पती पत्नींच्या तक्रारीचे धागे वाचून एक संवाद आठवला
पति-आज काय करणार आहेस जेवणात?
पत्नी- तुम्ही सांगा फर्माइश. काय खायचा मुड आहे ते
"फारशी काही भूक नाही. आमटी अन भात बनव फक्कडसा . आई करायची तशी चिंच गुळाची"
' काल तर केला होती तसली आमटी अन भात'
' मग पोळी अन बटाट्याची भाजी बनव काचर्यांची '
' अहो मुलाना नाही आवडत नुसती पोळी भाजी '
' मग वांगे भात बनव सोबत?'
' वांगी भात ? वातूळ होते '
' भाकरी अन पिठले?'
' पिठले रात्री खात नाहीत'
' ठीक आहे मग बाहेरच जाउयात ?'
' रोज रोज काय खायचे बाहेर. शिवाय मुलाना सकाळची शाळा आहे.. '
' इडली सांबार?'
' अगोदर नाही का सांगायचे, निदान इडलीचे पीठ तरी भिजवले असते '
' मॅगी असेल तरी चालेल. मी वाटाणे सोलतो झकास होईल बघ. मस्त अन लाईट'
' मॅगी ??? तुम्हीच नन्तर अर्ध्या रात्री डबे शोधत बसता. भूक लागली म्हणून
' मग काय करतेस?'
' तुम्ही सांगा ना... '
( नवरोबा; कपाळावर ठ्या...प करून हात मारल्याची स्मायली ड्रॉइंग रूम मध्ये शोधतात.....)
( बायको ;कन्फ्यूज झाल्याची स्मायली पिठाच्या डब्यातून बाहेर काढते......)
प्रतिक्रिया
28 Dec 2010 - 5:53 pm | धुमकेतू
अशा प्रकारचे संभाषण लांबवायचे नसेल तर एक हुकमी वाक्य टाकायचे " काहीही कर गं , तुझ्या हाताला अप्रतिम चव आहे :)" फक्त काळजी एवढीच घ्या की रात्री डबे शोधताना आवाज होऊ देऊ नका ! :) ही ही ही ही
28 Dec 2010 - 6:04 pm | चिंतामणी
घरोघरी मातीच्या चुली.
28 Dec 2010 - 6:10 pm | धमाल मुलगा
उत्तरः तूच ठरव. मी चाललोय मित्रांना भेटायला..खाणं-'पिणं' बाहेरच होईल. :P
(टीपः हे उत्तर स्वतःच्या जबाबदारीवर देणे. फटके पडल्यास बोंबलत आमचेकडे येऊ नये.)
28 Dec 2010 - 6:13 pm | धुमकेतू
धमु , फटके न पडता तु असे उत्तर जर तु तुझ्या बायकोला देऊ शकत असशील तर खरच तु खूप नशीबवान आहेस !!!!! :)
28 Dec 2010 - 6:20 pm | धमाल मुलगा
आमचे जहाँपनाह (तिर्थरुप) आणि अम्मीहुजूर जेव्हा इकडं येतात आणि नेमका मी एखाद्या दिवशी 'टाकीला' गेलो असेन तर परत आल्यावर पार्किंगमधून फोन केला की कारभारीण हळुच दार उघडून घरात घेते आणि शांतपणे झोपवते.
तशी गुणाची आहे हो माझी होम मिनिष्टर. :)
28 Dec 2010 - 6:38 pm | धुमकेतू
आमच्या कडे अशा प्रसंगी "गडाचे दरवाजे बंद झाल्याचा" खलिता हमखास येतो !!!! नशिबाचे खेळ ...चालायचेच ....
28 Dec 2010 - 8:04 pm | धमाल मुलगा
मग जाता कुठं? आख्खी रात्र बाहेर काढायचे म्हणजे वांधेच की हो. :(
29 Dec 2010 - 11:05 am | धुमकेतू
अशा प्रसंगी " तहाच्या अटी आणि शर्ती " मान्य करून घेऊन आणि वदवून घेऊन आमच्या युवराणी चोर वाटेने प्रवेश देतात !!! :)
28 Dec 2010 - 6:29 pm | मुलूखावेगळी
कदाचित तुम्ही खिचडी (जमल्यास कढी+ पापड)कर असे म्हणाले असता तर प्रश्न मिटला असता
नेक्स्ट टाइम ट्राय करुन बघा खिचडी आवडत असेल तर ;).
28 Dec 2010 - 6:43 pm | गणेशा
आवडले
29 Dec 2010 - 5:30 am | आत्मशून्य
.
29 Dec 2010 - 5:46 am | रेवती
मुगाची खिचडी, कढी, पापड आणि लिंबाचं गोडं लोणचं.
29 Dec 2010 - 10:36 am | निनाद मुक्काम प...
चल हॉटेलात जाऊ नाही तर होम दिलेवरी मागवू काहीतरी .रोज रोज स्वयंपाक करून दमत असशील ना ?( आणि रोज रोज भांडी घासून मला देखील कंटाळा येतो )
29 Dec 2010 - 10:40 am | निनाद मुक्काम प...
चल आज दोघे मिळून स्वयंपाक करूया .(मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा )
ताटाखालचा ........मुकाम पोस्ट
29 Dec 2010 - 10:37 am | विजुभाऊ
तीची बहुधा तीच अपेक्षा असते.
पण तीने ते केले तर पतीमहोदय बहुतेक टोमणे मार्तील म्हणून तीला त्याच्याकडून वदवून घ्यायचे असते.
जय खीचडी ,कढी ,पापड, अमसुलाचे सार, लिम्बाचे लोणचे
29 Dec 2010 - 11:14 am | दिपक
साभार- कोहम्?
29 Dec 2010 - 11:24 am | टारझन
एकंच नंबर संवाद :) अगदी जवळचा वाटणारा. धन्यवाद दिपक :)
-(म्हसालाढॉसा प्रेमी) काऊ
29 Dec 2010 - 11:27 am | स्वानन्द
वा वा... काय लिहीलय!
स्वगतः आम्हाला अशी चिऊ मिळू दे. आणि आमचाही तिच्याशी असा संवाद होऊ दे ना रे देवा :)
29 Dec 2010 - 2:44 pm | धमाल मुलगा
अप्रतिम आहे 'कल्पनाविलास'. ;)
-(वास्तवात जगणारा) ध.
30 Dec 2010 - 2:44 am | सविता
हा..हा.... म्हणजे हा सार्वत्रिक प्रश्न आहे तर....
आणि मला वाटत होतं इतके दिवस.... आपलंच नशीब खराब्...म्हणून असलं अनरोमँटिक ध्यान मिळालंय...
(माझ्या काऊ ची) चिऊ
29 Dec 2010 - 11:33 am | विजुभाऊ
स्वगतः आम्हाला अशी चिऊ मिळू दे. आणि आमचाही तिच्याशी असा संवाद होऊ दे ना रे देवा
तीच चिऊ नन्तर
अरे ऐकलस का....तांदळाचे दाणी संपलेत घेऊन ये.
असे म्हणते
किंवा ....तुम्हाला बरोबर बाहेर पार्टीला जायच....
तुम्ही बाहेरच्या खोलीतून बोलावता.
चिउ....चिउ.... दार उघड
ती म्हणते " थांब माझ्या गालाला पावडर लाऊ दे"
तुम्ही बाहेरच्या खोलीतून थोड्यावेळाने पुन्हा बोलावता.
चिउ....चिउ.... दार उघड
ती म्हणते
" थांब माझ्या ओठाला लिपस्टीक लाउ दे"
तुम्ही बाहेरच्या खोलीतून थोड्यावेळाने पुन्हा बोलावता.
चिउ....चिउ.... दार उघड
ती म्हणते
"थांबा माझ्या डोळ्याना लायनर लावू दे"
तुमचे घर तुमच्या घामाच्या धारानी वाहून जायच्या बेतात असते.
चिउ आपली मग्न असते स्वतःच्याय आरशात
29 Dec 2010 - 11:37 am | टारझन
=)) =)) =)) =)) विजुवाउ एकदम फुल्ल फार्ममधे ? विजुभाऊंचा हा संवाच वाचुन णोस्टॅल्जिक झालो :)
थोडी गंमत :
बाकी विजुभाउ एकदा त्यांच्या चिउ वर चिडले होते म्हणे .. का तर ..
विजुकाऊ म्हणाले = चिउ चिउ दार उघड
चुऊ म्हणे = थांब माझ्या केसाला कंग्वा करु दे ..
29 Dec 2010 - 11:44 am | छोटा डॉन
>>विजुभाउ एकदम फुल्ल फार्ममधे ?
+१, हेच म्हणतो.
थोडक्यात नेम चुकला, नायतर आमचे विजुभाऊ दुसरे 'व.पु.काळे'च व्हायचे.
- छोटा डॉन
29 Dec 2010 - 11:47 am | टारझन
बरं झालं नेम चुकला गड्या .. नाय तर विजुभाउ दुसरे 'सुकाळे' झाले असते तर काय घेतलं असतं ?
29 Dec 2010 - 2:46 pm | धमाल मुलगा
वापरातल्या पिवळट पडलेल्या काळपट बनियनसारखंच असलेलं कोमट मध्यमवर्गीय वास्तव किती सहजतेनं मांडलंत!
भारावलोय मी आपल्या ह्या लेखनानं.
29 Dec 2010 - 2:59 pm | विजुभाऊ
वापरातल्या पिवळट पडलेल्या काळपट बनियनसारखंच असलेलं कोमट मध्यमवर्गीय वास्तव किती सहजतेनं मांडलंत!
भारावलोय मी आपल्या ह्या लेखनानं.
नवर्याच्या पिवळ्या पडलेल्या गंजीफ्रॉक ची पर्वा न करता जी त्याच्या कुशीत शिरते तीच त्याची वहीदा:- व. पु.
ती : अरे तुझा बनीयन किती पिवळा दिस्तोय.
तो: अग बाहेरचा रस्त्यावर स्ट्रीट लाइटच्या दिव्यामुळे तसे दिसतय.
ती: कळतात बरे मला टोमणे.
तो : ( मनातल्या मनात) या असल्या वेळी बायकोला टोमणे मारायचे नसतात हे प्रत्येक विवाहीत पुरुषाला अनुभवाने माहीत असते ( उघड) टोमणे कशाला मारू.... त्या दिव्याच्या सोनेरी उजेडात बघ सगळे घर सोनेरी दिसतय.
आपल्याकडे सोने नसले म्हणून काय झाले. मने तर सोन्यासारखी निख्खळ आहेत. बघ्ना तुझ्या चेहेर्यावरून सोनेरी आनन्द झळझळून वहातोय
ती: हम्म.....