आज १ विचार वाचनात आला-
तो हा की "प्रशंसा का पहेला भोग भगवान को लगाये." ज्याप्रमाणे अन्नग्रहण करण्यापूर्वी देवाला प्रसाद दाखवतो त्याप्रमाणे कोणीही आपली स्तुती केली तर तिचा मनोमन त्याग करून ती प्रथम ईश्वराला समर्पित करा.
"त्वदीयम वस्तु गोविन्दम तुभ्यमेव समर्पयेत"
स्तुतीपासून कटाक्षाने दूर रहा. यामुळे तुमच्या मनात अहंकाराचे बीज रोवले जाणार नाही. गर्वाने तुम्ही आंधळे होणार नाही. तुम्हाला अनाठायी(?) अभिमान वाटणार नाही इ.इ.
मग माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले ते असे की "हेल्दी" अहंकार अशी काही गोष्ट असते की नसते? लहानपणी बाळाने पहीले पाऊल टाकले की आई-बाबा, अन्य दादा, काका, ताई टाळ्या वाजवून, प्रशंसोद्गार, बोबड्या पण हुरूप वाढविणार्या बोलांनी काढून बाळाला प्रोत्साहन देतात. आणि ही घटना खरं पाहता खूप खोल ठसा उमटविणारी असते. परमहंस योगानंद यांच्या "ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी" या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे - " Happier memories, too, crowd in on me: my mother’s caresses, and my first attempts at lisping phrase and toddling step. These early triumphs, usually forgotten quickly, are yet a natural basis of self-confidence."
मग लहानपणी पोसला जाणार्या या अहंकाराचे नक्की कितव्या वर्षा पासून "दुराभिमान /अहंकाआमध्ये" रुपांतर होऊ लागते आणि आपण आता कौतुकाचा डोस पुरे असे स्वतःचेच स्वतःला शिकवू लागतो? आपल्या तथाकथित मर्यादा ठरवू लागतो?
एका विशिष्ठ वयापासून आपल्या कानांवरही नकारात्मक वाक्ये, क्वचित "सुभाषिते" आदळू लागतात - "हरबर्याच्या झाडावर चढविणे", "अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे" , "स्तुती करावी ईश्वराची , व्यर्थ करू नये नराची" वगैरे वगैरे. आपणही दुसर्याची हातचे राखून प्रशंसा करायला शिकतो. आणि एक दुष्टचक्र बनत जाते ना आपण कोणाची खुल्या मनाने प्रशंसा करू शकतो ना कोणी आपली करत का तर आपली संकुचित विचारसरणी - दुसर्याची स्तुती करणे म्हणजे त्याची पाठ खाजविणे, त्याला मस्का पॉलीश करणे.
माझे तरी मत आहे की आपल्या समाजात प्रशंसा, स्तुती आदि गोष्टींना हवी तितकी प्रतिष्ठा दिलेली नाही. दुसर्याच्या चूका दाखविण्यात आपण एकदम अग्रेसर असतो पण तेच कौतुक करायची वेळ येते तेव्हा मूग गिळून गप्प बसतो. दुसर्याचे दोष दाखविण्याइतका उत्साह आपण लोक दुसर्याची वाखाणणी करण्यात दाखवत नाही. मी असे नाही म्हणत की खोटी प्रशंसा करा पण एखादी गोष्ट आवडली, कौतुकास्पद वाटली तर आवर्जून ती आवडली हे सांगा, तिला गृहीत धरू नका.
वरील विचारातील "अहंकाराची वीषवल्ली पोसली जाण्याची" कल्पना मला तरी खुळचट वाटली. जोपर्यंत एका ठराविक मर्यादेमध्ये निरोगी अहम ची जोपासना होते तोपर्यंत स्वतःबद्दल चांगले जनमत तयार होणे, तसा फीडबॅक (मराठी शब्द?) मिळणे हे चांगलेच.
आपला काय अनुभव आहे स्तुतीसंदर्भात?
प्रतिक्रिया
29 Jan 2011 - 5:20 am | शेखर काळे
अभिमान - स्वतःच्या अंगात असलेल्या नैपुण्याविषयीचा विश्वास.
अहंकार - आपण दुसर्यापेक्षा वरचढ आहोत हे दाखविण्याची हौस.
म्हणजे मी चांगले लिहू शकतो व मी हे लिहीलेले लोकांना आवडते हा अभिमान .. आणि
मी तुझ्यापेक्षा, इतरांपेक्षा चांगले लिहू शकतो व मीच लिहीलेले लोकांना आवडते हा अहंकार.
29 Jan 2011 - 5:40 am | Nile
अजिबात अनुभव नाही. साला उगाच काय कोणाची स्तुती करा. फीडबॅक (मराठी शब्द?)हाच आमचा अभिप्राय.
29 Jan 2011 - 6:21 am | शुचि
अहो पण तुमची स्तुती कोणी केली असेल तर तो अनुभव सांगा :)
29 Jan 2011 - 6:41 am | बबलु
आपल्या समाजात प्रशंसा, स्तुती आदि गोष्टींना हवी तितकी प्रतिष्ठा दिलेली नाही. दुसर्याच्या चूका दाखविण्यात आपण एकदम अग्रेसर असतो पण तेच कौतुक करायची वेळ येते तेव्हा मूग गिळून गप्प बसतो. दुसर्याचे दोष दाखविण्याइतका उत्साह आपण लोक दुसर्याची वाखाणणी करण्यात दाखवत नाही.
१००% सहमत.
29 Jan 2011 - 7:14 am | मदनबाण
ह्म्म...
स्तुती आवडत नाही असा मनुष्य प्राणी या भूतलावर सापडणे तसे दुर्मिळच... ;)
स्तुतीने हुरळुन न जाणे हे सर्वात महत्वाचे... ते एस्टीवर लिहलेलं असतं ना... मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक , त्येच फॉलो करावं म्हणतो.
बाकी अहंकार हेल्दी कसा असु शकतो ते काय मला समजले नाय बाँ !!!
बाकी वाचतोच आहे, लिहीत रहा.
29 Jan 2011 - 7:39 am | आत्मशून्य
तूमच्यावर काय परीणाम होइल ? अस्ले फाल्तू वीशय बंद करा असे लीहले तर काय परीणाम होइल ? मी तूमच्यावर होणार्या परीणामाबद्द्ल बोलतोय म्हणजेच मेंदूच्या भावनीक प्रतीक्रीये बद्दल ? मेंदूच्या बौध्दीक प्रतीक्रीये बद्दल न्हवे ज्या द्वारे तूम्ही माझ्या वर वीचारलेल्या प्रश्नाचे ऊत्तर मेंदूच्या कूवतीनूसार इथे लीहाल आणी जे सर्वस्वी मेंदूच्या भावनीक प्रतीक्रीयेवर (तूमच्या अहं वर)अवलंबून असेल ?
आता तूम्हाला माझे वरी वीधान पटो व न पटो तूमची प्रतीक्रीया ही मेंदूच्या बौध्दीक व भावनीक प्रतीक्रीये वर अवलंबून असेल.
ऊदा. असे गृहीत धरूया तूम्हाला माझे बोलणे पटले नाहीये.. मग काय प्रतीक्रीय द्याल ?
१) भावनीक प्रतीक्रीया तीव्रता ९०% बौध्दीक प्रतीक्रीया तीव्रता १०%
प्रतीक्रीया - तोंड सांभाळून बोल मेल्या
२) भावनीक प्रतीक्रीया तीव्रता ५०% बौध्दीक प्रतीक्रीया तीव्रता ५०%
प्रतीक्रीया - आपण प्रतीसादामधे वीनाकारण वैयक्तीक बनत आहात
३) भावनीक प्रतीक्रीया तीव्रता १०% बौध्दीक प्रतीक्रीया तीव्रता ९०%
प्रतीक्रीया - खरेतर वैयक्तीक प्रतीसाद द्यायची गरज न्हवती पण ठीक आहे तूमच्या वीधानाला पूश्टी देता येइल असे आणखी पूरवे देता येतील काय ?
लहान पणी प्रोत्साहन , स्तूती केल्ली जाते कारण बालकाच्या क्षमतांचा वीकास व्हावा हा हेतू असतो,पूढे जेव्हां त्याच्या क्षमतांच्या मर्यादा नीश्चीत होतात तेव्हा अर्थातच स्तूतीमूळे बौध्दीक स्तर वाढू शकत नाही, तर फक्त भावनीकता म्हणजेच अहं वाढतो.
कीव्हां लहान्पणी मेंदूच्या भावनीक प्रतीक्रीया या बहूतांशी मेंदूच्या बौध्दीक क्शमतेचा वीकास होण्यासाठी वापरल्या जातात, पण मोठे पणी नैसर्गीक्पणेच ती बौध्दीक वीकासाची वाढ खूंटल्याने भावनीक प्रतीक्रीयांचा साचले पणा हा फक्त अहंम वाढीसाठीच वापरल्या जाण्याचे प्रमाण जास्त असते, जे अर्थातच चांगले नाही. अर्थात सर्व काही ठीक्ठाक झाले तर उतारवयात भावनीक प्रतीक्रीयांच प्रमाण सूध्दा आपोआप कमी कमी होवू लागते (मीस फंक्शन होत नाही) परीणामी बौध्दीक क्षमते सोबत अहंपण कमी होवू लागतो.
अध्यात्मात "हेल्दी" अहंकार अशी काही गोष्ट अस्तीत्वात नसते. म्हणून वरील वीवेचन हे भौतीक जगाचा वीचार करून लीहले आहे.
29 Jan 2011 - 7:44 am | शुचि
काय सांगू? "उत्तम" म्हणालात तर मी विश्वास ठेवणार नाही कारण मला माहीत आहे हा लेख १० च्या पट्टीवर ३ आहे. आणि फालतू म्हणालात तरी मी मला थोपवू शकणार नाही कारण मला काही दिवसांनी काहीना काही सुचतं. पण भावनिक म्हणाल तर .......... "उत्तम" या प्रतिसादाने तर मला आनंद होणार नाही पण "फालतू" म्हणाल तर वाईट वाटेल ..... असे वाटेल त्यापेक्षा तुम्ही प्रतिक्रिया दिली नसतीत तर बरं झालं असतं.
29 Jan 2011 - 8:19 am | आमोद शिंदे
पूर्ण सहमत!!
29 Jan 2011 - 10:10 am | आत्मशून्य
:D
29 Jan 2011 - 8:18 am | आमोद शिंदे
मेंदू, अध्यात्म, बुद्धी वगैरे शब्दबंबाळ प्रतिसाद लिहिताना निदान शुद्धलेखनाच्या प्राथमिक चुका तर टाळा.
29 Jan 2011 - 9:53 am | llपुण्याचे पेशवेll
शुद्धलेखन मिपावर पूर्वीपासूनच फाट्यावर मारले गेले आहे.
शुद्धलेखनाबाबतचे सध्याचे धोरण काय आहे ठाऊक नाही.
29 Jan 2011 - 10:20 am | आत्मशून्य
तेव्हडी मला अक्कल असती तर काय मग..... आमचे लक्ष तूर्त ह्या धाग्यावर ५०+ प्रतीसाद कसे येतात हे बघून मनोरंजन करून घेणे एव्हडेच आहे.
29 Jan 2011 - 8:21 am | आमोद शिंदे
आमची काय मोडकांशी ओळख नसल्याने आमचा लेख फुलोरा बिलोरामधे नाय आला बॉ!
29 Jan 2011 - 9:54 am | llपुण्याचे पेशवेll
त्यासाठी मोडकांशी नाही रामदासांशी ओळ्ख असावी लागते.
29 Jan 2011 - 10:11 am | शिल्पा ब
बरीच माहीती आहे की तुम्हाला..
29 Jan 2011 - 10:24 am | llपुण्याचे पेशवेll
बरं मग.
29 Jan 2011 - 10:39 am | आत्मशून्य
तूमचा प्रतीसाद आमच्या सहीशी मिळता जूळता आला म्हणून बाकी काही नाही.
29 Jan 2011 - 10:50 am | शिल्पा ब
मग काय? कौतुक केलं एवढंच!!
29 Jan 2011 - 11:00 am | llपुण्याचे पेशवेll
ओक्के.
खुलाशाबद्दल धन्यवाद.
29 Jan 2011 - 12:56 pm | टारझन
=)) =)) =)) हा पुप्या साला भलताच हलकट आहे ( आपच्यात ही अशी स्तुती असते बॉ ... अहंकार मैत्रीत नसतो .. मात्र कोणी बाहेरचा आंटुष पंटुष असेल तर ... टोकावर :) )
- (केक आवाहनकार) अहनकार
29 Jan 2011 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार
+१ सहमत.
आम्हाला तर गुडीगुडी पेक्षा जेंव्हा आमचे मित्र 'हलकट आहेस साल्या' असे म्हणतात तेंव्हा जास्त आनंद होतो. त्या खर्या भावना.
आणि आम्ही जेंव्हा नान्या किंवा टिंग्याला 'तू भिकरचोट आहेस' असे म्हणतो तेंव्हा त्यामागे सुद्धा कौतुकाचीच भावना असते आणि ती त्यांना समजते देखील ;)
29 Jan 2011 - 11:18 am | अवलिया
>>>>आमची काय मोडकांशी ओळख नसल्याने आमचा लेख फुलोरा बिलोरामधे नाय आला बॉ!
थत्त्यांशी वाढवा ओळख. गेला बाजार प्रहारमधे नाव येईल. सभ्य आणि सुसंस्कृत आमोद शिंदे !! हाकानाका !!
29 Jan 2011 - 10:43 am | ५० फक्त
१. तो हा की "प्रशंसा का पहेला भोग भगवान को लगाये." ज्याप्रमाणे अन्नग्रहण करण्यापूर्वी देवाला प्रसाद दाखवतो त्याप्रमाणे कोणीही आपली स्तुती केली तर तिचा मनोमन त्याग करून ती प्रथम ईश्वराला समर्पित करा.
"त्वदीयम वस्तु गोविन्दम तुभ्यमेव समर्पयेत"
२. स्तुतीपासून कटाक्षाने दूर रहा. यामुळे तुमच्या मनात अहंकाराचे बीज रोवले जाणार नाही. गर्वाने तुम्ही आंधळे होणार नाही. तुम्हाला अनाठायी(?) अभिमान वाटणार नाही इ
आपण स्वतः स्तुतीपासुन दुर राहुन जर ती ईश्वराला समर्पित करणार असु तर एका दिवशी त्याच्याही मनात अहंकाराचे बीज रोवले जाईल व तो गर्वाने आंधळा होईल आणि त्याला ही अनाठायी अभिमान वाटु लागेल, मग काय ? किंबहुना आजच अशी परिस्थिती आलेली आहे काय ?
स्तुतीबद्दल माझा अनुभव म्हणाल तर मला माझी स्तुती केलेली आवडते पण परत उलट दुस-याची स्तुती करता येत नाही, खास करुन तोंडावर तर मुळिच नाही, पण माझ्या क्रुतीतुन मी हे दाखवु शकतो, आणि हाच माझ्या आणि माझ्या बायकोच्या भांडणाचा सुरुवातीचा मुद्दा असतो.
दोन वर्षापुर्वी माझ्या एका मॅत्रिणिने मी गाडि घेतल्यावर मला एक एसएमएस पाठवला होता, तो मात्र मी अजुन जपुन ठेवला आहे, आज पण जेंव्हा थोडंसं निराश वाटतं तेंव्हा तो पुन्हा वाचतो आणि मनाला पुन्हा उभारी येते.
हर्षद.
29 Jan 2011 - 10:53 am | चिर्कुट
>> "प्रशंसा का पहेला भोग भगवान को लगाये."
हे बरोबर आहे. कारण समर्थ रामदासांनीच म्हटलं आहे पुन्हा एकदा..स्तुती करावी एक ती परमेश्वराची अन करु नये व्यर्थ ती वानराची.. :-)
29 Jan 2011 - 11:07 am | विजुभाऊ
षडरीपू " काम क्रोध मोह लोभ मद मत्सर "
हे जीवनावश्यक आहेत.
या पैकी कोणताही एक नसेल तर जीवन निष्चल होईल.
अहंकार असेल तर माणूस आत्मविश्वासाने जगू शकेल. आहे त्या परीस्थितीत पिचत न रहाता त्यातून वर येण्याचा प्रयत्न करेल.
या षडरीपू पैकी सर्वच्यासर्व योग्यप्रमाणात असावेत. ते नसावेत असे जे म्हणतात त्यांचे जीवन सर्वसामान्य जगण्याच्या पातळीपासून फार वेगळे असते.
काम ( डिझायर) किंवा अगदी काम" भावना नसेल तर मानवी जीवन किती नीरस होईल हे कोणीही कल्पू शकेल.
काम भावना किम्वा कोणतीच भावना सप्रेस कराल तर ती भावना तुमचे आयुष्य भरून राहील. ब्रम्हचर्याचा पुरस्कार करणारी व्यक्तीच सर्वात जास्त काम भावनेचा विचार करत असते. असे रजनीश म्हणत
29 Jan 2011 - 12:43 pm | मी ऋचा
आर्ट ऑफ लीव्हिन्ग मध्ये सांगितले जायचे की ( जाते ), जेव्हा तुम्ही एखाद्या चित्राची प्रशंसा करता तेव्हा ती खरे तर चित्राकाराची प्रशंसा असते म्हणजे जर तुम्ही कुणाची प्रशंसा करता तेव्हा ती ईश्वराची प्रशंसा असते त्यामुळे ती मुक्त कंठाने करा आणि जेव्हा कुणी तुमची प्रशंसा करतं तेव्हाही ती ईश्वराची प्रशंसा समजून अलिप्तपणाने किंवा हुरळून न जाता स्वीकारा.
मला वाटते, स्तुतीशी "डिल" करण्यासाठी हा चांगला फंडा आहे..म्हणुन मी स्वतःची पण मुक्त कंठाने स्तुति करते ;)