प्रवास...

झंम्प्या's picture
झंम्प्या in जनातलं, मनातलं
10 Feb 2011 - 1:51 pm

खूप दमलोय आता..

खूप लांबपर्यंत आल्याची जाणीव होतेय... माहिती आहे कि अजून काहीच प्रवास झलेला नाही... पण ह्या क्षणी खूप दमलोय.
स्वतःला झोकून दिलेलं होतं ह्या गर्दीच्या प्रवाहात, कधी मी चाललो तर कधी ह्या गर्दीने मला चालवलं. आता थांबावसं वाटतंय. लांबपर्यंत कधी आलो कळलंच नाही मला. काल हातातून रेती सुटते तसा सुटत गेला आयुष्यातून. जबाबदारीचे ओझे खांद्यावर वागून दमलोय आता. हे ओझ खरच मला उचलायचा होतं का मीच ते उचललं हे सुद्धा समजत नाही.

वाटतंय सांजवेळ झालीये, संधीप्रकाशात हे माहित असून सुद्धा कि पुढे रात्र आहे, मनाला खोटी आस लागून राहिलीये, कि सूर्योदय होईल, खोट्या स्वप्नांची झालर ओढून दम्भ्पणाने वागलो, स्वतःशीच खोटं बोलत आलो आणि दुसर्यांना फसवता फसवता स्वतःलाही फसवायला लागलो. आता कंटाळा आलाय ह्या कोत्या, खोट्या प्रवृत्तीचा, जाणीव होते कि अहंकाराचा फना काढून उभ्या असलेल्या स्वतःशी लढणं तेवढं सोप्पं नाहीये, पण कधीन कधी स्वतःलाच जाब द्यावा लागणार आहे. त्या मुले मला आता भिऊन चालणार नाही.

सांजवेळ वाटतेय, छान गार वारा सुटलाय, पारिजाताचा सदा पडलाय कोणाच्या तरी दारात, छाती भरून सुगंध साठवतोय, ह्याच पारिजाताच्या साक्षीने काही स्वप्नही पहिली होती, कधी पूर्ण न होणारी,

ओठ थरथरतायत, तहानहि लागलीये, अंग कीटलय धुळीने, आईचा पदर आठवतोय, असाच माखलेला चेहरा ती स्वतःच्या पदराने पुसायची, चिडायची, पण पदराखाली तिच्या कसलीच भीती नसायची, स्वतःच्या हजार चुका झाकून घेईल ह्याची खात्री असायची,

अजूनही खूप पुढे जायचं, हा शेवट नाही हे माहित आहे, पण थांबावसं वाटतंय. थांबल्यावर हि सुद्धा भीती वाटते कि मी मागे पडेल आयुष्यात, धावायला लागणार आहे ह्या गर्दीसोबत, मनात अपेक्षा आहे कि कोणीतरी हात धरावा, पाठीवरून हात फिरवावा, पण हे सुद्धा माहित आहे, कि असं कोणी राहिलं नाही, इथून पुढे मीच एकटा असेल,

चला थांबून चालणार नाही, निघायला हवं

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

अतिंम क्षण खुप जबरदस्त मांडले आहेत.
वाचुन खुप काही करायचे आहे अजुन ही जाणीव ही झाली.. सांजवेळ नसली झाली तरी पहाट पुर्ण पणे उलटुन गेली आहे याची खडकन जाणिव झाली.

लिहित रहा ... वाचत आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Feb 2011 - 3:44 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तं लिहीलं आहे.

स्पा's picture

10 Feb 2011 - 3:50 pm | स्पा

फारच सुंदर....

सांजवेळ वाटतेय, छान गार वारा सुटलाय, पारिजाताचा सदा पडलाय कोणाच्या तरी दारात, छाती भरून सुगंध साठवतोय, ह्याच पारिजाताच्या साक्षीने काही स्वप्नही पहिली होती, कधी पूर्ण न होणारी,

क्या बात हे !!!
त्या पारिजातकाचा सुंगध लेखातून सुद्धा दरवळतोय

पहाटच नव्हे तर दुपारही टळत आहे अशी भेदक जाणीव आता व्हायला लागली आहे. त्यात हे वाचून एकदम खूप काही जाणवलं.

भारी आहे हे.

टारझन's picture

10 Feb 2011 - 3:52 pm | टारझन

चांगलं लिहीण्याची ताकद दिसली.

- कमोडक

५० फक्त's picture

10 Feb 2011 - 5:24 pm | ५० फक्त

सैनिकाचं मनोगत वाटतंय, थकलेल्या तसंच अंगभर झालेल्या जखमा सहन न होणा-या. छान लिहिलं आहेस. येउदे अजुन.

मला खूप आवडला हा लेख. एकदम प्रभावी लेखन शैली आणि कल्पना.

छान लिहिलं आहेस.
वेळ हातातून निसटून जातो आणि आपण फक्त बघत राहतो..
अगदी खरंय!!

तुमच्या मागच्या लेखाची आठवण झाली. हेलावुन सोडता तुम्ही. अहो दिवस काय टप्प्याट्प्प्यान पुढे सरकत्च राहिल शेवटी कसा घालवला हे महत्वाचे नाही का?

पण पदराखाली तिच्या कसलीच भीती नसायची, स्वतःच्या हजार चुका झाकून घेईल ह्याची खात्री असायची

मला "अग बाइ अरेच्च्या!" मधील "मायेच्या हळव्या" गाण्याची आठवण झाली....
लेख अतिशय प्रामाणिक....
cheers!!!