"ब्युटी अँड द बीस्ट" कथा ... प्लूटो ग्रह, व्रुश्चिक रास

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
5 Jan 2011 - 4:19 am

*ज्यांना ज्योतिष हे थोतांड वगैरे वाटत असेल त्यांनी हा लेख वाचू नये अथवा समं ना सांगून वरील पर्यायातून "ज्योतिष" हा पर्याय काढून टाकायची मागणी करावी. या धाग्यावर अवांतर करू नये ही विनंती.

बर्‍याच वर्षांपूर्वी मी "ब्युटी अँड द बीस्ट" या कथेची प्लूटो या ग्रहाशी तसेच वृश्चिक या राशीशी घातलेली एक सुरेख सांगड वाचली होती. तो लेख विशेषतः ज्यांना ज्योतिषविषयक ज्ञान आहे त्यांना आवडेल असा होता. आता जेवढी सांगड आठवते तेवढी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते.
सूर्य, चंद्रादि वैयक्तिक ग्रहांपेक्षा, प्लूटो हा ग्रह "व्यापक मानसिकतेवर" अधिराज्य करणारा ग्रह समजला जातो. म्हणजे त्याचे परीणाम बघताना व्यक्तीपेक्षा , त्या पीढीतील जनमानसावर काय समग्र परीणाम झाला ते साधारण पहातात. पण याचा अर्थ असा नाही की वैयक्तीक काहीच परीणाम होत नाही. हा ग्रह क्रूर आणि अशुभ समजला जातो कारण ज्या घरात हा पडतो त्या घराच्या कारकत्वाखाली येणार्‍या गोष्टींची हा उलथापालथ करतो. कोणत्याही गोष्टीची संपूर्ण काया पालटून टाकणे हे याचे मूळ काम मग ते भल्याकरता असो वा बुर्‍याकरता. या कायापलटामध्ये अनावश्यक गोष्टींचा संपूर्ण र्‍हास होतो जी की खूप पीडा-क्लेशदायक घटना असू शकते. पण जी आपल्या चांगल्याकरता आवश्यक असते. हा ग्रह फिनीक्स या पक्षाने देखील दर्शविला जातो. फिनीक्स हा स्वतःच्या राखरांगोळीतून भरारी घेणारा ग्रीक "मायथॉलॉजीकल" पक्षी. विध्वंस-पुनर्निर्मीती हे चक्र प्लूटो दर्शवितो.
वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये वृश्चिक आणि मेष या दोन्ही राशी मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात तर पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात वृश्चिक ही रास प्लूटोच्या अधिपत्याखाली येते. सूर्यापासून अतिदूर असा हा प्लूटो हा शीतग्रह शक्तीशाली वृश्चिक राशीचे अधिपत्य गाजवतो.
"ब्युटी अँड द बीस्ट" या कथेमध्ये राजपुत्राचा एकंदर २ वेळा कायापालट वाचकासमोर येतो. पहील्यांदा राजपुत्राचे भयावह जनावरात रूपांतर होताना. या रूपांतरामध्ये राजपुत्र किल्ल्याच्या नीरव शांततेत, मौनाच्या भयाण आणि एकाकी खाईमध्ये लोटला गेलेला आहे. त्याला केवळ एकच आशातंतू आहे की या हीडीस रूपातदेखील जर कोणी त्याच्यावर प्रेम केलं तर त्याला पुनः पूर्वरूप प्राप्त होऊ शकेल जे की त्याला जवळजवळ अशक्यप्राय वाटत आहे. एकाकी, विषण्ण आणि अंधःकारात हा राजपुत्र फक्त किल्ल्यात येईल त्या व्यक्तीला स्वतःच्या शक्तीने बंदी बनवून , अधिकार गाजवून , प्रेम हिसकावून घेऊ इच्छितो. वृश्चिक रास ही खूप सामर्थ्यवान मानली जाते (पॉवर) पण तितकच या लोकांना हेदेखील शिकावं लागतं की दुसर्‍यावर सत्ता गाजवून सर्व गोष्टी मिळतात असं नाही तर स्वतःवर काबू ठेवून, स्वतःला जिंकून , स्वसंयमाने (सेल्फ्-कंट्रोल) देखील आमूलाग्र बदल घडू शकतात, हवे त्याची प्राप्ती होऊ शकते. पहिल्यांदा बीस्ट हा ब्युटीला कैदेत ठेवतो पण हळूहळू त्यांच्या मैत्रीत १ वेळ अशी येते की तो तिच्या विनंतीला मान देऊन स्वतःच्या मनाविरुद्ध तिला, तिच्या वडीलांकडे जाण्यास परवानगी देतो. खरं पहाता हा फार अवघड त्याग आहे कारण त्याचा एकमेव आशातंतू तो सोडायला तयार होतो आहे. पण या त्याच्या विश्वासातच त्याच्या दुसर्‍या कायापालटाचे बीज लपलेले आहे. आणि दुसर्‍या रुपांतरात केवळ तो जनावरातून मनुष्यात परिवर्तित झालेला नसून त्याची आत्मिक उत्क्रांतीदेखील झाली आहे. त्याच्यातील दुसर्‍यावर सत्ता गाजविण्याच्या दोषाचा (कंट्रोलींग नेचर) र्‍हास झाला आहे. हा प्लूटोच्या कारकत्वाखाली येणारा पुनर्जन्मच!!!

हा लेख कितीजणांना सुसंबद्ध वाटेल ते माहीत नाही. कारण प्लूटो आणि व्रुश्चिक राशीचे गुणधर्म माहीत हवेत जे की मी द्यायचा थोडा प्रयत्न केला आहेच. आशा करते काहीजणांना तरी याची सांगड लागेल.

ज्योतिषआस्वाद

प्रतिक्रिया

अवलिया's picture

5 Jan 2011 - 8:14 am | अवलिया

गुंडोपंत आणि युयुत्सुरावांचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.

कवितानागेश's picture

5 Jan 2011 - 12:34 pm | कवितानागेश

.....या हीडीस रूपातदेखील जर कोणी त्याच्यावर प्रेम केलं तर त्याला पुनः पूर्वरूप प्राप्त होऊ शकेल>>>
ह्या दृष्टीनी या गोष्टीकडे कधीच पाहिले नव्हते.
मला वाटते, वृश्चिक राशीचे सोडून बाकी सगळयांना ही गोष्ट आवडेल! ;)

(वृश्चिकेशी षडाष्टक वाली) माउ.

यशोधरा's picture

5 Jan 2011 - 12:36 pm | यशोधरा

>>ह्या दृष्टीनी या गोष्टीकडे कधीच पाहिले नव्हते

असेच म्हणते. :)

सूर्यपुत्र's picture

5 Jan 2011 - 2:57 pm | सूर्यपुत्र

>>मला वाटते, वृश्चिक राशीचे सोडून बाकी सगळयांना ही गोष्ट आवडेल!
नाही बुवा, मी वॄश्चिक राशीचा आहे, आणि मला ही कथा खूप आवडली. :)

ही तुलना सुंदरच आहे आणि यात ज्योतिषावर विश्वास अविश्वासचा प्रश्नच येऊ नये.

हे तर माणसाच्या आयुष्यातल्या संकल्पनांवर आधारित आहे. बाकी ग्रहांमुळे होतं की आणि कशामुळे याचा इथे संबंधच नाही.

प्लुटो हा लिटरली एक ग्रह न मानता एक स्वभाव मानावा हवं तर.

आवडलं.

ह्ह्म्म्म !!
ज्योतिष माहिती वगैर असण्याचा काही संबंध दिसत नाहीये.

कल्पना आवडली.

वैयक्तिक मत : बाराही राशींमध्ये सर्वात जास्त बदनाम केली गेलेली रास म्हणजे वृश्चिक. वृश्चिकेचा फटकळपणा, डंख मारण्याची वृत्ती, उन्मादक आणि कामुकता, सूड घेण्याची मनोवृत्ती, सत्ता व वर्चस्वासाठीची आकांक्षा याच गुणधर्मांवर आजवर अनेक ज्योतिषी रसाळपणे बोलले आहेत. जाहीर कार्यक्रम करणारे शरद उपाध्येसुद्धा त्याला अपवाद नाहीत.

अवांतरः कर्सर पर्यन्त प्रेषण मसूदा तयार करा या वाक्याचा एक्झॅक्ट अर्थ काय?

५० फक्त's picture

5 Jan 2011 - 3:16 pm | ५० फक्त

"वृश्चिकेचा फटकळपणा, डंख मारण्याची वृत्ती, उन्मादक आणि कामुकता, सूड घेण्याची मनोवृत्ती, सत्ता व वर्चस्वासाठीची आकांक्षा याच गुणधर्मांवर " फिदा होउन मी वृश्चिकेवर जन्म घेतला आहे.

काय होतं ही असे स्वभाव विशेष वाचले ना की आपण नकळत तसे होत जातो किंवा आपल्या प्रत्येक क्रुतीला याच नजरेतुन पाहायला लागतो. नाही तर आपला स्वभाव कळत नकळत असा बनवत जातो.

पण आजच्या जगात सुखानं जगायला हे सगळे अतिशय आवश्यक गुण आहेत.

बाकी गोष्ट छान होती, मी वृश्चिकेचा असुन मला आवडली, तसे पण वृश्चिकेवे सारे जरा आत्मकेंद्रिच असतात, स्वतबद्दल सगळ्या गोष्टींचं यांना खुप कॉतुक असतं हे मात्र खरं.

हर्षद.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Jan 2011 - 9:27 am | निनाद मुक्काम प...

मी पण

गुंडोपंत's picture

6 Jan 2011 - 9:52 am | गुंडोपंत

उत्साह मस्त असतो तुम्हा लोकांचा... काम आणि कामात जोरदार रस घेता तुम्ही मंडळी! :)

फिदा होउन मी वृश्चिकेवर जन्म घेतला आहे. हे जन्म कधी आणि कुठे घ्यायचा हेच तर आपल्या हातात नसते ना... सगळा लोच्या तिथेच आहे!
जे काही आहे ते आपल्याला 'मिळते' आणि ते स्विकारण्या शिवाय आपल्या हातात काय असते?

लिहिलेले आवडले ..

वृश्चिक रास अआणि प्लुटो ग्रह यांच्या बद्दल असे जास्त काही माहिती नव्हते .. त्यामुळे सगळे नविन वाटले.

अवांतर : मकर रास आणि स्वामी शनी या बद्दल आहे का हो काही माहिती कोणाकडे ?

नाही आपल्या ७०% लेखांना ७० हून अधीक प्रतीसाद कायमच भेटतात :) असली हाफ सेंचूरी फटकवाय्ची कंन्सीस्टंन्सी तेडूल्करकडे पण नाय :)

नगरीनिरंजन's picture

5 Jan 2011 - 7:25 pm | नगरीनिरंजन

वृश्चिक फार आडमुठे आणि सत्ता गाजवणारे असतात. माझं आणि वृश्चिकेच्या व्यक्तींचं कधीच प्टलं नाही. "एकवेळ साप सोडावा पण विंचू ठेचावाच" असं कुठेतरी वाचलं आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे. ;-)
(वृश्चिक राशीच्या लोकांनी लगेच नांगी उगारू नये. राशीवरून माणसाचा स्वभाव ठरतो हे जितकं खरं आहे तितकंच माझं वरील विधान खरं आहे. )

आत्मशून्य's picture

5 Jan 2011 - 7:56 pm | आत्मशून्य

हे लोक फारच आत्मकेद्रीत असतात (कारस्थानी सूध्दा). पण फक्त मैत्री म्हणूनच जर यांचा आपल्या जीवनात प्रवेश घडला असेल तर फारच विश्वासू नाहीतर कीतीही आपले वाटले तरी कारस्थानीच साले.

सहज's picture

6 Jan 2011 - 6:30 am | सहज

>वृश्चिक फार आडमुठे आणि सत्ता गाजवणारे असतात.

लग्न झाले की स्त्रीचे नाव बदलते (सहसा, आजकाल नसेलही चू. भू. दे. घे.) तशी रासही बदलते की काय? जाणकारांनी खुलासा करावा.

गुंडोपंत's picture

6 Jan 2011 - 9:59 am | गुंडोपंत

'बायको' हा शब्दच खतरनाक आहे!
एकदा का प्रेयसी ते बायको हे परिवर्तन झाले की, आपण लोक खल्लास!
यांना रास, ग्रह ज्योतिष वगैरे सर्व गैरलागू असते.

लग्न झाल्यावर माझा तर आवाज जो काही बसला रे बाबांन्नो, तो अजून परत आला नाही...
तशात ही समोर आली की तो आवाज अजून खोल जातो आणि तीचा वर! ;)

वेताळ's picture

5 Jan 2011 - 7:56 pm | वेताळ

तुमचे लेख वाचताना दारु पिऊनच वाचायला हवेत,समजायला सोपे जातील.

पंगा's picture

6 Jan 2011 - 9:51 am | पंगा

तुमचे लेख वाचताना दारु पिऊनच वाचायला हवेत,समजायला सोपे जातील.

"Drinking makes you look beautiful."
"But I have not been drinking!"
"I daresay not. But I have been."

कवितानागेश's picture

6 Jan 2011 - 1:13 am | कवितानागेश

वेताळकाकांची रास ओळखा पाहू! ;)

समीरसूर's picture

6 Jan 2011 - 9:14 am | समीरसूर

कथा छान आहे.

मी वृश्चिक राशीचा आहे (आपल्या मराठी ज्योतिषानुसार). मराठी आणि पाश्चात्य राशींमध्ये फरक असतो का?

म्हणजे मराठी वृश्चिक रास आणि इंग्रजी वृश्चिक रास यांचे गुणधर्म सारखे असतात काय?

सर्वात प्रथम,
ज्यांना ज्योतिष हे थोतांड वगैरे वाटत असेल त्यांनी हा लेख वाचू नये अथवा समं ना सांगून वरील पर्यायातून "ज्योतिष" हा पर्याय काढून टाकायची मागणी करावी. या धाग्यावर अवांतर करू नये ही विनंती. झकास ढिस्क्लेमर टाकून फालतू प्रतिक्रियांना ढीस्स केल्या बद्दल अभिनंदन! उत्तम केलेत.

कथा, ग्रह आणि राशी याची उत्तम सांगड घातली आहे. हे मी आधी वाचले नव्हते त्यामुळे आवडले.

वर वृश्चिक राशीवर काहीजण बरसलेले दिसत आहेत.
असे बरसू नका नकारात्मक ग्रह करून घेऊ नका. प्रत्येकच राशीचे चांगले आणि वाईट गुणधर्म आहेत.
या राशीच्या विवेचनानंतर कदाचित तुम्ही त्यांना जास्त समजून घेऊ शकाल.

एखादा वृश्चिक राशीची व्यक्ती तुमच्या दृष्टीकोनातून वाईट वाटलीही असेल. पण त्याच वेळी त्याच्या कुंडलीतील चंद्राची, मंगळाची, गुरू आदी ग्रहांची स्थिती तसेच त्यांचे दृष्टी योग काय आहेत हे ही पाहिले पाहिजे.
वृश्चिक ही जल तत्वाची स्थिर राशी आहे. या राशीची व्यक्ती बहुदा स्वावलंबी असण्याच्या प्रयत्नात असते. तसेच यांची मते अतिशय ठाम असतात. भावना बहुदा तीव्र स्वरूपाने दिसून येतात. (यामुळेही काही वेळा ही मंडळी त्रासदायक वाटू शकतात!) तरल बुद्धीमत्तेच्या या व्यक्ती, प्रेम अतिशय उत्कटतेने करतात. शैय्यासुखाची आसक्ती असते. जोडीदाराची अतिशय काळजी घेतात पण टीका अजिबात आवडत नाही. (अर्थात कुणाला आवडते म्हणा...?) मनात आणले तर वृश्चिकेच्या व्यक्ती वेळप्रसंगी पर्वत महंमदाकडे घेऊन जाणार्‍या असतात. काहीश्या उधळ्या स्वभावाच्याही असतात. पैसा साठवणे जड जाते जरा यांना. :)
या व्यक्ती मध्यमकाळात अतिशय उत्तम मैत्री निभावतात पण यांचे शत्रुत्व अतिशय वाईट!

एक लक्षात ठेवा वृश्चिक राशीची व्यक्ती अतिशय कुटुंब वत्सल असते. आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. कोणतीही झीज सोसण्याची तयारी ठेवतात. माझ्यामते हा फार महत्त्वाचा गूण आहे.

परत एकदा वरील सर्व गूणावगूण हे पत्रिकेतील/कुंडलीतील चंद्राची, मंगळाची, गुरू आदी ग्रहांची स्थिती तसेच त्यांचे दृष्टी योग काय आहेत यावर अवलंबून असते.

सध्या इतकेच.

अमोल केळकर's picture

6 Jan 2011 - 2:00 pm | अमोल केळकर

प्रतिसादातील माहिती आवडली

अमोल केळकर

अवलिया's picture

6 Jan 2011 - 2:19 pm | अवलिया

मस्त माहिती

यशोधरा's picture

6 Jan 2011 - 4:18 pm | यशोधरा

छान लिहिलंय. सगळ्यांच राशींबद्दल लिहा, ही विनंती.

+१
अगदी अगदी !! वाचायला आवडेल, कारण आम्हा सिंह वाल्यांबद्दल असंच काहीबाही बोलतात लोक, आम्ही अहंकारी असतो वैगरे. अर्थात लोकांच्या बोलण्याला भीक घालू ते आम्ही कुठले. ;)
आणखी एक, हे स्वभावविशेष सरसकट त्या राशीला लागू होतात, की राशीतल्या तीन नक्षत्रांनुसार त्या बाबतीत थोडाफार बदल होतो ??

शुचि's picture

6 Jan 2011 - 8:21 pm | शुचि

अधिक लिहावे ही विनंती.

धमाल मुलगा's picture

6 Jan 2011 - 8:31 pm | धमाल मुलगा

वृश्चिक असल्याचा पुन्हा एकदा अभिमान वाटला. ;)

५० फक्त's picture

7 Jan 2011 - 11:05 am | ५० फक्त

+१००००० टु धमु.

मला पण, वर गुंडोपंतांनी सांगितलेलं माझ्याबाबतीत तर बरेच खरं आहे, विशेषतः उधळेपणा वगॅरे. पण या सगळ्या गुण आणि अवगुणांचा मला निश्चितच अभिमान आहे.

हर्षद.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jan 2011 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार

वृश्चिक असल्याचा पुन्हा एकदा अभिमान वाटला.

अर्रतेज्यायला ! धम्या वॄश्चिक आहे म्हणुन तिरका तिरका चालतो होय. मला वाटत होते.....

स्वानन्द's picture

7 Jan 2011 - 12:41 pm | स्वानन्द

अर्रे धमाल! तू बी वृश्चिक? वा वा!!