शिक्षा ठोका
सकाळी शाळेत एक मुलगा उशीरा आला. म्हणून रागे भरत गुरुजींनी विचारले " का रे, का उशीर झाला " पोराने उत्तर दिले
" हराच्या हाराच्या आहाराच्या पुत्राच्या मित्राच्या शत्रुच्या भावाच्या प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली म्हणून उशीर झाला ".
गुरुजींनी काय शिक्षा केली ते सोडा. तुम्ही काय शिक्षा ठोकणार ते सांगा. प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली हे गुरूजींना आवडले नाही हे कळते. पण आपण पोराच्या उत्तराचा नीट अर्थ लावून मगच शिक्षा करा.
[सगळ्यांना विचार करावयास वेळ मिळावा म्हणून वाक्याचा अर्थ दोन दिवसांनी सांगावा ही नम्र विनंती.]
[शाळकरू] शरद
प्रतिक्रिया
14 Dec 2010 - 8:21 am | शुचि
मस्त
मला हे २ दिवस वगैरे धीर धरवणार नाही.
साय खाऊन घसा बसला आहे का?
14 Dec 2010 - 8:25 am | रेवती
साय खाऊन घसा बसला आहे का?
हे सांकेतिक भाषेतील उत्तर आहे असे समजते आहे.;)
14 Dec 2010 - 8:28 am | शुचि
होय होय उत्तरच आहे ते
साय = प्रेयसी
सायीची मीठी = घसा बसणे
14 Dec 2010 - 8:17 am | शिल्पा ब
काहीच समजलं नाही. :(
14 Dec 2010 - 8:20 am | रेवती
विचार चाल्लाय.
14 Dec 2010 - 9:33 am | नरेशकुमार
शरद राव चान आहे.
मस्त कामाला लावलय ..........
चालु द्या,
14 Dec 2010 - 10:29 am | निवेदिता-ताई
तोच विचार चालु आहे..काय असावे बरे उत्तर...
14 Dec 2010 - 10:48 am | dipti
हर- महादेव , हराचा हार- नाग .... (माझा तर्क)..
14 Dec 2010 - 10:57 am | विजुभाऊ
" हराच्या हाराच्या आहाराच्या पुत्राच्या मित्राच्या शत्रुच्या भावाच्या प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली म्हणून उशीर झाला ".
हराचा हार = नाग
नागाचा आहार = उंदीर
उंदराच्या पिल्लाचा मित्र = ?
त्याचा शत्रु = माम्जर
माम्जराचा भाऊ = वाघ
वाघाची प्रेयसी = वाघीण
घरात वाघ आला होता का? ;)
14 Dec 2010 - 11:17 am | योगी९००
"हराच्या हाराच्या आहाराच्या पुत्राच्या मित्राच्या शत्रुच्या भावाच्या प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली म्हणून उशीर झाला ".
हराचा हार = नाग
नागाचा आहार = दुध
दुधाचा पुत्र = साय किंवा दही किंवा विरजण .?
त्याचा मित्र = लोणी
त्याचा शत्रु = तुप?
पुढे..?
14 Dec 2010 - 1:02 pm | योगी९००
हर ----- शंकर
त्याचा हार ---नाग
त्याचा आहार --- वायु[ हा एक संकेत आहे,नाग वायुवर जगतो अशी समजुत]
त्याचा पुत्र ---- हनुमान
त्याचा मित्र ---राम
त्याचा शत्रु ----रावण
त्याचा भाऊ --- कुंभकर्ण
त्याची प्रेयसी --- निद्रा
शरद यांच्या उपक्रमावरील लिंक मधून इथे डकवले आहे. पण यातील खालील गोष्टी न पटण्यासारख्या.. (वरच्या लिंक मधील प्रतिक्रियेत सुद्धा असेच विचारले आहे)
नाग वायूवर जगतो.
हनुमान हा रामाचा मित्र.. (तो तर रामाचा दास होता.)
14 Dec 2010 - 3:31 pm | शरद
आता श्री. खादाडभाऊ यांनी उत्तर फोडलेच आहे तर स्पष्टिकरण. नाग वायूवर राहतो हा एक संकेत. सर्प जातीतले प्राणी एकदा अन्न खाल्ल्यावर महिनोमहिने देखील काही न खाता राहू शकतात. त्यावरून प्राचिन काळी लोकांची समजूत झाली की साप वायू भक्षण करून जगतो.फार चूकीचे नाही. आता आपण हल्ली हनुमानाला रामभक्त मानतो. पण रामायणात त्याला रामाचा सखा म्हटले आहे.एक उदाहरण :हनुमान रामाला म्हणतो " स्नेहो मे परमो राजंस्त्वयि तिष्टतु नित्यदा " उत्तरकांड ४०.१६-१७ संत विठ्ठलाचे भक्त हे खरेच पण ते सर्व विठ्ठलाला आपला सखाच म्हणतात. तेव्हा वायूपुत्राचा सखा राम हे योग्यच. असो. निद्रा गळ्याला मिठी मारणार असेलच तर झोपाळू पोराला शाबासकीची थाप द्यावी हेच योग्य.
मी दोन वर्षांपूर्वी मिपा व उपक्रमचा सभासद झालो. पण माझे सर्व लेखन उपक्रमावरच झाले. मला असे वाटते की येथील फार फार तर १० % सभासद उपक्रम वाचतात. म्हणून पूर्वपरवानगी घेऊन मी तेथील काही लिखाण थोड्याफार फरकाने येथेही देतो. येथील बहुतांश वाचकांना ते नवीनच असते. ज्या सभासदांनी आधी वाचले असेल त्यांनी कृपया दुर्लक्ष करावे.
शरद
14 Dec 2010 - 3:44 pm | गणेशा
प्रश्नपत्रिका फुटली म्हणुन तुम्ही नविन प्रश्नपत्रिका द्यावी आता
14 Dec 2010 - 4:01 pm | योगी९००
प्रश्नपत्रिका फुटली म्हणुन तुम्ही नविन प्रश्नपत्रिका द्यावी आता
असेच म्हणतो..
शरद : तुमचे स्पष्टीकरण आवडले..
नविन प्रश्नाच्या प्रतिक्षेत..
24 Dec 2010 - 2:59 pm | llपुण्याचे पेशवेll
अरे वा मस्तं स्पष्टीकरण आहे. मी पण विचार करत होतो पण दिशा जरा चुकली. हराच्या हारातच आमची विकेट गेली. म्हणजे
हराचा हार - कवट्यांची माळ
त्याचा आहार - ?? इथेच आमची दांडी गुल.
28 Dec 2010 - 7:21 am | Pain
निद्रा गळ्याला मिठी मारणार असेलच तर झोपाळू पोराला शाबासकीची थाप द्यावी हेच योग्य.
म्हणजे काय?
14 Dec 2010 - 3:45 pm | मेघवेडा
वा! फ़ारच छान!
14 Dec 2010 - 3:46 pm | यशोधरा
मस्त! :)
14 Dec 2010 - 3:56 pm | बद्दु
ते काही नाही ...........आम्हाला नवीन प्रश्न पाहीजे... तुम्ही न फुटणारी (!) प्रश्नपत्रिका बनवुन वाटा...
14 Dec 2010 - 4:00 pm | गणपा
मस्त डोकेबाज कोड होतं. अजुन असतील तर द्या शरद राव.
आणि उत्तर देणार्यांनी उत्तर अशी धाग्यावर न देता. शरद रावाना व्यनी करावीत.(जर त्यांची परवानगी असेल तरच)
14 Dec 2010 - 4:30 pm | योगी९००
आणि उत्तर देणार्यांनी उत्तर अशी धाग्यावर न देता. शरद रावाना व्यनी करावीत
किंवा उत्तर छत्र प्रतिसाद म्हणून देण्याची सोय असावी.. मनोगत सारखे..
14 Dec 2010 - 7:51 pm | पिंगू
अहो उपक्रमावरील तुमची कोडी वाचून वेडा झालो होतो.. आता मिसळीवर कोडे टाका.. म्हणजे मज्जा येईल.
- मठ्ठ पिंगू
14 Dec 2010 - 8:25 pm | नगरीनिरंजन
गमतीदार! येऊ द्या अजून.
14 Dec 2010 - 8:35 pm | रेवती
अच्छा! उत्तर समजले.
आता पुढचे कोडे द्या.
15 Dec 2010 - 6:34 am | अर्धवटराव
नागाच्या "वायुभक्षणा"ची मला काहिच माहिती नव्हती. त्यामुळे हे कोडे मला सुटले नसते.
पुढील प्रश्न येउ देत...
(परिक्षार्थी) अर्धवटराव
24 Dec 2010 - 12:05 pm | चिगो
मी आपला बेडूक, उंदीर वगैरे विचार करत बसलो...
मस्त कोडे.. आणखी येऊ द्यात...
24 Dec 2010 - 1:46 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त! अजून लिहा.
12 Apr 2017 - 11:59 am | चित्रगुप्त
'मेघनादरिपुतात' मुळे इथे पहुचलो. हा उपक्रम इथेही चालवावा ही विनंती.
12 Apr 2017 - 10:35 pm | रुपी
हे कोडे त्याहीपेक्षा अवघड आहे. मला सुटले नसते :)