मानुस च बनला माणसाचा वैरी ..
तोंडावर हसू अन पाठीला सूरी ................
अशा नत द्रष्टाना
आपण कसे हेरायचे
आम्हीच पोखार्ल्यात भिंती घराच्या
हे किती दिवस लपवायचे ?
खाल्ल्या आयुष्यभर खस्ता
सावलीसारखे जपले
तुम्हाला हवी "स्पेस"
त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले
शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा
भाव आणून किती जणांना फसवायच
अस कुठवर चालायचं ......................
एकलव्यान मानल द्रोणास गुरु ...
दिला अंगठा म्हणुनी "गुरुदक्षिणा"
आजचेच काही "गुरु"
प्रायव्हेट ट्युशन घेऊन किती उकळतात "दक्षिणा"
भूछत्र उगवतात तसे उगवले
शाळा ,कॉलेज ,आणि नरसऱ्या ..........
डोनेशन ,अडमिशन ,फी ,आणि फंड
पार करत सामान्यांना येतात घेरया............
अशा "ज्ञान" विकणाऱ्या गुरूना..
आपणच किती सोकावतो आहे
कॉम्पिटीशन चा जमाना आहे म्हणून आपनच
त्यांच्यामागे धावतो आहे
दुष्काळी बळीराजा ,वैतागला हळहळला ...
कर्जाला टाटा बाय - बाय करून
देवाघरी विसावला
सरकारी प्यकेज चा फायदा
मधल्या च बोक्यानी उचलला
अशा बोक्याचं कंबरड
देवबाप्पा तू का मोडत नाहीस ..........
गरिबाला दिलीस अर्धी भाकरी
ती हि तू सोडत नाहीस ...........
ऐश्वर्य ,बंगला अन गाड्यांच्चा त्यांच्याकडे चमचमाट...................
गरीबाकड १-२ मडकी गाडगी
फाटलेली गोधडी अन मोडलेली खाट..............
जो पाप करतो
म्हणतात त्याचा घडा इथेच भरतो
मरण तर सर्व जीवांना अटळ
गरीब हि मरतो अन पापीही मरतो .............
पण (भ्रष्ट बोका )पुरेपूर जगतो
अन पुरपूर उप भोगतो
बिचारा गरीब चार घासासाठी
डोक्यावरच्या छतासाठी
रोज मरून जगतो
लढत पडत शेवटी
कुठतरी जाऊन खपतो
कोण गेलेय स्वर्गात अन कोण गेलेय नरकात
कोण पाहायला जातो ?
ज्याला हि अंदाधुंदी नाही बघवत
तो काय करतो ...........
एकट्याने काय लढणार ह्या .....
माजलेल्या बोक्यांशी ..
म्हणून दोन पेग मारून
निवांत झोपतो ..................
प्रतिक्रिया
24 Dec 2010 - 3:51 pm | स्पा
अ-- प्र-- ती-- म .
खरोखर अंतर्मुख करायला लावणारी कविता....
खूप छान......
24 Dec 2010 - 4:09 pm | नन्दादीप
>>>अ-- प्र-- ती-- म .
>>> खरोखर अंतर्मुख करायला लावणारी कविता....
स्पा भौ शी एकदम सहमत...
+१
24 Dec 2010 - 4:30 pm | स्वैर परी
पियुषा! जमलय बाकी! मस्त च!
24 Dec 2010 - 5:19 pm | गणेशा
मनातील व्यथा शब्दांमागुन कळुन येते आहे ..
लिहित रहा .. वाचत आहे ..
24 Dec 2010 - 5:33 pm | नगरीनिरंजन
मस्त! सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येणारे विचार अगदी चरचरीत भाषेत परिणामकारकपणे लिहीले आहेत! कविता आवडली.
24 Dec 2010 - 6:57 pm | धमाल मुलगा
१०१% सहमत! :)
मन- मनातलं भाष्य मनापासून उतरवलं आहेस.
24 Dec 2010 - 5:33 pm | प्रकाश१११
खाल्ल्या आयुष्यभर खस्ता
सावलीसारखे जपले
तुम्हाला हवी "स्पेस"
त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले
शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा
भाव आणून किती जणांना फसवायच
अस कुठवर चालायचं ...........
बाईग छान लिहितेस . खूप छान लिही. मस्त .मनापासून .
म्हणशील कोण कुठला काय म्हणतोय .चांगलं म्हणतोय . मनापासून की काय देवास ठाऊक ? [असा मनात विचार आणायचा नाही ]
लिवले ब्वा चला शुभ दिवस .!!
24 Dec 2010 - 6:12 pm | पिंगू
सत्य कथन मांडलय..
- पिंगू
24 Dec 2010 - 6:21 pm | बिपिन कार्यकर्ते
छानच!
24 Dec 2010 - 11:11 pm | स्वानन्द
लई भारी... !!
24 Dec 2010 - 11:55 pm | डावखुरा
भावस्पर्षी कविता...
पुलेशु
25 Dec 2010 - 1:23 am | इंटरनेटस्नेही
हदयस्पर्शी कविता. बाकी दोन पेग मारुन हे टायटल वाचुन आधी वाटले, तात्यांचा लेख आहे की काय.. ;)
-
(बार बाऊन्सर) इंट्या.
25 Dec 2010 - 5:49 am | अरुण मनोहर
भावना अगदी मनापासून व्यक्त केल्या आहेत. पु.ले.शु.
25 Dec 2010 - 7:55 am | आत्मशून्य
मनपूर्वक धन्यवाद. असेच दर्जेदार लेखन होत राहूदे.
25 Dec 2010 - 8:59 am | टारझन
अश्या दर्जेदार लेखांना माझे पुरातन काळा पासुन प्रोत्साहन आहे ;)
25 Dec 2010 - 10:29 am | मदनबाण
छान कविता...
25 Dec 2010 - 3:33 pm | प्राजक्ता पवार
छान .
26 Dec 2010 - 11:18 am | पिवळा डांबिस
बिचारा गरीब चार घासासाठी
डोक्यावरच्या छतासाठी
रोज मरून जगतो
लढत पडत शेवटी
कुठतरी जाऊन खपतो
वा, क्या बात है!!अगदी खरं आहे!!
अशा बोक्याचं कंबरड
देवबाप्पा तू का मोडत नाहीस ..........
गरिबाला दिलीस अर्धी भाकरी
ती हि तू सोडत नाहीस ...........
म्हणूनच त्या देवबाप्पावरचा आमचा विश्वासही उडत चाललांय!!!! किती जणांना नडावं त्याने!!!
तो काय करतो ...........
...
...
... दोन पेग मारून
निवांत झोपतो ..................
सहमत. तो तरी बिचारा काय करणार!!!!
जे चाल्लंय ते बघवतही नाही, आणि काही करताही येत नाही!!!
मग पेगांचाच सहारा!!!
26 Dec 2010 - 11:55 am | विलासराव
एकट्याने काय लढणार ह्या .....
माजलेल्या बोक्यांशी ..
म्हणून दोन पेग मारून
निवांत झोपतो .................
सह्हीईईईईईईई!!!!!!!!!!