स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार

चित्रा's picture
चित्रा in जनातलं, मनातलं
10 Jan 2011 - 10:31 pm

पाश्चिमात्य तसेच भारतातील स्त्रीमुक्तीवादी चळवळींचा माझा अभ्यास नाही, हे या लहानशा लेखाच्या प्रारंभीच सांगून टाकते. तेव्हा या लेखात जे काही आहे, ते माझ्या वैयक्तिक निरीक्षणांमधून आले आहे, त्यात माझे अनुभव जेव्हा कधीतरी स्त्रीमुक्तीवादी लेखिकांच्या स्त्री किंवा मिळून सार्‍याजणी सारख्या मासिकांमधून ज्या कथा/कादंबर्‍या किंवा लेख हाती लागले त्यांच्याशी आपोआप जोडले गेले, कधी त्यात आणि माझ्या मध्यमवर्गीय आयुष्यात मी जे काही समान पाहिले त्यामधून ही मते कधी टोकदार तर कधी बोथट होत गेली.

स्त्रियांच्या मुक्ततेचा प्रश्न हा सर्व मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांच्या समाजाच्या दृष्टीने नेहमीच थोडा टिंगलीचा, थोडा टवाळीचा तर कधीकधी अतिशय गंभीर असा ठरला आहे. मुळात मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांबद्दल असे म्हणण्याचे कारण असे की एका पीडीत अशा व्यक्तीची ती स्त्री आहे म्हणून पीडीत आहे, आणि म्हणून तिची सुटका करावी, हा विचार मध्यमवर्गियांनीच महत्त्वाचा समजला आहे/असावा. या प्रश्नांकडे अभ्यासक म्हणून बघण्याची गरज मध्यमवर्गानेच जाणली असावी, असा माझा समज आहे. तरी हे प्रश्न मात्र मध्यमवर्गाच्या पलिकडले, सगळ्याच समाजांना, समाजातील सगळ्याच स्तरांतील लोकांचे आहेत.

मी ज्या गावात वाढले, तेथे कुणबी, ब्राह्मण, कायस्थ आणि मुसलमान अनेक वर्षे राहत होते. ब्राह्मण कनिष्ठ मध्यमवर्गीय अधिक होते, कायस्थ हे त्यामानाने सुखवस्तू, शिकलेले असत आणि मुसलमान कारागीर अधिक होते. याउलट कुणबी विशेष करून लोणावळ्याकडील भागातून वसतीला आले होते, आणि लहान लहान "बेडी" करून राहत असत. हे सांगण्याचे विशिष्ट कारण असे, की या जातींप्रमाणे आणि आर्थिक स्तराप्रमाणे स्त्रियांवरील बंधने कमी-जास्त होती. तरीही एका विशिष्ट पातळीवर त्या स्त्रिया समान होत्या. तसेही 'अर्थ' सारख्या चित्रपटांमधून कथेतील पुरुषाच्या आजूबाजूच्या सर्व स्तरातील निम्न, मध्यमवर्गीय आणि यापेक्षा उच्चस्तरीय आणि वरवर पाहता मध्यमवर्गीयांच्या सोवळ्या बंधनांमधून मुक्त स्त्रियांचेही प्रश्न असतात त्यांची झलक दिसलीच होती. त्यावेळी साम्य लक्षात आले नाही, पण जशी मी मोठी झाले तशी माझ्या आजूबाजूला असलेल्या घरांमधली स्त्रियांबद्दलची अ‍ॅपथी, थोडेसे दुर्लक्ष, थोडीशी हात झटकून टाकण्याची भावना दिसायला लागली.

माझ्या माहेरी कामाला येणारी बाई लग्न होऊन आमच्या वाडीत आली, तेव्हा आम्ही त्यांच्या घरच्या सत्यनारायणाला गेलो होतो ते आजही आठवते. तिची सासू वर्षानुवर्षे आमच्याकडे कामाला होती. तिच्या सुंदर आणि शालीन अशा त्या सुनेला लग्न करून आणल्यानंतर त्यांच्या घरी प्रसाद देताना पाहिल्याचे मला आजही जसेच्या तसे आठवते. पण नवरा व्यसनी झाला, लवकर गेला, त्याच्यामागे चार मुलांचा सांभाळ करण्यात तिचे आयुष्य कसे जाते आहे हे आम्ही पाहत होतो, पण थोडीफार पैशाची मदत आणि तिच्या मुलांच्या शिकवण्या याखेरीज आम्ही फार काही केले असे वाटत नाही. आता तिचे स्वतःचे घर आहे, मुले बर्‍यापैकी नीट शिकली, पण तिने खूप भोगले आहे/असावे. अजूनही चार घरची कामे सोडू शकत नाही, हेही तिचे वास्तव आहे. ज्या स्त्रिया तिच्याएवढ्याही नशीबवान नव्हत्या, त्यांना नवर्‍याच्या मृत्युनंतर घर सोडावे लागले, त्यांच्याबद्दल काहीबाही ऐकू येत असे. लहानपणची माझी खेळण्यातली मैत्रिण तिच्या बहिणीच्या बाळंतपणातल्या निधनानंतर सोळाव्या वर्षी लग्न होऊन तिच्याच मेव्हण्याला दिली गेली. माझ्या मुसलमान मैत्रिणीच्या घरातली अगदी थेट हीच कथा. तेव्हा आम्ही चौथीत असू. अकरावीतल्या तिच्या सख्ख्या मोठ्या बहिणीला अपघाती निधन झालेल्या बहिणीच्या पंचवीशीतल्या नवर्‍याच्या मागे स्कूटरवर बसून जाताना पाहिली तेव्हा वाटलेले आश्चर्य अजून आठवते.

आमच्या घरी शिक्षण होते, घरदार व्यवस्थित होते. तरी कुठे फारशी स्त्री मुक्त होती? अर्थात पुरुषही मुक्त नव्हते. नोकरीला बांधलेले होते. पण घरातल्या स्त्रियांचा दिवस हा पहाटे चारला सुरु होई आणि रात्री अकराला मावळे. चार वाजता उठून करायचे काय तर आंघोळी करून सर्वांचे डबे, मुलींच्या वेण्या, आणि तयारी. दहाला परत थोडी सुटका झाली, तरी बारापर्यंत सकाळी शाळेत गेलेली मुले घरी येण्याची वेळ व्हायची, मग त्यांची जेवणे, अडीच तीनच्या सुमाराला दुपारची थोडी झोप आणि परत चार वाजल्यापासून संध्याकाळची तयारी. उन्हाळ्यात उन्हाळ्यातली कामे - वाळवणे घालणे, वर्षभराच्या तांदळाला बोरिक पावडर लावून ठेवायचा (हा काय प्रकार होता, तो जे केले आहे त्यांनाच कळेल. तांदूळ दोन हातांमध्ये घ्यायचा आणि पांढर्‍या पावडरने भरलेले हात घासून ती त्या तांदळाला चोळायची. असा वर्षभराचा तेरा-चौदा माणसांना लागेल एवढा तांदूळ आमच्या घरी उन्हाळ्यात यायचा), डाळींना उन्हे द्यायची, पापड, लोणची, मिरगुंडे, बटाट्याचा वर्षभरच्या उपासांना पुरेल एवढा कीस घालायचा, चिकवड्या-कुरड्या इ. इ. दहा कामे असत. ही कामे करण्यासाठी आम्ही मदत करत असू, पण मुख्य काम बायकांचेच. ती झाली की महिनाभर विश्रांती, माहेरी जाण्याची चंगळ असे. तेवढे झाले की परत जूनच्या पहिल्या आठवड्यात घरी. शिवाय एकत्र कुटुंबांमधील रुसवे-फुगवेही असत. या सगळ्या धबडग्यात नवर्‍याबरोबर चित्रपटाला जाण्यासारखी हौस तरी भागवायला वेळ कुठे होता? पुढे मी जेव्हा नवर्‍याकडून सासू-सासरे एकत्र चित्रपटांना जायचे हे ऐकले तेव्हा आठवले की आईबाबा दोघेच मिळून एकत्र चित्रपटाला गेले आहेत असा केवळ एक दिवस मला आठवतो. तेव्हा आईला झालेला आनंद आठवतो. माझ्या घरातल्या इतर स्त्रियांचीही कथा याहून काही फार वेगळी नव्हती. असे वाटते की या बायकांनी आपल्या जाणत्या आयुष्यातील खूप वेळ हा आपल्याला दिला, घरच्यांच्या सन्मानासाठी, पाहुणे-रावळ्यांसाठी दिला. आता तिला माणसांची ऊठबस करण्याचा फार कंटाळा येतो, इतका की कधीकधी मला तिच्या कंटाळ्याचा कंटाळा येतो. पण कधीतरी विचार करताना असे वाटते की तो कंटाळा येण्याचा तिला हक्क आहे. तो तिच्या वेळेवरचा तिचा अधिकार आहे. तो कसाही, तिला हवा तसा घालवण्याचा अधिकार तिला आहे.

मुळात स्त्रियांची मुक्ती हा विषय इतका चावून चघळून चोथा झालेला विषय बनला आहे, की त्यावर वेगळे काय बोलणार असे कधीतरी वाटते. कधी वाटते की आपली एवढी पात्रता नाही. पण तरीही असे म्हणावेसे वाटते की प्रत्येक माणूस, जो जिवंत असतो, त्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाची लांबी ही सारखीच असते. पुरुष आणि स्त्री या दोन्ही व्यक्ती असल्या तरी त्यांना मिळणारे क्षण हे कसलेही लिंग न स्विकारता येतात. त्या क्षणांमध्ये स्त्रियांचा क्षण किंवा पुरुषांचा क्षण असे भेद नसतात. त्या क्षणाच्या काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. असे अनेक क्षण स्वत:च्या मनाविरुद्ध काढणे याचा अर्थ जवळजवळ संपूर्ण आयुष्य मनासारखे न जगता येणे. हे कोणाही व्यक्तीला करावे लागू नये. यासाठी पैशाचे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य, दुसर्‍याच्या इच्छेचे, वेळेचे मोल समजणे इत्यादी गोष्टींचे महत्त्व आहे. बाईने डाळीला फोडणी द्यावी, का पुरुषाने; किंवा बाईने बाळाची शी काढावी, का पुरुषाने, हे प्रश्न माझ्या मते महत्त्वाचे आहेत, पण दुय्यम आहेत, प्रत्येक जित्याजागत्या व्यक्तीला मिळालेला वेळ कसा वापरता यावा या विचारांचे बाय-प्रॉडक्टस आहेत. मुळात जन्माला आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर आपण मान्य केलेल्या चौकटींमध्ये, शक्य तितक्या स्वेच्छेने करता यावा, ही माझ्या मते खरी स्वातंत्र्याची व्याख्या असायला हवी. चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे.

स्त्री-मुक्ती चळवळीची उपेक्षा होते, त्यांचा अजेंडा कसा चुकीचा, एकांगी आहे हे खरेखोटे दळण आपण नेहमीच दळत असतो. मराठी लेखक आणि लेखिकाही एकेरी, कंटाळवाण्या कथा लिहून समाजातील विसंगती दाखवत राहतात. पण हे असे सतत कंटाळवाणे काहीतरी कथा-कादंबर्‍या-लेखांमधून दाखवणारे भले मूर्ख, एकांगी असतील, पण आजूबाजूला जे जिवंत व्यक्तींच्या आकांक्षा दाबणे, त्यांचा स्वतःच्या वेळेवर हवा तेवढा अधिकार नसणे घडत होते/घडत आहे ते अधिक चुकीचे आहे असे नाही वाटत?

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jan 2011 - 10:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आवडला आणि स्वातंत्र्याची व्याख्याही!

चित्राताई, जी कथा एकत्र कुटुंबात रहाणार्‍या तुझ्या आईची होती ती विभक्त कुटुंबात रहाणार्‍या माझ्याही आईची होती. माझा फ्शेजारचं कुटुंब सोहोनींचं, काका बाबांचे शाळेतले मित्र आणि काकू आईची शाळेतली मैत्रीण. काका आणि बाबा अनेकदा फक्त गप्पा मारत एकत्र दिसायचे पण काकू आणि आईला एकत्र बसून गप्पा मारताना मी कधीच पाहिलं नाही. आईच्या काहीतरी शिवण आणि काकूच्या हातात तिचं निवडायचं धान्य अशाच प्रकारच्या नेपथ्यात गप्पा झालेल्या मी पाहिलेल्या आहेत.

"शेजारच्या फ्लॅटमधे रहाणार्‍या मैत्रिणीलाही निवांतपणे भेटता येऊ नये", असं आयुष्य मला नको असं मी अगदी लहानपणापासून स्वतःला समजावत आले. अवतरणातले शब्द खूप उशीरा सुचले आणि समजले असतील; पण अशाच प्रकारचा विचार करायला बाबांनी मला उद्युक्त केलं याबद्दल मी बाबांची अतिशय ऋणी आहे.

लेखातील विचारांना सहमती आहे हे सांगावे सुद्धा लागू नये इतका मुद्देसूद आणि वैचारिक लेख लिहिल्याबद्दल चित्राताईचे अभिनंदन!
मीही एकत्र कुटुंबात वाढलेली असल्याने सगळे काही जणू डोळ्यासमोर घडत होते.
तरीही एका विशिष्ट पातळीवर त्या स्त्रिया समान होत्या.
जातीधर्मांच्या चौकटी आपोआप गळून पडल्या कारण त्या स्त्रिया सुख दु:खाच्या धाग्याने बांधल्या होत्या किंवा आजही आहेत. आईला कधीही तिच्या बाईपणाची चौकट मान्य नव्हती पण त्या काळी इलाज नव्हता. "हे असं आयुष्य तुम्ही जगु नका." असं सारखं सांगत रहायची पण 'कसं जगा' हे तिलाही माहित नसल्याने मलाही उशिरानेच समजलं. जेंव्हा समजलं त्यावेळी मते खूप टोकदार झाली होती. अजूनही साध्यासुध्या जुन्या पद्धतीने वागणार्‍या आणि माझ्यामते 'सहन' करणार्‍या मुलींचे आणि माझे एक मिनिटापेक्षा जास्त जमत नाही. यातही (प्रामुख्याने उच्चशिक्षित) मुली स्वत:च स्वत:च्या वेळेवरचा अधिकार अमान्य करताना पाहिल्या कि संताप येतो.
दुसरी बाजू अशी आहे कि आपली कर्तव्ये नीट समजली कि अधिकाराची समज आपोआप येत जात असावी. मला अजूनही एखाद्या सखीशी दहा पंधरा मिनिटे गप्पा माराव्याश्या वाटतात. तसे करणे जमत नाही हे खरे!

अर्धवटराव's picture

10 Jan 2011 - 11:35 pm | अर्धवटराव

संसाराचा गाडा स्त्री-पुरुष या दोन्ही चाकांवर चालतो म्हणतात. पण अ‍ॅट लीस्ट आपल्या भारतीय समाजात "स्त्री" चाकावर सोशीकपणाचा भार जास्त देण्यात आला आहे. आजच्या आधुनीक काळात समाजाने (यात स्त्री-पुरुष दोघेही आलेत) स्त्रीयांची हि घुसमट समजुन घेउन त्यावर योग्य तो प्रॅक्टीकल उपचार केला तर(च ?) आपली कुटुंब व्यवस्था अधीक बळकट आणि आनंददायी बनेल...

(कौटुंबीक) अर्धवटराव

अनामिक's picture

10 Jan 2011 - 11:59 pm | अनामिक

....स्त्रीयांची हि घुसमट समजुन घेउन त्यावर योग्य तो प्रॅक्टीकल उपचार केला तर(च ?)....

माझा ह्या समाजाने ह्या शब्दावरच आक्षेप आहे. आपण समाजाने, सरकारने असे शब्द वापरुन आपल्यावरची जबाबदारी सोयीस्करपणे टाळतो (अर्धवट, कृ. व्यक्तिशः घेऊ नका). वर चित्राताई म्हणते त्याप्रमाणे प्रत्येकालाच येणार्‍या प्रत्येक क्षण कसा जगायचा त्याचं स्वातंत्र्य असायला हवं. स्त्री सुशिक्षीत असो की अशिक्षीत, तिच्याकडून कायमच भरपूर अपेक्षा केल्या गेल्या आहेत. तुला जे करायचं ते कर, पण नवर्‍याची, घराची जबाबदारी सांभाळून! म्हणजे काय की एकीकडे स्वातंत्र्य द्यायचं, पण ते करताना तिच्या आधीच्या जबाबदार्‍यांमधे काहीच सूट नाही. मग स्त्रीने तारे वरची कसरत करत नेहमीचं रडगाणं गात रहायचं. सरकारने/समाजाने आरक्षण देऊन, वेगवेगळ्या सुविधा निर्माण करुन खूप काही उपयोग होईल असं वाटत नाही. सुरवात ही घरी व्हायला हवी. घरातली स्त्री गृहिणी का असेना, तिने काय करावं, कसं वागावं, कसं जगावं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य जरी तिला मिळालं तरी खूप बदल होईल.

चित्राताईची स्वातंत्र्याची व्याख्या चपखल आहे आणि आवडली सुद्धा!

अर्धवटराव's picture

11 Jan 2011 - 12:42 am | अर्धवटराव

अनामिक,
तुमचा आक्षेप समजतोय. म्हणुनच मी मुद्दाम 'भारतीय समाज' शब्द वापरला. मुळात स्त्रीयांवर ही वेळ का आली? स्त्रीला तिचे क्षण तिच्या इच्छेने जगण्यावर बंधने कशी आणि कोणि टाकली? प्रत्येकाने त्याचा/तिचा वेळ कसा घालवायचा हे ठरवताना त्या व्यक्तीला समाजानेच किती व्यक्तीगत स्वातंत्र्य दिलय ? समाजाने, सरकारने स्त्रीस्वातंत्र्यावर कायदे करण्याचा वा आरक्षण देण्याचा मुद्दा नाहिये. तर समाज म्हणा, कुटुंब म्हणा, आपली चौकट विस्तारायला तयार आहे का हा प्रश्न आहे. नाहि तर एखाद्-दुसरी स्त्री, जी आपले स्वातंत्र्य जपण्याची हिम्मत दाखवु शकेल, तीच फक्त स्वातंत्र्य उपभोगु शकेल... ते हि हजार कटकटींना तोंड देत देत...

अर्धवटराव.

अन्या दातार's picture

11 Jan 2011 - 7:22 pm | अन्या दातार

नोकरी करताना मला आलेला एक अनुभव मी सांगतो.
मित्राच्या लग्नासाठी मी बाहेरगावी गेलो होतो. माझा जॉब पर्चेसचा असल्याने सप्लायर्सशी फॉलो-अप घेणे हे माझे काम होते. पण मी कायदेशीर रजा घेऊन बाहेर गेलो तेंव्हासुद्धा मला माझा जॉब (अर्थातच माझ्या स्वतःच्या फोनवरुन) करावाच लागला.
मग आता मला सांगा; मी कायदेशीररित्या रजा घेऊन बाहेर माझे स्वातंत्र्य उपभोगत असूनही मला कामातून अंग बाजूला करता आले का? माझी जबाबदारी संपली का?
तात्पर्यः नोकरीत कुणाचीही (रिस्पेक्टीव्ह) जबाबदारी कुठल्याही सबबीखाली संपत नाही.

याचप्रकारे, जेंव्हा कुटुंबात घरची आणि बाहेरची अशी कामाची विभागणी असेल तर स्त्रीची (नवरा बाहेर काम करतो हे गृहित धरले आहे) जबाबदारी कशी संपते?
जेंव्हा आजारपण/बाळंतपण/माहेरपण अशा वेळेस नवरा घेईलच का नाही सांभाळुन?
जेंव्हा बायकोसुद्धा बाहेर जॉब करत असेल तर मात्र नवरा-बायकोने काही जबाबदार्‍या वाटून घेतल्या पाहिजेत असे वाटते.

अहो पण तुम्हाला त्या गोष्टीचा पगार मिळतो की.
बाई नोकरि करीत नसली आणि घराची जबाबदारी तिच्यावर असली तरी त्यातून कधीतरी सुट्टी मिळते का?

पगार हा एक प्रकारचा बेनेफिट आहे. तशाच प्रकारचा बेनेफिट स्त्रियांना सुरक्षितता, घरबसल्या आरामदायी जीवन, दगदगीच्या प्रवासापासून सुटका, कार्यालयीन कामाच्या ताणतणावांपासून मुक्तता अशा स्वरुपात मिळतोच की.

नितिन थत्ते's picture

12 Jan 2011 - 9:45 pm | नितिन थत्ते

स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांतून एकाची निवड करायची वेळ येते तेव्हा बरेच लोक सुरक्षितता निवडतात आणि स्वातंत्र्य सोडून देतात. पण स्वातंत्र्य गेले की सुरक्षितता जातेच* हे बर्‍याच उशीरा लक्षात येते.

*सुरक्षितता जातेच कारण ती आता स्वातंत्र्य ज्याच्याकडे सरेंडर केले त्याच्या मर्जीवर अवलंबून असते.

आजानुकर्ण's picture

13 Jan 2011 - 11:59 am | आजानुकर्ण

स्वातंत्र्य आणि सुरक्षितता या गोष्टी म्युच्युअली एक्सक्लुझिव असाव्यात असे वाटत नाही.

नितिन थत्ते's picture

13 Jan 2011 - 1:15 pm | नितिन थत्ते

तेच तर...तसं वाटत नाही. पण असतं.

आजानुकर्ण's picture

13 Jan 2011 - 11:59 am | आजानुकर्ण

स्वातंत्र्य आणि सुरक्षितता या गोष्टी म्युच्युअली एक्सक्लुझिव असाव्यात असे वाटत नाही.

चित्रा यांनी मोकळेपणाने सांगितलेले अनुभव मोलाचे आहेत. नेमकी कुठल्या विचारांना चालना मिळते आहे, ते चक्र अजून चालूच आहे. त्याबद्दल विस्कळित विचार -

स्वातंत्र्याची व्याख्या जशी केलेली आहे, ती पटण्यासारखीच आहे - "आयुष्यात मिळालेल्या क्षणोक्षण काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. असे बहुतेक क्षण स्वत:च्या मनाविरुद्ध काढणे याचा अर्थ जवळजवळ संपूर्ण आयुष्य मनासारखे न जगता येणे."
लेखिकेला पूर्ण जाणीव आहे, की समाजात परस्पर-आश्रित म्हणून जगायचे, म्हणजे प्रत्येकाला काही क्षण पर(स्पर)-तंत्राच्या कंटाळवाण्या कार्यात घालवावे लागतातच, उर्वरित क्षणच तितके स्व-तंत्र वागण्यासाठी मिळतात. स्त्रीमुक्ती (किंवा कुठल्याही समूहाची मुक्ती) व्हायची गरज आहे, हा विचार केव्हा येतो? स्त्रियांना (किंवा त्या कुठल्याही समूहातल्या व्यक्तींना) जितक्या मोठ्या प्रमाणात काळ नकोशा किंवा कंटाळवाण्या पर(स्पर)-तंत्राच्या कार्यात घालवावा लागतो, तितका पुरुषांना (किंवा त्या समूहावेगळ्या बहुसंख्य व्यक्तींना) घालवावा लागत नाही, त्यांना स्वतंत्र वेळ अधिक मिळतो. समाजात उपलब्ध असलेला मर्यादित स्वतंत्र वेळ लोकांनी अधिक समसमान वाटून घ्यावा हेच न्यायाचे आहे ना? असा प्रश्न लेखिका विचारत आहेत असे वाटते. आणि न्यायाचे आहे, हे मी मान्य करतो.
- - -
(दोन बारीक तपशिलाबाबत स्पष्टीकरण :
१. मराठी कथालेखकांनी आजूबाजूच्या विसंगतीकडे दुर्लक्ष न करता त्याबद्दल लिहीत जावे, पण लेखन कंटाळवाणे असू नये ही काळजी घ्यावी, असा काही शेवटच्या परिच्छेदाचा मथितार्थ आहे काय?
२. घरकामाचा वाटप हा दुय्यम आहे, कारण समसमान मिळकत, शिक्षण आणि स्वतंत्र वेळेचे मोल मनात रुजल्यावर या गोष्टी आपोआप येतात, असा मथितार्थ आहे काय?
असे मथितार्थ असल्यास ते पटण्यासारखेच आहेत.)

चित्रा's picture

11 Jan 2011 - 12:16 am | चित्रा

समाजात उपलब्ध असलेला मर्यादित स्वतंत्र वेळ लोकांनी अधिक समसमान वाटून घ्यावा हेच न्यायाचे आहे ना?

माझे मत एवढेच आहे, की स्वातंत्र्य म्हणजे मला माझा वेळ कसा घालवायचा आहे त्याची निवड करता यावी. ती मूल्ये समाजात रुजावीत. मूल्ये कशी रुजणार? तर या विषयांवरील लेखन होत रहावे. केवळ काही लेखक लेखिका कंटाळवाणे, रटाळ, लिहीत राहतात म्हणून हे विषय महत्त्वाचे नाहीत, अशी भावना मनात रुजू नये.

मराठी कथालेखकांनी आजूबाजूच्या विसंगतीकडे दुर्लक्ष न करता त्याबद्दल लिहीत जावे, पण लेखन कंटाळवाणे असू नये ही काळजी घ्यावी, असा काही शेवटच्या परिच्छेदाचा मथितार्थ आहे काय?

नाही. अनेक लेखकांचे या विषयावरचे लेखन कंटाळवाणे आहे असे (खरे जरी) वाटत असले तरी त्यावर केवळ लक्ष केंद्रित करून या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये, कारण रटाळ, कंटाळवाणे लेखन मासिका पाक्षिकांमध्ये वाचायला लागणे हे जेवढे अन्याय झाल्यासारखे वाटू शकते त्यापेक्षा समाजात घडत असलेला व्यक्तींवरील अन्याय हा शेकडो पटींनी अधिक जाचक आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे मासिका-पुस्तकांवरील लेखनामुळे टीका करून या विषयाचे ट्रिवियलाजेशन करू नये.

घरकामाचा वाटप हा दुय्यम आहे, कारण समसमान मिळकत, शिक्षण आणि स्वतंत्र वेळेचे मोल मनात रुजल्यावर या गोष्टी आपोआप येतात, असा मथितार्थ आहे काय?

होय, असाच अर्थ आहे.

शुचि's picture

11 Jan 2011 - 12:30 am | शुचि

या विषयावर माझा स्वतःचा खूप मानसिक गोंधळ आहे हे मी कबूल करते.

बरेचदा नवर्‍यापेक्षा घरातील सासरकडचा स्त्रीवर्ग हाच मला शतॄ वाटल्याकारणाने मी नवर्‍याच्या कलाने घेणे पसंद करते. मग तू म्हणतोस ना हे कर, ते कर तर जरूर करेन. मात्र अमकं करू नकोस ला मला समर्पक कारण दे एवढीच मी अपेक्षा त्याच्याकडून ठेवते. शेवटी कुठेतरी तडजोड ही करावीच लागते.

सगळीकडेच आपलं ते खरं करणं म्हणजे स्वातंत्र्य आहे का? नवर्‍याने पैसेही कमवायचे, बाहेर स्पर्धेला तोंड द्यायचे आणि २ घास आरामाची अपेक्षाही करायची नाही हा कुठला न्याय? आजही बायका कमावत्या असल्या तरी घर चालवायचा ओनस पुरुषावरच असतो. तो बदलला आहे का?

आजही स्त्री कमी कमावणार्‍या, बुटक्या, वयाने लहान पुरषाशी लग्न का करत नाही? लग्न करताना मात्र आपल्यापेक्षा जास्त शिकलेला, जास्त कमावणारा नवरा का हवा असतो?
_______________________________________________
लेख आवडला. संयत वाटला.

चित्रा's picture

11 Jan 2011 - 1:19 am | चित्रा

धन्यवाद, सर्वच प्रतिसादकांचे.

>>लग्न करताना मात्र आपल्यापेक्षा जास्त शिकलेला, जास्त कमावणारा नवरा का हवा असतो?
मुद्दाम ठरवून आपल्यापेक्षा कमी शिकलेला, कमी कमावणारा नवरा हा कोणाला हवा असेल? जर शिकणे आणि कमावणे या समाजात राहण्याच्या दृष्टीने मोलाच्या गोष्टी धरल्या, तर जास्त शिकलेला आणि कमावणारा नवरा हवा असणे समजू शकते.

>>आजही स्त्री कमी कमावणार्‍या, बुटक्या, वयाने लहान पुरषाशी लग्न का करत नाही?
पसंद अपनी, अपनी. माझ्या ओळखीत उंच बायको आणि बुटका नवरा आहेत. लग्न ठरवून झाले असताना, वयानेही लहान मुलगा आनंदाने, हौशीने केल्याचे उदाहरण घरात आहे. अर्थात कमी कमावणारा नाही. पण चांगले कमावणे ह्यात वाईट काय आहे?

>>नवर्‍याने पैसेही कमवायचे, बाहेर स्पर्धेला तोंड द्यायचे आणि २ घास आरामाची अपेक्षाही करायची नाही हा कुठला न्याय? आजही बायका कमावत्या असल्या तरी घर चालवायचा ओनस पुरुषावरच असतो. तो बदलला आहे का?

नाही.

लेखात मी आमच्या घरच्या पुरुषांबद्दलही एक वाक्य लिहीले आहे. अधिक लिहीले तर बरेच मोठे होईल. तेही अतिशय परिश्रम करणारे आहेत/होते, एवढेच म्हणते. बरीच घरे अशी असावीत.

पण बायकांसाठी मात्र वर्षानुवर्षे ठराविक कामे करीत राहणे, स्वतःचे पैसे हाती नसणे, नवर्‍यावर सर्व गोष्टींसाठी अवलंबून असणे, किंवा कामाचे स्वरूप ठरवता किंवा बदलता न येणे, अशी काहीतरी अवघड समाजव्यवस्था होती/अजूनही आहे.

आता त्यात असा फरक आहे की हल्ली बर्‍याच मध्यमवर्गीय स्त्रियांना बाहेरची कामे करून घरातलीही कामे करावी लागतात. त्यातून काहीतरी सुटका करून घेण्याच्या प्रयत्न केला तर शेजारीपाजारी, नातेवाईक बोलतात. मुंबईच्या मध्य रेल्वेने प्रवास करणार्‍या बायका भाजी निवडत घरी जात असत हे मी पाहिले आहे. पुरुषांना भाजी निवडण्याची गरज वाटत नाही. त्यांच्या काळज्या वेगळ्या आहेत. म्हणावे तर बायकांना त्याही म्हणजे पैशाच्या, कामाच्या इथल्या प्रमोशनच्या, मॅनेजमेंटच्या काळज्या आहेत. घरगुती काळज्यांची विभागणी झाली, पण श्रमांची विभागणी म्हणावी तशी झाली नाही, असे दिसते. असे श्रम कमी करायला जावे तर चेष्टा होते. किंवा अशा या वागण्यातील विसंगती/दुटप्पीपणा दाखवून देणार्‍या लेखनाची सातत्याने टिंगल होते.

अन्या दातार's picture

11 Jan 2011 - 7:28 pm | अन्या दातार

>> मुंबईच्या मध्य रेल्वेने प्रवास करणार्‍या बायका भाजी निवडत घरी जात असत हे मी पाहिले आहे. पुरुषांना भाजी निवडण्याची गरज वाटत नाही.

गरज भलेही वाटत असेल हो, पण जागा असते का तिथे? दोन बाकड्यांमधल्या जागेतही लोक उभे असतात मग भाजी कुठे निवडायची? (बाकी स्त्रियांसाठी राखीव डब्यातून प्रवास करणे मला कायदेशीरदृष्ट्या शक्य नसल्याने त्याबद्दल बोलू शकत नाही.)
सरसकट विधान करणे मला जमत नाही.

अन्या, स्त्रियांच्या डब्यातही तितकीच गर्दी असते की :) पुरुषांच्या डब्यात जशी आणि जितकी गर्दी असते तितकीच.

आजानुकर्ण's picture

12 Jan 2011 - 9:59 am | आजानुकर्ण

स्त्रियांच्या डब्यातही पुरूषांच्या डब्याइतकीच गर्दी असेल तर स्त्रियांना भाज्या निवडणे कसे शक्य होते याबाबत शंका वाटते.

अनेक सरकारी वगैरे कार्यालयांमध्ये स्त्रिया भाज्या निवडताना पाहिले आहे. कामाच्या वेळेत भाज्या निवडणे हे कामाच्या वेळेत मिपा मिपा खेळण्याप्रमाणेच आक्षेपार्ह आहे.

यशोधरा's picture

12 Jan 2011 - 12:05 pm | यशोधरा

न निवडून सांगतात कोणाला? आडमुठे प्रश्न विचारणारे आणि निरनिराळ्या शंका कुशंका काढणारे कुटुंबिय घरी असतील, त्यांच्या तोंडात भरण्यासाठी निवडत असाव्यात.
>>अनेक सरकारी वगैरे कार्यालयांमध्ये स्त्रिया भाज्या निवडताना पाहिले आहे. > मी पण. तसेच सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कार्यालयातील पुरुषांना कामाच्या वेळेत चकाट्या पिटतानाही पाहिले आहे. तुम्ही नाही बघितलेत?

आजानुकर्ण's picture

12 Jan 2011 - 2:10 pm | आजानुकर्ण

सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कार्यालयातील स्त्रिया आणि पुरुष चकाट्या पिटताना पाहिले आहे. भाज्या निवडणे हे जसे स्त्रियांचे लक्षण आहे तसे चकाट्या पिटणे हे पुरुषांचे व्यवच्छेदक लक्षण नाही.

यशोधरा's picture

12 Jan 2011 - 2:39 pm | यशोधरा

भाज्या निवडणे हे जसे स्त्रियांचे लक्षण आहे >> हो?
>> तसे चकाट्या पिटणे हे पुरुषांचे व्यवच्छेदक लक्षण नाही >> आँ?

आजानुकर्ण's picture

12 Jan 2011 - 2:59 pm | आजानुकर्ण

चकाट्या पिटणे हे केवळ पुरुषांचे व्यवच्छेदक लक्षण नाही

बेटर. :) आडवळणाने का होईना, तुम्ही पुरुषही चकाट्या पिटतात ह्याला सहमती दर्शवल्याबद्दल धन्यवाद. आता त्यांनी भाज्या निवडायला सुरुवात केली की झालेच. काहीजण मनात तुम्ही उल्ल्केख केला आहे त्या व्यवच्छेदक लक्षणांबद्दल काही न आणता निवडतातही. :)
तसेच भाज्या निवडणे हे केवळ स्रियांचे व्यवच्छेदक ल़क्षण नाही. निदान नसावे.

आजानुकर्ण's picture

12 Jan 2011 - 6:02 pm | आजानुकर्ण

तसेच भाज्या निवडणे हे केवळ स्रियांचे व्यवच्छेदक ल़क्षण नाही. निदान नसावे.

असे असेल तर पुरूषही भाज्या निवडतात हे सिद्ध होऊन एकंदर चर्चेचा सूर पालटण्याची शक्यता आहे असे नम्रपणे सुचवू इच्छितो.

यशोधरा's picture

12 Jan 2011 - 6:34 pm | यशोधरा

मी ह्या चर्चेत दिलेले प्रतिसाद एकदा नीट वाचायची तसदी घ्याल का? कृपया? कुठेही मी पुरुषांनी अमकेच करावे वा स्त्रियांनी तमके का करु नये वगैरे सूर लावलेला नाहीये. उलट माझ्या प्रतिसादांमधे मी कोणत्याही व्यक्तीने - इथे स्त्रीने - स्वतःला सक्षम बनवावे हेच सांगितलेले आहे.

अन्या, ह्यांनी पुरुषांच्या डब्यात खूप गर्दी असते त्यामुळे ते भाज्या निवडू शकत नाहीत असे विधान केले आहे, त्यावर मी फक्त बायकांच्या डब्यातही गर्दी असते हे सांगितले आहे आणि त्यात काहीच अतिशयोक्ती नाही. लोकलमधून प्रवास केल्याने मी हे नक्कीच अनुभवावरुन सांगू शकते. तेह्वा गर्दी असते, हे भाज्या न निवडण्याचे कारण चालेलच असे नाही.

>>असे असेल तर पुरूषही भाज्या निवडतात हे सिद्ध होऊन >> त्यामुळे सिद्ध होत नाही. 'निदान नसावे' हे फार महत्वाचे. दुसरे म्हणजे, "काहीजण मनात तुम्ही उल्लेख केला आहे त्या व्यवच्छेदक लक्षणांबद्दल काही न आणता निवडतातही" हे वाक्य वाचायला तुम्ही विसरलात का? की तुमचे येन केन प्रकारे काहीही बादरायण संबंध लावून प्रतिवाद करायचाच, हे धोरण आहे?

बाकी अन्या दातार ह्या आयडीला दिलेल्या उत्तरावर तुम्ही इतक्या हिरीरीने चालवलेला प्रतिवाद वाचून मजा वाटली. असो. बाकी ह्यापुढे चालू द्या.

आजानुकर्ण's picture

12 Jan 2011 - 8:00 pm | आजानुकर्ण

अन्या दातार ह्या आयडीला दिलेल्या उत्तरावर तुम्ही इतक्या हिरीरीने चालवलेला प्रतिवाद वाचून मजा वाटली.

???

आमची कुठेही शाखा नाही.

श्रावण मोडक's picture

12 Jan 2011 - 12:20 pm | श्रावण मोडक

अनेक सरकारी वगैरे कार्यालयांमध्ये स्त्रिया भाज्या निवडताना पाहिले आहे. कामाच्या वेळेत भाज्या निवडणे हे कामाच्या वेळेत मिपा मिपा खेळण्याप्रमाणेच आक्षेपार्ह आहे.

चला, इथे तरी स्त्री-पुरूष समता आहे हे नसे थोडके. ;)

प्रियाली's picture

11 Jan 2011 - 3:31 am | प्रियाली

स्त्रियांना जास्त कमावणारा नवरा हवा असणे यात अयोग्य काय आहे? अतिशय योग्य निर्णंय आहे. मी कितीही ठाम माझ्या पायावर उभी असले आणि दोघाचौघांना पोसण्याची ताकद असली तरी मला माझ्याहून जास्त कमावणारा जोडीदार आवडेल. यामागे माझे म्हणणे असे की यदाकदाचित उद्या माझी नोकरी गेली तर माझ्या जोडीदाराचे उत्पन्न मला आणि कुटुंबाला पुरेल असे हवे.

पुरुषांना कमी पगाराच्या बायका का हव्या असतात हे कोडे आहे. ;)

नुकताच मला माझ्या काही वर्गमित्रांशी बोलण्याचा प्रसंग आला. अनेकांपैकी फक्त दोघांच्या बायका प्रोफेशनली स्टेबल आणि उत्तम पगाराच्या नोकर्‍या करताना आढळल्या. इतरांच्या बायका गृहिणी, घरात बसून ट्यूशन घेणार्‍या किंवा शिक्षिकेची नोकरी करणार्‍या होत्या. (हे करण्यात काही कमी आहे असे नाही परंतु इंजिनिअरिंग करून, जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे कमर्शिअल आर्टिस्ट असून, एमबीए असून किंवा एम.एस्सी. असून कायमस्वरुपी घरकाम करण्याचा निर्णय घेणार्‍या बायकांबद्दल आश्चर्य वाटते हे खरेच.)

शुचि's picture

11 Jan 2011 - 3:52 am | शुचि

>>...... असून कायमस्वरुपी घरकाम करण्याचा निर्णय घेणार्‍या बायकांबद्दल आश्चर्य वाटते हे खरेच >>
कधी कधी कौटुंबिक वातावरण नोकरीकरता पोषक नसते. कधीकधी स्वतःचा निर्णय असतो.
_______________________________________________

माझी एक मैत्रिण आहे तिने एम बी बी एस केले आणि आता पूर्ण वेळ ग्रुहीणी आहे. नवरा म्हणतो "काय ते डॉक्टरकीचं ज्ञान पाजळायचं ते घरी पाजळा!!!"
पण तिने नवर्‍याला अफलातून साथ दिली आहे. नवर्‍याचं मित्र-वर्तुळ अफाट आहे. घरी सारखी येजा आणि राबता असतो. यातूनच तो मोठ्या पदावर चढू शकला आहे. हीने रांधा-वाढा-उष्टी काढा एवढच नाही तर अप्रतिमच साथ त्याला दिली आहे. मुलांना वेगवेगळ्या वर्गांना(क्लासेस) घालणे, पाहुण्यांची सरबराई , पार्टीज ना जाणे सर्व मनापासून आणि शिस्तीत ठेवले आहे. त्यांची बचत दांडगी आहे ती हिच्या शिस्तप्रिय स्वभावामुळेच. मुलांना देखील मातृसौख्य भरपूर आहे. सारखे नवनवीन पदार्थ आणि व्यवस्थित साग्रसंगीत सर्व जय्यत मिळतं.
सांगायचा मुद्दा हा की जे लोक खरच चमकणार असतात ते कुठेही चमकू शकतात.

प्रियाली's picture

11 Jan 2011 - 4:01 am | प्रियाली

कधी कधी कौटुंबिक वातावरण नोकरीकरता पोषक नसते.

हे समजू शकते. म्हणजेच समानतेपासून स्त्री अद्याप दूर आहे असेच म्हणायला हवे.

कधीकधी स्वतःचा निर्णय असतो.

खरेच? एखादी मुलगी इंजिनिअरींग किंवा मेडिकलला अ‍ॅडमिशन घेताना भविष्यात कायमस्वरुपी घरी बसण्याचा निर्णय घेते? असे असेल तर या मुलींचे प्रबोधन आवश्यक आहे. असा निर्णय किती पुरुष घेताना पाहिले आहेत?

माझी एक मैत्रिण आहे तिने एम बी बी एस केले आणि आता पूर्ण वेळ ग्रुहीणी आहे. नवरा म्हणतो "काय ते डॉक्टरकीचं ज्ञान पाजळायचं ते घरी पाजळा!!!"
पण तिने नवर्‍याला अफलातून साथ दिली आहे. नवर्‍याचं मित्र-वर्तुळ अफाट आहे. घरी सारखी येजा आणि राबता असतो. यातूनच तो मोठ्या पदावर चढू शकला आहे. हीने रांधा-वाढा-उष्टी काढा एवढच नाही तर अप्रतिमच साथ त्याला दिली आहे. मुलांना वेगवेगळ्या वर्गांना(क्लासेस) घालणे, पाहुण्यांची सरबराई , पार्टीज ना जाणे सर्व मनापासून आणि शिस्तीत ठेवले आहे. त्यांची बचत दांडगी आहे ती हिच्या शिस्तप्रिय स्वभावामुळेच. मुलांना देखील मातृसौख्य भरपूर आहे. सारखे नवनवीन पदार्थ आणि व्यवस्थित साग्रसंगीत सर्व जय्यत मिळतं.
सांगायचा मुद्दा हा की जे लोक खरच चमकणार असतात ते कुठेही चमकू शकतात.

यावर काय बोलावे? :) माणसे कशाचाही गौरव करतात याचे उत्तम उदाहरण.

बाकी, शिस्त, उत्तम स्वयंपाक, मातृसौख्य, नवनवीन पदार्थ आणि एमबीबीएस यांचा परस्परसंबंध नाही. एमबीबीएस होऊन तुमची मैत्रिण हे करण्यात मोठेपणा मानत असेल तर तिच्या अंतरंगातील खरे दु:ख जाणून घ्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jan 2011 - 4:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी, शिस्त, उत्तम स्वयंपाक, मातृसौख्य, नवनवीन पदार्थ आणि एमबीबीएस यांचा परस्परसंबंध नाही.

एवढं सगळं करायचंच होतं तर लोकं मरमरून अभ्यास करून ज्या एमबीबीएसच्या मागे लागतात त्याचीच एक सीट का फुकट घालवली?

असा आडमुठा नवरा मिळणार आहे हे स्वप्न पडलं होतं का तेव्हा?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jan 2011 - 4:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिक्षणाने माहिती वाढली, पण विचार वाढला नाही. नवर्‍यालाही थोडे "कूल पॉईंट्स" मिळाले असावेत त्याच्या समविचारी लोकांमधे, एमबीबीएस बायको घरी रांधा-वाढा-उष्टी काढा याबरोबरच शोभेची बाहुली म्हणून पार्ट्यांमधेही मिरवते म्हणून!

माझा दृष्टीकोन: नवर्‍याने परवानगी मागितली का बायकोची "नोकरी करू का" म्हणून? मग हिला का हवी परवानगी?? अशिक्षित, अर्धशिक्षित बायकांना निदान नोकर्‍याही धड मिळत नाहीत.
प्रियालीचा प्रतिसाद पटला, असं जगण्यापेक्षा घटस्फोट घेऊन स्वतःवर अवलंबून असणं जास्त उत्तम.

अर्थात शुचि, तुझ्या मैत्रीणीने ठरवावं तिला काय आवडतं ते! तिच्यासाठी मी तर नाही निर्णय घेऊ शकत.

तेच होतं ना सगळीकडून कुचंबणाच येते नशीबी. इकडे आड तिकडे विहीर. नवरा की नोकरी? असे पर्याय दिले तर सहसा बायका कच खातात आणि नवरा हा पारंपारीक पर्याय स्वीकारतात. कारण घरचेदेखील पाठीशी उभे रहायला तयार नसतात. मग तो म्हणतो आहे ना "सोड नोकरी तर सोड' असेच तेदेखील म्हणतात.
पुस्तकी शिक्षणाने खमकेपणा येत नाही तो मूळात असावा लागतो. आपल्यावर कौटुम्बिक व्यवस्थेचे इतके महत्व बिम्बलेले असते लहानपणापासून की असा खमका स्टँड नाही घेता येत की - मला नोकरी करायचीच आहे मग तू परवानगी दे अथवा घटस्फोट दे.

प्रियाली's picture

11 Jan 2011 - 4:42 am | प्रियाली

पुस्तकी शिक्षणाने खमकेपणा येत नाही तो मूळात असावा लागतो. आपल्यावर कौटुम्बिक व्यवस्थेचे इतके महत्व बिम्बलेले असते लहानपणापासून की असा खमका स्टँड नाही घेता येत की - मला नोकरी करायचीच आहे मग तू परवानगी दे अथवा घटस्फोट दे.

याच्याशी सहमत आहेच पण अन्याय दूर सारायचा असेल तर हे करणे भागही पडते.

काही वर्षांपूर्वी मनोगतावर एक गोष्ट लिहिली होती. तिचा कल स्त्रीमुक्तीचा नसला तरी विचार न करता निर्णय घेतल्याची परिणिती कशी होऊ शकते त्यावर होता. गोष्ट बर्‍यापैकी सत्य आहे आणि या गोष्टीतील दोघांनी घटस्फोट घेऊन, पुन्हा लग्न केलेले आहे आणि त्यांचे दुसरे संसार बरे चालले आहेत.

कथा आवडली. वास्तव वाटली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jan 2011 - 5:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुचंबणा होते हे खरं आणि उदात्तीकरण खोटं एवढंच हवं होतं. याची जाणीव होणं महत्त्वाचं आहे शुचि.

कुचंबणा होऊ दिली जाते म्हणून होते.
दोष आईवडिलांचा आहे. एम बी बी एस चे शिक्षण काय मुलीला डॉक्टर केली हे मिरवायला दिले? या शिक्षणासाठीचे तुझे आणि आईवडिलांचे कष्ट पाण्यात घालवायचे नाहीयेत हा एवढा साधा विचार देता नाही आला?

सुहास..'s picture

11 Jan 2011 - 5:50 pm | सुहास..

असा आडमुठा नवरा मिळणार आहे हे स्वप्न पडलं होतं का तेव्हा? >>>

माझ्या मते आडमुठा नाही , मुर्खच आहे.

मु़ळामुठा

आजानुकर्ण's picture

12 Jan 2011 - 10:28 am | आजानुकर्ण

एवढं सगळं करायचंच होतं तर लोकं मरमरून अभ्यास करून ज्या एमबीबीएसच्या मागे लागतात त्याचीच एक सीट का फुकट घालवली?

आमच्या वर्गातील 18 मुलींपैकी किमान 7 मुली इंजिनियरिंगची पदवी पदरात पाडून आता केवळ घरकाम करत आहेत. त्यांच्या जागेवर होतकरू मुलांना प्रवेश मिळाला असता तर ती 7 मुले आणि त्यांच्या प्रत्येकी 1 अशा 7 बायका यांचे भले झाले असते.

टारझन's picture

12 Jan 2011 - 12:46 pm | टारझन

अगदी मनातला प्रतिसाद :) सात स्त्रीयांची वाट लावली त्या सात स्त्रीयांनी. त्यामुळी "स्त्री ची खरी दुश्मान स्त्री" च आहे ह्या वाक्याला पुष्टी मिळत आहे.

बाकी आपल्या घरात काय करता येईल एवढंच आपण बघतो , उगाच मराठी संस्थळावर तावातावाने "आपले उद्धट आणि उच्च विचार " प्रकट करुन लाल करुन घेत नाही :) बाकी काही प्रतिसादांवरुन वाटते की जगातल्या सगळ्या स्त्रीयांचं उक्त जणु यांच्याच खांद्यावर आहे =)) अशांनी स्वतःच्या घरात असाच गोंधळ घालु नये अन्यथा त्यांची इंचाइंचाने अधोगती झाल्याशिवाय रहाणार नाही.

चित्रा चा लेख संतुलित आहे . त्यात कुठेही आडमुठेपणा नाही , भांडकुदळपणा नाही, आणि हळुवार आहे जे काही आहे ते. :) " हळुवारपणा हा स्त्रीयांमधे असावाच्च " असे वाटते. आडमुठ्या आणि गुडघ्यात मेंदु असलेल्या स्त्रीयांची ( आणि पुरुषांचीही , हे लिहावं लागतं , खास आडमुठ्या स्त्रीयांसाठी) आम्हाला प्रचंड कीव वाटते =))

-( शोबाजी विरोधी स्त्रीसमर्थक) टारझन

स्त्री समर्थक न राहून सांगतोस कुणाला?
तुझं लग्न आलय काही महिन्यांवर!;)

पण तिचा नवरा जर परवानगी देत नसेल तर तिने घटस्फोट घ्यावा काय? हे तर रोगापेक्षा उपाय जालीम असे झाले.

प्रियाली's picture

11 Jan 2011 - 4:08 am | प्रियाली

पण तिचा नवरा जर परवानगी देत नसेल तर तिने घटस्फोट घ्यावा काय? हे तर रोगापेक्षा उपाय जालीम असे झाले.

घटस्फोटापर्यंत तर मी पोहोचले नव्हते. :) तिचा नवरा परवानगी देत नाही आणि तिला आपले करिअर करण्यासाठी नवर्‍याची परवानगी लागते हे कळले, जे क्लेशदायक आहे.

असो. व्यावसायिक शिक्षण घेऊन जन्मभर आपल्याला आवडती लाईन न घेता आल्याने कुढत बसण्यापेक्षा घटस्फोट घेऊन आपले जीवन आनंदान जगणे हा निर्णय मला योग्य वाटतो. जन्मभर अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाचा नाश करणे योग्य. रोगापेक्षा उपाय जालीम वाटत नाही. परंतु हे माझे मत झाले.

विजुभाऊ's picture

12 Jan 2011 - 12:10 pm | विजुभाऊ

पण तिचा नवरा जर परवानगी देत नसेल तर तिने घटस्फोट घ्यावा काय? हे तर रोगापेक्षा उपाय जालीम असे झाले.

म्हातारी मेल्याचे दु:ख्ख नाही.पण काळ सोकावतो.
त्या स्त्रीला परवानगी घेण्याची आवश्यकताच का भासावी? लग्नापूर्वीच जर तिने स्वतःचे करीयर करणार असे ठरवले असते. लग्ना अगोदर जोदीदाराला संगितले असते तर हा प्रश्न आलाच नसता. अगोदर छोट्या छोट्या गोष्टीत परवानगी मागायची नवर्‍याला सवय लावली.
या सर्वाला कारणीभूत आहे आर्थीक स्वातन्त्र्य..... आर्थीक निर्णयासाठी अवलंबून असलात की तुमचे स्वत्व संपलेले असते. देणारा त्याच्या अटी लादत जातो. बॅन्क , सावकार , वर्ल्ड बॅन्क यांचेही असेच असते

शुचि's picture

11 Jan 2011 - 4:14 am | शुचि

>> एमबीबीएस होऊन तुमची मैत्रिण हे करण्यात मोठेपणा मानत असेल तर तिच्या अंतरंगातील खरे दु:ख जाणून घ्या.>>

+१००००
हो ती दु:खी आहे. खूप दु:खी आहे. पण मला हे कौतुक वाटतं की तरी तिने संसार व्यवस्थित पार पाडला आहे.

माझ्या एका मैत्रिणीची आठवण झाली. त्या डॉ. मैत्रिणीने लग्नाच्या मांडवातच लग्न करायला नकार दिला कारण नवरा ऐनवेळी (लग्नाच्या दिवशी सकाळी) नोकरी चालणार नाही, अमकं चालणार नाही, तमकं चालणार नाही असे म्हणाला.
तिच्या म्हणण्यानुसार त्याने ही अरेरावी योग्य वेळीच केली. लग्न झाल्यावर केली असती तर घटस्फोटाची नसती कटकट मागे लागली असती. शिवाय आईवडीलांचा पुरेसा पाठिंबा कशालाच नाहीये.
तिचं लग्न पुन्हा होण्यास थोडा उशीर झाला पण आता ठिक आहे सगळे.

शिल्पा ब's picture

11 Jan 2011 - 6:58 am | शिल्पा ब

या मुलीचं वागणं आवडलं...असंच खंबीर रहायला हवं.उगाच समाजाला घाबरून लग्न केलं असता तर समाज आला असता का निस्तरायला? तिला भावनिक, मानसिक आधार द्यायला?

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 7:07 am | नरेशकुमार

रेवती ताई आपल्या मैत्रिनीने घेतलेला निर्णय योग्य आहे असे वाटते.

अवांतर :
आमच्या बाबतित इथे उलटे झाले आहे.
जेव्हा जेव्हा मि मुलिंना 'नोकरि करयचि नाहि' असे सांगितले, तेव्हा तेव्हा त्यांनि मला रिजेक्ट केले.
आनि जेव्हा नाईलाजस्तव मी हि अट काढुन टाकली तेव्हा मात्र नोकरिचि इच्छाच नसनारि बायको मिळाली.

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 6:15 pm | नरेशकुमार

एका कळीला फुल होन्याचि संधी मिळालिच पाहिजे होती. असे मनापासुन वाटते.

पुरुषांना कमी पगाराच्या बायका का हव्या असतात हे कोडे आहे
स्त्रीने आपल्याला नकार देवू नये म्हणून असेल बहुतेक.
जास्त पगाराचा नवरा मिळावा ही स्त्रीयांची अपेक्षा असते तर पुरुषांची स्त्रीने नेहमी आपल्या पेक्षा थोडे कमीच रहावे. आर्थीक बाबतीत वरचढ होऊनये. शिवाय स्त्रीचे उत्पन्न असेल तर तो बोनस गृहीत धरण्यात येतो. मिळाला तर उत्तमच की. ही भावना असते.
लग्नानन्तर समजा स्त्रीची प्राप्ती नवर्‍यापेक्षा जास्त झाली की त्या स्त्रीला तिच्या उत्पन्नामुळे सुपीरीयॉरिटी कॉम्प्लेक्स येतो असा ही समज आहे. पुरुषाने हा कॉम्प्लेक्स सहन करणे थोडे अवघडच असते.
बाकी भरपूर शिकुन स्त्रीया लग्नानन्तर स्वतःचे डोके ( मेंदू) बाजूला का ठेवून देतात हे देखील एक कोडे आहे ;)

प्रियाली's picture

12 Jan 2011 - 5:02 pm | प्रियाली

लग्नानन्तर समजा स्त्रीची प्राप्ती नवर्‍यापेक्षा जास्त झाली की त्या स्त्रीला तिच्या उत्पन्नामुळे सुपीरीयॉरिटी कॉम्प्लेक्स येतो असा ही समज आहे. पुरुषाने हा कॉम्प्लेक्स सहन करणे थोडे अवघडच असते.

धन्यवाद. उत्तर मला पटते.

बाकी भरपूर शिकुन स्त्रीया लग्नानन्तर स्वतःचे डोके ( मेंदू) बाजूला का ठेवून देतात हे देखील एक कोडे आहे

डोके बाजूला ठेवणे, स्त्री, लग्न वगैरेंचा परस्परसंबंध नाही. स्त्रियांचे व्यवच्छेदक लक्षणही नाही. समाजधारणाही नाही. डोके बाजूला ठेवण्याचे काम स्त्री आणि पुरुष हे दोन्ही करत असतात. तेव्हा हे कोडे नाही.

अप्पा जोगळेकर's picture

12 Jan 2011 - 3:50 pm | अप्पा जोगळेकर

पुरुषांना कमी पगाराच्या बायका का हव्या असतात हे कोडे आहे.
छ्या. काहीतरीच.

मितान's picture

11 Jan 2011 - 12:31 am | मितान

चित्राताई, तुझी स्वातंत्र्याची व्याख्या मनापासून पटली. तू दिलेली उदाहरणे माझ्याच सासर माहेरच्या एकत्र कुटुंबात पाहिलेली आठवतात.
अनेकदा तू म्हणतेस तसे क्षण मनासारखे जगायला कुणाचीच हरकत नसते. तिथे आड येतो तो पिढ्यानपिढ्या स्त्री म्हणून आपल्यात झिरपत आलेला तो विशिष्ट दृष्टिकोण.
एक उदा : एक सामाजिक विषयावरचा चित्रपट बघायला कोणी मित्रमैत्रिण तयार होईना म्हणून मी एकटीच गेले नि चित्रपट पाहून आले. त्यावर कॉलेजातल्या 'स्त्रीमुक्तिवादी' गटात १५ दिवस चर्चा झाल्या ! नंतर मी एकटी सिनेमाला कधीही जाऊ शकले नाही.
अर्थात खूप छोटं उदाहरण आहे हे. पण मला तरी अजून स्वता:तल्या १ % तरी शिल्लक असलेल्या पारंपारिक कर्मठ दृष्टिकोनातून मुक्त होता आलं नाही !

प्रियाली's picture

11 Jan 2011 - 5:19 am | प्रियाली

एक सामाजिक विषयावरचा चित्रपट बघायला कोणी मित्रमैत्रिण तयार होईना म्हणून मी एकटीच गेले नि चित्रपट पाहून आले. त्यावर कॉलेजातल्या 'स्त्रीमुक्तिवादी' गटात १५ दिवस चर्चा झाल्या ! नंतर मी एकटी सिनेमाला कधीही जाऊ शकले नाही.

अरेरे! असं व्हायला नको. सिनेमाला बिनधास्त एकट्याने जावे. मी अनेकदा जाते. उलट, माझा नवरा मला प्रोत्साहन देतो. (जा बाई! मी पैसे घालवून तीन तास झोपण्यापेक्षा, पैसे न घालवता तीन तास ताणून देतो असे म्हणतो. अर्थात, सर्व चित्रपटांसाठी नाही.) नाहीतरी, अलेक्झांडर, ३००, एंजल्स अँड डिमन्स बघण्यात त्याला इंटरेस्ट नसतो आणि मला उगीच बाजूला बसून कुणी (घोरून) डिस्टर्ब केलेले चालत नाही. मी आरामशीर एकट्याने चित्रपट बघते. :) माझ्याही मैत्रिणी आहेत हसणार्‍या पण प्रत्यक्षात गंमत अशी की त्यांच्यापैकी अनेकजणी नवर्‍याबरोबरही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघत नाहीत. (कारण वेळ नाही, इंटरेस्ट नाही, मुले लहान आहेत वगैरे)

बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ नये, एकट्याने थेटरात जाऊ नये म्हणणार्‍यांना खेटरे दाखवणे उत्तम.

इतक्या वर्षात हे केले नाहीस म्हणून आता एकदा करून बघ, अशीच गंमत म्हणून. :)

बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ नये, एकट्याने थेटरात जाऊ नये म्हणणार्‍यांना खेटरे दाखवणे उत्तम.<<
अगदी अगदी.
कामानिमित्ताने मुंबईभर फिरत असताना भूक लागते/ चहाची तल्लफ येते/ थोडावेळ टेकावसं वाटतं... मग उडपी/ कॉफिशॉप/ रेस्तरां असं जे काय त्या वेळेला गरजेचे असेल ते आणि समोर दिसेल त्याप्रमाणे त्यात घुसायचं. काही ठराविक एरियांमधे मुंबईतही अजूनही एकटी बाई येऊन बसलीये यावर वेटर्स मधे जरा बारीकशी हलचल पसरतेच. आपली कावळा नजर त्यामुळे ते दिसतेच. आणि आपल्यामुळे हे झालंय ह्यामुळे चक्क मजा येते. :)

पिवळा डांबिस's picture

11 Jan 2011 - 9:58 am | पिवळा डांबिस

कामानिमित्ताने मुंबईभर फिरत असताना भूक लागते/ चहाची तल्लफ येते/ थोडावेळ टेकावसं वाटतं... मग उडपी/ कॉफिशॉप/ रेस्तरां असं जे काय त्या वेळेला गरजेचे असेल ते आणि समोर दिसेल त्याप्रमाणे त्यात घुसायचं.
१००% सहमत!
माझी बायको एम एस सी करतांना तिला मुंबईभर फिरावं लागायचं! ज्यांना एमएससीचा अभ्यासक्रम माहिती आहे त्यांना ठाऊक असेल की त्यात दिवसभर लॅबमध्ये प्रयोग करावे लागतात आणि संध्याकाळी लेक्चर्स असतात.आणि ती मुंबईभर (म्हणजे फोर्ट पासून ते बोरिवली/ मुलुंडपर्यंत कुठेही) असतात. लेक्चर संपेपर्यंत रात्रीचे ८.३० वाजतात म्हणजे घरी येईपर्यंत ९.३०-१०.००. अशा वेळी त्या मुलींनी काय दिवसभर उपाशी रहायचं? माझी (त्यावेळेची भावी) पत्नी आणि तिच्या मैत्रिणी (कधी एकत्र तर कधी एकएकट्याच) मग अशाच कोठेतरी उडप्याच्या हॉटेलमध्ये जात असत. मला त्यात कधीच काही वावगं वाटलं नाही.
मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की माझी आणि माझ्या पत्नीची ही गोष्ट २५ वर्षांपूर्वीची आहे....
आणि तिच्या आईवडिलांना आणि भावी सासू-सासर्‍यांनाही त्यावेळेही त्यात कधीच काही वावगं वाटलं नाही.....
त्यानंतर मग आज हे मी काय वाचतोय? माझ्या त्यावेळच्या पहाण्यातली मराठी लोकं वर वर्णन केल्याइतकी बुरसटलेली कधीच नव्हती...
की मुंबईकर आणि इतर महाराष्ट्रीयन लोकं यांत हा मूलभूतच फरक आहे?

मितान's picture

11 Jan 2011 - 12:48 pm | मितान

>>>>मुंबईकर आणि इतर महाराष्ट्रीयन लोकं यांत हा मूलभूतच फरक आहे?

:)

हॉटेलात एकटीने खाणे मला नवीन नाही. पण नीधप म्हणते तशी एकटी बाई खात बसलेली बघुन आजुबाजूला आणि वेटर्स मध्ये किंचित कुजबूज सगळीकडेच जाणवते.

अप्पा जोगळेकर's picture

12 Jan 2011 - 3:57 pm | अप्पा जोगळेकर

तशी एकटी बाई खात बसलेली बघुन आजुबाजूला आणि वेटर्स मध्ये किंचित कुजबूज सगळीकडेच जाणवते.
हे म्हणजे काहीच्या काहीच आहे. तुमच्याच डोक्यात असेल कि अरे आपण काहीतरी चुकिची गोष्ट करतोय की काय ? इतका वेळ नसतो कुणाकडे. आपल्यालाच वाततं लोकं आपल्याला पाहतायत असं.

रेवती's picture

11 Jan 2011 - 7:02 pm | रेवती

की मुंबईकर आणि इतर महाराष्ट्रीयन लोकं यांत हा मूलभूतच फरक आहे?

असं काही नाही. नवरा अमेरिकेत असताना मी महिनोन् महिने एकटी रहायचे तेंव्हा एकटीनेच हैदराबादच्या खानपानगृहात जायचे. तेंव्हाही आजूबाजूच्या लोकांच्या आणि वेटर्सच्या नजरेतला विचित्र भाव टिपता येत असे. जेवताना असे लोकांनी आपल्याकडे बघणे मलाच नको वाटायचे म्हणून मग एक हाटेल जिथे एकदोन वेटर्स जरा ओळखीचे होते तिथे जायला सुरुवात केली. एकटीला बघून तेही हमखास छोटे टेबल, रस्त्याकडची बाजू बघून देत आणि वेळ चांगला जात असे. तिथून बाकिचे लोकही फारसे बघू शकत नसत.

पुष्करिणी's picture

11 Jan 2011 - 3:42 pm | पुष्करिणी

सिनेमा, हॉटेलात जाउन खाणं, चहाच्या टपरीवर चहा पिणं या गोष्टी मी एकटीनं केल्यात आणि करतेही.
पहिल्यांदा असं वाटलं होतं की सगळे लोक माझ्याकडेच पहातायत ...पण नंतर भीड चेपली. इतर मैत्रिणीही ह्या गोष्टी हळूहळू करू लागल्या.

पिवळा डांबिस's picture

12 Jan 2011 - 5:42 am | पिवळा डांबिस

मुंबईखेरीज अन्यत्रही बायकांनी गरज पडल्यास एकट्याने बाहेर जाऊन हॉटेलात खाणं हे घडू शकतं हे वाचून खरोखरीच बरं वाटलं.
हां, असं करतांना पुरुष बघत रहातात हा मुद्दाही सत्य आहे. त्याचं काय आहे की बायका (मग त्या एकट्या असोत वा बायका-बायकांच्या ग्रुपमध्ये असोत) हाटेलातच काय पण कुठेही दिसल्या की तिथे एकटे असलेले पुरुष (मग त्यां पुरुषांचं वय, वजन, उंची, रंग, मॅरिटल स्टॅटस काहीही असो!) त्यांना न्याहाळत बसतात हे मात्र एक अखिल भारतीय दुर्दैव आहे!
:(

अप्पा जोगळेकर's picture

12 Jan 2011 - 4:00 pm | अप्पा जोगळेकर

त्यांना न्याहाळत बसतात हे मात्र एक अखिल भारतीय दुर्दैव आहे!
म्हणजे काय? पाहायचंही नाही की काय?
- आपादमस्तक न्याहाळणारा

पुष्करिणी's picture

12 Jan 2011 - 7:55 pm | पुष्करिणी

खरं तर माझा अनुभव असा आहे की छोट्या गावातल्या बायका या बाबतीत जास्त मुक्त असतात , त्यांची जास्त रिस्क घ्यायची तयारी असते.
माझे पुण्यातले शेजारी आणि पुण्यात यायच्या आधीच्या गावातले शेजारी यांत स्त्रीमुक्ती किंवा स्त्री स्वातंत्र्य या बाबतीत आधीच्या गावातले शेजारी/ओळखीचे लोक जास्त ओपन मांइडेड होते / आहेत.
मी व्यक्तीश: एका दारु पिउन धिंगाणा घालणार्‍या आणि बेकार नवर्‍याच्या बायकोला ओळखते, त्या बाइंनी आजूबाजूच्यांची अजिबात तमा न बाळगता , वेळप्रसंगी नवर्‍याच्या दोन मुस्काटात ठेउन त्याला नोकरीला लावलं..आणि दारुही सोडवली.
आधी लोकांनी कुजबूज केली पण नंतर सपोर्टही खूप केलं...

पंगा's picture

13 Jan 2011 - 11:46 am | पंगा

मुंबईखेरीज अन्यत्रही बायकांनी गरज पडल्यास एकट्याने बाहेर जाऊन हॉटेलात खाणं हे घडू शकतं हे वाचून खरोखरीच बरं वाटलं.

असे का वाटावे बरे? म्हणजे, इतरत्र असे घडू शकत नसावे अशी शंका का बरे यावी?

सूर्य गेटवे ऑफ इंडियाला उगवून चौपाटीस मावळत असावा काय?

प्रशस्तिपत्राबद्दल आभारी आहे.

आजानुकर्ण's picture

13 Jan 2011 - 11:56 am | आजानुकर्ण

बायकांनी गरज पडल्यास बाहेर खाण्याजोगी परिस्थिती असणाऱ्या पुण्यात वास्तव्य असल्याचे वाचून माझंही मन भरून आलं. त्यापेक्षा जास्त आनंद वरील प्रशस्तीमुळे झाला.

आजानुकर्ण's picture

13 Jan 2011 - 11:56 am | आजानुकर्ण

बायकांनी गरज पडल्यास बाहेर खाण्याजोगी परिस्थिती असणाऱ्या पुण्यात वास्तव्य असल्याचे वाचून माझंही मन भरून आलं. त्यापेक्षा जास्त आनंद वरील प्रशस्तीमुळे झाला.

पिवळा डांबिस's picture

13 Jan 2011 - 11:57 pm | पिवळा डांबिस

सूर्य गेटवे ऑफ इंडियाला उगवून
जराशी तपशीलातली चूक! सूर्य गेटवेला न उगवता मुंब्र्याच्या डोंगरात उगवतो. पण असो!
चौपाटीस मावळत असावा काय?
खचितच! जि़ज्ञासूंनी प्रत्यक्ष जाऊन खात्री करावी!!!

(मुंबईचा जाज्वल्य अभिमान असलाच पाहिजे ही अट मुंबईकर होण्याला लागतच नाही! --आदरणीय भाईकाका)
:)

मुक्तसुनीत's picture

14 Jan 2011 - 12:03 am | मुक्तसुनीत

जराशी तपशीलातली चूक! सूर्य गेटवेला न उगवता मुंब्र्याच्या डोंगरात उगवतो. पण असो!
यलोनॉटी , सूर्य गेटवेला उगवण्याची चूक होयाचीच. अस्सल मुंबईकराला "कापूस कुठे उगवतो" असे विचारल्यावर नाही का , तो "गादीतून आपोआप बाहेर येतो" असे उत्तर देत ? ;-)

- कुणी मुंबईस एक भिकार म्हण्टले तर तिला सात भिकार म्हणणारा ;-)

तुमच्या उपप्रतिसादाची वाट बघतच होते.
पिडांच्या लेखाला, प्रतिसादाला तुमच्या उपप्रतिसाद आला नाही तरच नवल!;)

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2011 - 6:19 am | पिवळा डांबिस

अस्सल मुंबईकराला "कापूस कुठे उगवतो" असे विचारल्यावर नाही का , तो "गादीतून आपोआप बाहेर येतो" असे उत्तर देत ?
मुसुराव, अगदी बरोब्बर!
:)

पिवळा डांबिस's picture

11 Jan 2011 - 12:33 am | पिवळा डांबिस

प्रत्येक माणूस, जो जिवंत असतो, त्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाची लांबी ही सारखीच असते. पुरुष आणि स्त्री या दोन्ही व्यक्ती असल्या तरी त्यांना मिळणारे क्षण हे कसलेही लिंग न स्विकारता येतात. त्या क्षणांमध्ये स्त्रियांचा क्षण किंवा पुरुषांचा क्षण असे भेद नसतात. त्या क्षणाच्या काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. असे अनेक क्षण स्वत:च्या मनाविरुद्ध काढणे याचा अर्थ जवळजवळ संपूर्ण आयुष्य मनासारखे न जगता येणे. हे कोणाही व्यक्तीला करावे लागू नये. यासाठी पैशाचे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य, दुसर्‍याच्या इच्छेचे, वेळेचे मोल समजणे इत्यादी गोष्टींचे महत्त्व आहे. बाईने डाळीला फोडणी द्यावी, का पुरुषाने; किंवा बाईने बाळाची शी काढावी, का पुरुषाने, हे प्रश्न माझ्या मते महत्त्वाचे आहेत, पण दुय्यम आहेत, प्रत्येक जित्याजागत्या व्यक्तीला मिळालेला वेळ कसा वापरता यावा या विचारांचे बाय-प्रॉडक्टस आहेत. मुळात जन्माला आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर आपण मान्य केलेल्या चौकटींमध्ये, शक्य तितक्या स्वेच्छेने करता यावा, ही माझ्या मते खरी स्वातंत्र्याची व्याख्या असायला हवी. चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे.
१००% सहमत!
उत्तम लेख आणि त्याहून उत्तम सारांश!!
आणि वर वर्णन केलेले स्वातंत्र्य पूर्णपणे शक्य आहे (मायक्रो लेव्हलवर) असा अनुभव आहे!!!

इन्द्र्राज पवार's picture

11 Jan 2011 - 1:11 am | इन्द्र्राज पवार

"....चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे. ..."

~ चित्राताईंच्या या लक्षणीय लेखातील वरील वाक्य फार अर्थपूर्ण आहे. म्हणजे अगदी लक्ष्मीबाई टिळकांपासून ते गौरी देशपांडे यांच्यापर्यंतचे या विषयावरील साहित्य चर्चेला घेतले तरी जिथेतिथे ही एक भूत 'चौकट' स्त्रीच्या मुक्तछंदातील पाचर म्हणून आडवी येतेच. अवघड असेल तर अजूनही अगदी 'प्रोफेसर' पदावर काम करणारी स्त्री ती चौकट फेकून देणे दूरच पण शिथिल करण्यासाठी काय प्रयत्न करत असेल हाही एक संशोधनाचा विषय ठरेल. मी मुंबई-पुणे येथील वातावरणाचा उल्लेख मुद्दाम करीत नाही, कारण नाही म्हटले तर तेथील स्त्री वेळ आली तर ती चौकट शिथिल होईल की नाही याची वाट न पाहता ती तोडूनही टाकू शकेल...इतपत ती बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र बाण्याचीही आहे. पण दुर्दैवाने बहुतांशी भागात आजही 'आले आहे नशिबी, तर करावे लागेल...' म्हणून नोकरीवरून दमूनभागून आल्यानंतरही अगोदर घरी येऊन हातात रीमोट कंट्रोल घेऊन बसलेल्या नवरा नावाच्या 'मालका'ला चहा करून तिला द्यावा लागतो....[हे मी स्वतः डोळ्यानी माझ्या थोरल्या बहिणीला करताना पाहिले होते...आजही करते....शासकीय सेवेत क्लास टू ऑफिसर असून].

"....आजूबाजूला जे जिवंत व्यक्तींच्या आकांक्षा दाबणे, त्यांचा स्वतःच्या वेळेवर हवा तेवढा अधिकार नसणे घडत होते/घडत आहे ते अधिक चुकीचे आहे असे नाही वाटत?...."

~ नक्कीच चुकीचे आहे. पण याला कारण काही अंशी स्त्रीच आहे असे माझे निरिक्षण सांगते [मी स्वतः आजही एकत्र कुटुंबात राहतो आणि चित्राताईंनी लेखात उल्लेख केलेली सर्व कामे आमच्या घरातील स्त्रिया करीत असतात आणि त्यातही माझी आई ही 'आपल्या भावाच्या दारी येऊन राहिलेली' या दर्जाची असल्याने इतरांच्या तुलनेत तिला आणखीन एक पाटी जादा काम नेहमीच असते]. चित्राताई हे मान्य करतील की स्त्रीच्या मनामध्ये एक नैसर्गिक भय असतेच असते. वेळ आली तर स्त्री वाघालादेखील भीत नाही, भुतालाही ती बाहेरची वाट दाखवेल; पण का कोण जाणे हीच स्त्री 'पुरुषा'ला घाबरते. हे घाबरणे का यावे तर स्त्रीनेच मनाची कल्पना करून घेतली आहे की पुरुषाशिवाय तिचे जीवन अपूर्ण आहे. ती अपूर्णता आपल्या कपाळी येऊ नये म्हणून प्रसंगी ती आपल्या आशाआकांक्षेला मुरड घालते आणि स्वतःच्या वेळेवर उदक सोडते. हे शिक्षित स्त्रीच्या बाबतीत होते तर या महाराष्ट्राच्या हजारो खेडोपाडी पसरलेल्या गावातील स्त्रीची काय रामकहाणी !!

माझ्या माहितीतील (अगदी माझ्या वर्गातील म्हटले तरी चालेल) एम.ए. झालेल्या मुलीचा बी.ए. झालेल्या, पण व्यवसाय धंद्यात चांगला स्थिर असलेल्या, युवकाशी रितीरिवाजानुसार विवाह झाला. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविलेली ही वर्गभगिनी स्त्री मुक्ती चळवळीवर तावातावाने बोलत असे, त्यावेळी तिचे कौतुकही आम्ही वर्गमित्र करत असू. पण एकदा नवरोबाने तिच्या मैत्रिणीला पाठविलेल्या पत्रावर तिने " सौ. xxx शिंदे-देसाई" अशी जोड आडनावाची (जसे 'माधुरी दिक्षित-नेने) अशी सही केलेली पाहिल्यावर ते पत्र हिसकावून घेऊन फाडून टाकले तर त्याच्या कृतीला या कॉलेज प्लॅटफॉर्मवर बिजली असलेल्या व आता 'नवरी' झालेल्या तरुणीने काहीच विरोध केला नाहीच उलट 'या पुढे तशी सही करणार नाही' अशी चक्क कबुलीही दिली. हा किस्सा नंतर तिने आमच्या ग्रुपला एवढ्यासाठी सांगितला की, तिला पत्र पाठविताना आता फक्त "सौ.xxx देसाई" असाच उल्लेख करून पाठवावा यासाठी.

म्हणजेच नवर्‍यापेक्षा जास्त शिकूनही आणि गुणात्मकरित्याही अधिक सक्षम असणारी अशी ही स्त्री जर 'बॅक टु दि पॉट्स अ‍ॅण्ड पॅन्स' होते, तर स्त्रीमुक्ती गीत गाणार्‍याने तरी काय अपेक्षा ठेवायची?

इन्द्रा

याला कारण काही अंशी स्त्रीच आहे
थोडी सहमत.
स्त्रीनेच मनाची कल्पना करून घेतली आहे की पुरुषाशिवाय तिचे जीवन अपूर्ण आहे.
पुरुषही खरेतर स्त्रीशिवाय अपूर्ण आहे आणि त्याचे भय त्यालाही वाटत असते.
उदाहरणे तर अनेक देता येतील. त्यातल्या कितीतरी उदाहरणांमुळे स्त्री मुक्ती बाजूला राहून जाते कि काय असे वाटू शकेल.
एकंदरीत विचार करताना स्त्री किंवा पुरुष असा विचार न होता बरोबर काय किंवा चुकिचे काय (कृती) असा विचार व्हावा.
नवरा नावाच्या 'मालका'ला चहा करून तिला द्यावा लागतो
यात दोष दोघांचाही आहे. नवरा आधी घरी पोहोचला आहे तर त्याने चहा करायला काय हरकत आहे आणि जर तो ती कृती करत नसेल तर त्याला तसे ठामपणे सांगण्याची कृती बायकोने करायला हवी.

>>म्हणजेच नवर्‍यापेक्षा जास्त शिकूनही आणि गुणात्मकरित्याही अधिक सक्षम असणारी अशी ही स्त्री जर 'बॅक टु दि पॉट्स अ‍ॅण्ड पॅन्स' होते, तर स्त्रीमुक्ती गीत गाणार्‍याने तरी काय अपेक्षा ठेवायची?>>

याला कारणे अशी असू शकतात की,
१. त्या स्त्रीला जर मुलं-बाळं असतील तर (ती स्त्रीस्वभावातली एक त्रुटी म्हणा किंवा weak point म्हणा किन्वा आई असण्याचा effect/side effect म्हणा ) अशा स्त्री ला जुळवून घेणे महत्वाचे वाटत असते आपल्या बछड्यांसाठी. त्यांना आई-वडिल दोन्ही मिळावेत आणि त्यांचा परिपक्व विकास व्हावा, परिपूर्ण जीवन मिळावे असे तिला वाटत असल्याने may be ती बंडाचे निशाण न फडकवता शरणागती पत्करत असावी
२. किंवा माहेरून support नसणे वा अन्य काही मजबूरी (मजबूरीला मराठी शब्द पटकन आठवत नाहिये) असावी.
३. समाजाच pressure असू शकते. लहानपणापासून पहात आलेले संसार, नवरा-बायकोंच्या वागण्याबद्दलच्या बरं-वाईट/चूक्-बरोबर च्या समाजमान्य कल्पना ह्यांचाही पगडा/pressure असू शकते. किंवा एकट्या बाईला समाज कसे जगू देत नाही किंवा तिच्याकडे कसे पाहिले जाते, तिचे जीवन कसे चर्चिले जाते ह्याची पाहिलेली उदाहरणे ही कारणेही असू शकतील.

Anyways, मला पण शिकलेल्या/विचार करण्याची ताकद असलेल्या मुली उगाच अशी मुस्कटदाबी/अरेरावी सहन करताना पाहिल्या की अस्वस्थ व्हायला होते. याचा अर्थ प्रत्येकीने उठून घरी रोज भांडणं केली पाहिजेत असे नाही पण फक्त नवरा आहे म्हणून उगाचच मुस्कटदाबी/अरेरावी सहन करू नये.

सध्याच्या जगात मुलींनी लग्नाआधीचेच नाव कायम ठेवण्याचे विचार/चर्चा चालू असताना असे प्रसंग पाहिले की मनाला दु:ख होते. कोणालाही आपण जन्मापासून आपण वापरत असलेले नावच नक्कीच अधिक जवळचे वाटणार. असो. हा झाला १ sample विषय. असे हजारो विषय्/गोष्टी आहेत. असो.

(माझ्यापुरते मला असे वाटते की स्त्रियांना स्त्री मुक्ती वगैरे अशी काही मुक्ती अभिप्रेत नसून स्त्री ला १ स्वतंत्र अस्तित्व किंवा १ माणूस म्हणून जगायचे आहे असे अभिप्रेत आहे. )
ही झाली शिकल्या सवरत्या स्त्रियांची कथा. यावरून अशिक्षित/परावलंबी स्त्रियांच्या व्यथांची कल्पनाच न केलेली बरी.

थोडे विषयाच्या अनुषंगाने अवांतरः
आणि बरेच घरात मी असे पाहिले आहे की सासूलाच आवडत नसते स्वतःच्या मुलाने स्वतःच्या घरात काम केलेले. मुलाला सुनेने ताट वाढून हातात दिले पाहिजे. etc. मग सून नोकरी करणारी असो किंवा नसो.

मला हे ही कळत नाही कि सुनेने कसे वागावे हे सासू(सासरे) कसे काय ठरवू शकतात/ का बंधन घालू शकतात. हा स्वयंघोषित अधिकार त्याना कुणी दिला आहे. सुनेने कसे वागावे किंवा मुलगा-सुने ने एकमेकांशी कसे वागावे हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न असतो.

अवांतराबद्दल क्षमस्व. पण आसपास असे प्रकार पाहिले की रहावत नाही.

नंदन's picture

11 Jan 2011 - 1:21 am | नंदन

लेख आवडला. संयत, नेमका आणि टोकाची भूमिका न घेणारा - लेखात उल्लेखलेल्या बव्हंशी दळणीय कथांपेक्षा बराच वेगळा. स्वातंत्र्याची लिंगनिरपेक्ष व्याख्याही पटली. (इंद्राच्या प्रतिसादातला शेवटचा किस्सा वाचून 'आहे मनोहर तरी' मधला 'डाऊन विथ द किचन'चा प्रसंग आठवला.)

स्वाती२'s picture

11 Jan 2011 - 1:22 am | स्वाती२

चित्रा ताई, माझ्या लहानपणच्या आठवणी अगदी अशाच! फरक इतकाच की विभक्त कुटुंब होते. पण तरीही नोकरी निमित्ताने रहाणारे भाचे-पुतणे आले-गेले खूप असायचे. तीच गोष्ट आजोळी! मात्र या सगळ्या कष्टांची घरातल्या पुरुषांना किम्मत होती.
आमच्याकडे बरेचदा सकाळचा दुसरा चहा बाबा करायचे. आमच्यासाठी पहाटे पाच वाजता उठलेल्या आईला १५-२० मिनिटे जरा स्वस्थ बसुन निदान हेडलाईन्स तरी वाचायला मिळायच्या. दुपारी तीन-साडेतीन ला बाबा चहा प्यायला घरी यायचे. तेव्हाही आई एखादे चांगले पुस्तक वाचत असेल तर 'असु दे! तुझी लिंक तुटेल' म्हणत बाबा चहा करायचे. मला आणि माझ्या बहिणीला त्यांनी कुठलीच गोष्ट मुलगी म्हणून नाकारली नाही आणि मुलगा नाही म्हणून कधी खंतही केली नाही. लहानपणी या सगळ्याचे काही विशेष वाटले नव्हते पण जरा समज आल्यावर इतर घरात मुलींना मिळणारी वागणूक् बघितल्यावर प्रचंड चिडचिड व्हायची. मात्र खरी झलक अनुभवली ती लग्नानंतर ६ महिने सासरी राहिले तेव्हा. इकडे यायचे म्हणून नोकरी सोडली होती. दुपारी सगळे काम आटपून हातात वाचायला पुस्तक घेतले तर सा. बाई म्हणाल्या-'मला असे मुलींनी जाड जाड पुस्तक वाचत बसलेले अजिबात आवडत नाही. माझ्या मुलींना पण मी असल्या सवयी लागू दिल्या नाहित.' आख्ख्या एक मिनिटाने माझी ट्युब लागली. 'मला मात्र पुस्तकांशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे मी येताना वाचायला पुस्तकं घेऊनच आले.' मी त्यांना शांतपणे सांगितले. मात्र तो पर्यंत माझ्या अवांतर वाचनावर कुणी आक्षेप घेइल असे कधी वाटले नव्हते. हळू हळू माझा रिकामा वेळ आणि तो मी कसा घालवावा इतपासून माझी देवावरची श्रद्धा मी कशी व्यक्त करावी/ करु नये इतपर्यंत बर्‍याच गोष्टीबाबत मतप्रदर्शन, आज्ञावजा सल्ले देणे झाले. शेवटी त्यांना स्पष्ट सांगावे लागले की पहिली २५ वर्षे पुसणे मला जमणार नाही. तुमच्या कडून काही नवीन आवडले तर जरूर घेइन पण तुमच्या मुलाने पसंत केलेली मी ही अशी आहे.
गंमत म्हणजे माझ्या सा. बाईंनी स्वतःचे छंद जोपासले होते. सा. बुवा त्यांना घरात सगळ्या कामात मदत करायचे. अगदी वेळप्रसंगी पोळ्यासुद्धा भाजायला मदत करायचे. म्हणजे स्वातंत्र्य फक्त स्वतः पुरते! :(

माझीदेखील केस काहीशी अशीच आहे :(
१८० अंशात सासर-माहेर फरक आहे.

>>'मला असे मुलींनी जाड जाड पुस्तक वाचत बसलेले अजिबात आवडत नाही. माझ्या मुलींना पण मी असल्या सवयी लागू दिल्या नाहित.'

हेच मला पटत नाही की जिथे तिथे आपल्या मतांची पिंक टाकायचा अधिकार आपल्याला आहे ही समजूत असे लोक का करून घेतात. कुठे असे कुणी ऐकले आहे का की जावयाला एखाद्या सासूबाईंनी असे सांगितले की, 'मुलांनी अमूक अमूक असे करू नये. मला अजिबात आवडत नाही. सो तू परत असे नको करू' असे सांगितले तर त्याला ते आवडेल का? त्याची प्रतिक्रिया काय असेल?

पंगा's picture

13 Jan 2011 - 12:49 pm | पंगा

हेच मला पटत नाही की जिथे तिथे आपल्या मतांची पिंक टाकायचा अधिकार आपल्याला आहे ही समजूत असे लोक का करून घेतात.

याला एकच उत्तर आहे: भारतीय समाजात अजूनही प्रबळ असलेली Gerontocracy. (याला मराठीत 'थेरडेशाही' म्हणावे काय?) याचा त्रास कोणालाही, कधीही आणि कोठेही, धर्म- जाति- आणि लिंगनिरपेक्षतः होऊ शकतो. ('मौत और टट्टी, किसी को भी, कभी भी और कहीं भी आ सकती है' या सुभाषिताप्रमाणेच.) आणि त्यात senilityची भर पडली की मग आणखीच बहार येते. जणू दुधात साखरच!

मात्र याला विरोध करणे हे हिंदुधर्मातील महत्पापांपैकी होय.

कुठे असे कुणी ऐकले आहे का की जावयाला एखाद्या सासूबाईंनी असे सांगितले की, 'मुलांनी अमूक अमूक असे करू नये. मला अजिबात आवडत नाही. सो तू परत असे नको करू'

शंका: असे सासूबाईंनीच म्हटले पाहिजे का? सासरेबुवांनी म्हटलेले नाही का चालणार? आणि 'मुलांनी अमूक अमूक करू नये' हे स्पेसिफिक कारणच असले पाहिजे का? एकंदरच ढवळाढवळ - आणि तीही बहुधा अत्यंत कुजकटपणे - चालू शकेल काय?

थोडक्यात उत्तरः होऊ शकते.

असे सांगितले तर त्याला ते आवडेल का?

अशा प्रकारचे काहीही सांगितलेले मनापासून आवडणारी कोणतीही जिवंत - आणि डोक्याने अंमळ अधू किंवा कोमात वगैरे नसलेली - व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) दाखवून द्या. तिला सद्गुरू मानण्यास मी तयार आहे.

त्याची प्रतिक्रिया काय असेल?

स्वतःच्या घरात राहत असतानासुद्धा दुसर्‍याच्या घराचा हप्ता भरून (किंवा घर गहाण टाकून) वारावर जेवल्यासारखे वाटू शकते. मग नेमके काय करावे म्हणता? बोला! (असल्या पादरट कारणांसाठी घटस्फोटाचा वगैरे विचार करणे हा माझ्या मते शुद्ध - नव्हे, रिफाइन्ड - महामूर्खपणा आहे. नाही म्हणजे, असले काही अघोरी उपाय सुचवणार असाल तर आधीच सांगून ठेवतोय!)

'माइंड युवर ओन बिझनेस' किंवा तत्सम काही म्हटल्याने फक्त अपमान होऊ शकतो आणि तापमान वाढते आणि आपलेच डोके खराब होते, दुसर्‍यात सुधारणा होत नाही. (शिवाय असली उत्तरे देणे जिवावर येत असेल आणि त्याचा उपयोग नाही, उलट त्रास आहे, हेही दिसत असेल, तर भयंकर चिडचीड होऊ शकते. आपलीच. प्रतिपक्षावर ढिम्म परिणाम नसतो.) आणि सरळ सांगून सुधारणा तर सोडाच, मुळात डोक्यात काही प्रकाश पडण्याची सुतराम शक्यता नसते, उलट 'आपलेच कसे बरोबर'छाप उलट आर्ग्युमेंटे मिळण्याची ग्यारंटी असते. अशावेळी जोडीदारीण जर समजदार - आणि तितकीच खमकी - असली, तर तिचाच काय तो आधार असतो. तीच काय ती अशा 'केसेस' व्यवस्थित 'हाताळू' शकते; अन्यथा पुरुषाच्या हातात अशा वेळी चिडचीड होण्याव्यतिरिक्त फारसे काही नसते.

शिल्पा ब's picture

11 Jan 2011 - 2:45 am | शिल्पा ब

लेख छान आहे.
पण असे व्हायला हवे वगैरे सांगणे सोपे अन करणे मात्र ...
प्रत्येकाने / प्रत्येकीने दुसर्याची स्पेस जपली तरी बरीच मुक्ती मिळेल.

चित्रा's picture

11 Jan 2011 - 5:11 am | चित्रा

धन्यवाद.

अदिती म्हणते आहे तसे कोणीतरी (बाबा) विचार करायला उद्युक्त करणे महत्त्वाचे आहे. काहींच्या बाबतीत नवीन विचार देण्याचे, किंवा स्वतःकडे बघण्याची दृष्टी देण्याचे काम वाचनाने होते असेही होत असावे.

मितान यांचाही अनुभव तसाच गंमतीदार आहे. लोकांची काहीशी दुटप्पी वृत्ती दिसते.

स्वाती२, तुम्ही घरच्यांना दिलेले उत्तर मला आवडले. त्यात ठामपणा आणि संयम आहे.

शुचि यांच्या मैत्रिणीचे उदाहरण हल्लीच्या काम करणार्‍या स्त्रियांना पटणे अवघड आहे. स्वतःला आवडत नाही म्हणून एखाद्या गोष्टीचा त्याग करणे, त्याविषयी घरच्यांना पटवून देता येणे वेगळे, आणि नवरा म्हणतो आहे, त्याच्या करिअरसाठी स्वतःच्या करीअरचे दान करणे वेगळे. दोघांमध्ये सख्य असले तर हा निर्णय आनंदानेही होईल. पण कोणाही व्यक्तीने स्वतःचे असे थोडेतरी पैसे कमवावे किंवा घराबाहेर थोडेसे पडावे, लोकांमध्ये थोडे काम करावे, असे मला वाटते. हे अनुभव माणसाला जगात वावरण्याचे थोडेसे का होईना ज्ञान देतात. सुरेख संसार करणे हे चांगलेच आहे, पण ते करत असताना थोडे जगात वावरण्याचे ज्ञान यावे. ते घरातून थोडे बाहेर पडल्याशिवाय मिळत नाही असे वाटते.

शिल्पा ब, म्हणतात स्पेस देण्याने सुरुवात व्हावी. मुळात देण्याची स्पेस ही कल्पना आपल्याकडे फारशी रुजू नाही. तेव्हा त्याचीही थट्टा होतच असते. यासाठी व्यक्तींनी जागरूक असणे महत्त्वाचे असे वाटते. (जसे स्वाती२ होत्या).

इंद्रराज पवार यांनी दिलेली उदाहरणे मासलेवाईक आहेत. मात्र स्त्रियांचे पुरुषाशिवाय जीवन अपूर्ण आहे तसे बायकांशिवाय पुरुषांचेही असावे. घाबरण्यापेक्षा स्त्रियांना स्थैर्य गमावायचे नसते, असे मला वाटते. येणारी अस्थिरता स्विकारण्याचे धाडस होत नाही. त्यासाठी लागणारे आर्थिक/सामाजिक बळ नसते. मुलांची जबाबदारी घेता येईल का ही शंका असल्याने असलेले स्थैर्य कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवणे महत्त्वाचे वाटते असे होत असावे. स्त्रियांच्या परिस्थितीला पुरुष जबाबदार आहेत, असे माझ्या मते नेहमीच बरोबर नाही. आपण सगळेच सर्व जैसे थे तसे राहावे यासाठी प्रयत्नशील असतो. त्यातून दुर्दैवाने बाहेर पडायला लागले, तर सावरतोही. पण शक्य तितके स्थैर्याला धक्का लागू नये यासाठी आपल्याला न पटणार्‍या गोष्टीही स्वीकारत असतो. हे पूर्ण नष्ट होणे शक्य नसावे असे वाटते. मात्र हे स्विकारणे एकाच घटकाला सतत करायला लागू नये.

बाकी, रेवती, प्रियाली, पिडा, नंदन यांच्या सहभागामुळेही चर्चेत चांगली भर पडली आहे. धन्यवाद.

>>>>>शिल्पा ब, म्हणतात स्पेस देण्याने सुरुवात व्हावी. मुळात देण्याची स्पेस ही कल्पना आपल्याकडे फारशी रुजू नाही. तेव्हा त्याचीही थट्टा होतच असते. यासाठी व्यक्तींनी जागरूक असणे महत्त्वाचे असे वाटते.

हे मात्र अगदी खरं. लग्न होऊन अगदी ओळखीच्या घरात आले तेव्हा हे स्पेस प्रकरण सासूच्या गळी उतरवायला बरेच दिवस लागले.

नगरीनिरंजन's picture

11 Jan 2011 - 6:00 am | नगरीनिरंजन

लेख अतिशय संतुलित आणि संयमित आहे. आवडला.

>>मुळात जन्माला आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर आपण मान्य केलेल्या चौकटींमध्ये, शक्य तितक्या स्वेच्छेने करता यावा, ही माझ्या मते खरी स्वातंत्र्याची व्याख्या असायला हवी. चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे.

१००% सहमत. इतक्या प्रकारचे लोक असतात की याहून सर्वसमावेशक व्याख्या होऊ शकत नाही असे वाटते.
आणि या व्याख्येत 'स्त्री-पुरुषांना' असे म्हटले आहे ते खूप बरे केलेत. या अनुषंगाने या लेखाच्या शीर्षकातला स्त्रीमुक्ती हा शब्द थोडासा अप्रस्तुत वाटतो कारण अन्याय हा फक्त स्त्रियांवरच होतो असे नाही. स्त्रियांवरच्या अन्यायाचे प्रमाण खूप जास्त आहे हे मान्य आहे पण थोड्या प्रमाणात का होईना पुरुषांवर अन्याय होतोच. त्यामुळे अशा विचारांना स्त्रीमुक्तीचे लेबल लावून उगाच त्यांच्याबद्दल लिंगभेदाला खतपाणी घालणारे किंवा पुरुषांच्या विरोधातले विचार असे गैरसमज होऊ नयेत असे वाटते.
विशेषतः स्त्रियांवर अन्याय फक्त पुरुष करतात असे नसून सध्याच्या समाज रचनेत अधिकार मिळालेल्या स्त्रियाही इतर स्त्रियांवर अन्याय करायला मागेपुढे पाहत नाहीत. उदा. सासवा.
मी स्वत: दोन्ही प्रकारची उदाहरणे पाहिली आहेत. अतिशय मनमोकळ्या आणि आनंदी अशा स्त्रीच्या कोणतीही हौस-मौज पूर्ण न होऊ देणारे नवरा-सासू पाहिले आहेत त्याचप्रमाणे वर्षातून फक्त दहा-पंधरा दिवस सासूचे तोंड पाहायला लागत असूनही तिच्या नावाने वर्षभर खडे फोडून, नवर्‍यानेही स्वतःच्या आईविरुद्ध बोलावे म्हणून त्याला त्रास देणार्‍या स्त्रियाही पाहिल्या आहेत.
हे सगळं व्यक्तिसापेक्ष आहे आणि हातात अधिकार आले की कोण कसे वागेल ते सांगता येत नाही. आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे बळ मिळणे हे या चळवळींचे उद्दिष्ट असावे मग ती स्त्री असो वा पुरुष.

सहज's picture

11 Jan 2011 - 6:37 am | सहज

चांगला लेख व वाचनीय प्रतिसाद.

एका कुटुंबात विविध निर्णय कसे घेतले जातात? लोकेशन (महानगर, अन्यशहर,ग्रामीण विभाग) व समाजातील कुठल्या स्तरात तुम्ही सध्या आहात? आपल्यात अशी पद्धत नाही, आपल्याकडे असे नसते इ. वाक्यांचा नेमका मतितार्थ. याचा खल ज्याने त्याने करावा.

मग

प्रेम म्हणजे काय? तडजोड म्हणजे काय? सुखी आयुष्याची व्याख्या? ह्यावर विचार.

शेवटी म्हणलं तर समाजाचा म्हणलं तर ज्याचा त्याचा असा हा प्रश्न. व्यक्ती स्वातंत्र्याची, समानतेची शिकवण आपल्या शिक्षणपद्धतीत नेमकी कशी शिकवली जाते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 6:52 am | नरेशकुमार

चांगला लेख व वाचनीय प्रतिसाद.
इतकेच.

दुर्दैवाने (खरेतर सुदैवाने ) इतक खोल विचार करन्याचि वेळ आलीच नाही.
आमच्य घरचे वातावरनच असे आहे कि आता स्वतःवर काहि बंधने घालुन घ्यावित असे कधिकधि वाटते. (असे बायकोला हि वाटते हे विशेश, पन कधिकधि)

वरील प्रतिसाद वाचून आणि शुचीच म्हणणं वाचून आश्चर्य वाटलं. उच्चशिक्षण घेऊन घरी का बसायचं? मग काय उपयोग त्या शिक्षणाचा? फक्त भक्कम कमावणारा नवरा मिळावा म्हणून?
प्रत्येकाच्या ओळखीत कोणी न कोणी असे असेलच.
आपल्याकडे समाजमनाचा फारच बाऊ केला जातो...लोक काय म्हणतील? याला प्रचंड महत्व. नवर्याचं न ऐकता समजा नोकरी केली आणि त्याने त्यावरून त्रास दिला तर का म्हणून अशा माणसाबरोबर राहायचं? उलट स्त्रीला नोकरीतून पैशाचं बळ मिळतच ना मग मन मारून, घुसमटून जगण्यात काय अर्थ? माझ्या मते जिथे कुठे जी शक्य असेल ती नोकरी स्त्रियांनी करावी...एक म्हणजे बाहेरच्या जगात जगायला मिळते, त्यातूनच मित्र/मैत्रिणी जोडता येतात...आर्थिक बळ आहेच...

केवळ नवरा/ सासू इ. कोणी म्हणते म्हणून घरीच बसावं हा निर्णय योग्य नाही....गृहिणी असणे कमीपणाचे मुळीच नाही...उलट तो एक प्रचंड डोकेदुखी असणारा २४/३६५ जॉब आहे जिथे कुणी कामाला appreciate करत नाही...पण लादलेला अन मनाविरुद्ध्चा निर्णय असेल तर आयुष्यभर ती जाणीव कुरतडत राहणार.

आणि खरं सांगायचं तर वरील प्रतिक्रिया आणि समाजातील अगदी घरातीलहि उदा. पाहून असं वाटतं कि मुक्तीची खरी गरज पुरुषांना आहे.

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 7:29 am | नरेशकुमार

उच्चशिक्षण घेऊन घरी का बसायचं? मग काय उपयोग त्या शिक्षणाचा? फक्त भक्कम कमावणारा नवरा मिळावा म्हणून?
माझे उत्तर केवळ यासाठी,

बायकोने नोकरी करण्यात माझी काहीच हरकत नाही हो (आनि आता हशि हरकत घेण्याचि वेळ सुध्दा गेलि कधिच)
तिलाच नोकरि कराविशि वाटतच नाही, बायको अगोदरच BE झालेलि आहे. आता ति ते CDAC, software testing, MBA वगेरे वगेरे करत बसते. ति म्हनते कि पुढे मुलांना मार्गदर्शन करायला सोपे जाईल.
पुन्हा बायकोने नोकरी करण्यात माझी काहीच हरकत नाही हो
पन माझि हरकत/संमती याला कोनी विचारले तरि पाहिजे ना.

मीली's picture

11 Jan 2011 - 8:49 am | मीली

शिल्पा ,तुझे सगळे मुद्दे पटले पण एक म्हणजे मुले असतील तर ....तर खरा प्रश्न येतो.नवर्या विरुद्ध जायला स्त्री दहा वेळा विचार करते .कारण मुलांना एकटे वाढवणे म्हणावे तितके सोपे नाही आहे.आणि दुसरे लग्न ही पण दूरची गोष्ट आहे कारण घटस्पोटित चा शिक्का लागलेला असतो.बर्याचश्या गोष्टी खूप सोप्या वाटतात.'मुलांना दोघाचे प्रेम,आधार मिळणे आवश्यक आहे' असाही विचार स्वताच्या अभिमानापेक्षा ,त्रासा पेक्षा प्रबळ होत असावा असे मला वाटते.
अजून एक म्हणजे स्त्री शिकलेली असो अगर नसो स्वत:चे निर्णय घेता यायचे स्वातंत्र तिला हवेच हवे.गरज असली तर तिने मागे राहायला नको.पण मुले लहान असतील आणि तिला घरी राहायचे असेल तरी काही जण तिला घरी बसू देत नाहीत.माझ्या एका मैत्रिणीची सासू तिच्या लग्नानंतर सारखी मागे लागायची बी ई मुलगी केली तरी नोकरी करत नाही .नोकरी लागायला थोडा वेळ लागतो हे पण समजून घेत न्हवती.
लेख खूप छान लिहिला आहे.आमच्या आजोळी पण लहानपणी आधी माणसांची पंगत ,मुले मग शेवटी मुली असे बसायच्या.फार राग यायच्या .मुले खेळायला निघून जायची ,मुली मागचे आवरत राहायच्या.बंडाची ठिणगी लहानपणीच पडली होती.मी प्रश्न विचारले तर उलट उत्तरे देते म्हणायची आजी!
आता च्या पिढी ने मात्र हि चाकोरी भेदली आहे हे मात्र नक्की!!