माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे...

फटू's picture
फटू in जे न देखे रवी...
8 Jun 2008 - 2:04 am

तुम्ही चांगले वागा, किंवा वाईट वागा
माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे
दिसत असलो मी हसत खेळत तरीही
माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे

चारोळ्याविचार

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

8 Jun 2008 - 4:15 am | अरुण मनोहर

सतीश, पहाटेच्या उम्मीद भरल्या वेळी उदास राग का बरे? Cheer up. दुभंगलेलं मन सांधायला मिपा आहे की.

राजेश's picture

8 Jun 2008 - 5:45 am | राजेश

अरे सतिश,
आपल्याकडे (माणगावला) इतका झक्कास पाऊस पडतोय नं...
...पहिल्या पावसाच्या नुसत्या कल्पनेनी सुद्धा छान वाटेल बघ तूला!!

राजेश

विसोबा खेचर's picture

8 Jun 2008 - 6:42 am | विसोबा खेचर

दिसत असलो मी हसत खेळत तरीही
माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे

अरे देवा! असं काय झालं रे? आम्हाला तरी सांग! :)

बाय द वे, चारोळी छान आहे. एखाददा वाचायला बरी वाटते. मध्यंन्तरी मात्र मिपावर अगदी चारोळ्यांचं रान उठलं होतं व या चारोळीवाल्यांनी नक्को जीव केला होता!

कुठे गेली आमची चारोळीवाली प्राजू? :)

असो..!

तात्या.

गिरिजा's picture

8 Jun 2008 - 12:21 pm | गिरिजा

:)

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

सारखे नसतात...

असंच काहीतरी बिनसलं आणि त्या सणकीमध्ये वरची चारोळी जन्माला आली...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण's picture

8 Jun 2008 - 3:35 pm | मदनबाण

मन दुभंगुन सुद्दा
आयुष्य हे जगावच लागत.
स्वतः दु:ख सहन करुन सुद्दा
दुसर्‍यासाठी हसावच लागत.

(४ओळींचा वेडा)
मदनबाण.....

फटू's picture

9 Jun 2008 - 2:27 am | फटू

मदनबाण, एकदम मस्त रे...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

रामदास's picture

9 Jun 2008 - 7:05 am | रामदास

अशी अटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला
स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला.
अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी धरावे
जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपत जावे.
कुसुमाग्रजांची कविता आहे.

चतुरंग's picture

9 Jun 2008 - 7:06 pm | चतुरंग

केवळ कुसुमाग्रज! धन्यु रामदास.

चतुरंग