मित्रानो.
दरवर्षी नेमाने येणारा क्षण आज पुन्हा येतोय
या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण.
नवी नवरी माहेराहून सासरी जाताना तिच्या मनात असते तशी हुरहुर आणि आनन्द अशा सम्मिश्र भवना घेवून आपण हे क्षण जगत असतो.
सरत्या वर्षात काय गमावले /काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो.
लहानपणी १ जानेवारीला मी गेल्या वर्षी झोपलो ते एकदम थेट्या वर्षीच उठलो असे सांगायचो. ते खरे देखील होते.
३१ दिसेंबरला टीव्हीवर फारतर रात्री ११ पर्यन्त कार्यक्रम असायचे. गावात एखादा गाण्याचा कार्यक्रम वगैरे असायचा. ३१ डिसेंबर हा इवेन्ट झालेला नव्हता. लोक फारतर एकमेकाना फोनवरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत. रात्री बरा वाजता कोणी फोन करणे हा प्रकार तितकासा रुढ नव्हता. ३१ डिसेंबर ला रात्री घरी काहितरी वेगळा पदार्थ करायचा. टीव्हीवरील कार्यक्रम बघत तो खायचा आणि कुडकुडत्या थन्डीत मस्त रजई पांघरून झोपून जायचे. दुसर्या दिवशी शाळेत जर्रा उत्साहतच जायचे.
"३१ डिसेंबरला जन्मणार्या मुलीचे नाव वर्षा खेर असेल" असले पी जे त्यावेळी फार ग्रेट वाटायचे.
मोबाईल नव्हते त्यामुळे एस एम एस वगैरे भानगडी नव्हत्या. दुसर्या दिवशीपासून घारात पोस्टमन चे स्वागत होत रहायचे. नव्यावर्षाची ग्रीटिंग्स यायची. ती पुस्तकात खुणेसाठी किंवा भिन्तीवर चिकटवले जायची.
घरात नव्या वर्षाचा बदल म्हणून पहिल्यान्दा जाणवायचा तो म्हणजे भिन्तीवरचे कालनिर्णय बदलले जायचे. पण जुने फेकून दिले जात नसे. टीव्हीवरी साप्ताहिकी पाहून त्यावर कार्यक्रम लिहीलेले असायचे , त्यातल्या रेसीपी , हे करून पहा वगैरेची कात्रणे कापून ठेवली जायची.
नव्या वर्षाबरोबर यायचे ते शेवटाची घटक चाचणी चे वेळापत्रक. ते डिसेम्बरच्या शाळेचे गॅदरिंग, ट्रीप वगैरेच्या रमणीय वातावरणातून
जमिनीवर आणायचे.
लहानपण सुखाचे काहोते ते आता कळते...आपण काय गमावले ते कळ्त नव्हते काय कमावणार ते माहीत् नव्हते. भूत व्हविष्याची चिंता नव्हती. वर्तमानातच जगायचे वय होते.
घरी लाईट गेली तर बोअर न होता शेजरपाजारच्या मुलाना घेवून श्लोक पाढे कविता जे काय येत असेल त्याच्या भेन्ड्या व्हायच्या.
दिवसभरात काय करायचे याचे टाईमटेबल नसायचे त्यामुळे आला क्षण साजरा करण्यासाठीच असतो या घट्ट समजावर जगण्याचा उत्सव व्हायचा.
वर्षा अखेरीला हे सगळे क्षण हमखास आठवतात.
आणि जाणीव होते "अरे... हे अख्खे वर्ष मी वर्तमानात जगलोच नाही... " वाट्याला आलेला प्रत्येक क्षण मी भूतकाळाची उजळणी करण्यात नाहीतर भविष्याचे प्लॅनिंग करन्यात घालवला. या वर्षात माझ्या मुलाना गोष्ट संगितली नाही , पत्नीबरोबर निवान्त चांदण्यात रीकामा भटकलो नाही , आई सोबत माझ्या लहानपणी मी कसा होत आणि माझी मुले आत्ता कशी आहेत ह्या गप्पा मारल्या नाहीत.
बायकोला तीला काही हवे नको विचारले नाही.
मित्राला त्याच्या मुलांबद्दल विचारले नाही , मैत्रीणीसोबत रस्त्यारून सॉफ्टी खात चालत गेलो नाही. घरात सगळी भावंडे मिळुन दंगा घातला नाही. एकही लग्न वगैरे अटेन्ड केले नाही. त्यामुळे अचानकपणे एखादा दूरचा नातेवाईक भेटला नाही.
हे सगळे हरवलेले क्षण पुन्हा सापडणार नाहीत. कितीही आटापिटा केला तरी पुढच्या रवीवारी जाउ भेटायला असे म्हणून भेट पुढे ढकललेल्या "आजीला" ती गेल्यामुळे आता पुन्हा कधीच भेटता येणार नाही. स्वतःच्या इतिहासातले एकेक पान असे विखरून जाताना पहताना ते पान संपले. आपला इतिहास हरवला ही रुखरुख मनाला टोचतच असते.
नव्या वर्षात मी ठरवलय..... वर्तमानात जगायचे. जगण्याचा उत्सव करायचा.
प्रतिक्रिया
31 Dec 2010 - 11:35 am | यशोधरा
>>वर्तमानात जगायचे. जगण्याचा उत्सव करायचा. >> मस्त लिहिलंय विजूभाऊ! येणार्या नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा :)
31 Dec 2010 - 12:19 pm | नगरीनिरंजन
असेच म्हणतो. छान लिहीलंय. नवीन वर्षाच्या तुम्हालाही अनंत शुभेच्छा!
31 Dec 2010 - 12:24 pm | चाणक्य
१००% खरंय. मोबाईल नव्हता, डिश टी.व्ही. नव्हता, डिजिटल कॅमेरा नव्हता, आयपॉड नव्हता, ईन्व्हर्टर नव्हता पण त्यांची कधी निकड जाणवली नाही. या गोष्टींमुळे आयुष्या सुकर झालंय खर, पण बर्याच वेळेला, यामुळे खराखुर्या आनंद देणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतं.
सहमत. आम्हीही बघतो प्रयत्न करून
स्वाक्षरी-
31 Dec 2010 - 12:24 pm | अवलिया
नवीन वर्षाच्या सर्वांना अनंत शुभेच्छा!
31 Dec 2010 - 12:26 pm | अमोल केळकर
खुप छान लिहिले आहे
"अरे... हे अख्खे वर्ष मी वर्तमानात जगलोच नाही... " - अगदी असंच वाटतं प्रत्तेकवेळेला
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!
अमोल केळकर
31 Dec 2010 - 12:31 pm | sneharani
छान लिहलयं!
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
:)
31 Dec 2010 - 12:55 pm | ब्रिटिश टिंग्या
मस्त लिहीलय भौ! :)
31 Dec 2010 - 1:10 pm | गणपा
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
31 Dec 2010 - 1:45 pm | धमाल मुलगा
विजुभाऊ,
जियो! एकदम मस्त मुक्तक! दिल खुश हो गया! :)
31 Dec 2010 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार
विजुभौ अॅट हिज बेस्ट !
झकास लेखन एकदम.
31 Dec 2010 - 2:06 pm | मुलूखावेगळी
छान लिहीलंय.
31 Dec 2010 - 2:34 pm | ashutosh.kulkarni
फारच सुन्दर लिखाण, मनात कुठेतरी असे विचार नेहमी असतात. तुम्ही ते ईथे ऊतरवलेत. धन्यवाद!
31 Dec 2010 - 3:53 pm | स्मिता.
छान लिहिलंय विजुभाऊ! त्यापुढे आणखी काही लिहायलाही सुचत नाहीये...
याच संधीचा लाभ घेऊन सर्व मिपाकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
31 Dec 2010 - 4:18 pm | लतिका धुमाळे
सर्व मि पा करांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
लतिका धुमाळे
1 Jan 2011 - 2:17 pm | ज्ञानराम
" वाट्याला आलेला प्रत्येक क्षण मी भूतकाळाची उजळणी करण्यात नाहीतर भविष्याचे प्लॅनिंग करन्यात घालवला.
अगदी बरोबर , पण आता ती चूक परत नाही करायची..
तूम्हालाही नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
4 Jan 2011 - 11:58 am | विजुभाऊ
धन्यवाद.
हे वर्ष सर्वाना आनन्ददायी आनि यशदायी जावो