केक, केक आणी केक

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in जनातलं, मनातलं
27 Jan 2011 - 1:39 pm

केव्हाच मनात होते ह्या विशयी बोलेन पण नाहि जमले.
हल्ली केकच्या पा़क्रु टाकुन ह्या बायकांनी अगदी उत आणलाय.
मला पण वाटतेय कि केक करुन ह्या बायकांचे छुपे चॅलेन्ज स्विकारावे ;)
पण प्रॉब्लेम हा आहे कि माझ्याकडे ओव्हन नाही.
माहेरी आहे पण कधी लक्श दिले नाही.
माझ्याकडे एक साधा माइक्रोव्हेव आहे ज्याचा उपयोग मी फुड रि-हिटिन्ग साठी करते.
ह्यात बेकरी/क्नन्व्हेक्शन असले मोड नाहित.
तर ह्या साध्या माइक्रोव्हेवमधे मी केक व नानकटाइ टत्सम पदार्थ करुन शकेन का?
तरी बायकांनी निट मार्गदर्शन करावे.

मार्गदर्शनानंतर केक निट झाला नाही तर कोर्‍टात खेचले जाइल, वकिल आधिच पाहुन ठेवावा ;)

पाकक्रियामाहिती

प्रतिक्रिया

अवलिया's picture

27 Jan 2011 - 1:41 pm | अवलिया

>>>तरी बायकांनी निट मार्गदर्शन करावे

पुरुषांनी केले तर नाही चालणार?

पर्नल नेने मराठे's picture

27 Jan 2011 - 1:44 pm | पर्नल नेने मराठे

पुरुशांमध्ये गणपा एक लायकिचा होता त्याला ही हिरवा माज आलाय म्हणे?

माझ्या कडे तुझ्यासारखा मायक्रोवेव्ह नाही.
माझ्याही माहेरीच आहे. लक्षही दिलं होत. पण तेव्हा लोकांना जळवायचा नाद नव्हताना लागला. ;)
तुर्तास हे घे.
http://hubpages.com/hub/healthycakerecipes

पर्नल नेने मराठे's picture

27 Jan 2011 - 2:28 pm | पर्नल नेने मराठे

बायकांचे रिप्लायच नाहित :ओ त्याना माझी टफ फाइट नकोय ;) हेह्च खरे..
गणपा थन्क्स हं !!!

यशोधरा's picture

27 Jan 2011 - 2:37 pm | यशोधरा

तू त्यांच्या चांगल्या पुस्तकांमध्ये नसशील :P

बायकांचे रिप्लायच नाहित
बायका? कोण बायका? इथे तर सगळ्या मुली आहेत.;)

सेरेपी's picture

28 Jan 2011 - 7:48 am | सेरेपी

अगदी! ;-)

नन्दादीप's picture

27 Jan 2011 - 1:47 pm | नन्दादीप

ओव्हन नसला म्हणून काय झाल????
केक चे भांडे आहे का?? माझ्या लहानपणी आईने त्या भांड्यात केकच मिश्रण घालून गरम वाळू वर "बेक" केल्याचे स्मरतय मला.

अधिक प्रकाश केककुशल महिला मंडळ टाकेलच.

पुष्करिणी's picture

27 Jan 2011 - 8:18 pm | पुष्करिणी

हे बेस्ट, चुचु वाळूच्याच देशात राहते नाहीतरी...

पर्नल नेने मराठे's picture

28 Jan 2011 - 9:55 am | पर्नल नेने मराठे

तु परत जाताना एक बाकरवडीचे पॅकेट खाली टाक ग !!!

नंदन's picture

27 Jan 2011 - 2:12 pm | नंदन

असं मागे कुणीतरी विडंबनात लिहिलं होतं त्याची आठवण झाली ;)

मेघवेडा's picture

27 Jan 2011 - 2:15 pm | मेघवेडा

टत्सम!!

आवडलेला आहे! चुचुआजी तू फक्त असे नवनवे शब्दच तयार करीत राहा गो. केकाबिकाच्या भानगडीत नको पडूस! :D

कुंदन's picture

27 Jan 2011 - 2:15 pm | कुंदन

चांगला झाला केक तर मला बोलाव ग खायला.
मी न विसरता येईन हो ....

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jan 2011 - 2:20 pm | llपुण्याचे पेशवेll

नान्स स्पेषल केक करनार का ?

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2011 - 2:23 pm | परिकथेतील राजकुमार

आता मग किराणा दुकान बंद करुन बेकरी चालु का ??

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 4:15 pm | नरेशकुमार

मॅडम, बेकरी चालू केलित तर पत्ता डकवा इथं
नेक्स्ट टाईम पासुन आमी तुमच्या कडुनच केक घेउ. पण डिस्काउंट मिळाला पायजे बरंका !

चुचे उद्या सांगते ग मावेतली बिस्कीटे आणि केक कसे करायचे ते.

पर्नल नेने मराठे's picture

27 Jan 2011 - 2:29 pm | पर्नल नेने मराठे

थन्क्स जागुताइ

कच्ची कैरी's picture

27 Jan 2011 - 3:00 pm | कच्ची कैरी

माझ्याक डे कुठल्याही प्रकारचा माइक्रोवेव ओव्हन नाही त्यामुळे मी यावर काही उजेड टाकु शकणार नाही

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 4:14 pm | नरेशकुमार

तुमच्य कडे गॅस, स्टोव्ह, चुल, बंब, सोलर कुक्कर आदि काही असेल तर त्याने काही उजेड टाकता येतो का बघा ना.

मुलूखावेगळी's picture

27 Jan 2011 - 3:41 pm | मुलूखावेगळी

ए मला येतो गॅसवर तवा ठेवुन करायचा
पन त्याला २ तास लाग्तात
म्हनुन माझी आइ करु देत नाही
तुला चालत असेल तर सान्ग रेसिपी देइल
फुल्ल गॅरन्टी चान्गला होतो
मनापासुन केला तर ;)

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 4:12 pm | नरेशकुमार

बराबरे,
घरात गॅस दोन तास जाळायचा, त्या पेक्षा भायेरुन आनलेला परवडत असेल.

आमि बि असंच करतो. कोन ते घरात करयच्या भान्गडित पडनार ?
मस्त भायेर जायचं आनि पायजे ते हादाडुन यायचं !

फुल्ल गॅरन्टी चान्गला होतो
मनापासुन केला तर Wink

शेवटच्या वाक्यात खरी मेख आहे =))

हेहेहे... काहीही विचारते!
मला येत नाही असलं काहीही!!

रेवती's picture

27 Jan 2011 - 8:05 pm | रेवती

मला नाही सांगता येणार.
त्यातून 'बाई' म्हटल्यामुळे तर अजिबातच नाही.

"डच ऑव्हन" म्हणजे जाड बिडाचे झाकणासहित भांडे.

हे स्टोव्हवर ठेवून काही गोष्टी बेक करता येतात.

जर झाकणावर निखारे ठेवता आले, तर उत्तम.

ही पद्धत कमलाबाई ओगले देतात - सांदण करण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे सांदणे-वड्या-नानखटाई भाजणे हे फक्त "डच"-युरोपियन नव्हे.

(पण आधुनिक स्वयंपाकघरात निखारे कुठून मिळवणार?) माझी आई दुसर्‍या एका जाड धातूच्या ताटलीत वाळू खूप गरम करत असे, आणि ही वाळूची ताटली स्टोवरील या "ओव्हन"वर झाकण म्हणून ठेवत असे.

निखारे किंवा वाळू ठेवलेले झाकण खालून (अन्नाच्या दिशेला असलेला भाग) काळवंडलेले असले पाहिजे. चकचकीत असून तितके उपयोगाचे नाही.

बेकिंगच्या भाजण्यात वरून-खालून-सगळीकडून उष्णता लागणे महत्त्वाचे असते.

(कै. कमलाबाई ओगले या बाईंनी माझ्या मार्फत ही माहिती दिली आहे, हे जाणून म्या पुरुषाचा प्रतिसाद केक-सांदणाइतका गोड मानून घ्या.)

सेरेपी's picture

28 Jan 2011 - 2:35 am | सेरेपी

चुचुआज्जी

ही घ्या दोन मिन्टात मा.वे. मधली केकृ (नवीन शब्द शिकले आज म्हटलं वापरुन घेऊ):

http://www.grouprecipes.com/87049/cake-in-a-cup.html

मी मधे यातले गाजर आणि चॉकलेट केक करुन पाहिले होते, साखरेऐवजी मध आणि मैदा आणि कणिक ५०/५० वापरून. छान होतात, फक्त पटकन खावेत (तो मला तरी कधी प्रॉब्लेम आला नाही ;-) )
आणि हो, मी मुलगी आहे ('बाई' नाही) तेव्हा बघा आमची केकृ चालत असली तर!

चित्रा's picture

28 Jan 2011 - 7:52 am | चित्रा

>>>बायकांचे रिप्लायच नाहित :ओ त्याना माझी टफ फाइट नकोय
हाहाहाहा

बायकांचे छुपे चॅलेन्ज स्विकारावे म्हणून बायकांनीच "निट मार्गदर्शन करावे. " असा दम भरू शकणार्‍या चुचुतै भारी आहेत.

पर्नल नेने मराठे's picture

28 Jan 2011 - 9:58 am | पर्नल नेने मराठे

चित्रा तुच मला निट ओळखलेस ग !!! थन्क्स ह..

विजुभाऊ's picture

28 Jan 2011 - 10:25 am | विजुभाऊ

चुचू आत्ते कोणतीही रेशीपी असूदे
केक मात्र अस्साच दिसायला हवा c
ही घे रेशीपी
http://www.indobase.com/recipes/details/black-forest-cake.php
बाकी बायकाना बायका मदत करतील तर त्याना बायका कशाला म्हणायचे......

शिल्पा ब's picture

28 Jan 2011 - 10:32 am | शिल्पा ब

मि विक्तचा केक अनुन खते..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jan 2011 - 10:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय पण धागा आणि एकेक प्रतिसाद आहेत. =))

चुचुआत्ते, तू तिरामिसु करून पहा गं. त्याला कोणत्याच ओव्हनची गरज नाही. या पहा रेसेप्या, मिपावरच्याच आहे.
दुवा १: शेफ - सुबक ठेंगणी
दुवा २: शेफ - स्वाती दिनेश.

पैसा's picture

31 Jan 2011 - 11:24 pm | पैसा

केक झाला की नै शेवट?

मी-सौरभ's picture

31 Jan 2011 - 11:42 pm | मी-सौरभ

नविन प्रश्ण...
ह्या सर्व महिला 'बाई' म्हटल्यावर एवढ्या का उसळतात???