गेल्या आठवड्यांत गड्डा यात्रेवर एक लेख टाकला होता, हि त्याची लिंक http://misalpav.com/node/16457 - त्या लेखात काठ्या व लग्न यांचे उल्लेख व जालावरुन घेतलेले फोटो होतेच, पण गेल्या शनिवारी माझे सहकारी व मित्र श्री. काशिनाथ स्वामी यांच्याकडुन या वर्षीच्या काठ्याचे फोटो टाकत आहे. हे फोटो इथे प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल श्री. काशिनाथ स्वामी यांचे अतिशय आभार.
या काठ्या हया म्हणजे बांबु असतात ज्यांना लवचिक व मजबुत करण्यासाठी वर्षभर तेल पाजलेले असते व गड्ड्याच्या दिवशी त्यांना सजवुन त्यांची मिरवणुक काढली जाते.
ह्या फोटोत श्री. काशिनाथ स्वामी हे पारंपारिक बाराबंदी घातलेले दिसत आहेत. त्यांनी बाराबंदीच्या वर कमरेला एक सुती दोराने विणलेला पट्टा बांधला आहे, या पट्ट्याच्या पुढे आलेल्या टोकात या काठ्यांचे टोक ठेवुन ती काठी अलगद दोन्ही हाताने सावरत हे काठीवाहक चालतात.काठ्यांचे टोक हे बहुधा पितळी असुन ते उलट्या शंकुच्या आकाराचे असते.
हा श्री. सिद्धेरामेश्वरांचा पालखितला मुखवटा.
आणि ही पालखी.
या फोटोत काठ्यांच्या उंचीची कल्पना येईल. या काठ्यांना पुर्ण लोकरी घोंगड्यांनी लपेटुन त्यावर सोन्याची किंवा चांदिची कडी घातलेली असतात. एका दिवशी या वर खोब-याच्या वाट्यांचे हार घातलेले असतात, तसेच लग्नाच्या दिवशि बाशिंगे पण बांधतात.
या एकुणं सात काठ्या व एक नंदिधव्ज अशी पुर्ण मिरवणुक असते.
हल्ली या काठ्यांच्या संपुर्ण मार्गावर अशा अत्यंत सुंदर रांगोळ्या काढलेल्या असतात.
हे स्वामी
हा देवळाच्या आवारात चाललेला विडे लावण्याचा कार्यक्रम.
शेवटी पुन्हा एकदा काठ्या देवळात आल्यावर.
तर या अशा वॅशिष्ट्य पुर्ण गड्डा यात्रेत पुढच्या वर्षी आपणां सर्वांचे सहर्ष स्वागत आणि पुढच्या वर्षी काठ्यांच्या लग्नाला व गड्डा यात्रेला जरुर येण्याचे स्नेहपुर्ण आमंत्रण.
हर्षद.
.
प्रतिक्रिया
1 Feb 2011 - 11:25 pm | यकु
सुंदर फोटो..
रांगोळीतील मोर फार आवडले. :)
2 Feb 2011 - 2:08 am | गणपा
सुरेख हर्षद.
पहिल्यांदाच अश्या यात्रेचे फोटोरुपी का होईना दर्शन झालं.
2 Feb 2011 - 2:20 am | शुचि
हार- मोराच्या रांगोळ्या - विड्याची पाने - फेटेवाले गावकरी काय मजा वाटते पहायला. (अर्थात मी पहील्यांदाच पहाते आहे)
खरच शब्द नाहीत.
2 Feb 2011 - 3:01 am | उल्हास
सुरेख फोटो आणी वर्णन देखील
2 Feb 2011 - 7:14 am | सहज
छान फोटो!
>सोलापुर शहरात एकुन ६८ ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केलेली आहे, त्या सर्व ठिकाणी या काठ्या नेउन आणण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी या काठ्यांचे व श्रीसिद्धेश्वराचे लग्न लावले जाते
एकंदर किती काठ्या असल्या पाहीजेत व त्या कशाचे प्रतिक आहे?
श्री. सिद्धेरामेश्वरांबद्दल, बाराबंदी अजुन काही प्रथा व अजुन माहीती जमल्यास द्या.
2 Feb 2011 - 8:11 am | llपुण्याचे पेशवेll
सुंदर. बर्याच दिवसांनी रूमाल बांधलेले लोक पाहीले. पारंपारीक बाराबंदी तर खासच. :)
धन्यवाद हर्षद.
(वैशिष्ठ्य हा शब्दातला "वै" V+a+i या क्रमाने टाईप करून आणता येईल. तुम्ही तो "वॅ" असा टाईपला आहे चुकून)
2 Feb 2011 - 8:38 am | प्रचेतस
ही यात्रा प्रत्यक्ष तिथे जाउनच बघायला पाहीजे.
2 Feb 2011 - 8:47 am | स्पा
खूपच सुंदर फोटो
2 Feb 2011 - 10:17 am | मुलूखावेगळी
खुप छान फोटो अनि वर्णन पन
इथे टाकलयाब्द्दल धन्यवाद
गड्ड्याची यात्रा पाहिली होती पन हे काठ्यान्चे आज पहिल्यान्दाच पाह्ते
आवडली काठीची वरात, रान्गोळ्या,फेटेवाले सर्व
2 Feb 2011 - 10:20 am | मैत्र
वेगळाच प्रकार आहे. फोटो मुळे कल्पना आली आकाराची, पोशाखाची आणि एकंदरीत वातावरणाची...
गड्डा यात्रा आणि काठ्यांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
एकदा आवर्जून भेट द्यायला हवी सोलापूरला यात्रेच्या वेळी..
2 Feb 2011 - 11:00 am | कच्ची कैरी
फोटो बघुन धन्यता लाभली ,सोलापुरला जवळच अस कोणी नाही नाहीतर प्रत्यक्ष बघायला मिळाले असते पण तुमच्यामुळे अप्रत्यक्षरित्या का होइना गड्डा यात्रा पहण्यास मिळाली ,पुन्हा एकदा धन्यवाद!
2 Feb 2011 - 11:09 am | टारझन
येक नंबर .. मज्जा आलि
2 Feb 2011 - 2:06 pm | डावखुरा
उत्सुकता आहे...
पुढच्या वेळी जमले तर पाहु...
2 Feb 2011 - 2:16 pm | परिकथेतील राजकुमार
आवर्जुन फोटो टाकल्याबदल मनःपुर्वक धन्यवाद.
सुरेख आले आहेत फोटो, तसेत त्याखालील माहिती देखील उत्तम.
2 Feb 2011 - 2:30 pm | sneharani
मस्त फोटो!मस्त माहिती!!
2 Feb 2011 - 2:48 pm | प्यारे१
काटी न घाँगडं घिऊन्द्या की रं,
मला बी जत्रंला यिऊन्द्या की.......
2 Feb 2011 - 3:24 pm | निनाद मुक्काम प...
दिवसाची सुरवात देव दर्शनाने झाली .
रंगीबेरंगी प्रफुल्लीत करणारे फोटो पाहून मन टवटवीत झाले .
प्रत्यक्ष जत्रेचा मौहोल अजूनच न्यारा असेल .
2 Feb 2011 - 4:17 pm | प्रसन्न केसकर
बरीच वर्षे झाली गड्ड्याची यात्रा बघुन. आज या धाग्याच्या निमित्तानं जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद!
2 Feb 2011 - 5:12 pm | यशोधरा
मस्त! पहिल्यांदाच पाहिले.
कोकणातील तरंगाची यात्रा असते, तसे काहीसे काठ्या हा प्रकार असावा असे वाटते.
3 Feb 2011 - 9:25 pm | क्रान्ति
हर्षू, खासच आहेत रे फोटो! अगदी दक्षिण कसब्यातून काठया पहातोय असं वाटलं!
गणपा, या एकूण सात काठ्या असतात. पहिली लिंगायत समाजाची हिरेहब्बू यांची मानाची काठी. मग सोनार, कुंभार अशा इतर सगळ्यांच्या मिळून एकूण सात.
श्री सिद्धरामेश्वर हे योगी, तपस्वी होते. ते अतिशय रूपवान, तेजस्वी दिसत. त्यांच्या एका कुंभार भक्ताची कन्या त्यांच्यावर भाळली आणि त्यांच्याशी विवाह करण्याची तिनं इच्छा व्यक्त केली. पण सिद्धरामेश्वरांनी आपण योगी असल्यानं गृहस्थाश्रम आपल्याला वर्ज्य आहे असं तिला समजावलं. पण तीही निश्चयाची पक्की होती, तिनं मनोमन सिद्धरामेश्वरांना आपला पती मानून इतर कुणाशीही विवाह करणार नाही, असं आपल्या पित्याला सांगितलं. यावर उपाय म्हणून सिद्धरामेश्वरांनी आपला नंदीध्वज तिला दिला व याच्याशी तू विवाह कर असं सांगितलं. तिनं त्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजाशी विवाह केला आणि त्यानंतर होमकुंडात स्वत:ची आहुती दिली. या विवाहाचं प्रतिक म्हणून आजही संक्रांतीच्या दिवशी सिद्धेश्वर मंदिरात या काठ्या आणि नंदीध्वज यांचा विवाह अगदी थाटामाटात, विधिपूर्वक संपन्न होतो आणि निम्म्याहून अधिक सोलापूरकर अगदी घरचं लग्न असल्यासारखे नटूनथटून या लग्नाला उपस्थित रहातात.
भोगीदिवशी ६८ ज्योतिर्लिंगांना तेल लावण्याचा कार्यक्रम होतो, संक्रांतीदिवशी लग्न आणि किंक्रांतीला होम. होमादिवशी साडीचोळी अर्पण केली जाते भक्तांकडून कुंभारकन्येला. काठ्या या त्या कन्येचं प्रतिक. त्यांचा विवाह नंदीध्वजाशी होतो.
या काठ्या इतक्या जड आणि उंच असतात, की त्या चालवायची प्रॆक्टीस केली जाते जवळजवळ महिनाभर आधीपासून, जशी गणपतीत लेझिमची करतो तशी. कारण ती काठी झुकून चालत नाही! उंची पण एवढी असते, की एक आठवडाभर रोडक्रॊस केबल काढून ठेवाव्या लागतात वीज आणि फोनवाल्यांना. त्यामुळे त्या मार्गावरचे फोन बंद रहातात, पण तेव्हा कुणी कुरकुर नाही करत! [अर्थात, आता तर मोबाइल आले, पण आम्ही जेव्हा तिथे होतो, तेव्हा एरवी फोन बंद झाला अर्ध्या तासासाठी, तरी ओरडणारे लोक तब्बल आठवडाभर काहीही तक्रार करायचे नाहीत!]
बरं, ती मिरवणूक काही तास-दोन तासांची नसते, जवळजवळ अर्धा दिवस जातो त्यात, कारण घरोघरी दारात थांबवून त्या काठ्यांची पूजा केली जाते, नवसाचे खोबरं-लिंबू यांचे हार घातले जातात. आणि विशेष म्हणजे सोलापुरातील सगळ्या जातिधर्माचे लोक या सोहळ्यात सामील असतात! पारंपारिक बाराबंदी, फेटे घालून अनवाणी पायांनी सगळ्या वयातली मुलं-माणसं लगबगीनं काठी धरण्यासाठी धावत असतात! तोही मोठा मान असतो! आणि मग या विवाहानिमित्त यात्रा भरते मस्तपैकी भली मोठी. माझ्या बंधुराजानं फोटो दिलेच आहेत दोन दुव्यांमधे. मी मला आठवली तेवढी माहिती दिली.
3 Feb 2011 - 10:43 pm | ५० फक्त
तायडे, मला जास्त टायपायचा कंटाळा येतो म्हणुन मी फोटो जास्त टाकतो.
सर्व प्रतिसादकांचे अतिशय आभार, आमच्या गावच्या पुढच्या वर्षीचं सर्वांना पुन्हा एकदा जाहीर आमंत्रण. जानेवारीत संक्रांतीच्या एक दिवस आधी ते एक दिवस नंतर ही काठ्यांची मिरवणुक असते, यात्रा म्हणजे गड्डा पुढं जानेवारी महिनाभर चालु असतो.
तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा बोलावतो आहे - भाग्यश्रीचे वडे, रेवड्या , उसाचा रस आणि पोटाच्या पचनाबरोबरच आयुष्यांचा हिशोब सांगणारी पाणिपुरी खायला हो आणि बरोबर एक पिसाची टोपि आणि चंद्रावर कटरिना बरोबर फोटो पण.
पुन्हा योग्य वेळी आठवणं करेनच.
हर्षद.
4 Feb 2011 - 8:31 am | नरेशकुमार
खुपच छान !
एक अतिशय सुंदर यात्रेचे सुख पदरी पाडले बघा तुम्ही आमच्या.
सर्व फोटो आनि लेख मनापासुन आवडले.
4 Feb 2011 - 9:03 am | चिंतामणी
एकदा अनुभव घेतला पाहीजे. वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमीत्ताने सोलापुरला जाणे व्हायचे. आता या निमीत्ताने जायला पाहीजे.
9 Feb 2011 - 5:13 pm | नि३सोलपुरकर
धन्यवाद हर्षद,
फोटो टाकल्याबदल मनःपुर्वक धन्यवाद
एक सोलापुरकर म्हनुन खुप अभिमान आहे या परपरेचा.
सर्व मिपा कराना पुढच्या वर्षीचं जत्रंच जाहीर आमंत्रण.....
9 Feb 2011 - 5:23 pm | प्राजक्ता पवार
सुरेख आले आहेत फोटो . मस्तं माहिती.