"बाप" माणुस झालो

झकासराव's picture
झकासराव in जनातलं, मनातलं
15 Oct 2007 - 9:13 am

मागील आठवड्यात आम्हास पुत्र रत्न प्राप्ती झाली. :)
आपल्या सर्वाना कळवावे म्हणुन ही बातमी इथे टाकली आहे.

हे ठिकाणबातमी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Oct 2007 - 9:31 am | विसोबा खेचर

झकासरावा,

तुझे व तुझ्या सौ चे हार्दिक अभिनंदन..

छोट्याला अनेकोत्तम आशीर्वाद...

मिसळपाव परिवार तुमच्या आनंदात सहभागी आहे....

तात्या.

कोलबेर's picture

15 Oct 2007 - 9:34 am | कोलबेर

मग नाव काय ठेवले/ठेवणार? बारसे कधी? हे पण कळवा की!

प्रकाश घाटपांडे's picture

15 Oct 2007 - 9:34 am | प्रकाश घाटपांडे

१) आपल्या जबाबदार्‍या नकळत वाढल्या.
२) लोकसंख्येत एकाची भर पडली
३) भविष्यात एका गरजू तरुणाचा रोजगार कमी झाला
४) रत्न निघतय कि दिवटा याची काळजी निर्माण झाली.
५) आपल्याला अधिक कमाई करण्याची गरज निर्माण झाली
( दु:ख हे आनंदासाठी चांगले विरजण आहे)
प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव's picture

15 Oct 2007 - 9:47 am | प्रमोद देव

कुणी नवीन दुकान काढले की "दिवाळ्याचा अर्ज मागवून घ्या म्हणावं" असे म्हणणार्‍या 'अंतु बर्व्या'ची आठवण आली आपल्या प्रतिसादाने.
घाटपांडे साहेब आपण जन्माने नसलात तरी वृत्तीने कोकणी दिसताहात( आहे की नाही स्वभाव विश्लेषण....आम्हाला बी वाइच शास्त्र येतं म्हन्तो मी) नाही तर असा प्रतिसाद दिला नसतात.
(कृ. ह. घ्या.)

प्रकाश घाटपांडे's picture

15 Oct 2007 - 10:01 am | प्रकाश घाटपांडे

आमच्या नावातच घाट हाये. इथ येउन पुन्यात आल्यव आमच्यात कोकनि संस्कार झाले. आनंदात काय सगळेच सहभागी होतात. दु:खात व्हत नाहीत ना? म्हनुन आम्हि झकासरावांचे खरे हितचिंतक!
झ़कासराव आम्हाला ई पेढा पाठवा बरका! पेढा खाल्ल्याव त्याची चव जिभेवर लई रेंगाळते,

अवांतर - अंतू बर्वा परत एकदा वाचला पाहिजे.
प्रकाश घाटपांडे

कोलबेर's picture

15 Oct 2007 - 11:48 pm | कोलबेर

कोकणी असो की वैदर्भीय महाराष्ट्रा बाहेरच्यांसाठी सगळेच घाटी आहेत.. हे कॉलेजात केल्यावर कळले.

विकास's picture

16 Oct 2007 - 12:01 am | विकास

अभिनंदन झकासराव! नाव काय ठेवले?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2007 - 12:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकासराव अभिनंदन !
चिरंजीवास आमचेही आशिर्वाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु's picture

16 Oct 2007 - 12:16 am | प्राजु

झकासराव...
बाजी मारलित तर...! अभिनंदन... आमचे ही आशिर्वाद चिरंजीवाना आपल्या.
- प्राजु.

देवदत्त's picture

16 Oct 2007 - 7:54 am | देवदत्त

मनःपूर्वक अभिनंदन..

ध्रुव's picture

16 Oct 2007 - 11:02 am | ध्रुव

झकासराव अभिनंदन..,
नाव काय ठेवणार आहात?
छायाचित्रे चढवा जालावर..... वाट बघेन!!

ध्रुव
सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

झकासराव's picture

16 Oct 2007 - 3:00 pm | झकासराव

तुमच्या शुभेच्छाबद्दल. :)
घाटपांडे साहेब तुम्ही भविष्याचे चित्र दाखवले त्याबद्दल विशेष आभारी आहे. :)
देव साहेब अहो त्यांच्या आडनावातच "घाट" आहे की.
हलकेच घ्या हो.
बारस अजुन नाही झाल. दिवाळीनंतर होइल.
नाव ठेवल्यावर सांगेन इथे सगळ्याना. :)
छायाचित्र नक्की टाकेन.

सध्या एकच मदत हवी आहे.
इथे इ-पेढे द्यावे म्हणतोय. ते कसे द्यावे? (चित्र कसे टाकावे)

प्रमोद देव's picture

16 Oct 2007 - 3:04 pm | प्रमोद देव

झकासराव's picture

16 Oct 2007 - 3:26 pm | झकासराव

हाक मारली की देव आले धावुन :)
धन्यवाद प्रमोद देव

कांचन's picture

16 Oct 2007 - 10:23 pm | कांचन

झकासराव,

देवांनी तुमच्या वतीने दिलेले पेढे पावले! पुत्ररत्नप्राप्तीबद्दल अभिनंदन!

कांचन

राजे's picture

16 Oct 2007 - 11:43 pm | राजे (not verified)

अभिनंदन झकासराव!

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

राजीव अनंत भिडे's picture

17 Oct 2007 - 1:38 am | राजीव अनंत भिडे

मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन आणि मुलाला आशीर्वाद!

ह्या सदराची 'वैयक्तिक' या नावाखाली हेटाळणी होऊन ते 'आपापसात' मध्ये न जाता अद्यापही मिसळपावच्या मेन स्ट्रीमवरच आहे याबद्दल मी पंचायतसमितीचे आभार मानतो.

कुणी सभासद स्वत:बद्दल किंवा इतरांबद्दल काही लिहू लागला की लगेच त्याला 'आपापसात' मध्ये पाठवून आपला प्रशासकीय शहाणपणा सिद्ध करायचा, हा प्रकार मिसळपाववर नाही, तसेच मिसळपाववर 'आपापसात' सदृष एखादा 'महारवाडा' नाही याबद्दल मला मिसळपावचे आणि पंचायत समितीचे कौतुक वाटते!

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

पुरणपोळी's picture

17 Oct 2007 - 9:37 am | पुरणपोळी

आभिनंदन!

झकासराव's picture

17 Oct 2007 - 12:17 pm | झकासराव

सार्‍यांचे :)
पुरणपोळि, मिसळ पाव मी असल्या पदार्थांचा फॅन आहे. नुसत वाचल तरी तोंडात ३० मिलि लाळ येते.
आणि लोक्स असे आयडी घेवुन मनात खाण्याची तमन्ना जागी करतात. चांगल आहे हे. :)
मला अजुनही इकडे वेगवेगळ विभाग कसे आहेत ते कळालेल नाही.(मनोगतावर पण कळत नाही)
म्हणुन बातमी अस काही दिसल त्याखाली टाकल हे.
बरोबर आहे ना पण??

आजानुकर्ण's picture

17 Oct 2007 - 6:45 pm | आजानुकर्ण

अभिनंदन साहेब.