त्या गावांत चौघेजण
चौघांकडेही मोबाईल फोन
वेगवेगळे हॅण्डसेट, अन्
वेगवेगळे रिंगटोन
कायम कामात असतात ते
त्यात फारसा 'चेंज' नाही
एकाच गावात असूनसुध्दा
भेटण्यासाठी 'रेंज' नाही
बोलतात, भेटतात फोनवरच
एसेमेसमधून पडते गाठ
"हाय.. हॅलो .. कसं काय"
(हे फोनलादेखील झालंय पाठ)
एके दिवशी एकजण
वैतागूनच गेला फार
गप्पा मारु, भेटू तरी
काहीतरी करु यार
त्याने मग सगळ्यांना
एके दिवशी एसेमेस केले
दिवस ठरवला, रानात गेले
फोनसुध्दा फेकून दिले
गप्पा झाल्या, खूप हिंडले,
हसले, खेळले, खूप रडले,
वेळाचेही नव्हते भान
मजा केली त्यांनी छान.
. . . . . . . . . . . . . . . . . .
हल्लीही ते कामातचं असतात
भेट अशी घडंतच नाही
हातात मोबाईल असल्यावर
काम तसं अडंतच नाही.
प्रतिक्रिया
18 Jan 2011 - 8:21 pm | मी-सौरभ
कविता मस्त जमलीय...
18 Jan 2011 - 8:41 pm | प्रकाश१११
बोलतात, भेटतात फोनवरच
एसेमेसमधून पडते गाठ
"हाय.. हॅलो .. कसं काय"
(हे फोनलादेखील झालंय पाठ)
छान आणि मस्त .!!
19 Jan 2011 - 8:42 am | नरेशकुमार
मस्त आहे कविता.
आवडली.
19 Jan 2011 - 10:42 am | टारझन
खरंच .. कलियुग कलियुग ते हेच ..
कधीतरी एखाद महिना विना इंटरनेत , विना संगणक आणि विना मोबाईल घालवण्याचा विचार आहे. आज पर्यंत काही जमलं नाही :(
19 Jan 2011 - 10:56 am | गवि
मस्त.. आवडली.. खरं आहे तुमचं..
19 Jan 2011 - 11:42 am | अनिल आपटे
कविता छान जमली आहे
मला आवडली
अनिल आपटे
20 Jan 2011 - 8:37 pm | गणेशा
कविता खुपच छान आहे..
आवडली
20 Jan 2011 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तय राव, कविता आवडली.
-दिलीप बिरुटे
17 Oct 2021 - 8:47 pm | चित्रगुप्त
दहा वर्षांपूर्वीची ही कविता आज वाचनात आली. मस्त आहे.
17 Oct 2021 - 8:54 pm | कुमार१
छान आहे.
19 Oct 2021 - 8:02 am | प्राची अश्विनी
इतक्या वर्षांनंतरही कविता परिस्थितीला नेमकं मांडते.
छानच.