******काल्पनिक कथावस्तू/मुक्तक******
______________________________________________________
अधून मधून आम्ही भेटत असतो. आताशा तो मला पूर्वीपेक्षाही जास्त आवडू लागला आहे कारण जितक्या वेळा आम्ही भेटतो तितक्या वेळा त्याची ओळख पटते तर कधी नव्याने होते. मला नेहमीच गंमत वाटत आली आहे की माझं काही त्याच्यापासून लपून कसं रहात नाही? त्याचे भेदक डोळे नीर्विकारपणे माझा ठाव घेतात. मिश्किल कुठला!
वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही. किंबहुना तो तसा नसता तर मला लहान, उपरा, परका वाटला असता.
नवर्याला न सांगता गुपचूप त्याला भेटायचं हे थोडं माझ्याकरता अवघडच होतं पण आम्ही जमवतो.त्याला भेटलं की, इतर वेळी शब्द शोधणारी मी, खूप गप्पा मारते, हसते. हो, तो मला हसवतोच मुळी. आणि मी हसत असले की, चष्मा नाकावर घसरवून, नाना पाटेकरसारखा डिट्टो, चष्म्याच्या वरून माझं हसणं लक्षपूर्वक पहातो. आता इतक्या वर्षानंतर माझ्या हसण्यात इतक्या बारकाईने पहाण्यासारखं त्याला काय आढळतं? पण त्याचं हेच "अटेन्शन" मला खूप आवडतं. मग मी त्याला गर्वाने विचारते "असा काय बघतोयस? कधी पाहीलं नाहीस का मला हसताना?" आणि तो म्हणतो ..... तो काही म्हणतच नाही... करतो!! वेल....
त्याच्याही अनेक आवडी आहेत अणि मुख्य म्हणजे आमच्या आवडी अगदी भिन्न आहेत. जसं त्याला मासे पाळण्याचा छंद आहे, भरभर लांबवर चालत जाण्याचाही - एकटं बरं का. त्याला वॉकला जाताना कोणी म्हणजे कोणी बरोबर चालत नाही. रोज, नियमित कितीतरी मैल रपेट करून तो येतो.
माशांच्या टँकमधील पाणी वेळेत बदलणं, माशांना खाद्य घालणं, सुंदर शिंपल्यांनी टँक सजवणं हे त्याचे आवडीचे उद्योग.
आमची भेट प्रथम झाली ती पुस्तकांच्या दुकानात. ब्लेस दॅट शॉप. रॅकवरील एकच पुस्तक त्याने आणि मी एकाच वेळी दोन बाजूंनी धरून खेचले. आता आठवत नाही कोणतं पुस्तक होतं ते पण "लोकल" विभागातील होते. पुस्तकाच्या निमित्ताने जी ओळख झाली ती आम्ही जोपासली. माझ्याकडून आधी अधिक पुढाकार घेतला गेला. मग पुढे सवय होत गेली. मला पहील्यांदा खूप गिल्टी वाटे पण मी पुढेपुढे निर्ढावले.असो. तो बॅचलर आहे. त्याचा निर्णय!
त्याच्यामध्ये सर्व गुणच गुण आहेत असे नाही. तो एक नंबरचा हेड्स्ट्राँग आणि प्रसंगी कमालीचा सरकॅस्टीक आहे. बट इट सुट्स मी फाईन. कामाच्या वेळी तो मला बिलकुल एंटरटेन करत नाही. ह्म्म दॅट हर्ट्स. इट हर्ट्स माय इगो. पण त्याची हीच एकाग्रता सर्व बाबतीत असते, हे कौतुकास्पद आहे. त्याला त्याच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ केलेली आवडत नाही. पण मी देखील तशीच असल्याने आमचे जमते.
आमची मैत्री आहे. आमच्यात आकर्षण आहेच आहे. पण शिवाय आम्ही निर्णय घेतला आहे खूष रहाण्याचा. जे मला विवाहात मिळत नाही ते या विवाहबाह्य नात्यातून मिळवण्याचा. लग्नातून फक्त शारीरीक सुखाची अपेक्षा नसते. मैत्री, साहचर्य, स्नेह, भावनिक गुंतवणूक, प्रेम, आधार आदि अनेक गोष्टी अपेक्षीत असतात. हेच जर लग्नातून मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तर दुसर्या नात्यातून ते मिळवायला काय हरकत आहे? कारण प्रत्येकाला लग्न उधळून देता येईलच असे नाही.
सो फार सो गुड. कुढत / रडत स्वतःची प्रतारणा करत जगण्यापेक्षा मी नवर्याशी प्रतारणा करून जगणं स्वीकारलं आहे.
प्रतिक्रिया
16 Dec 2010 - 3:45 am | मुक्तसुनीत
लेखात मांडलेला दृष्टिकोन रोचक आहे.
मैत्री, साहचर्य, स्नेह, भावनिक गुंतवणूक, प्रेम, आधार आदि अनेक गोष्टी अपेक्षीत असतात. हेच जर लग्नातून मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तर दुसर्या नात्यातून ते मिळवायला काय हरकत आहे? कारण प्रत्येकाला लग्न उधळून देता येईलच असे नाही.
असे असेल तर माणसे अशा लग्नसंबंधापासून दूर नक्की का जात नाहीत ? उपरोल्लेखित गोष्टी म्हणजेच लग्न असा माझा समज आहे. यापैकी काहीही अस्तित्त्वात नसेल तर लग्न नावाचे काहीच अस्तित्त्वात नाही. "उधळून" लावायच्या आधीच लग्न संपलेले आहे, इतकाच याचा अर्थ.
16 Dec 2010 - 7:17 am | विंजिनेर
त्यांना बहुदा समाजाच्या दृष्टीकोनातून(किंवा कायदेशीर - कागदोपत्री) अस्तित्वात असलेले लग्न अभिप्रेत असावं.
कारण असं पोकळ का होईना पण असलेलं लग्न समाजात वावरताना सोयिस्कर/श्रेयस्कर असावं (प्रेयस्कर नसलं तरीही).
16 Dec 2010 - 11:01 am | टारझन
हे कडवं सर्वाधिक आवडलं !!
-(%%%%) ^%%#@#
16 Dec 2010 - 4:29 am | पिंगू
मुक्तक काही पचनी पडलं नाही..
16 Dec 2010 - 7:02 am | स्पा
मुक्तक काही पचनी पडलं नाही.
पाटणकर काढा घ्या..
पोट साफ होईल
मस्त शुची .... एकदम छान लिहिलं आहेस .
हल्ली online मैत्री पण याचमुळे वाढतेय का?
16 Dec 2010 - 4:50 am | निनाद मुक्काम प...
अश्या गोष्टी समाजात घडतात .पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या भारतात तर सर्वात जास्त .अर्थात येथे प्रतारणा करणारे बहुतेक करून पुरुष असतात .लग्न झाल्यावर काही वर्षात संसारात गोडी वाटत नसेल तर विभक्त होणे भारतातील अनेक स्तरीय कुटुंबव्यवस्थेत शक्य नसते .समाजात हा ट्रेंड नाही आहे .मग अश्या पुरुषांसाठी डान्स बार अथवा विवाहबाह्य संबंध असतो .कारण शरीर सुख हेच काही ह्या संबंधाचा स्त्रोत नसतो तर भावनिक दृष्ट्या त्यांना आधार हवा असतो .अगदी काही दशकांपूर्वी आपल्या कर्मठ समाजात सुध्धा रखेली असणे हे काही आपल्याला नवीन नाही .अर्थात आता स्त्री पुरुष समानतेच्या काळात महिलांकडून अश्या गोष्टी घडल्या तर नवल नसावे .
मी विवाहबाह्य संबंधाचे समर्थन करत नाही आहे .पण एखादी व्यक्ती आनंदी राहत असेल .व त्यात त्यांचे कुटुंब विभक्त न होता मुलांना पालक व त्यांचे प्रेम आधार मिळत असेल .तर त्याला कोण हरकत घेणार ? शेवटी समाधान मानण्यावर असते .जगात प्रत्येकाला आनंदी राहायचा अधिकार आहे .वल्ड इज नॉट इनफ (बॉंड सिरीज ) मधील एक पात्र म्हणते .' देअर नो पोइंत ऑफ लिविंग इफ यु कान्ट फील द लाइफ.
हेच वाक्य टायटल ट्रक मध्ये आहे . (जे गार्बेज ह्या स्कॉटिश गायिकेने स्वर बध्द केले आहे .)
19 Dec 2010 - 10:54 am | ज्ञानेश...
मग अश्या पुरुषांसाठी डान्स बार अथवा विवाहबाह्य संबंध असतो .कारण शरीर सुख हेच काही ह्या संबंधाचा स्त्रोत नसतो तर भावनिक दृष्ट्या त्यांना आधार हवा असतो .
डान्स बारमधे 'भावनिक' आधारसुद्धा मिळतो?
16 Dec 2010 - 7:00 am | गवि
प्रेम,मैत्री वगैरे छंद आहेत,लग्न म्हणजे नोकरी रोजगार आहे.छंद वगैरे ठीक,नोकरी हवीच, अशीच सबकॉन्शस प्रतिमा लग्नाची खोलवर झालेलीच आहे.
अर्थातच हे हवंहवंसं अटेन्शन,मैत्री,मानसिक गरज वगैरे केवळ ती व्यक्ती 'नवरा' नाही आणि बाहेर थोडावेळ भेटतात,म्हणून टिकून आहे. बाकी लग्न हे प्रेम करुन करा किंवा ठरवून. प्रेमाची पहिली तीव्रता कधीच टिकून राहणार नाही.
एकत्र नुसते राहू जरी लागले तरी आरुनफिरुन मागील दाराने अतिपरिचयात अवज्ञा,उपेक्षा,कंटाळा,रस संपणे,नात्याचे चिपाड होणे,पेप्सीतले बुडबुडे संपणे हे सर्व पुन:प्रवेश करेलच.हे सर्व नुसते एकत्र राहून.
लग्न करताना तरी आवडी शेअर करणारा अशा दृष्टीने कितीजण
(आणि जणी) स्थळ बघतात?त्या तर त्याचे "राहण्याचे स्थळ" पहात असतात. केवळ अमेरिकेच्या स्वर्गात तो तिला ठेवू शकेल म्हणून डाव मांडणा-या कमी असतील? आणि तो तरी काय पाहतो? गोरी सुंदर वगैरे हेच. if basis are these, तर मग नव्याचे दिन संपले की असे चष्मा नाकावर घेऊन अटेंशन किती वर्षे अपेक्षावे?
लग्न म्हणजे तर फार मोठा व्यवहार आहे. ते काँट्रॅक्ट आहे.बाकी लेख उत्तमच.
16 Dec 2010 - 10:46 am | स्वानन्द
अतीशय उत्तम प्रतीसाद. अगदी मनातलं लिहीलंत.
रोजगार आणि छंद यांचं उदाहरण तर अगदीच मस्त.
16 Dec 2010 - 1:06 pm | मी ऋचा
+१
16 Dec 2010 - 2:20 pm | भाऊ पाटील
जबरा प्रतिसाद हो गवि.
साला आपण तुम्चा फ्यान आजपासुन
-छगनमुरारी
16 Dec 2010 - 7:23 pm | स्वैर परी
अगदी मनातले लिहिलेत!
स्वानुभव नाही, परंतु मला देखील असे वाटते, कि लग्न झाल्यानंतर बहुदा सगळे "आता केलय ना, मग चालुद्या पुढे" अशा भावनेने संसाराचा गाडा हाकत असावेत. अपवाद असतीलहि काही, पण हाताच्या बोटावर मोजण्याईतके!
बाकि, लेख तर सुरेखच, लिखाणाची शैली आवडली.
17 Dec 2010 - 7:22 am | निनाद मुक्काम प...
@लग्न करताना तरी आवडी शेअर करणारा अशा दृष्टीने कितीजण
(आणि जणी) स्थळ बघतात?त्या तर त्याचे "राहण्याचे स्थळ" पहात असतात. केवळ अमेरिकेच्या स्वर्गात तो तिला ठेवू शकेल म्हणून डाव मांडणा-या कमी असतील? आणि तो तरी काय पाहतो? गोरी सुंदर वगैरे हेच. if basis are these, तर मग नव्याचे दिन संपले की असे चष्मा नाकावर घेऊन अटेंशन किती वर्षे अपेक्षावे?
लग्न म्हणजे तर फार मोठा व्यवहार आहे. ते काँट्रॅक्ट आहे
+१
अप्रतिम भाषेत भावना व्यक्त केल्या तुम्ही
ह्याच भावना पद्यात
म्हणजे कांदेपोहे ह्या सिनेमाचा चा टायटल ट्रेक
16 Dec 2010 - 7:06 am | नेत्रेश
* साहचर्य, स्नेह, भावनिक गुंतवणूक, प्रेम, आधार या गोष्टी मैत्रीला परिपुर्ण करणार्या असुन मैत्रीचाच भाग आहेत. आता या मैत्री मध्ये नवर्यापासुन लपवण्यासारखे काय आहे? की खरेच काही लपवण्यासारखे आहे जे ईथे लिहीले नाही?
* कदाचित आत्ता नसेल पण भविष्यात असु शकेल या आशेपोटी लपवाछपवी चालली आहे? आत्ता विवाह तोडता येत नाही, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा बॅकप असावा म्हणुन? (बॅकप भावनिक आधारासाठी, जमल्यास अधीक गोष्टींसाठी)
* की काही 'थ्रील' म्हणुन चोरुन भेटणे चालु आहे? पण पकडले गेली तर 'खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारा आना' अशी अवस्था.
16 Dec 2010 - 7:46 am | इंटरनेटस्नेही
आवडलं. शुचिताईंच्या लेखनाचं हे वैशिष्ट्य आहे की त्या जेव्हा लिहतात तेव्हा नुसतं पांढर्यावर काळं करत नाहीत, तर कथाविषय आपल्या समोर जणु प्रत्यक्ष घडतेयं असा मांडतात.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
16 Dec 2010 - 8:04 am | शिल्पा ब
अरे वा!!! विस्तृत प्रतिसाद ! आपले कार्यबाहुल्य आटोपले वाटतं ;)
16 Dec 2010 - 5:21 pm | स्वानन्द
:)
17 Dec 2010 - 2:29 am | इंटरनेटस्नेही
अरे वा!!! विस्तृत प्रतिसाद ! आपले कार्यबाहुल्य आटोपले वाटतं ;)
धन्यवाद! ;)
-
(रिकामटेकडा) इंट्या.
16 Dec 2010 - 9:18 am | मनीषा
प्रत्येक नात्यात माणूस वेगवेगळा असतो.., वेगळा वागतो.
तुम्हाला आवडणारा हा मित्रं नवरा म्हणून कसा असेल? कसा वागेल ? माहित नाही .
सो फार सो गुड. कुढत / रडत स्वतःची प्रतारणा करत जगण्यापेक्षा मी नवर्याशी प्रतारणा करून जगणं स्वीकारलं आहे
हे फारसं आवडलं नाही
शेवटी -- known devil is better than unknown friend .
16 Dec 2010 - 7:41 pm | पैसा
हेच म्हणते.
जरी कथा काल्पनिक असली तरी, नवर्याची फसवणूक करणे हे न पटणारे आहे. फसवणूक करण्याची जरूर वाटावी, याचा अर्थ या महिलेची मित्राबद्दलची भावना परदर्शक नसावी. आताच्या काळात मित्र/मैत्रीण कोणाचेही (नवर्याचे/बायकोचे) असू शकतात. त्यात लपवण्यासारखं काय आहे? उलट बरेचदा, काही काळाने असा मित्र नवर्याचाही मित्र होऊन जातो.
नवर्याबरोबरचं आपलं नातं रुक्ष का झालं याचा या उदाहरणातील महिलेने देखील विचार करायची गरज आहे. टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. तिने जर हात पुढे केला तर ते नातं अजून सुधारू शकेल. आपल्या अशा मित्राबद्दल आपण आपल्या मुलाना सांगू शकतो का, याचा एकवेळ प्रामाणिक विचार केला तरी बर्याच गोष्टी आपाआपल्या जागी जातील.
17 Dec 2010 - 2:47 am | इंटरनेटस्नेही
उलट बरेचदा, काही काळाने असा मित्र नवर्याचाही मित्र होऊन जातो.
हेच म्हणतो.
-
(मैत्रीणीच्या बॉयफ्रेंड बरोबर बीअर पिणारा, आणि नंतर मैत्रीणीच्या शिव्या खाणारा) इंट्या.
16 Dec 2010 - 9:45 am | वेताळ
विचार करायला लावणारे व काळजाचे ठाव घेणारे मुक्तक आहे.माणुस हा कितीही झाले तरी एक प्राणी आहे व तो त्या वळणावर नक्कीच जाणार हे लेखिकेने अतिशय सुंदर शब्दात मांडले आहे.लग्न हा एक नात्याचा सोन्याचा पिंजरा आहे . हे सत्य खुप कमी लोकाना उमगते.विवाहबाह्य संबधाना नाके मुरडणार्या तथाकथिक समाज ठेकेदारांच्या तोडावर एक सणसणीत चपराक इथे नायिका मारते आहे.
विवाहबाह्य संबध चांगले कि वाईट ह्या गर्तेत अडकलेल्या नवोदिताना हा लेख योग्य मार्गदर्शन करतो (माझा मेल आयडी हवा असेल तर व्यनी करा).छोटयाच लेखात लेखिकेला बरेच प्रश्न विचारात घेता आले नाहीत तरी पुढील लेखात त्यावर लेखिका योग्य तो प्रकाश टाकतीलच.जीवनातले खुपच अभिजात व मौलिक मार्गदर्शन हा लेख करतो ह्या बद्दल कोणाचे ही दुमत नसावे.
16 Dec 2010 - 10:19 am | समीरसूर
पण खूप महत्वाचा आहे, विशेषतः आजकालची जगण्याची धावपळ, शर्यतीत पुढे राहण्याची अहमअहिका, त्यातून संवादाला मिळणारा कमी वेळ, टीव्हीसारख्या सवतीचं किंवा सवत्याचं घरावर होणारं आक्रमण, निव्वळ चंगळवादावर आधारलेली सुखाची कल्पना, पब मध्ये तीन तास नाचलो, पाच पेग दारू प्यालो, सिगारेटी फुंकल्या, बेहोश होऊन घामाच्या धारा पुसत ठणठणणार्या कर्कश संगीतावर नाचलो म्हणजे मला अमाप सुख मिळाले अशा हास्यास्पद कल्पना...अशा कित्येक बाबींमुळे आपआपसातला संवाद कमी होतोय. शिवाय नैसर्गिक उर्मी, बदलाची ओढ, आयुष्यात काहीतरी वेगळं असण्याची धडपड यामुळे अशी अनामिक ओढ पुरुषाला किंवा स्त्रीला कुणाकडे तरी ओढत असावी. ही ओढ नैसर्गिकच असावी असे वाटते. शेवटी माणूस हा एक प्राणी आहे. पण माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे म्हणून कुठे थांबायचे, कुठली लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही हे ठरवता आले म्हणजे मग काही प्रॉब्लेम येणार नाही असे वाटते.
16 Dec 2010 - 10:31 am | गवि
आवडलं.
Only except for:
>>>>>>>>>>>
कुठली लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही हे ठरवता आले म्हणजे मग काही प्रॉब्लेम येणार नाही असे वाटते.
>>>>>>>>>>>
Question:
कुठली लक्ष्मणरेषा नाही ओलांडायची ?
शारिरिक ओलांडली तर प्रतारणा,वाईट.मनांची ओलांडली तर मर्यादा राखली असे ?
16 Dec 2010 - 1:13 pm | समीरसूर
:-) ते वाक्य चुकून लिहिले गेले. दिलगीर आहे.
16 Dec 2010 - 11:16 am | नितिन थत्ते
मुक्तक आवडलं.
काल्पनिक असल्यामुळे ठीकच आहे. :) प्रत्यक्ष असेल तर 'तोल ढळत नाही ना?' यावर बारीक लक्ष ठेवणे चांगले. कारण त्या व्यक्तीच्या "आहारी जात असल्याची" चिह्ने दिसत आहेत. विशेषतः चोरून भेटण्याची कृती.
16 Dec 2010 - 2:22 pm | समीरसूर
प्रत्यक्षातली अशी नाती हाताबाहेर गेल्याची काही उदाहरणे मला माहित आहेत. आयुष्यात भयंकर उलथापालथ घडवून आणतात असल्या गोष्टी.
पण एखादा चांगला मित्र असणे किंवा मैत्रीण असणे यात काही वावगे नाही. आपल्या भावना कुठल्याच नात्याच्या अपेक्षांचे ओझे न बाळगता कुणासोबत शेअर करता आल्या तर असल्या मैत्रीमध्ये काही वावगे नसावे. पण म्हणतात ना, एक परका पुरुष आणि एक परकी स्त्री यांच्यातले नाते कधीच निखळ मैत्रीचे वगैरे असत नाही. काही अंशी शारीरिक आकर्षण असल्याशिवाय स्त्री आणि पुरुष एकमेकांकडे ओढले जाऊ शकत नाहीत. इन फॅक्ट, पुरुष आणि स्त्री यांच्यातली एकमेकांविषयी असलेली सुप्त ओढ ही एक खूप हळवी आणि नाजूक भावना आहे. खूप नैसर्गिक आहे ते.
म्हणूनच मानलेला भाऊ किंवा मानलेली बहीण या नात्यांवर माझा तितकासा विश्वास नाही. शाळेत असतांना मुलींकडून राख्या बांधून घेणे हा एक तसलाच भंपक प्रकार होता. ज्या मूर्ख लोकांनी हा प्रकार सुरु केला असेल ते खरच संत असतील. ज्या मुलीकडून रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घ्यायची त्याच मुलीवर मग बाकीचे दिवस लाईन मारायची असले प्रकार सर्रास व्हायचे. आणि ते त्या वयात होणारच, किंबहुना ते कुठल्याही वयात होणारच... निसर्ग नियम आहे तो... तो नियम जर तसा नसता तर जग किती रुक्ष आणि कोरडे होऊन गेले असते याची कल्पना करु शकत नाही.
16 Dec 2010 - 7:47 pm | स्वानन्द
सहमत.
16 Dec 2010 - 11:28 am | वेताळ
चोरुन भेटुन लपाछप्पी,सागरगोटे वगैरे खेळ देखिल ते खेळता येतात म्हटल.
16 Dec 2010 - 1:18 pm | अवलिया
मुक्तक चांगले...
16 Dec 2010 - 1:25 pm | नगरीनिरंजन
>>वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही. किंबहुना तो तसा नसता तर मला लहान, उपरा, परका वाटला असता.
हे आधी बरोबर वाटले पण तो बॅचलर आहे हे वाचल्यावर वरील वाक्य विचित्र वाटले. या नात्यातून नक्की काय हवे आहे हा प्रश्न पडला. 'कुगार'पणा करणार्या स्त्रीला असा पुरुष नक्कीच पसंत पडणार नाही आणि एक मित्र म्हणून संवेदनशील आणि स्त्रियांचे मन समजून घेणारा हवा असेल तर ते गुण एका बॅचलर (तेही चाळिशीच्या) पुरुषात कदापिही सापडणार नाहीत.
हे नातं नसून स्त्रीच्या बाजूने एक रूटीनच्या कंटाळ्यावरची रिअॅक्शन किंवा इन्फॅच्युएशन किंवा सेवन यिअर इच असण्याचा संभव अधिक वाटतो आणि पुरुषाच्या बाजूने एक फ्लिंग.
16 Dec 2010 - 2:08 pm | शुचि
आपला प्रतिसाद आवडला. खरं आहे आपलं म्हणणं.
16 Dec 2010 - 5:35 pm | गणेशा
कथेतील नायिकेला प्रेम .. भावनात्मक गुंतवनुक .. मैत्री .. आधार ..स्नेह हे तीच्या नवर्याकडुन मिळत नाही .. म्हणुन ह्या सर्व गोष्टींमुळे ती दुसर्या पुरुषाकडुन हे मिळवत असतानाचे तीचे चित्रण छान दाखविले आहे ..
आवडले ..
परंतु नविन साथीदार हा मित्र म्हणुन या सर्व गोष्टी देतो आहे .. कारण मित्र हे नातच खुप ग्रेट आहे .. ते कधी कधी पती या नात्यापेक्षा ही श्रेष्ठ ठरते .. परंतु येथे मैत्रीच्या पलीकडील आकर्षण ही आहे .. आकर्षणं हे मैत्री नावाच्या कमळात असलेला काळसर भुंगा आहे .. त्या मैत्रीची गोडी तो शोषुन घेवु शकतो .. ह्या गोष्टीची जान ही नायिकेने ठेवले पाहिजे असे वाटते ...
अवांतर :
लग्न म्हणजे काय ? पुण्यात राहत असताना फार तर कात्रज - हडपसर वाला नवरा चालेल .. कींवा ठाण्यात राहताना फारतर कल्यान - डोंबीवली चालेल असे दृष्टीकोण बदलले पाहिजे ..
सिनेमा गृहात अंधारात हातात हात घेवुन पाहिलेले चित्र आणि उजेडात ..संसारात एकमेकांत निभवायचे नातं हे नक्कीच वेगळे असते, हे जाणले पाहिजे
पुरुषाने ही शरीरापलीकडे ..गोर्या कातडि कडे न बघता .. मनाचा ठाव घेणे गरजेचे आहे.. आणि हे ज्यांना जमते तेच खर्या मैत्रीचा अर्थ पाहु हि शकतात ..
वेगवगळी नाती हि अशेच असतात ... एकमेकात गुंतलेले .. पती हे नातं ही असेच आहे .. मित्र.. सखा .. नवरा .. वडिल .. या सर्व नात्यांचे मिश्रण म्हणजे पती ...
योग्य पती/पत्नी होणे म्हणजे सर्व नात्यांचे रेशमी धागे जपण्यासारखे आहे असे वाटते ..
---------------
16 Dec 2010 - 7:31 pm | स्वैर परी
:)
16 Dec 2010 - 8:08 pm | यकु
मुक्तक काल्पनिक असले तरी समाजात वास्तवात जे घडते ते समोर मांडण्याची रिस्क लेखिकेने घेतली आहे. त्याबद्दल अभिनंदन!!
माझे व्यक्तिशः निरिक्षण असे आहे की काहीकाळानंतर असा तथाकथित मित्र देखील बेचव ठरतो आणि या मुक्तकात लग्नाचे जे झाले आहे तेच अशा मैत्रिचे होते.
आगे क्या होता है?
मग पुढे असलेच मित्र शोधण्याची गरज (!) निर्माण होते... ( चटक लागते? )
आणि मग पुढे बसणारे अनेक शिक्के पचवायला तयार व्हावे लागते.
16 Dec 2010 - 10:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लिखाण आवडलं, विचार पटलेच असं नाही.
असा कोणी मित्र असण्यात वावगं मला तरी वाटत नाही. पण कथानायिकेने ही गोष्ट नवर्याला सांगितली नसेल तर मात्र मला ते चूक वाटतं; (म्हणजे असा कोणी माझा मित्र असेल तर ते माझ्या नवर्यापासून लपवून ठेवणार नाही). अर्थात कथेत नवर्याला ही गोष्ट सांगितली आहे, वा नवर्यापासून लपवली आहे असा स्पष्ट उल्लेख नाही.
स्त्री-पुरूषांचीही मैत्री होणं सहाजिक आहे, आणि समीरसूर म्हणतात त्याप्रमाणे सुप्त आकर्षणामुळेही अशी मैत्री होऊ शकते. त्यात अनैसर्गिक काहीही नाही. पण मैत्री मैत्रीच्याच पातळीवर ठेवणं आणि सर्वच नातेसंबंधांमधे आवश्यकतेएवढी पारदर्शकता ठेवणं हे जास्त महत्त्वाच!
16 Dec 2010 - 10:39 pm | अनामिक
अदितीच्या मताशी खूप सहमत आहे. मलाही अश्या मैत्रीमधे काही वावगं वाटत नाही, पण तुम्ही काय करता किंवा तुमच्या मित्रांबद्दलची माहिती तुमच्या जोडीदाराला असायला हवी. मुक्तकातील नायीका म्हणते की प्रत्येकालाच लग्न उधळून लावता येईल असे नाही... पण जे नातं विश्वासावर जोपासल्या गेलंय (?) त्यात अशी अपारदर्शकता का असावी? शिवाय या नवीन नात्याबद्दल जोडीदाराला कळल्यावर त्याला तुमचं नातं हे फक्त मैत्रीपुरतंच मर्यादीत आहे हे कसं कळावं किंवा फक्त मैत्री आहे यावर विश्वास तरी का ठेवावा? अजून एक शंका म्हणजे नायीकेच्या मित्रालाही फक्तं मैत्रीच हवी आहे की अजून पुढे काही? आणि कालांतराने ह्या मैत्रीमधेही कोरडेपणा येणार नाही याची खात्री काय? ही मैत्री जोपासण्यापे़क्षा मी जोडीदाराबरोबर निर्माण झालेल्या कोरड्या नात्यात पुन्हा ओलावा कसा आणता येईल याचा प्रयत्न करीन.
16 Dec 2010 - 10:51 pm | रन्गराव
वर लई भावनात्मक आणि सात्विक कॅटेगिरीतले प्रतिसाद आले आहेत. स्त्रियांच्या थोड्या अनप्रिडेक्टेबल मनोवृत्तीचा विचार केला तर थोडे वेगळे निष्कर्श काढता येतात.
१. स्त्रीयांना पुरूषांना कंट्रोल मध्ये ठेवायला आवडत. ज्यांना कंट्रोल करायला अवघड असत असे पुरूष अजून जास्त आवडतात. पण ज्यादिवशी ती त्याला मुठीत आणते, थ्रील संपलेलं असत कदाचित. आणि जर कथेतल्या स्त्रीचा पती पत्नीची प्रत्येक गोष्ट बिनविरोध ऐकणारा असेल तर तो फार इंटरेस्टींग प्राणी नसेल. मग कंट्रोल करायला कुणी ईंट्रेस्टींग सापड्ला की त्याच्यावर वर्चस्व मिळवायची धडपड. स्मार्ट स्त्रियांच्या बाबतीत हे जास्त होतं. कारण त्यांना नेहमी काही ना काही आवाहन हव असतं. चाळीसाव्या वर्षीही लग्न वगैरे असल्या कचाट्यात न पडणारा स्वच्छंदी प्राणी म्हणजे भारीच आवाहन असणार. आणि त्याच कामच्या वेळी तिला भाव न देण पण इतर वेळी हसवण ही सगळी त्याच्या वांड असण्याची लक्षण. किती ताणायचं ते परफेक्ट माहीत असणारा माणूस.
२. चोरून भेटणे वगैरे गुंता: आपल्या पतीला उगाच इनसेक्युअर फील होउ नये म्हणून घेतलेली एक काळजी असू शकते.
हो आणि आता त्या नात्यामध्ये लक्ष्मण रेखा काय ती त्याच ओलांडण. जरा जास्तीच अतिरंजक वाटल. जर आयुष्यात कधी एखादी बाई बॉस म्हणून मिळाली तर तिला हो ला हो म्हणायचा गाढवपणा करू नका, सुरुवातीला छान जमेल पण काही दिवसान ती एकतर दुसर्या इंट्रेस्टींग एम्प्लोयीवर खूष होईल किंवा तुमचा गुलामासारखा वापर करेल.
16 Dec 2010 - 10:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सॉरी, पण एवढं जनरलायझेशन पाहून एवढंच हसता आलं!
16 Dec 2010 - 11:01 pm | रन्गराव
तुमची प्रतिक्रिया वाचून तर स्मायली पण रडायला लागल्या आहेत म्हणून टाकल्या नाहीत. :( ही खाली पडून हसण्याची स्मायली होती बघा काय केलत त्याचं!
16 Dec 2010 - 11:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जमेल तुम्हालाही इमोटीकॉन्स टाकणं ... थोडं एच्टीएमेल शिका फक्त!
16 Dec 2010 - 11:14 pm | रन्गराव
जास्ती नादाला लागू नका नाहीतर कथेतल्या नायिकेसारखा व्हायच (इथ तर डोक्यावरचे सगळे केस शिल्लक असलेला बॅड बॉय आहे)! वर जे काही लिहिलं आहे त्याचा स्वत:च पुरावा बनाल!
17 Dec 2010 - 12:22 am | टारझन
जियो !
- (जियो लॉजिस्ट) टार्या
मी जोतिबा मोतीबा टींगरे सहकारी पतपेढीचा सदस्य आहे .
17 Dec 2010 - 12:30 am | शिल्पा ब
याला म्हणतात आवाहनाचे आव्हान..
17 Dec 2010 - 1:26 am | रेवती
वैयक्तिक शेरेबाजी टाळा रन्गराव!
तुमच्या खासगी आयुष्याचा अदितीने कुठेही उल्लेख केलेला नसताना आपण अशी प्रतिक्रिया देत आहात.
17 Dec 2010 - 8:17 am | रन्गराव
मॉरल पोलिसिंग, तेही पक्षपती! चालू दे!
17 Dec 2010 - 1:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नीट समजलं नाही. "नीट अभ्यास केलात तर लोळून हसणार्या इमोटीकॉनचा एच्टीएमेल कोड लिहीता येईल" असा सल्ला देण्याचा आणि (सो कॉल्ड) बॅड बॉय मित्र असण्याचा काय संबंध? पण तुम्ही काही लिहीलं आहेत म्हणजे एकदम 'फनी-फनी' असणार म्हणून हसून घेते.
17 Dec 2010 - 8:15 am | रन्गराव
नाव सार्थकी लावण्याचा प्रयत्न पाहून थक्क झालो. ;)
17 Dec 2010 - 8:19 am | नितिन थत्ते
सदर आयडी इगोसेण्ट्रिक असल्याचे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या मालिकेतच लक्षात आले होते. ते येथे परत दिसून येत आहे.
प्रतिसाद वैयक्तिक वाटत असल्यास उडवावा.
17 Dec 2010 - 8:24 am | रन्गराव
हाय अस हाय बघ!
17 Dec 2010 - 8:42 am | टारझन
क्यों थत्तेचच्चा , कही पे णिगाहे .. कही पे णिशाना ? :)
-(शिश्य) टारझन
थत्तेचाचा क्लास अॅकॅडमी
18 Dec 2010 - 9:47 am | रन्गराव
क्या बता रा टार्झन भाय? यह बात सच्ची है तो रास्ते से हटता मैं ;)
18 Dec 2010 - 9:28 am | स्वानन्द
आवरा जरा स्वता:ला. उग आपलं ताळतंत्र सोडुन बोलायचं..
18 Dec 2010 - 1:06 pm | शिल्पा ब
नाई तं काय ? (बाकी कोणाला दम भरला हो? ;))
19 Dec 2010 - 6:20 pm | स्वानन्द
केवढी ती घाई भांडण्याची!
जाऊ दे तुम्ही असंच हो ला हो म्हणत रहा हो..भांडायला मिळाल्याशी मतलब ;)
20 Dec 2010 - 2:50 am | शिल्पा ब
नाईतं काय!!
17 Dec 2010 - 12:27 am | बेसनलाडू
आज कल चे लव हे असेच असते, हे पचवणे त्या नावाचा चित्रपट पाहताना जड गेले; पण हा लेख वाचून ते पटवून घ्यायला अजिबात कष्ट पडले नाहीत. सैफ अली खानच्या प्रेमापोटी लग्न झालेल्या दिवशीच नवर्याचा त्याग करणारी आणि तो करताना "चाहिये तो मैं वापस आकर तुम्हें सॉरी बोलुंगी" असे नवर्याला ऐकवणारी दीपिका पडुकोण हे जर आजच्या स्त्रीचे प्रतीक असेल, तर संपलेच. सध्या तरी तिला (पक्षी त्या व्यक्तिरेखेला) आधुनिक स्त्रीचे प्रतीक न समजता अपवादच समजतो आहे. स्त्रियांच्या मानसिक सशक्तपणाचे, कणखरपणाचे गुणगान आजवर ऐकून होतो; पण लेखातील स्त्रीच्या विचारांनी या गुणगानाचा पुनर्विचार करायला भाग पाडले.
(प्रेक्षक)बेसनलाडू
मित्रत्त्वाचे नाते, जोडीदार (नवरा/बायको) म्हणून असलेले नाते आणि निव्वळ आकर्षण यांचा सारासार विचार न होता मोठी गल्लत होते आहे की काय, असे वाटून गेले. मागे एकदा विवाहबाह्य संबंधांवरील धाग्यावर कोणीतरी 'जोडीदाराच्या माहितीबाहेर आणखीही कोणी (प्रतिजोडीदार म्हणून) आयुष्यात असणे काही गैर नाही' याचे समर्थन केले होते, तेव्हा खूप मोठा धक्का बसला होता. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे 'मर्यादा' फक्त शारीरिक पातळीवर असेल आणि ती ओलांडणे पाप वाटत असेल, तर तो फार संकुचित विचार आहे. शरीराने मर्यादा ओलांडली नसेल, पण मनाने आधीच ओलांडली असेल, तर तेथेच जोडीदाराबरोबरचे नाते संपले आहे, असे म्हणण्यात काय गैर आहे? असो.
(विचारवंत)बेसनलाडू
'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हे सहजच आठवले. लेखात वर्णन केलेल्या फुलपाखरी नात्यामागे सुसाट धावणार्यांनी लक्षात ठेवावे असे.
(स्मरणशील)बेसनलाडू
17 Dec 2010 - 12:41 am | शिल्पा ब
नवीन हिंदी पिच्चर पाहणे सोडा...मनावर वाईट परिणाम होईल ;) आणि पिच्चर मधल्या गोष्टी खऱ्या नसतात...आवडत नसला तरी लग्न झाल्यावर बायका राहतात त्याच्याबरोबर...कमीतकमी भारतीय बायका तरी...
स्वतःचे लग्न बरे वाईट कसे का असेना, ते सोडून गर्लफ्रेंड / बॉयफ्रेंडशी लग्न करणारा/ री अजूनतरी पाहण्यात नाही...लोक दुसरी बायको करतात (कायदा इथे काढू नका) पण दुसरा नवरा करायची सोय नाही...काय तो विचार आधी करून मगच पाऊल उचलावे...नुसतंच थ्रील हवं असेल तर sky diving , rock climbing वगैरे प्रकार आहेत..बाकी ज्याची त्याची मर्जी.
पण सहसा नवऱ्याला बायकोचा मित्र पचनी पडत नाही हेच खरं..
17 Dec 2010 - 1:01 am | बेसनलाडू
कायद्याच्या परवानगीबाहेर दुसरी बायको करणारे नवरे आहेत तशाच दुसरा नवरा करणार्या बायकाही असतीलच की; नसतील कशावरून?
(जिज्ञासू)बेसनलाडू
बाकी थ्रिल्स बाबत सहमत.
(सहमत)बेसनलाडू
आणि 'सहसा' या वाक्यातून प्रतीत होणार्या शेवटच्या वाक्यातील जनरलायजेशनशी असहमत :) बायकोच्या मित्राशी तिच्या नवर्याची सगळ्यात जास्त मैत्री होऊ शकते/व्हावी, असे आम्हांला वाटते ;) बायकोचा डबल उद्धार तिच्याच पुढ्यात करण्याची सुवर्णसंधी याव्यतिरिक्त कोणती असेल? ;) (सर्वांनी ह. घ्या.) :)
(असहमत)बेसनलाडू
17 Dec 2010 - 1:06 am | शिल्पा ब
<<कायद्याच्या परवानगीबाहेर दुसरी बायको करणारे नवरे आहेत तशाच दुसरा नवरा करणार्या बायकाही असतीलच की; नसतील कशावरून?
असतील की...पण सर्रास नाही...परदेशात असे प्रकार चालतात असे ऐकुन आहे...जर्मनीतील निनाद हे अधिक सांगु शकतील.
<<बायकोच्या मित्राशी तिच्या नवर्याची सगळ्यात जास्त मैत्री होऊ शकते/व्हावी, असे आम्हांला वाटते
होतेच असं नाही...बर्याचदा तसे नसते...नुसतं वाटुन काय होतंय का? चालायचंच
17 Dec 2010 - 2:10 am | निनाद मुक्काम प...
http://www.yourdictionary.com/boy-toy
युरोपात सगळे लोण अमेरिकेतून येत
बॉय टोय का काही तरी म्हणतात बुंआ अश्या प्रकाराला
17 Dec 2010 - 1:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
(असहमत)बेसनलाडू यांच्याशी सहमत. तसेच नवर्याच्या मैत्रिणीसोबत बसून नवर्याच्या नावाने खडेफोड करण्यासारखी दुसरी संधी नाही ... असं माझ्या काही मित्रांचा पश्चात्ताप पाहून मत झालेलं आहे.
तर मग बेला, कधी भेटवतो आहेस तुझ्या बायकोला?? ;-)
19 Dec 2010 - 10:46 am | स्मिता.
बेला यांच्या प्रतिक्रियेतील अदितीने हायलाईट केलेल्या भागासकट पूर्ण प्रतिक्रियेशी सहमत.
17 Dec 2010 - 7:16 am | नगरीनिरंजन
विवाहबाह्य प्रेमप्रकरण आणि sky diving , rock climbing यातलं थ्रील सारखंच आहे? असेल तर मग एक नैतिक आणि दुसरं अनैतिक कशावरून ठरतं?
एखाद्याचा/ची जोडीदार दुसर्या भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर sky diving , rock climbing करायला गेल्यास ते योग्य की अयोग्य? दुसर्या भिन्नलिंगी व्यक्ती बरोबर काय काय केलं म्हणजे ते नैतिक असतं आणि काय काय अनैतिक असतं?
या जगात आपला/ली जोडीदार सोडून दुसर्या भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण कधीच न वाटलेला/ली मानव असेल?
17 Dec 2010 - 7:28 am | शिल्पा ब
मी फक्त थ्रील बद्द्ल म्हंटलं...यात सुद्धा थ्रील असतं...
17 Dec 2010 - 8:23 am | नगरीनिरंजन
ते मान्य. बहुतेकवेळा थ्रीलसाठीच असली प्रेमप्रकरणे होतात. घरकी मुर्गी हळूहळू दाल बराबर होते आणि मग बाहेरची दाल मुर्गीपेक्षा रुचकर वाटते.
लवकर ओसरणारं असलं तरी यातलं थ्रील sky diving, rock climbing पेक्षा खूप जास्त असावं.
18 Dec 2010 - 1:07 pm | शिल्पा ब
तुम्ही म्हणताय म्हणजे असेल बुवा!!! आपल्याला काय अनुभव नाय ;)
17 Dec 2010 - 12:45 am | कवितानागेश
लिहिण्याची शैली नेहमीप्रमाणेच छान.
पण खरे तर 'मैत्री' म्हटली की तिथे 'स्त्री-पुरुष' फरक असतो का मला अजून कळले नाहीये.
म्हणजे स्त्रियांची मैत्री स्त्रियांशी असली तर चालेल आणि पुरुषांशी असली तर उगीचच तिथे 'लैंगिकतेची किनार' जोडली जाईल (किंवा उलट ), असे प्रत्येकवेळेस का गृहीत धरायचे?
ज्यांची मैत्री आहे, ते, व जे 'बाहेरून' बघतायत, ते, अशा सगळ्यांचाच हा गोंधळ दिसतो.
कथानायीकेची मनस्थिती अशीच गोंधळाची वाटतेय. (अगदी वास्तववादी आहे! अशी मनस्थिती अनेकांची असते).विरुद्धलिंगी व्यक्तीशी असलेली मैत्री 'मैत्री' साठी आहे, की अजून कशासाठी हे जोपर्यंत व्यक्तीला स्वतःला समजत नाही, तोपर्यंत 'गिल्ट' पण सुरुच रहाते. कथानयिकेचा 'मित्र' बेपर्वाईएनी वागतो, हे 'चालते', पण नवरा बेपर्वाईनी वागला तर चालत नाहे, यातूनच खरे तर, नवरा-बायकोचे नाते खरच किती 'खोल' आहे हे कळते. त्यामूळे ही 'मैत्री' नसून 'बंडखोरी' वाटते!
शिवाय पती-पत्नी दोघांनीही जोडीदाराकडून उगीचच अती-आदर्श वागणुकीच्या अपेक्षा ठेवल्या तर हा गोंधळ वाढतच जातो.
मला वाटते, acceptance जितका जास्त, तितके नाते समृद्ध.
17 Dec 2010 - 12:39 am | पर्नल नेने मराठे
म्हणुन मी बरी न माझा नवरा बरा... नकोच ते मित्रबित्र्....हवित कशाला ती नसती लफडी.
पटत नसेल तर सरळ घटस्फोट घ्यावा नाहितर ग्पगुमान घरात बसावे :(
नान्स जरा जिमेलवर ये रे ;)
=)) =))
17 Dec 2010 - 3:16 am | आमोद शिंदे
चुचु आणी नाना हा काय नविन चुना!! :)
17 Dec 2010 - 3:20 am | मुक्तसुनीत
आशिं नको नाचु !
17 Dec 2010 - 2:05 am | शुचि
लेखात दाखविलेल्या अप्रामाणिक वृत्तीचे समर्थन करण्याचा हेतू कुठेही नाही. हा केवळ कल्पनाविलास आहे.
जेव्हा एखादं लग्नं टिकलेलं असतं तेव्हा कुठेतरी बारीक, रेशमी धाग्याच्या जीवावर ते तगलेलं असतं मग तो धागा मूल असो वा कधीकाळी नवर्याने केलेलं बायकोचं किंवा व्हाईसे व्हर्सा आजरपण असो.
माझं स्पष्ट मत हे आहे की - लग्नाच्या बाहेर (शारीरीक) संबंध ठेवायचे असतील तर सरळ नवर्याची परवानगी घ्यावी जी की ९९% केसेस मध्ये मिळणार नाही अथवा मग घटस्फोट घेऊन काय ती स्वातंत्र्याची इच्छा पुरवावी.
पण कल्पनेमध्ये आपल्याला हवं तसं वागायचं स्वातंत्र्य असतं आणि वरील मुक्तक हा केवळ कल्पनाविलास च आहे. समाजात किती लोक वरील बाईप्रमाणे वागतात त्याचा मला अजीबात अंदाज नाही ना जाणून घ्यायची इच्छा. पण काल अतिशय उद्विग्न मनोवस्थेमध्ये हे मुक्तक सुचले आणि मी ते लिहून काढले. आय फेल्ट ग्रेट आफ्टर धिस!!!
मी यावर विश्वास ठेवते की गर्तेत कोसळायला प्रयत्न करावे लागत नाहीत पण आपण गर्तेत कोसळू नये, आपले अधःपतन होऊ नये , मिळालेली एखादी गोष्ट टिकावी याकरता मात्र सातत्याने प्रयत्न करावे लागतात मग ते लग्न का असेना. रोपाला नख लावणं सोपं असतं पण त्याला जपणं हे कठीण काम असतं.
हे गाणं या संदर्भात आठवतं -
I beg your pardon,
I never promised you a rose garden.
Along with the sunshine,
There's gotta be a little rain sometimes.
17 Dec 2010 - 8:41 am | रन्गराव
चांगल केलत. काहीही चुकल नाही. तुमचा कल्पनाविलास हे तुमच राज्य! संधि मिळाली की सज्जनपनाचा मुखवटा चढवून मॉरल हायग्राऊन्ड घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अस समजून दुसर्याला शहानपना/मर्यादा शिकवणर्या भोंदू लोकांकडे दुर्लक्ष करा. you needed to vent out and u did it. तुम्हाला बरं वाटल ना, झाल मग. प्रतिक्रिया मनावर घेऊ नकात.
आणि इतका बोल्ड विषय हँडल केलात तोही इतक्या सुंदररित्या त्याचच कौतुक वाटत.
20 Dec 2010 - 9:23 am | Pain
संधि मिळाली की सज्जनपनाचा मुखवटा चढवून मॉरल हायग्राऊन्ड घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अस समजून दुसर्याला शहानपना/मर्यादा शिकवणर्या भोंदू लोकांकडे दुर्लक्ष करा
तुम्ही त्या लोकांना ओळखत नसताना आणि काहीही पुरावे नसताना त्यांनी सज्जनपणाचा मुखवटा चढवलाय आणि भोंदू आहेत असे बिनबुडाचे आरोप कशाला करता ?
लेख कल्पनाविलासावर आहे हे सगळ्यांना माहिती आहेच, लोक प्रत्यक्षात घडणार्या/ घडू शकणार्या गोष्टींबद्दल बोलत आहेत. समजत नसेल तर विचारा आधी.
17 Dec 2010 - 2:18 am | पक्या
नातं मैत्रीचं वाटलं नाही, दोघेही एकमेकांचा वापर करीत आहे असे वाटले.
17 Dec 2010 - 3:02 am | आमोद शिंदे
शुचिंची फ्यांटसी आवडली
18 Dec 2010 - 10:02 am | वेताळ
आता पुढच्या लेखात त्यानी विवाहित पुरुषानी दुसर्या विवाहित स्त्रीयाना कसे पटवावे ह्याबद्दल फॅण्टसी लिहावी अशी विनंती करतो.कारण अश्या लेखाची खुप आवश्यकता आहे.