तो 'कोपर्यावरचा इराणी'. मुंबईत एके काळी बहराला आलेली ही जमात आजकालच्या पिढीला माहीतदेखील असेल की नाही, अशी शंका येते. बरे आपण म्हणावे "तो कोपर्यावरचा इराणी.." आणि समोरच्याने "कोण रे?" असे विचारून आपलेच दात घशात घालावेत, अशी स्वतःची गत करून घ्यायला मला तरी आवडायचे नाही. इराण्याला नाव नसतेच. ज्याच्या हाटेलावर नावाची पाटी असेल, तो अस्सल इराणी नाहीच. किंबहुना तो नेहमी कुठल्यातरी कोपर्यावरचाच असल्याने नि तुम्ही मुंबईत जेथे कोठे असाल, तिथून कोपरभरच लांब असल्याने 'कोपर्यावरचा इराणी' इतकीच त्याची ओळख पुरेशी असते. मग ते भेटीचे ठिकाण असो, नवख्या माणसाने पत्ता चुकू नये म्हणून सांगायची खूण असो, सकाळी कचेरीत जायच्या आधी ब्रून-मस्का किंवा बन-मस्का, आम्लेट-पाव नि कटिंग हा ठरलेला नाश्ता हाणायची जागा असो की फुकटात पेपर वाचायला मिळायचे नि त्यातील बातम्यांचा काथ्याचे (व घड्याळ्याच्या काट्यांचे!) कूट करायचे वाचनालय! कॉलेजात जायला लागल्यावर मग घरी येताना मटण पॅटिस किंवा खिमा पॅटिस, टोस्ट किंवा खारी, कधी लहर आलीच तर पुडिंग, चहा नि सिगरेट असा शाही बेत मित्रांच्या संगतीने जमवायचा. तुम्ही नेहमीचे गिर्हाइक असाल, तर तुम्हाला खुर्ची उलटी फिरवून बसण्याचीही मुभा असते. शक्य तितक्या जुनाट काळ्या रंगाची खुर्च्या-टेबले, त्यांवर तितक्याच उठून दिसणार्या पांढर्या कपबशा नि बाउल्स, स्टीलचे चकचकीत चमचे आणि रोमन आकडे असलेले, टोल्यांचे पण कधी टोले न वाजणारे घड्याळ ही अस्सल इराण्याची ओळख आहे. कालौघात त्याच्या पुढील पिढीतील नतद्रष्टांनी हाटेलांना 'कॅफे गुडलक' किंवा तत्सम नावे देणे, आतले फर्निचर नूतनीकरणाच्या नावाखाली बदलणे, विनाकारण उत्तर भारतीय नि दाक्षिणात्य पदार्थही उपलब्ध करून देणे वगैरे सांस्कृतिक भेसळ करून ही ओळख पुसायला सुरुवात केली. मॅक्डोनाल्ड वगैरे चालू झाल्यावर तर सगळी पिढीच बिघडू लागली; पण निष्ठावान खवय्या इराण्याला विसरला नाही नि त्याच्याच जिवावर उरलासुरला इराणी अजूनही तग धरून आहे. अंधेरी स्टेशनबाहेरील मॅक्डोनाल्ड मध्ये जितकी गर्दी असते त्याच्या अनेकपट गर्दी समोरच्या इराण्याकडे असते! मॅक्डीच्या बाहेरील जोकर जितके लक्ष वेधून घेत नाही तितके इराण्याच्या बसक्या कपाटाच्या काचेमागील पिवळाजर्द वर्ख नि पापुद्रे ल्यालेले नि वेड लावणारा घमघमाट सुटलेले खिमा पॅटिस, मटण पॅटिस, खारी, मावा केक वगैरे मला खुणावत असतात.
अधिक वाचण्यासाठी - http://misalpav.com/node/12015
***
पाऊस आणि मनुष्य यांचे नाते काय आहे हे शब्दांत सांगता येणे अवघड आहे. पावसावर बहुधा प्रत्येक जण एकदा तरी काहीतरी लिहितच असतो. प्रत्येक कवी कधी ना कधी पावसाचा संदर्भ घेतच असतो. पावसाशी प्रत्येकाच्याच काहीना काही आठवणी निगडीत असतातच. प्रत्येकाच्या मनातल्या कुठल्यातरी कोपर्यात पाउस कधीचा पडत असतोच असतो.
घाटातला पोपटीपिवळा रंग उतरणीला लागलेल्या पावसातही आपला ताजेपणा टिकवून होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाल्यासारखा. खोपोली ते लोणावळा पट्ट्यामध्ये कोसळणारे दुधी धबधबे, कड्याकपारीमधून अचानक दिसणारे फेसाळते झरे मनातही कित्येक खळखळत्या आठवणी जागे करून जात होते. अशाच एका पावसाने कधी माझी आजी माझ्यापासून हिरावली होती; आणि त्याच वेळी नव्याने ओळख झालेल्या नि कालौघात सर्वोत्तम ठरलेल्या मित्रांशी गाठ घालून दिली होती. चार वर्षांपूर्वीच्या पावसाने मातृभूमी सोडताना असे काही रौद्र रूप दा़खवले होते की हाच पाऊस आपला इतका लाडका का आणि कसा असू शकतो, असा प्रश्न पडला होता. त्यावेळी नवीकोरी पुस्तके नि दप्तरे घेऊन शाळेची धरलेली वाट, रेनकोटाची टोपी मुद्दामहून काढून भिजत घरी आल्यावर आईचा खाल्लेला मार, आले-लिंबू-वेलची-पुदिना घातलेला गरमागरम चहा, हवाहवासा वाटणारा एक चेहरा, निरोप देताना पाणावलेले आईवडिलांचे डोळे, मायभूमीतला चिखल, चौपाटी, ओल्या मातीचा वास, टपरीवरचा चहा आणि वडापाव, उद्यान गणेश च्या मागचा भजीपाव, मित्रमैत्रिणीसोबतचा भिजता टाइम् पास्, सॅन्डविच् नि कॉफी, सगळे डोळ्यांतल्या ढगांमागे सारून विमानात बसलो होतो. आणि यावेळी मात्र कोणाचीतरी आयुष्यभराची साथ, स्वप्ने, आशाअपेक्षा, जबाबदारी आणि प्रेम - सगळे सामावलेली अंगठी बोटात मिरवत! पाऊस मात्र कधीचा पडतच होता नि पडतच राहिला.
हलकेच भिजा पावसात - http://misalpav.com/node/9760
****
मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखकाची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी तो केवळ एवढेच लिहु शकतो असे नाही. त्याचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/77 इथे वाचता येईल.
बरोबर आहे मंडळी, हा लेखक आहे बेसनलाडू. :)
अनेक सुंदर सुंदर कविता, वैचारिक तसेच ललित लेखन करणारा बेसनलाडू पाककृती मधे सुद्धा प्रवीण आहे. विडंबनांची आवड अनेकदा सुरेख विडंबनांचा नजराणा घेऊन आलेली आहे.
मात्र बेसनलाडू आमचा या आठवड्याचा "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे हल्ली बरेच दिवसांत त्याने आम्हाला त्याच्या लेखांचे बेसनलाडू खाऊ घातले नाहीत. हरकत नाही. आम्ही त्याला खाण्याचे बेसनलाडू भेट देत आहोत. त्याच बरोबर फुल आणि ब्लेजर देत आहोत. त्याचा त्याने स्विकार करावा आणि लवकरात लवकर एखादा मस्त लेख लिहावा की तो वाचून रसिक जन उद्गारतील " वा ! बेसन लाडू असावा तर असा !" बाकी तो ठरवेल ते मान्य. कसे?
पुष्प
ब्लेझर
बेसनलाडू
दुकानांचे पत्ते
पुष्प - http://www.orkutpapa.com/scraps/yellow-rose.jpg
ब्लेझर - http://product-image.tradeindia.com/00224107/b/0/Men-s-Blazer.jpg
बेसनलाडू - http://fastindianrecipes.com/wp-content/uploads/2009/08/micro_besan_lado...
क्रमशः
(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)
प्रतिक्रिया
11 Feb 2011 - 6:52 pm | मस्त कलंदर
बेलाने लिहितं व्हावं...
11 Feb 2011 - 6:55 pm | स्वाती दिनेश
बेलाचा "अॅडवाजर, बुडबायजर.. " हा सुध्दा असाच कुठेतरी अडगळीत पडला आहे.. त्याचीही आठवण (त्याला)ह्या निमित्ताने करुन देऊ इच्छिते,
पुढचा मिपाकर कोण? याची वाट पाहत आहे..
स्वाती
12 Feb 2011 - 1:18 am | बेसनलाडू
चे आधीचे सगळे भाग येथे एकत्र देतो आणि पुढचा भाग पहिल्यांदा येथेच (आणि मग इतरत्र) लिहीन, अशी ग्वाही देतो.
(आश्वासक)बेसनलाडू
11 Feb 2011 - 7:02 pm | परिकथेतील राजकुमार
नानबाशी सहमत !
बेला ह्यांना शेवटचे खरडवह्यातुन नववर्षाच्या शुभेच्छा देताना किबोर्ड हाताळताना बघितले होते.
11 Feb 2011 - 11:10 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
11 Feb 2011 - 11:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बेला, लवकरात लवकर लिहीते होणे.
11 Feb 2011 - 7:03 pm | श्रावण मोडक
मस्त.
बेला, कुठं आहेस?
11 Feb 2011 - 11:31 pm | प्रीत-मोहर
मी चुकुन बैला वाच्ल
=))
11 Feb 2011 - 7:15 pm | रेवती
बेलाचं लेखन बरेच दिवसात आलं नाही.
त्यानं लिहितं व्हावं यासाठी शुभेच्छा.
(नाना, तुमच्या जवळजवळ सगळ्या धाग्यांना प्रतिसाद देतिये);)
11 Feb 2011 - 7:16 pm | गणपा
अवलिया यांच्या या मालिकेतील धाग्यांवर सहमत नसणारा विरळाच असावा. :)
11 Feb 2011 - 7:21 pm | प्रचेतस
आमच्यासारख्या तुलनेने नवीन मिपाकरांना एकाहून एक सरस लेखांची एकत्रित मेजवानी देताय.
डोक्यात तिडीक आणणार्या मिपाकरांचेही खूप खूप आभार.
11 Feb 2011 - 8:08 pm | कच्ची कैरी
लेखाबद्दल बर्याच जणांनी तारिफ केलेली आहे तेवढे ते बेसनलाडू पाठवुन द्या बर जरा !एकदम फॅन्टाबुलस दिसताय!
12 Feb 2011 - 12:02 am | शिल्पा ब
अरे काय हे!!! हल्लीच लग्न झालंय (वर्ष तरी झालं असेल म्हणा) ... जरा वेन्जोय करू द्या त्याला...तुम्ही एक रिकामटेकडे एकटेच असलात म्हणून काय झालं !!
12 Feb 2011 - 10:43 am | पर्नल नेने मराठे
हल्लीच लग्न झालंय (वर्ष तरी झालं असेल म्हणा) ... जरा वेन्जोय करू द्या त्याला
+१
तुम्ही एक रिकामटेकडे एकटेच असलात म्हणून काय झालं !!
=)) =))
12 Feb 2011 - 1:17 am | बेसनलाडू
नाना आणि मंडळी,
तुमचा माझ्या लेखनावरील लोभ पाहून खूप बरे वाटले. माझा लेखनसंन्यास अनेकदा परिस्थितीजन्य आणि तात्पुरत्या स्वरूपाचा असला तरी सध्याचा मात्र तुलनेने प्रदीर्घ आहे, हे नक्की. एक मात्र खरे, की असा 'संन्यास' मी ठरवून घेतलेला नाही. अनेकदा मनात काहीतरी येते, कधीतरी काहीतरी सुचते; पण सुचेल त्या क्षणी ते कागदावर किंवा मिसळपाववर, मनोगतावर, ब्लॉगवर उतरवून काढण्याची ऊर्मी काहीशी कमी झाली आहे, हे खरे.
(संन्यासी)बेसनलाडू
ही परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी आशा आहे.
(सुधारक)बेसनलाडू
तुम्हां सगळ्यांचा लोभ असाच राहू द्यावा, ही सदिच्छा. या धाग्यातून प्रतीत होणार्या लेखनसंबंधी अपेक्षांना योग्य न्याय द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन.
(आश्वासक)बेसनलाडू
12 Feb 2011 - 11:04 am | झंम्प्या
च्यायला.. डोक सुन्न होत...
कळतच नाही काय चल्ले, आम्ही आपले तोकड्या बुद्धीचे टुकार वाचक, रस्त्यावरून जाताना कॉलेजच्या बाहेर हा कट्टा दिसतो, खुप हशा कल्लोल होताना दिसतो, आयुष्य कारंज्यासार्ख फवारून भाहेर पडताना दिसत. आयुष्यात अस जगन कधीच जमल नाही आम्हाला, म्हणून कधीतरी ह्या कट्ट्यावर येउन बसाव, स्वताहाचीसुद्धा लिहिण्याची खुमखुमी जिराउन घ्यावी अस वाटत, पण हा सगळा फापट पसारा पाहिल्यावर, अजुन आपण रांगत आहोत आणि पळन्याच्या शर्यतीत आलोय अस वाटायला लागत...
असो... हीच आमची प्रेरणा स्थान... कधीतरी आम्हालाही नाम्ब्राचा बनियान मिळेल आणि आम्हीही पळन्याच्या शर्यतीत भाग घेऊ...
12 Feb 2011 - 11:12 am | sneharani
या लेखमालिकेने नविन अन चांगले लेख वाचायला मिळतील अशी आशा!
:)
12 Feb 2011 - 11:56 am | शाहरुख
लाडूजी, तुमचं लिखाण आवडत असलं तरी प्रतिसाद देताना दर २ वाक्यानंतर ती कुठल्या भुमिकेतून लिहिली आहेत हे सहीतून सांगणं आमच्या डोक्यात तिडीक आणते.
अर्थात आम्हाला तिडीक येते म्हणून वागणं बदला असं म्हणणं नाही..मिपा हा समाजमनाचा आरसा असल्याचं कालपरवा परत एकदा वाचले..त्या दृष्टीने आमच्या मताची नोंद करत आहोत.
नानांच्या आग्रहाचा मान ठेवुन दाबून लिहावे !
(शाहरुख) शाहरुख
12 Feb 2011 - 12:42 pm | बेसनलाडू
स्वाक्षरीचा वारसा मला जुने, ज्येष्ठ आंतरजालीय सहकारी प्रवासी आणि धोंडोपंत यांच्याकडून मिळाला; मी तो नेमाने पुढे नेत आहे इतकेच ;)
(वारसदार)बेसनलाडू
12 Feb 2011 - 5:40 pm | प्राजक्ता पवार
मस्तंच . या लेखनमालेच्या निमित्ताने अनेक चांगल्या पण न वाचलेल्या लेखांची ओळख होतेय.
15 Feb 2011 - 2:32 pm | गणेशा
बेसनलाडु तुमचे आश्वासन लवकर पुर्ण करावे अशी विनंती ..
- गणेशा
तुमचे
जाता जाता सहि बरोबर भुमिकाशब्द खुप आवडतात ..
15 Feb 2011 - 2:48 pm | मुलूखावेगळी
@गणेशा
त्यानी लगेच ३ लेख लिहिलेत २-३ दिव्सापुर्वी शोधुन वाच