(पृथ्वी समर्थ आणि पक्षनिष्ठा)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
21 Dec 2010 - 2:38 am

अलीकडच्याच एका प्रसंगी दिल्लीच्या परिसरात काही नेते म्याडमदर्शनाच्या इच्छेने यत्न करत होते. युवराजांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे सहाय्य मागितले. युवराजांनी त्यांना निष्ठा दृढ करा असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. एक प्रहर रात्र उलटल्यावर म्याडम आदिमायेच्या रूपात स्वीय सचिव, आपल्या खास मर्जीतली चौकडी, ट्रकभरून फायलींचा गठ्ठा, हातात बंद लिफाफा आणि एक स्वीस देशीची वर्गणी पुस्तिका अशा लवाजम्यासह तिथे दाखल झाल्या. त्या वेळी बरोबरच्या सचिवाला "वेळ निभवावी" असे म्हणून सिलेक्शन करायला सांगितले.

सचिवाने एक टेबलखुर्ची मांडून त्यावर एक मेणबत्ती लावली व एकेक फाईल काढून वाचू लागला. कॉमनवेल्थ, लवासा, भूखंड, आदर्श अशी एक एक फाईल निघायला लागली आणि एक एक नेता पळून जायला लागला. तरीही काही नेते निगरगट्टपणे बसून आहेत असे पाहून स्वीस देशीची वर्गणी पुस्तिका सगळ्यांमध्ये फिरवून वार्षिक वर्गणीचा आकडा भरायला लावा असा आदेश आदिमायेने देताच आणखी बरेच नेते नदारद झाले.

तरीही काही नेते तग धरून आहेत असे दिसताच उरलेल्यांनी सर्वभावे चौकडीला तोषवावे असे त्या जरा जोरातच कुजबुजल्या. तेव्हा उरले सुरले नेतेही धूम ठोकते झाले. युवराज मात्र शांतपणे बसून होते. कारण ही आदिमाया कोण आहे हे त्यांनी ओळखले होते. तेव्हा बाकीच्या गोष्टी अंतर्धान पाऊन सुरक्षित जागी पोचत्या होऊन तिथे साक्षात म्याडम प्रकट झाल्या. तेव्हा त्या नेत्यांनाही काही ना काही द्यावे अशी युवराजांनी विनंती केली. पण ते कलंकित निष्ठावंत आहेत त्यांची सांप्रतच्या कालखंडात तरी मुख्यमंत्रीपदाची योग्यता नाही असे आदिमायेने सांगितले, आणि कलंकरहित निष्ठावन्ताचे नाव बंद लिफाफ्यातील कागद अलगद काढून त्यावर लिहून लिफाफा पुन्हा बंद केला.

पुढे चौकडीच्या सल्ल्यानुसार त्या नेत्यांचे यथायोग्य 'खाते' अथवा महामंडळ देऊन समाधान केले असे वर्णन आहे.

विनोदप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

21 Dec 2010 - 2:45 am | प्राजु

हाहाहा! छान आहे.

शुचि's picture

21 Dec 2010 - 2:55 am | शुचि

हिलॅरीअस!!!! :-)

स्वाती२'s picture

21 Dec 2010 - 5:11 am | स्वाती२

:D

नितिन थत्ते's picture

21 Dec 2010 - 7:43 am | नितिन थत्ते

मस्त.

आवडलं

Pain's picture

21 Dec 2010 - 8:12 am | Pain

हाहाहा :) मस्त

गवि's picture

21 Dec 2010 - 8:21 am | गवि

jhakaas...A-1... :)

अवलिया's picture

21 Dec 2010 - 8:36 am | अवलिया

हा हा हा

जबरा !! !

स्पा's picture

21 Dec 2010 - 8:39 am | स्पा

+१

प्रीत-मोहर's picture

21 Dec 2010 - 9:21 am | प्रीत-मोहर

+२

संकेत's picture

21 Dec 2010 - 8:38 am | संकेत

फर्मास.

चिंतामणी's picture

21 Dec 2010 - 8:42 am | चिंतामणी

हा.हा.पु.वा.

..=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

sneharani's picture

21 Dec 2010 - 10:45 am | sneharani

हा हा हा! मस्त!

स्वानन्द's picture

21 Dec 2010 - 10:52 am | स्वानन्द

लई भारी !!

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार

जहबर्‍या !!

रणजित चितळे's picture

21 Dec 2010 - 12:56 pm | रणजित चितळे

छान

भडकमकर मास्तर's picture

21 Dec 2010 - 5:04 pm | भडकमकर मास्तर

:)

भाऊ पाटील's picture

21 Dec 2010 - 5:34 pm | भाऊ पाटील

एक नंबरी! विडंबनाचा उत्कृष्ट नमुना!!
प्रतिभा वापरल्याबद्द्ल धन्यवाद. ;)