एका रात्री !

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
23 Dec 2010 - 1:34 am

सोनालीनं धाडकन् खोलीचा दरवाजा उघडला. उद्याच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी आज रात्रभर तिला जागरण करायला लागणार होतं. तिची रूमपार्टनर नेहा जरा लवकरच झोपायची. त्यामुळे सोनाली पुस्तकं, वह्या वगैरे सामान घेउन ह्या वेगळ्या खोलीत आली होती. ही खोली तशी मोठिच होती पण तळ मजल्यावर, म्हणजे काहीशी तळघरासारखीच होती. त्यामुळे कोणी ह्या खोलीत राहात नसे.

सोनालीनं पुस्तकात डोकं घातलं आणि अभ्यास चालू केला. किती वेळ गेला हे कळलंच नाही. कुठलंतरी एक पुस्तक वर आपल्या खोलीतच विसरल्यामुळं ती उठली. रात्रीचे दोन वाजले होते. बराच वेळ बसून अंग आंबून गेलं होतं. जरा हातपाय ताणून तिनं आळस दिला आणि तिसर्‍या मजल्यावरच्या तिच्या खोलीकडे जाण्यासाठी जिने चढू लागली.

हॉस्टेलच्या त्या लांबलचक व्हरांड्यातली दिवे अगदीच मंद वाटत होते. लाकडी जिनेसुद्धा बरेच जुने झाल्यामुळे कर्रकर्र वाजत होते. ती तिच्या खोलीजवळ पोहोचली. उगाच नेहाची झोपमोड व्ह्यायला नको म्हणून दाराची कडी हळूच आवाज न करता तिनं काढली आणि बाहेरच्या दिव्याचा प्रकाश जेमतेम आत येइल इतपतच दार उघडलं.

कसलातरी गंजलेल्या लोखंडासारखा विचित्र वास येत होता. कपाळावर आठ्या घालत ती आत शिरली. वास काही केल्या कमी होत नव्हता. तिच्या आठ्या वाढल्या आणि रागानं तिचे हात थरथरू लागले. रात्रभराच्या जागरणामुळे मनावर ताण पडला आहे अशी तिने स्वतःचीच समजूत घातली.

नेहा कोपर्‍यातल्या तिच्या बिछान्यावर झोपलेली होती. तिचा श्वासोच्छ्वास सोनालीला ऐकू येत होता. परिक्षेच्या ताणामुळे नेहासुद्धा थोडी दमल्यासारखी वाटत होती. "झोपेत पण किती आवाज करते ही !" त्रासूनच ती म्हणाली, पण मनातल्या मनात नेहाचा तिला हेवाच वाटत होता.

सोनाली अंधारात भिंतीच्या कडेकडेने चालत तिच्या कपाटाजवळ आली, कपाटात हात घालून तिनं अंदाजानेच पुस्तक उचललं. बाथरूम मधून टप् टप् आवाज येत होता. "अजून नळ ठीक केलेला नाहिये वाटतं. उद्या परिक्षा झाली की तक्रार करायला पाहिजे" असा विचार करता करता ती पुन्हा दरवाज्यापर्यंत आली. दरवाजा पुन्हा हळूच बंद केला. बाहेरच्या मोकळ्या हवेत तिला जरा बरं वाटलं. पुन्हा खाली जाउन ती अभ्यासाला बसली. पहाटे साडेसहा वाजेपर्यंत अभ्यास केल्यावरमात्र तिला अजिबात बसवेना. " आता फार झालं जागरण ! सकाळी ९ वाजताचा पेपर आहे" म्हणून ती उठली. "निदान एक दोन तास तरी झोप मिळाली पाहिजे" असं म्हणून ती तिच्या खोलीकडे वळली. पहाटेचा गार वारा अंगाला बोचत होता. खोलीचं दार उघडलं तेव्हा सकाळची किरणं खोलीत पसरली होती. नेहा अजून झोपलीच असेल म्हणून तिनं हलकेच दरवाजा लोटला.

पुन्हा नाकाला कालचाच घाण लोखंडी वास येउन झोंबला. दचकूनच तीनं आत पाउल ठेवलं आणि पुढचं दृश्य पाहून ती किंचाळायला लागली. नेहाचं शव भिंतीवर हातपाय ताणून बांधलं होतं, तिच्या तोंडात बोळा कोंबला होता. तिचा गळा ह्या कानापासून त्या कानापर्यंत कापला होता. त्यातून ठिबकणार्‍या रक्ताचा टप् टप् आवाज येत होता. बिछाना पूर्ण रक्ताने भरला होता. तिचा आवाज ऐकून शेजारच्या सगळ्या खोल्यांमधल्या मुली धावत आल्या. सोनाली थरथरत उभी होती. सोनालीच्या हातून पुस्तकं खाली पडली आणि टणकन् मोठा आवाज झाला. तिनं डोळे विस्फारून खाली पाहिलं, एक गंजलेला कोयता पडला होता.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

शेखर's picture

23 Dec 2010 - 1:41 am | शेखर

क्रमशः राहिले वाटते....

असुर's picture

23 Dec 2010 - 1:44 am | असुर

आँ????

--असुर

पुष्करिणी's picture

23 Dec 2010 - 1:45 am | पुष्करिणी

सोनालीनंच तर नाही केला ना खून...
क्रमश: राहिलं का?

मलाही आधी तसंच वाटलं होतं! सोनालीनेच नेहाला टपकवला वगैरे असं काहीतरी!!! पण कथेतील गूढ हे अतर्क्यच राहीलं की!!!

--असुर

क्रमशः राहिलेलं नाही. मला वेगळा शेवट सुचला नाही. कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे अशी अर्धवट वाटतेय.
अजून थोडी मोठी हवी होती. सोनालीचं पात्र जरा जास्त क्लिअर झालं पाहिजे. असो, पुढच्या वेळेला :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Dec 2010 - 2:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हीच गोष्ट मोठी करून लिही. चित्र डोळ्यासमोर आलं, वर्णन जमेलेलं आहे.

सुरवात छान झाली होती. रंगात येई-येईतो कथा संपुन पण गेली.
पुलेशु. :)

सुनील's picture

23 Dec 2010 - 2:08 am | सुनील

कथा गंडलीय!

थोडा अजून विचार करून मग लिहायला हवी होती.

नगरीनिरंजन's picture

23 Dec 2010 - 2:46 am | नगरीनिरंजन

वातावरण निर्मिती मस्त जमली आहे. लघुतमकथा आवडली. एका चांगल्या भयकथेचे बीज आहे. लिहा अजून.

इंटरनेटस्नेही's picture

23 Dec 2010 - 3:51 am | इंटरनेटस्नेही

चान चान.

कथा रंगवत आणून मधेच सोडून दिल्यासारखी वाटते आहे.
भिती तर वाटलीच!

डीसॉडर आहे. बोलेतो अभ्यास के टेन्शन के वजह्से सोनाली के दीमाग मे केमीकल लोच्या होएला है. कथेला सोनाली कॉलींग सोनाली असे नाव द्यावे.

टारझन's picture

23 Dec 2010 - 10:41 am | टारझन

वास्तवदर्शी लेखन

समीरसूर's picture

23 Dec 2010 - 11:25 am | समीरसूर

उत्तम वातावरणनिर्मिती आणि कथावस्तू. पण अपूरी वाटते.

खूप छान रायटिंग प्रॉम्प्ट आहे हा. इथून पुढे कल्पनांचे पंख लावून कितीतरी रंजक कथांचे बगीचे शोधता येतील. हा एक प्रयत्नः

(मराठे: माफ करा, मोह आवरत नाहीये. :-))

गंजलेला कोयता, नेहाचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शव आणि तिच्या चेहर्‍यावरचे भेसूर भाव बघून सोनालीची भीतीने गाळण उडाली. नेहाचे डोळे अर्धवट उघडे होते. तिचा चेहरा अगदी बर्फासारखा थिजलेला वाटत होता. एव्हाना आसपासच्या खोल्यांमधल्या सगळ्या मुली आल्या होत्या. सगळ्या मुली दारातच उभ्या राहिल्या. खूप प्रचंड घाबरलेल्या दिसत होत्या. धीर करून मीनलने सोनालीला विचारले,

"सोनाली, कसं झालं हे? कुणी केलं? पोलीसांना फोन करायला हवा. शी किती भयंकर प्रकार आहे हा..."

"नको, त्याआधी देशमानेमॅडमना कळवायला हवे." कुणीतरी म्हणले. मीनलने झटपट खाली गेली आणि वॉचमनला शोधू लागली. वॉचमन जागेवर नव्हता. मीनल पळत देशमानेबाईंच्या बंगल्यावर गेली. हॉस्टेलच्या रेक्टर म्हणून देशमानेबाई आवारातल्याच एका छोट्या बंगल्यात राहत असत. सकाळचे सव्वा सात वाजत आले होते. मुली आता बर्‍यापैकी सावरल्या होत्या आणि आता त्यांच्या चेहर्‍यावर नऊ वाजताच्या पेपरचे टेंशन दिसू लागले होते. आता पोलीस येणार, मग पंचनामा, चौकशी, जाब-जबाब होणार. आपल्या पेपरचे काय होणार, रद्द होईल का असे अनेक प्रश्न मुलींच्या चर्चेतून ऐकू येत होते.

"रद्द झाला तर बरंच होईल बाई, माझे तर तीनच चॅप्टर्स वाचून झालेत आणि बाकीचे तीन मी ऑप्शनला टाकले होते. पेपर पुढे ढकलला गेला तर थोडा वेळ तरी मिळेल वाचायला..."

"असं कसं झालं असेल गं? सोनाली तर किती गोड मुलगी होती. किती हुशार पण होती. कुणी केलं असेल हे? आणि किती क्रूर आहे बघ...गळा चिरलाय कोयत्याने..."

"अगं तुला माहित नाही का? अथर्वशी वाजलं होतं म्हणे तिचं. काल खूप जोरात भांडण झालं म्हणे. जाऊ दे, आपल्याला काय करायचयं?"

सगळ्या मुली आपसात कुजबुजत होत्या. सगळ्यांच्याच चेहर्‍यावर भीती दाटली होती. सोनाली हमसून-हमसून रडत होती. मीनल धापा टाकत देशमानेबाईंना घेऊन आली. देशमानेबाई ते दृष्य बघून जागच्या जागीच थिजल्या. त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. मीनल हुंदके देत होती आणि सोनालीला जवळ घेऊन तिचे सांत्वन करत होती.

"मॅडम, मी सकाळी साडे सहाला खोलीत आले तर मला हे दिसलं. कुणी मारलं असेल हो तिला?..." सोनालीचा आक्रोश थांबत नव्हता.

"वॉचमन गायब आहे. मॅडम, आता काय होईल?" मीनलचे डोळे भरून आले होते.

"थांबा. रडू नका. मी महाजनसरांशी बोलते. कशालाच कुणीही हात लावू नका." देशमानेबाई एका कोपर्‍यात जाऊन हलक्या आवाजात महाजनसरांशी बोलून आल्या. नंतर लगेच देशमानेबाईंनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवले. मुलींची काव-काव सुरुच होती. काही पेपरमुळे पांगल्या होत्या.

"फार शिष्टच होती नेहा. नेहमी तोर्‍यात असायची. मागे मला लिफ्ट देतेस का विचारलं तर नाही म्हणाली. मिहीर आला तर गेली त्याच्यासोबत भुर्र निघून....बरच झालं...नाही म्हणजे वाईटच झालं पण..." मंजिरी म्हणाली. थोड्या वेळाने मंजिरी पण निघून गेली.

साधारण पावणे आठ वाजले होते. दहा-पंधरा मिनिटांनी महाजनसर आले. त्यांनी देशमानेबाईंशी थोडा वेळ चर्चा केली. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर मिहीर सोबत सगळा लवाजमा घेऊन आले.

"मी इ. मिहीर. फोन कुणी केला होता?"

"मी केला होता." देशमानेबाई म्हणाल्या.

"साहेब, मी महाजन, कॉलेजचा प्राचार्य. आज नऊ वाजता पेपर आहे मुलींचा. विद्यापीठाच्या परीक्षेचा आहे. मुलींनी पेपरला जायला हवं नाहीतर उगीच नुकसान... "

"त्याचा प्रॉब्लेम नाही सर. मुलींना खुशाल जाऊ द्यात. मला फक्त सोनालीचा, देशमानेबाईंचा आणि आपला जबाब तात्काळ घ्यावा लागेल. मग पुढची कार्यवाही नंतर करता येईल."

इंस्पेक्टरसाहेबांनी लगेच फोटो काढण्याच्या, पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. सोनालीकडून माहिती घेतली. देशमानेबाई आणि महाजनसरांची जबानी घेऊन त्यांनी त्यांचे निरीक्षण सुरु केले.

"सर, आज पेपर झाल्यावर मात्र मला मुलींकडे चौकशी करावी लागेल. शिवाय वॉचमनची माहिती आपल्याकडून घ्यावी लागेल...."

"नो प्रॉब्लेम साहेब. पेपर संपल्यावर आपल्याला हवी ती मदत मिळेल. थँक्स!" महाजनसर म्हणाले.

महाजनसर आणि देशमानेबाई मुलींना पेपर होणार असल्याचे सांगून निघून गेले. सोनाली कशीबशी तयार होऊन बसली. तिच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते.

अचानक तिला आठवले, आपण रात्री दोन वाजताच्या सुमारास खोलीमध्ये आलो होतो तेंव्हा तिचा श्वास सुरु होता म्हणजे ती मरण्याच्या काही क्षण आधी आपण येऊन गेलो होतो. त्याच वेळी तिला लोखंडाचा वास देखील आला होता. तिला खूप हळहळ वाटली. ती धावत साहेबांकडे गेली आणि तिने हा प्रकार सांगीतला. साहेबांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि तिला शांत केले.

साहेबांचे विचारचक्र केव्हाच सुरु झाले होते. दोनच्या आधी काही काळ खून झाला असावा असा अंदाज त्यांनी बांधला. त्यांनी नीट निरीक्षण सुरु केले. नेहाला तिच्या हाता-पायांना दोर्‍या बांधून भिंतीवर उभे ताणून बांधले होते. तिच्या हाता-पायाच्या दोर्‍याची दुसरी टोके खिडकीच्या गजांना घट्ट बांधलेली होती. दोर्‍या नव्या दिसत होत्या. दोर्‍या कसल्या, दोरखंडच होते ते. कोयता थोडा गंजलेला होता. आधी बांधून मग गळा चिरलेला दिसत होता. तोंडातला बोळा नव्या कापडाचा दिसत होता. खूप योजनाबद्ध रीतीने हा खून करण्यात आला होता असे साहेबांच्या लक्षात आले. पण इतक्या योजनाबद्ध रीतीने जर खून करण्यात आला असेल तर खुन्याने कोयता तिथेच का टाकला असेल? इतका मूर्ख असावा खूनी? नेहाच्या गादीवर पुस्तके दिसत होती. म्हणजे खुनापूर्वी ती जागी होती? खुन्याने दिवा न लावता खून केला असण्याची शक्यताच नाही. सोनाली तर म्हटली होती की ती साधारण रात्री १० वाजता पुस्तके घेऊन जायला निघाली तेव्हा नेहा झोपलेली नव्हती. मग नंतर ती जागी होती का? खुन्याने नेहाला बांधले, तोंडात बोळा कोंबला, नंतर तिला भिंतीला बांधले आणि मग खून केला, या सगळ्या भानगडी करण्यासाठी त्याला पाऊण तास तर सहज लागला असेल. तिने प्रतिकार केला असेल. मग आधी तिला बेशुद्ध करून मग तर तिला बांधले नसेल? खूनी आत शिरला कसा असेल? नेहाने दार उघडले असेल? आणि वॉचमन काय करत होता? एक ना हजार प्रश्न. साहेबांनी पटापट पंचनामा आटोपला. सगळ्यावस्तू सीलबंद पिशव्यांमध्ये गोळा केल्या आणि प्रेत विच्छेदनासाठी पाठवून दिले...

आत्मशून्य's picture

23 Dec 2010 - 2:32 pm | आत्मशून्य

बाकी हॉरर कथेला तूम्ही सस्पेन बनवले. सोनीवरची सी. आय. डी. आठवली.

समीरसूर's picture

23 Dec 2010 - 3:30 pm | समीरसूर

कुणीही असू शकतो..... :-)

अवलिया's picture

23 Dec 2010 - 3:32 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

मस्तानी's picture

23 Dec 2010 - 7:14 pm | मस्तानी

मराठे ... खरंच क्रमशः ठेवून आणखी विचार करून पुढे लिहायला हवी होतीत ...
समीरसूर ... मान गये उस्ताद !

मस्त.
हे जमायला तेवढी प्रतिभा हवी! पुढच्या वेळेला पेपरवर लिहुन मग टाईप करायला घेईन म्हणजे जरा निवांतपणे लिहिता येइल.
कथेला पुढे वाढवल्याबद्धल धन्यवाद!

समीरसूर's picture

23 Dec 2010 - 11:27 am | समीरसूर

माझ्या वरच्या विस्तारात नेहाच्या मित्राचे नावदेखील नजरचुकीने मिहीर लिहिले गेले आहे. क्षमस्व. :-)

असं कसं झालं असेल गं? सोनाली तर किती गोड मुलगी होती. किती हुशार पण होती. कुणी केलं असेल हे? आणि किती क्रूर आहे बघ...गळा चिरलाय कोयत्याने..."

येथे ही सोनाली ऐवजी नेहा हे नाव हवे होते असे वाटले

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Dec 2010 - 2:31 pm | विश्वनाथ मेहेंदळे

दोन्ही चुका अजूनही सुधारता येतील की. त्या प्रतिसादाला अजून कुणीही उत्तर दिले नसल्याने तो अजूनही समीरसुर यांना संपादित करता येईल.

अवलिया's picture

23 Dec 2010 - 2:32 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

आता पाचर मारली गेली आहे.

टारझन's picture

23 Dec 2010 - 3:12 pm | टारझन

शक्यता नाकारता येत नाहि.

-गणिल

समीरसूर's picture

23 Dec 2010 - 3:25 pm | समीरसूर

चूक मान्य!! खूप घाई-घाई मध्ये लिहिले त्यामुळे जरा गोंधळ झाला. क्षमस्व.

पटापट लिहित गेलो. थोडा रीव्ह्यु करायला वेळ मिळाला असता तर बरे झाले असते :-)

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

कथेतील वातावरणनिर्मिती आवडली ..
समिरसूर प्रयत्न खुप छान केला तुम्ही

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या मराठेंचे शुद्धलेखन चांगले आहे.

शक्यता नाकारता येत नाहि.

- मरिल

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Dec 2010 - 8:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्या ठाण्याच्या शाळेत तेवढंतरी शिकवतात म्हटलं! ;-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Dec 2010 - 12:48 am | निनाद मुक्काम प...

प्रचंड असूया
बाकी त्यांनी कथेचा भाग पहिला भाग लिहावा .व दुसरा भाग मिपावरील अजून एका सदस्याने मग तिसरा आणि कोणी तरी
धमाल येईल
किंवा कथेचा शेवट दोन सदस्यांनी वेगवेगळा करावा.