पाऊस !!!
तो ही पहिला !!!
वाह क्या बात है !!!
काल पुण्यात या मोसमातला पहिलावहिला पाऊस पडला आणि मन अगदी सैरभैर झालं.
पहिल्या पाऊसाची गंमतच काही वेगळी असते नाही ?
लहानपणी अशा पावसात आईची नजर चुकवून भिजायचे. आता नवय्राची नजर चुकवुन का होईना पण पहिल्या
पावसात भिजतेच . कोणाकोणाला पहिल्या पावसात भिजायला आवडते बरे?
की आमच्या यांच्यासारखे विजांना घाबरुन घरात कोंडुन घेतात?
प्रतिक्रिया
4 Jun 2008 - 10:54 pm | १.५ शहाणा
पहिल्या पाऊसात मातीचा गंध काहि औरच असतो
4 Jun 2008 - 11:15 pm | पिवळा डांबिस
पहिल्या पाऊसाची गंमतच काही वेगळी असते नाही ?
पहिल्या पाऊसात मातीचा गंध काहि औरच असतो
सहमत! आम्हीही इथे (क्वचितच) पडणार्या पावसात भिजून घेतो.
आता नवय्राची नजर चुकवुन का होईना पण पहिल्या पावसात भिजतेच .
"श्रीमंत पेशवे" आता त्यांच्या "नवर्याची" नजर चुकवून पावसात भिजतात?
नाय म्हणजे वाचतांना काहीतरी गोंधळ दिसतो आहे, पण काय सांगता येत नाय!:)
या पुणेकरांचा काय भरोसा नाय!!:))
कोणी पुणेकर खुलासा करून सांगेल काय या बिचार्या मुंबैकराला?
(ह. घ्या)
4 Jun 2008 - 11:38 pm | श्रीमंतपेशवे
अहो डांबीसकाका नावावर जाऊ नका.
नावात काय आहे? ..... गुपित हेच की मी पेशव्यांची पेशवीन.
5 Jun 2008 - 7:36 am | प्रभाकर पेठकर
"श्रीमंत पेशवे" आता त्यांच्या "नवर्याची" नजर चुकवून पावसात भिजतात?
सातारचे 'छत्रपती' असतील.
5 Jun 2008 - 7:47 am | यशोधरा
मी पण भिजते पावसात पेशवीण सरकार :)
6 Jun 2008 - 5:26 am | विसोबा खेचर
संध्याकाळी पावसात आम्ही काही मित्रमंडळी मनसोक्त भिजलो. लै धमाल आली! :)
आपला,
(पाऊसवेडा) तात्या.
6 Jun 2008 - 10:09 am | मदनबाण
माझ्या घरातुन दिसणारा पावसाळ्यातील हा नजारा.....
(चिंब भिजलेला)
मदनबाण.....
6 Jun 2008 - 4:20 pm | आनंदयात्री
तुम्ही काय डोंगराबिंगरावर रहाता काय राव ? नाहितर मुंबईत आजुबाजुला एवढी झाडी असलेले घर असणे म्हणजे तुम्ही कोणीतरी बिगशॉट असणार !
काय गुपित काय है भो ?
का काही कल्याण मटका वैगेरे :) ??
हघेहेवेसांनलगे :)
6 Jun 2008 - 10:08 pm | मदनबाण
तुम्ही काय डोंगराबिंगरावर रहाता काय राव ?
मित्रा हे वास्तव आहे...
मुंबईत आजुबाजुला एवढी झाडी असलेले घर असणे म्हणजे तुम्ही कोणीतरी बिगशॉट असणार !
नाही मध्मवर्गीय आहे रे बाबा गेले १८ वर्ष इथच राहतो आहे...हा अजुबाजुला काही बिगशॉट मात्र आता आले आहेत !!!!! पुर्वी खुप वनराई होती आता थोडी फारच राहीली आहे.बिबळ्या पण यायचा आधी ..... आता फक्त कुत्तरडे आहेत ते ही मोठ्या संख्येने...रात्री त्यांचीच आलापी ऐकतो.....
का काही कल्याण मटका वैगेरे
अरे व्यापार खेळण्यापलीकडे माझी मजल कधी गेली नाही बघ..... :)
6 Jun 2008 - 11:51 pm | विसोबा खेचर
आता फक्त कुत्तरडे आहेत ते ही मोठ्या संख्येने...रात्री त्यांचीच आलापी ऐकतो.....
मदनबाणा, कृपया त्या मुक्या प्राण्याचा उल्लेख 'कुत्तरडे' असा हेटाळणीचा न करता नीट कर अशी तुला विनंती!
त्याच्यासारखा माणसांचा प्रेमी आणि इमानी प्राणी दुसरा नाही!
आपला,
(श्वानप्रेमी) तात्या.
6 Jun 2008 - 11:58 pm | चतुरंग
माझ्या त्या लाडक्याच्या आठवणीने हळवा झालो बघ. त्याच्याबद्दल लिहिणार आहे लवकरच!
चतुरंग
7 Jun 2008 - 12:12 am | विसोबा खेचर
वाट पाहतो शेठ! :)
7 Jun 2008 - 12:23 am | मदनबाण
कृपया त्या मुक्या प्राण्याचा उल्लेख 'कुत्तरडे' असा हेटाळणीचा न करता नीट कर अशी तुला विनंती!
तात्या मी पण श्वानप्रेमी आहे पण ही मुकी जनावर रात्री मात्र मुकी राहत नाही !!!!!
एकदम २५-३० कुत्रांची आरडा ओरड मी तरी सहन करु शकत नाही....कालचीच गोष्ट रात्री १:४५ च्या सुमारास एक कुत्र तर अगदी जोरजोरात रडत होत.....हे सगळ अगदी भयाण वाटत्,,,, ही मोकाट कुत्री रात्रीच्या झोपच खोबर करुन टाकतात !!!!! ~X(
माझ्या सारख्या शिफ्ट मधे काम करणार्याला तर रात्रीची झोप मोठ्या मुश्कीलीने मिळते त्याच अस वाटळ करतात ही भुंकणारी मंडळी .....
मदनबाण.....
(भटक्या कुत्रांच्यामुळे त्रस्त झालेला ठाणेकर)
मदनबाण.....
7 Jun 2008 - 12:37 am | चतुरंग
श्वानप्रेमी असलो म्हणून काय झालं रातीची झोप तर नीट हवीच.
मलाही कुत्री भुंकू, विशेषतः रडू लागली की फार अस्वस्थ आणि तगमगायला होतं.
तुझ्या शब्दामागचा सात्विक संताप मी समजू शकतो. :)
चतुरंग
6 Jun 2008 - 6:52 pm | वरदा
ठाण्यात अजुन इतकी झाडं आहेत? सहीच आहे....
6 Jun 2008 - 4:34 pm | आनंदयात्री
माता पेशवे,
आम्हासही पावसात भिजायला प्रचंड आवडते. पावसाळ्यात सायंकाळी म्हणजे कचेरीतुन घरी जाण्यावेळेस जर पाउस असेल तर आम्ही हमखास भिजतोच !! चिंब चिंब होउन निथळत घरी जायला लै आवडते.
परवा जेव्हा पहिला पाउस आला तेव्हा आम्ही कचेरीत कार्यमग्न (मिपा मिपा खेळत ;) ) होतो, ज्या क्षणाला आम्ही खिडकीकडे पाहिले त्याक्षणाला गळ्यातला हेडफोन फेकुन आम्ही तुरंतमे गच्चीवर धावलो अन तसेच भिजलो, काय अवर्णनीय आनंद सांगु ..