आयपीएल च्या अंतीम सामन्याच्या पुर्वसंधेला डि.वाय पाटील स्टेडिअमवर जाण्यापुर्वी एक विडंबन
चाल प्रसिध्द गाणे ' विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे !!
==============================================================
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !
आनंदाची शाम त्यांची आनंदाची रात्र रे !! आयपीएल चा खेळ रे,--
खेळाडुंची खाण रे, चौकार-षटकार मार रे !
प्राणांचाही प्राण माझा, पैसा तुची एक रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----
सर्वांचा तो देव रे, मोदी स्वयंमेवरे ! सर्वांचा तो देव रे, मोदी स्वयंमेवरे !
प्रिती, शाहरुख, अंबानी , घेती वाटुन संघ रे, !! आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----
सचिनचा आराम रे, पोलॅक करी काम रे !
मुक्त होई हरभज्जी , चिटणीस येई आत रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----
सामने अनेक रे, बुकी करी फिक्स रे !
टोनी, शास्त्री , अरुणलाल - सांगती आख्यान रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !
आनंदाची शाम त्यांची आनंदाची रात्र रे !! आयपीएल चा खेळ रे,--
---------------------------------------------------------------------
आमचा पाठिंबा धोनीला - विजयासाठी शुभेच्छा !!!
(मुंबई इंडिअन्स) केळकर
प्रतिक्रिया
1 Jun 2008 - 6:03 pm | हेरंब
आयपीएलचा खेळ रे
यालाच लोक क्रिकेट समजतात रे
खर्या तंत्राला विसर रे
आतशबाजीलाच सलाम रे |
1 Jun 2008 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खेळाडुंची खाण रे, चौकार-षटकार मार रे !
प्राणांचाही प्राण माझा, पैसा तुची एक रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !
मस्त !!!!
1 Jun 2008 - 8:11 pm | प्रभाकर पेठकर
आयपीएलचा खेळ रे!
अरे, अरे, काय रेऽऽ!
ह्यालाच क्रिकेट म्हणतात का रे,
शरीरविक्रयाचा खेळ रे.
कोण माझा, कोण परका,
सगळीच सरमिसळ झाली रे,
धोनी माझा, युवराजही माझा
हार-जीत कोणाची रे!
पैसा माझा, खेळ परका,
कमरेचेही सोडले रे,
ह्यालाच क्रिकेट म्हणतात का रे,
शरीरविक्रयाचा खेळ रे.
2 Jun 2008 - 8:58 am | अमोल केळकर
कोण माझा, कोण परका,
सगळीच सरमिसळ झाली रे,
धोनी माझा, युवराजही माझा
हार-जीत कोणाची रे!
हे खासच !
2 Jun 2008 - 9:20 am | विसोबा खेचर
केळकरसाहेब अणि पेठकरशेठ,
दोघांचीही विडंबने झकास...
आपला,
(सचिनप्रेमी) तात्या.
2 Jun 2008 - 9:56 pm | अमोल केळकर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !