अमेरीकी उन्मत्तपणा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
9 Dec 2010 - 10:43 am
गाभा: 

भारतीय महीला राजदूत मीरा शंकर याना जॅकसन विमानतळावर
http://www.rediff.com/news/report/indian-envoy-meera-shankar-patted-down...
ही अशी वागणूक देण्यात आली. गोर्‍या लोकांना भारतीय लोकांबद्दल हा असा आकस का असतो? त्यातून राजदूतसुद्धा सुटत नाहीत.
त्या ऑफिसरने जणू साडी नेसलेली महिला कधी पाहिलीच नव्हती का?
मात्र अमेरीकन अधिकारी हा मस्तवालपणा अरबांसोबत दाखवत नाहीत.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

9 Dec 2010 - 11:20 am | चिरोटा

करावे तसे भरावे.ईकॉनॉमी क्लासमधून जाणार्‍या वर्गाला 'cattle class' म्हणणार्‍यांना कोणीतरी धडा शिकवते हे वाचून बरे वाटले.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Dec 2010 - 12:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

चिरोटा साहेब, त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान हे तुमच्या लक्षात नाही का आले अजून? राजदूताला अशी वागणूक मिळते तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचे पंचारतीने स्वागत होणार आहे काय ?? ही वागणूक त्या एका व्यक्तीला नसून सर्व तपकिरी कातडीवाल्यांना आहे.

बाहेरच्यांकडे आपण १०५ हे तत्व असावे. एक काम करा, महाभारत पुन्हा वाचा, ते नाही पटले तर भारताचा इतहास वाचा. अंभीने काय केले, पृथ्वीराज कसा हरला हे जाणून घ्या. ते ही पचत नसेल तर पंचतंत्र चालेल. बघा, म्हणजे तसा आग्रह नाही, जमले तर करा.

मृत्युन्जय's picture

9 Dec 2010 - 1:05 pm | मृत्युन्जय

राजदूताला विमानतळावर सिक्युरिटी चेक मधुन सूट असते काय? माझ्या मते त्यांच्याकडची कागदपत्रे चेक करता येत नाहीत. पण गरज पडल्यास सिक्युरिटी चेक चा आग्रह धरता येतो. कुठल्याही व्यक्तिला पॅट सर्च असेल तर इन रूम सर्च घेण्याची विनंती करता येते. मीरा शंकर यांची ही विनंती धुडकावून लावण्यात आली. हे अयोग्य आहे. त्याचा निषेध करता येइल. पण विमानतळावरील तपासणी मधुन केवळ राष्ट्राध्यक्षांना सूट आहे असे समजतो. तज्ञांनी खुलासा करावा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Dec 2010 - 1:11 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मटा मधील बातमी मधला एक परिच्छेद
जॅक्सन-एव्हर्स इंटरनॅशनल एअरपोर्टवरून मीरा शंकर बाल्टीमोरला रवाना होणार होत्या. त्यादृष्टीने त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि सिक्युरिटी लाइनमध्ये उभ्या राहिल्या. पण काही सुरक्षारक्षकांनी अचानक त्यांना या रांगेतून बाहेर काढलं आणि व्हीआयपी रुममध्ये नेऊन त्यांची झडती घेतली. जॅक्सन एअरपोर्टवर अद्याप फुल-बॉडी स्क्रिनर्स बसवलेले नाहीत. अशावेळी साडी नेसलेल्या मीरा शंकर यांची तपासणी करण्यासाठी सुरक्षारक्षकांनी हा मार्ग अवलंबला.

पूर्ण बातमी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7069900.cms

मृत्युन्जय's picture

9 Dec 2010 - 1:16 pm | मृत्युन्जय

मग नक्की कशाचा निषेध करणार? जो एक निषेध करायचा मुद्दा असु शकेल असे मला वाटत होते. तो पण नाही आहे इथे. ती बाई (अमेरिकन विमानतळावरची) कायद्यानुसार वागली. काय चुकले नक्की तिचे? तुम्हीही त्यांना अशीच वागणूक द्या.

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 1:16 pm | शिल्पा ब

तुम्हाला अजूनही समजलेले नाही...विचारणा झाल्यावर त्यांनी आपण राजदूत असल्याचे सांगून तशी कागदपत्रे दाखवली तरीही त्यांची झडती घेण्यात आली...याचा काय अर्थ होतो? आणि पूर्ण कपडे घातलेल्या त्याच एकट्या होत्या का? कदाचित असतीलही म्हणा..

चिंतामणी's picture

12 Dec 2010 - 1:02 am | चिंतामणी

राजदूताला विमानतळावर सिक्युरिटी चेक मधुन सूट असते काय?

येथे एक धागा आहे या बद्दल. (विषय जरी रॉबर्ट वडरा/वडार यांना त्यात सवलत असे असेल तरी) त्यात एक फटु आहे तो बघीतल्यावर सगळ्या शंका दूर होतील अशी (भाबडी) आशा आहे. :)

अवलिया's picture

9 Dec 2010 - 11:38 am | अवलिया

विजुभाउ काय उपयोग या धाग्याचा?

विजुभाऊ's picture

9 Dec 2010 - 11:53 am | विजुभाऊ

काय उपयोग या धाग्याचा?

हो तेही खरेच आहे.
असे धागे काढणे हे सुद्धा त्या खसखशीच्या दाण्यावरच्या चित्रा सारखे एक अनावश्यवक कौशल्य.
असो
भारताने आत्मसम्नान कधीच गहाण टाकलाय.
अवांतर : गांधीना ब्रीटीश रेल्वे अधिकार्‍याने रेल्वेतून पहिल्यावर्गातून खालीउतरवले., त्यांचे सामान फेकून दिले .गांधीनी ब्रीटीश सरकारला भारतातून बाहेर फेकून देण्याचे मनसूबे रचले

>>>भारताने आत्मसम्नान कधीच गहाण टाकलाय.
एक राजदुत किंवा एक भारतीय व्यक्ति म्हणजे संपूर्ण भारत नाही.
तुम्ही एक पत्र लिहाच ओबामाला " काय रे तुझे डोके ठिकाणावर आहे काय?"
मजकुर पूर्वेकडुन घ्या !

>>अवांतर : गांधीना ब्रीटीश रेल्वे अधिकार्‍याने रेल्वेतून पहिल्यावर्गातून खालीउतरवले., त्यांचे सामान फेकून दिले .गांधीनी ब्रीटीश सरकारला भारतातून बाहेर फेकून देण्याचे मनसूबे रचले

तुर्तास असो.

विजुभाऊ's picture

9 Dec 2010 - 12:22 pm | विजुभाऊ

एक राजदुत किंवा एक भारतीय व्यक्ति म्हणजे संपूर्ण भारत नाही.

असहमत. राजदूत हा त्या त्या देशाचे प्रतिनिधीत्व करतो. कोणत्याही देशाचा राजदूत हा त्या देशाच्या राजाचे / सरकारचे इतर देशात प्रातिनीधी असतो. राजदूताचा अपमान हा पर्यायाने देशाचा अपमान असतो.
सामान्य भारतीय नागरीक आणि दूतावासातील राजदूत यात फरक असतो. राजदुताला राजकीय संरक्षण असते. त्याना काही खास राजकीय अधिकार असतात.
भारताकडून असे काही झाले असते तर अमेरीकेने त्वरीत निषेध केला असता. प्रेस्टीज इश्यू केला असता. भारताने त्या व्यक्तीवर कारवाई केली असती.
भारत सरकारने कारगील युद्धाच्या वेळेस पाकिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्याची धमकी दिली होती.
दूतावास बंद करणे म्हणजे त्या देशाशी व्यापरीक राजकीय संबन्ध न ठेवणे.

गोंधळ होत आहे तुमचा विजुभाउ ! तुम्ही म्हणालात आत्मसन्मान गहाण टाकला आहे. माझा त्यावर आक्षेप आहे. भारत सरकार योग्य त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित करत आहे.

हा एकप्रकारे भारताचा आणि भारतीय परंपरेचाही अपमान असल्यानं मीरा शंकर यांनीही झाल्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. आपण इथे पुन्हा कधीही येणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय.

दरम्यान, गव्हर्नर ऑफिस या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं प्रवक्ते डॅन डर्नर यांनी सांगितलं आहे. मिसिसिप्पी स्टेट युनिव्हर्सिटीनं मीरा शंकर यांची माफी मागितली आहे.

हे मटाने दिलेले वृत्त आहे. तुमची अपेक्षा तिथेच मोठा तमाशा करावा अशी होती का? खरेच तसे करायला हवे होते पण असे मत मांडले की विचारवंत भडकतात त्याचे काय? राजकारण आणि धर्म सुक्ष्म असते. लगेचच भारताने आत्मसन्मान गहाण टाकलाय असे निष्कर्ष काढणे चुकीचे वाटते.

चिंतामणी's picture

12 Dec 2010 - 1:03 am | चिंतामणी

त्याच बरोबर विजुभाउंना स्वत:चे मत मांडा असेसुध्दा सांगा.

खुप छान लिहिलंय ! मज्जा आली वाचताना :) पुर्वीचे दिवस आठवले आणि रविवारचा मेणु पक्का झाला.
धन्यवाद हो विजुभाउ

फोटो बद्दल काहीच नाही..... का दिसत नाही तुझ्या हापिसातुन?

टारझन's picture

9 Dec 2010 - 11:57 am | टारझन

खालचे सगळे फोटो आवडले :) बाकी विजुभाऊ अगदी मनातले लिहीतात. त्यांची (एप्रिल) "फळांची आर्जवे" मी पुन्हापुन्हा वाचलेली आहेत !

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 12:04 pm | शिल्पा ब

एक गोष्ट लक्षात घ्या...अमेरिकेत लेखी स्वरुपात किंवा अगदी तोंडी जरी तक्रार केली तरी त्याची त्वरित दखल घेतली जाते...म्हणून सामान्य भारतीयांकडून याविषयी विरोध दाखवण्यासाठी इथे मेल लिहू शकता

JMAA.info@jmaa.com

http://www.whitehouse.gov/contact?utm_source=contact&utm_medium=intro&ut...

मी आताच संतापून लिहिलंय...

This letter is in regards to the news below

http://www.rediff.com/news/report/indian-envoy-meera-shankar-patted-down...

As an Indian I would like to ask you few questions.

1) Even when the ambassador stated her status by showing the papers why she was patted down?

2) Would you do this to the Arab ambassadors? Or even Pakistani ambassadors considering they *** up in your country's *** and making you live under camera in your own home.

3) Have you people NEVER EVER seen anybody in sari or you are just ignorant ***?

4) Indians and making money for your country and are an asset, peace loving people.

This type of behavior from your side is just like the people who are scaring the hell out of you. (If you don't understand this sentence get some indian to explain it to you.)

This incident is extremely insulting to all the Indians worldwide. We strongly object.

Also train your employees to understand the concept of political leaders or diplomat and their status.

- Shilpa

Proud Indian.

गांधीवादी's picture

9 Dec 2010 - 12:19 pm | गांधीवादी

'निषेध नोंदविणे खरेच गरजेचे आहे' असे वाटते.
आम्हीहि पत्र धाडतोच आहोत. आणि मित्रांनाही कळविले आहे. पडू दे जरा पाऊस पत्रांचा.

विजुभाऊ's picture

9 Dec 2010 - 12:24 pm | विजुभाऊ

धन्यवाद शिल्पा.
अवांतरः बघ नान्या ;इथे लिहिल्याचा काहीतरी उपयोग झाला ना !

शैलेन्द्र's picture

9 Dec 2010 - 1:50 pm | शैलेन्द्र

बापरे, जहाल आहे हे... मराठी संस्थळावर टाकल असत तर लगेच संपादीत झाल असतं....

अप्पा जोगळेकर's picture

9 Dec 2010 - 8:28 pm | अप्पा जोगळेकर

As an Indian I would like to ask you few questions.
Indians and making money for your country and are an asset, peace loving people.
पत्रामागची कळकळ स्तुत्य आहे. पण वरील वाक्ये पुन्हा एकदा भारतीयत्व या कन्सेप्टच्या संदर्भात तपासून पाहिली पाहिजेत.

This incident is extremely insulting to all the Indians worldwide.
येथे people from Indian origin अधिक योग्य झाले असते.

शशिकांत ओक's picture

26 Feb 2011 - 12:03 pm | शशिकांत ओक

शिल्पाजी,
आपण वरील निषेधपत्र पाठवल्यानंतर काय उत्तर आले. याची उत्सुकता वाटून विचारणा करत आहे.

शिल्पा ब's picture

27 Feb 2011 - 12:56 am | शिल्पा ब

अजुनतरी काहीच नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 12:18 pm | परिकथेतील राजकुमार

कोण मीरा शंकर ?

विजुभौ तुम्ही आजकाल विश्वाची फारच चिंता करु लागला आहात. हे वय झाल्याचे लक्षण आहे, का त्या विहिरीतल्या पिशाच्चाने तुम्हाला झपाटले आहे ?

असो..

ह्याचा निषेध म्हणुन आज आम्ही अमेरिकन झेंड्याची चड्डी घालुन दारवा पियाला जाउ.

जयहिंद !

अवलिया's picture

9 Dec 2010 - 12:32 pm | अवलिया

आजच एका नविन अमेरिकन झेंड्याच्या चड्डीची तुझ्यासाठी पाठ्वली आहे
आता ह्यापुढे असे काही घडले की चड्डी अडकवायची आणि संतापाने दारु पियाला जायचे.
चार पेग झाले की तिथुनच एक खरमरित मेल ओबाम्याला धाडून द्यायची.
काय बोल्तो

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 12:36 pm | शिल्पा ब

तुमची चड्डी त्याला दिसणार नाही पण खरमरीत पत्र दिसेल...

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार

खरमरित मेल ओबाम्याला धाडून द्यायची.

अगदी अगदी. आणि इमेल मध्ये 'फ* , अ‍ॅ*' सारखे मनाला गुदगुल्या करणारे (लिहिणार्‍याच्या) आणि शेंडीला झिणझिण्या आणणारे (वाचणार्‍याच्या) शब्द देखील वापरु. मग आपण अभिमानाने त्या पत्राची एक कॉपी इथे मिपावर देखील डकवु. मग लवकरच लोक आपल्याला देशभक्त आणि अन्याय विरोधी लढ्याचे प्रमुख समजु लागतील. कदाचित विचारवंत देखील म्हणतील.

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 12:50 pm | शिल्पा ब

चालेल...जमतंय का बघा...स्वतःलाच नाही सुचलं तरी कोणाचीतरी कॉपी करून का होईना भारताचे लोक जागे आहेत हे समजेल...

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 12:57 pm | पर्नल नेने मराठे

ह्याचा निषेध म्हणुन आज आम्ही अमेरिकन झेंड्याची चड्डी घालुन दारवा पियाला जाउ.

परा अगदी दोळ्यासमोर आला =))

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 12:59 pm | शिल्पा ब

बास की राव!!

पूर्वी लोक पट्ट्या पट्ट्याचा लेंगा घालून दूध आणायचे

काही प्रश्न
१) हल्ली पट्ट्या पट्ट्याचा लेंगा घालुन काय आणतात?
२) दुध आणण्यासाठी कोणते कपडे घालतात?

देशभक्त , सर्वसामान्य नागरीक , आणि राजकीय नेते यांच्यात एक फरक आहे
सर्वसामान्य नागरीक विचार करतो
देशभक्त कृती करतो
राजकीय नेता त्या कृतीला स्वतः दिलेली चालना असे भासवतो
असामान्य नागरीक ती कृती होऊच शकत नाही असे सांगत असतो
अवांतर : वरील सूत्रानुसार श्री श्री परा , शुची तै विजुभाऊ आणि नाना कुठल्या कॅटेगरीत मोडतात?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Dec 2010 - 1:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे

यावर उत्तम उपाय म्हणजे आपणही असेच करणे. पुढील वेळी अमेरिकेचा राजदूत येणार असेल तेव्हा पाळत ठेवून त्याची अशीच झडती घेणे. त्याला एक नाही तर चार तास बसवून ठेवावे. अमेरिकेसारखा उन्मत्तपणा आपण दाखवायला काय हरकत आहे?

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 1:10 pm | शिल्पा ब

हॅ हॅ हॅ भलतेच गमतीशीर हो तुम्ही मेहेंदळे गुरुजी..

मृत्युन्जय's picture

9 Dec 2010 - 1:18 pm | मृत्युन्जय

काय चुकीचे आहे. बरोबर बोललेत ते. इंदिरा गांधींनी हेर्नी किसिंजर ची खोड अशीच मोडली होती एकदा असा किस्सा ऐकुन आहे. त्या बाइने जे करुन दाखवले ते आपणही करावे.

बेसनलाडू's picture

9 Dec 2010 - 1:21 pm | बेसनलाडू

म्हणूनच निक्सन (की किसिन्जर) साहेब इंदिराजींना चेटकीण म्हणाले असावेत काय? ;-)
(मांत्रिक)बेसनलाडू

मृत्युन्जय's picture

9 Dec 2010 - 1:28 pm | मृत्युन्जय

हेन्रीच तो. निक्सन बरोबर बोलताना असे बोलला होता. किती फ्रस्ट्रेट झाला असेल नाही तेव्हा तो? बाई ग्रेट होती हे नक्की.

मी कुठे म्हंटल चुकीचं बोलले म्हणून...त्यांनी गमतीशीर विधान केलं असं माझं म्हणणं आहे..
बाकी इंदिरा गांधीनी जशास तसे उत्तर दिले होते पण आता नवीन इंदिरा गांधी कुठून आणणार तुम्ही? कारगिल झालं, वाट्टेल तेव्हढे हल्ले झाले...याच पार्श्वभूमीवर (हा शब्द म्हणायचीसुद्धा चोरी आजकाल) आताच्या नेत्यांनी काय केलं हे सांगुन ज्ञानवर्धन कराल अशी आशा आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 1:18 pm | परिकथेतील राजकुमार

यावर उत्तम उपाय म्हणजे आपणही असेच करणे. पुढील वेळी अमेरिकेचा राजदूत येणार असेल तेव्हा पाळत ठेवून त्याची अशीच झडती घेणे. त्याला एक नाही तर चार तास बसवून ठेवावे. अमेरिकेसारखा उन्मत्तपणा आपण दाखवायला काय हरकत आहे?

मुळात मी राजदूत आहे तेंव्हा मला असामान्य वागणुक मिळालीच पाहिजे असा तोरा तो करेल असे वाटत नाही. त्यातुनही झडतीची सक्ती झाल्यास तो नक्की सहकार्य करेल असेच वाटते.

कदाचीत मी चुकत असीन पण आपण एखाद्या मोठ्या पदावर आहोत ह्याचा नको तेवढा अभिमान, तोरा काही भारतीय अधिकारी व नेते मिरवतात तसा बाहेर कोणी मिरवत नसेल. मध्ये जपान मध्ये प्रदुषणमुक्ती अभियानाचा विशिष्ठ दिवस म्हणुन सर्व सरकारी अधिकार्‍यांनी वाहनांचा वापर टाळला होता त्या दिवशी जपानचे अध्यक्ष सायकलवरुन आपल्या कार्यालयात जात असतानाचा त्यांचा फोटु प्रसिद्ध झाला होता आणि त्याच्याच खाली आचारसंहिता चालु झाल्याने गाडी काढुन घेतली म्हणुन मुलाच्या गाडीवरुन कार्यालयात येत असतानाचा महापौरांचा फोटो प्रसिद्ध झाला होता. ह्या फोटोत प्रसिद्धी देण्यासारखे काय होते हे मला आजवर उमगलेले नाही. मुळात महापौर शहराच्या भल्यासाठी काय करतात हेच मला उमगलेले नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Dec 2010 - 2:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे

परासाहेब, तुम्ही बातमी नीट वाचली का? बाईंनी सुरुवातीला वेगळी वागणूक मागितली असे त्यात कुठे लिहिले आहे? मी वर दिलेला परिच्छेद पुन्हा वाचा. त्यात स्पष्ट लिहिले आहे की "त्यादृष्टीने त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि सिक्युरिटी लाइनमध्ये उभ्या राहिल्या". परत वाचा "त्या सिक्युरिटी लाइनमध्ये उभ्या राहिल्या". यात त्यांनी असामान्य वागणूक मागितली का?

यानंतर त्यांना त्यांचा पेहराव बघून बाजूला काढण्यात आले (आणि reading between the lines, वंश बघून). त्यानंतर त्यांनी राजदूत असण्याचा उल्लेख केला तर काय चुकले? राजकीय शिष्टाचार धरून या बाबतीत त्यांना सामान्य नागरीकापेक्षा वेगळी वागणूक नको मिळायला?

मुळात अशी झडती का घेतली जाते माहित आहे का? एकतर Possible security threat म्हणून किंवा smuggling च्या शंकेने. भारतासारख्या देशाचे राजदूत असे करतील का? मूळ बातमीत एक वाक्य आहे. " एका देशाच्या राजदूताला अशी वागणूक मिळणं निश्चितच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गव्हर्नर ऑफिस या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं प्रवक्ते डॅन डर्नर यांनी सांगितलं आहे". हे सगळे शिष्टाचारात बसत असेल तर अमेरिकेने चौकशी पण नसती केली.

जाता जाता, अमेरिका म्हणजे स्वर्ग आहे, तेथील सर्व लोक नेहमी नियमाप्रमाणे वागतात, सर्वांना समान वागणूक देतात असे कुणाला वाटत असेल तर एवढेच म्हणेन की "झोपेतून जागे व्हा"

जाता जाता, अमेरिका म्हणजे स्वर्ग आहे, तेथील सर्व लोक नेहमी नियमाप्रमाणे वागतात, सर्वांना समान वागणूक देतात असे कुणाला वाटत असेल तर एवढेच म्हणेन की "झोपेतून जागे व्हा"

गेलात तुम्ही विचारवंतांच्या "गुड बुकात" ;)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार

मेहेंदळे साहेब आपण माझी प्रतिक्रीया निट वाचलीत का ? मी स्पष्टपणे "कदाचीत मी चुकत असीन पण आपण एखाद्या मोठ्या पदावर आहोत ह्याचा नको तेवढा अभिमान, तोरा काही भारतीय अधिकारी व नेते मिरवतात तसा बाहेर कोणी मिरवत नसेल"" असे म्हणले आहे. मी बाईंनी असे केलेच असेल असे कुठे म्हणलेले नाही हो.

मुळात अशी झडती का घेतली जाते माहित आहे का? एकतर Possible security threat म्हणून किंवा smuggling च्या शंकेने. भारतासारख्या देशाचे राजदूत असे करतील का?

ह.घा. पण बहुदा त्या सिक्युरीटी वाल्यांनी नुकताच एखादा हिंदी शिणीमा पाहिला असावा ;)

जाता जाता, अमेरिका म्हणजे स्वर्ग आहे, तेथील सर्व लोक नेहमी नियमाप्रमाणे वागतात, सर्वांना समान वागणूक देतात असे कुणाला वाटत असेल तर एवढेच म्हणेन की "झोपेतून जागे व्हा"

ह्या एकाच वाक्याने आपण मिपावरील एका विशिष्ठ गटाचे हिरो झाला आहात तर एका विशिष्ठ गटाने आपल्यावर पाळत ठेवायला सुरुवात देखील केली असेल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Dec 2010 - 4:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>बहुदा त्या सिक्युरीटी वाल्यांनी नुकताच एखादा हिंदी शिणीमा पाहिला असावा
ही ही ही !!!

>>ह्या एकाच वाक्याने आपण मिपावरील एका विशिष्ठ गटाचे हिरो झाला आहात तर एका विशिष्ठ गटाने आपल्यावर पाळत ठेवायला सुरुवात देखील केली असेल
अरे वा !! मला इतके महत्त्व मिळेल असे वाटले नव्हते. छान छान !!!

जातात कशाला मरायला अमेरीकेत कुणास ठावुक.

नायतं काय!!! आपापल्या हापिसात बसून राहावं गपगर तं चालले राजदूतगिरी करायला..

अविनाशकुलकर्णी's picture

9 Dec 2010 - 3:43 pm | अविनाशकुलकर्णी

प.रा हि कशी वाटते ते बघा

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 3:53 pm | परिकथेतील राजकुमार

अशी पाहिजे. एक अजुन आहे पण ती इकडे देता येत नाही ;)

वॉव .. ये तो बडा टाँईंग है मॅन !!
जी इकडे देता येत नाही ती व्यनि करा :)

समांतर : निसत्या दोर्‍या चालतील का ? खि खि खि

विजुभाऊ's picture

9 Dec 2010 - 4:03 pm | विजुभाऊ

ए परा तू वरचीच चड्डी कापून इथे चिटकवली आहेस

मग काय खालची कापुन चिटकवेल ? कैच्याकैच विजुभौ शॉच !!

च्यायला हे लोक वरतीपण चड्डी घालतात!! तरीच यांचं स्वागत अमर्रिकेत असं होतं.

मृत्युन्जय's picture

9 Dec 2010 - 4:24 pm | मृत्युन्जय

वरतुन चड्डी घालणार्‍यांचं अमेरिकेला कौतुक असतंच नेहेमी. सुप्परमॅन आठवा बरे.

विजुभाऊ's picture

9 Dec 2010 - 3:50 pm | विजुभाऊ

त्या चांदण्या निळ्यावर दिस्तात्....काळ्यावर नाही

रोमना's picture

9 Dec 2010 - 5:13 pm | रोमना

हि गांधीवादाची सुरुवात तर नव्हे?

विजुभाऊ's picture

9 Dec 2010 - 5:22 pm | विजुभाऊ

रोमना तुम्ही म्हणतातशा अर्थाने गांधीवादाची ही सुरुवात असेल आणि त्यामुळे अमेरीकन माजुर्डेपणाला धडा मिळणार असेल तर फारच बरे होईल.
वाजपेयीनी अणूचाचणी केली त्यामुळे अमेरीकेने भारतावर म्हणे बरीच बंधने आणली होती. त्याची कोणतीच झळ इथल्या सर्वसामान्याना पोहोचली नाही. त्या बंदीमुळे भारताचे काहीच नुकसान झाले नाही.
उत्तर कोरीयाचे अमेरीका काहीच वाकडे करू शकलेला नाहीय्ये.
चिन तर अमेरीकेला कोणत्याच बाबतीत जुमानत नाहिय्ये.
अमेरीका आपले काहिही वाकडे करू शकत नाही आणि अमेरीकाच भारतावर अवलंबून आहे हे अमेरीकेला जाणवून दिले तरी सुद्धा तो गांधीवाद यशस्वी होईळ

रोमना's picture

9 Dec 2010 - 5:53 pm | रोमना

सध्या जास्तीत जास्त तेल विहीरी व तेल लंपास करणे चालूच आहे.
अरबी लोकांसारख त्यांनाही थोडक्यात श्रीमंत व्हायचय नुसत पैशानी नव्हे तर सत्ता गाजवण्यासाठीहि.
भारतातला वनस्पतीपासून इंधन बनविणारा गायबच झाला ?

भारतातला वनस्पतीपासून इंधन बनविणारा गायबच झाला ?

तो रमर पिल्लै !
त्याने लोकाना मस्त चुना लावला होता.
अर्थात धान्यापासून पेट्रोल बनवल्यामुळे धान्याच्या किमती किती वाढतील याची कल्पना आहे का?
सरकार त्यासाठी प्रोत्साहन देत नाही

गांधीवादी's picture

10 Dec 2010 - 3:47 am | गांधीवादी

>>त्याने लोकाना मस्त चुना लावला होता.
त्याने जे केले तेच जर का पश्चिमेला कोणी केले असते तर त्या लोकांनीच त्याला जड इंग्लिश नावे देऊन त्याची पेटंट वगेरे घेऊन त्याचा उदोउदो केला असता, ह्याची खात्री आहे.
बर, ह्या महानुभावाने जे काय केले, त्याला मी 'चुना लावणे' असे न म्हणता केवळ 'चुन्याचा ठिपका लावला' असे म्हणेन. आणि त्यासाठी मात्र चक्क CBI ला पाचारण केले गेले.
आणि तेच आजकालचे घोटाळे पाहता त्यात 'चुन्याची खोरे' लावली जातात तेव्हा CBI कुठे असते ?
>>
धान्यापासून पेट्रोल बनवल्यामुळे धान्याच्या किमती किती वाढतील याची कल्पना आहे का?
सरकार त्यासाठी प्रोत्साहन देत नाही

शोध कर्त्याच्या बोलण्यात १० टक्के तरी तथ्य असते आणि त्यादृष्टीने शोध घेऊन जर का खरेच धान्यापासून पेट्रोल बनविणे शक्य झाले तर,
१) आपल्याला पेट्रोल आयात करण्याची गरज उरणार नाही
२) शेतकर्याला अधिकाधिक प्रोत्साहन मिलेले.
३) एकूण भांडवल भारतातच राहील
बाकी, धान्यापासून दारू बनविताना मात्र शेतकऱ्याच्या भल्याचे गणिताचे डोंगर उभे केले जातात, तेच गणिताचे डोंगर इथे मात्र फसतात.

मूळ मुद्दा तोच, एखाद्या व्यक्तीच्या ज्ञानाचा उपयोग आपले सरकार करून घेईल असे सहजासहजी वाटत नाही.
http://www.hinduonnet.com/thehindu/2000/03/12/stories/01120007.htm

वेताळ's picture

9 Dec 2010 - 5:41 pm | वेताळ

मला वाटते अश्या त्रासदायक चौकश्या टाळण्या करिताच अमेरिकन नागरिक खुप कमी कपडे वापरतात.

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 6:07 pm | धमाल मुलगा

दुसरं काय?
आणि जिथं आपल्या सरकारला ह्या विषयाचं गांभिर्य कळत नाही / जाऊन सरळ खडसवायचा दम नाही, तिथं आपण बोंबलुन करणार काय?

स्वप्निल..'s picture

9 Dec 2010 - 8:29 pm | स्वप्निल..

अगदी असेच म्हणतो!!

महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा तपासणीतून थोडीफार सूट मिळाली पाहिजे हे मान्य आहे पण मीराबाईंचे प्रकरण पहिलेच नाही. आजवर छप्पनवेळा असे घडून गेले आणि म्हणावा तसा आवाज उठवला गेला नाही. त्यास भारत सरकार काहीच जबाबदार नाही काय? आपले अधिकारी दुसर्‍या देशात पाठवताना आधीची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून काय काय केले गेले?
पॅट डाऊन तपासणीचा इथे सामान्य माणसानेही पुरस्कार केलेला नाही पण सुरक्षेसाठी म्हणून 'ओक्के' म्हटले आहे असे ऐकले आहे. मला या प्रकरणाचा राग आलेला नाही तर विचित्र वाटले. अमेरिकन सुरक्षा व्यवस्थेनी इतके ताणू नये तसेच भारत सरकारने सामान्य जनतेसाठी नाही तर नाही पण अधिकार्‍यांसाठीही काही केले नाही म्हणून खंत वाटली. मीराबाईंचे प्रकरण, शाहरूख खान तसेच प्रफुल्ल पटेल या नावांमुळे पेप्रात बातमी तरी आली. दोनदा हिथ्रो लंडनला असाच अनुभव माझ्यासरख्या सामान्य (कॅटल क्लास) प्रवाशाला आला.......काय करणार? नियमाप्रमाणे तिथल्या बायांनी मला बाजूला केले तपासणी केली. ते करताना कोणताही आक्षेपार्ह प्रकार मला तरी वाटला नाही पण सिंगल आउट केल्याने विचित्र वाटले.
आजकाल दागिने असताना फारशी तपासणी झालेली आठवत नाही पण काही सुरक्षा तपासणीच्यावेळेस कमरेचे पट्टे, शूज् आणि बरोबरचे सगळे सामान तपासायला द्यावे लागते म्हणून किती भारतीय बायका कमीत कमी दगिने वापरणे पसंत करतात? एखादी बांगडी, छोटे मंगळसूत्र एवढ्यावर भागत नाही काय? असले काही केले कि आपण त्या लोकांना जास्त इंटरेस्ट घ्यायला भाग पाडतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Dec 2010 - 8:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एखादी बांगडी, छोटे मंगळसूत्र एवढ्यावर भागत नाही काय? असले काही केले कि आपण त्या लोकांना जास्त इंटरेस्ट घ्यायला भाग पाडतो.

असं असेल तर श्रीमती मीरा शंकर यांनीही जीन्स-टीशर्ट अथवा स्कर्ट-टॉप किंवा फॉर्मल सूट घातला असता तर कदाचित त्यांनाही वेगळं काढलं गेलं नसतं. (मी स्वतः घड्याळ, चष्मा वगळता एकही दागिना घालत नसले तरीही) हे पटलं नाही. बांगड्या असोत वा ब्रेसलेट्स आणि मंगळसूत्र असो वा चेन-पेंडंट, ही प्रत्येकाची अभिव्यक्ती आहे आणि फक्त वर्ण वेगळा म्हणून भारतीयांनी आपली अभिव्यक्ती सोडावी आणि गोर्‍यांना मात्र यातून सूट हे अमान्य!

काही वेळा गोर्‍या सहप्रवाशांना सोडून मलाही असं वेगळं काढलेलं आहे, अगदी बांगड्या, मंगळसूत्र घातल्या नव्हत्या, साडी नव्हे, जीन्स-टीशर्ट घातले असूनही! मला वेगळं काढलं आणि बरोबरच्यांना जाऊ दिलं याचा मला राग आला नसला तरीही माझ्याबरोबरच्या गोर्‍या मित्र/सहप्रवाशांना नक्कीच आला होता. पण मी, एक सामान्य नागरीक आणि माझ्या देशाची राजदूत यांच्यात फरक आहे आणि तो योग्य आहे तिथे दिसलाच पाहिजे.

डिस्नीलँडच्या राईड्समधे भारतीय (किंवा इतर कोणत्या देशाची) राजदूत आहे म्हणून रांग मोडून जाऊ देण्याची गरज नाही पण विमानतळावरची अशी वागणूक पटली नाही.

वर लिहिल्याप्रमाणे महत्वाच्या व्यक्तिंना वेगळी (कमी कटकटीची) सुरक्षा व्यवस्था हवी पण याबाबतीत सामान्य जनतेने आवाज उठवून फायदा नाही. सरकारने पाऊले उचलायला हवीत. असे प्रसंग अनेकदा येऊनही भारत सरकार गप्प का आहे? आपण दुसर्‍यांचा उन्मत्तपणा दाखवण्याआधी आपले सरकार काय करते या बाबतीत हे पहायला हवे. अमेरिकेचा हा स्वभाव अनेक वर्षे आहे. तो आपण चालवून का घ्यावा हे सरकारला वाटले पाहिजे.सरकार का आवाज उठवत नाही? आपल्या देशाचे सन्माननीय अधिकारी पाठवताना त्यांची व्यवस्था दुसर्‍या देशात कोणत्याप्रकारे होणार आहे हे पाहण्याचे अधिकार सरकारला आहेत. सरकार पहिला निषेध हा भारतातल्या अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये नोंदवू शकते. पुढच्यावेळेस अधिकारी व्यक्तीला आम्ही पाठवणार नसल्याचा पवित्रा घेउ शकते. सरकारचा खंबीरपणा हाही महत्वाचा मुद्दा होऊ शकतो.
फिकट अक्षरातील मजकूर जनता क्लासशी (चांगल्या अर्थी) संबंधित आहे. साड्या नेसणार्‍यांनी साड्या नेसाव्यात पण काही महिला हातभर सोन्याच्या बांगड्या (किंवा म्याचिंग दागिने) घालून प्रवास करतात. तपासणीत त्यांना सगळे दागिने काढायला सांगितले तर ट्रेमध्ये ढिगभर बांगड्या, मग गळ्यातले चार प्रकार, अंगठ्या काढत बसतात आणि लोकांची रांग मात्र वाढत असते. अश्यावेळेस आवश्यक ते किमान दागिने घालून गेलं कि वेळ कमी जातो. नंतर तपासणी अधिकार्‍यांच्या कपाळावरची आठी बघावी लागत नाही. उदा. एका महिलेने एका तबकात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून ती तशीच नेणार म्हणून हटून बसली होती. तपासणी अधिकारी तिला मूर्ती नेऊ द्यायला तयार होते पण त्यांना ती आडवी पाडून एक्स रे स्क्रिनिंग करावयाचे होते त्याला ती तयार नव्हती. लोक इतके अस्वस्थ झाले होते त्यांची वादावादी बघून! अश्यावेळेस वाटते कि आपण उगाच लक्ष वेधून घेत आहोत का? हजारो लोक प्रवास करत असताना थोड्या को ऑपरेशनने गोष्टी सोप्या होत असतात.
कोणत्याही प्रकारच्या डिस्क्रिमिनेशनला अर्थातच माझा विरोध आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Dec 2010 - 1:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत.

हातात हजार बांगड्या घालून जायलाही हरकत नाही पण रांगेच्या बाहेरच उभं राहून बांगड्या, ठुशा, नथी, वाकी इत्यादी दागिने काढून एखाद्या पिशवीत ठेवले तर इतरांचीही गैरसोय होत नाही. भारतात खरंतर एवढी तपासणी होतही नाही तरी मी घड्याळही काढून खांद्यावरच्या झोळीत टाकते, मला आणि इतरांनाही ताटकळत बसावं लागत नाही.

हजारो लोक प्रवास करत असताना थोड्या को ऑपरेशनने गोष्टी सोप्या होत असतात.

अगदी! मला तर असे प्रवासी पाहिले की त्या सिक्युरिटी चेक करणार्‍या लोकांचीच दया येते.

शिल्पा ब's picture

10 Dec 2010 - 2:11 am | शिल्पा ब

+१

हा अ‍ॅक्स इफेक्ट असु शकतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Dec 2010 - 8:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाय द वे, विजुभाऊ, मूळ धाग्यातला भारताच्या महिला राजदूत ... यातला महिला हा शब्दप्रयोग खटकला. राजदूत महिला आहे का पुरूष याचा काय संबंध? भारताच्या राजदूत यावरूनच सदर व्यक्ती स्त्री आहे हे कोणत्याही मराठी भाषिकास समजावे.

मुद्दाम महिलांना 'सिंगल आऊट' करण्याचा प्रकार आणि तो ही वर्णद्वेषाची तक्रार करणार्‍या धाग्यावर फारच हास्यास्पद आहे.

सेरेपी's picture

9 Dec 2010 - 9:39 pm | सेरेपी

पटलं! मलाही हे खटकलं.

टारझन's picture

9 Dec 2010 - 11:39 pm | टारझन

मकरंद अनासपुरे म्हणतो ... "कोणाला कशाचं ... आणि हिजड्याला मिशांचं ... "

-(खुर्चीसम्राट)

सेरेपी's picture

10 Dec 2010 - 12:02 am | सेरेपी

म्हणजे काय हो काका?

चिंतामणी's picture

12 Dec 2010 - 1:12 am | चिंतामणी

=)) =)) =)) =)) =))

अवलिया's picture

10 Dec 2010 - 5:16 pm | अवलिया

प्रतिसाद न उडाल्याबद्दल अभिनंदन !

भारताच्या राजदूत यावरूनच सदर व्यक्ती स्त्री आहे हे कोणत्याही मराठी भाषिकास समजावे.

मुद्दाम महिलांना 'सिंगल आऊट' करण्याचा प्रकार आणि तो ही वर्णद्वेषाची तक्रार करणार्‍या धाग्यावर

ओ बाई साहेब. या धाग्यात म्हंटल्याप्रमाणे मी भारतीय महीला राजदूत या वाक्यातून महीला हा शब्द काढून टाकला तर फारच अनर्थ होईल. कारण " भारतीय राजदूतानी साडी नेसल्यामुळे राजदूताना बाजूला नेऊन सुरक्षा तपासणी करण्यात आली " ही अशी बातमी काय भयंकर खळबळ माजवेल कल्पना कर.
अवांतरः प्रतिभाताई पाटलाना अजूनही राष्ट्रपती असेच संबोधतात. ते त्या पदाचे नाव आहे. चेअर्मन चे चेअरपर्सन झाले तसे राष्ट्रपती चे राष्ट्रस्पाऊस असा नावबदल झालेला नाहिय्ये हे लक्षात घ्या.

टारझन's picture

10 Dec 2010 - 10:58 am | टारझन

भारतीय राजदूतानी साडी नेसल्यामुळे राजदूताना बाजूला नेऊन सुरक्षा तपासणी करण्यात आली

=)) =)) =)) =)) विजुभाऊ , आवरा !! तुम्ही स्त्रीची आजची प्रतिमा डागाळवत आहात !!
आणि बाईच्या मागे साहेब लावलेला देखील मला खटकला आहे. ह्यासाठी मी तुम्हाला कोर्टात खेचिन .. खेचु का ? राखी साहेबांच्या कोर्टात !!

- एकच साहेब ... बाबा साहेब

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Dec 2010 - 8:53 pm | निनाद मुक्काम प...

ह्या मुद्याचा बाऊ करण्यात आला आहे मुंबई कारचा वृत्त पत्राला बडे अधिकारी व दक्षिण मुंबईतील श्रीमान धेंडे ह्यांना परदेशात भारतात मिळते तशी राजेशाही बडदास्त ठेवली जावी अशी अपेक्षा असते .
मुळात राजदूताचे विशेष अधिकार असतात .त्यांच्यावर दुसर्या देशात अगदी हेरगिरीचा आरोप आला तरी कोणतीही कारवाई न होऊ देता त्यांच्या मूळ मायदेशी परत पाठवण्यात येते .हाच कायदा दूतावासातील कर्मचारी वर्गावर लागू होतो .(आठवा काही वर्षापूर्वी आपण पाकिस्तानी राजनैतिक कर्मचारी भारतातून पाठविले तर त्यांनी सुद्धा प्रत्युत्तर म्हणून आपला अधिकारी परत पाठवला .मुद्दा असा आहे .कि जर अमेरिकन सरकारला वाटले कि झडती घ्यावी सुरक्षितेसाठी तर घेऊ शकतात .आपली एअर इंडिया भारतात अतिमहत्वाच्या व्यक्तींना जे लाड करते तसे जगात क्वचित होतात .उदा परदेशात माझा एक मित्राचे वडील मुंबईत बड्या अधिकारावर आहेत .त्याच्या महत्वाच्या औषधे भारतातून आणायची होती .अर्थात आमचा एक भारतीय मित्र सुट्टीवर आल्या असल्याने तो आणणार होता .त्याला ह्याच्या तीर्थरूपांनी फोनोफोनी करून कुठलीही चेकिंग न करता सरळ विमानात बसवले .
मला ओबामा भारत भेटीतील किस्सा आठवला .कि भुजबळ हे ओबामा ह्यांना भेटायला आले तेव्हा ओबामा ह्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची तपासणी करावयास मागितली तेव्हा माझ्या राज्यात खरेतर मीच तुमची तपासणी करायला हवी असे त्यांनी खडे बोल सुनावल्यावर मग अमेरिकन दूतावासातून माफी मागितली गेली .थोडक्यात काय परकीय भूमीवर त्यांच्या नियमाने वागणे पण आपल्या देशात त्यांना आपल्या नियमाने वागायला लावणे .
अजून एक उदाहरण द्यायचं तर पूर्वी अरब जेव्हा कुलाब्यातील हॉटेलात यायचे तेव्हा त्याची सरबराई हि एका राजमहा राजासारखी करायचे विमानतळावर तोच प्रकार .आपण डी हा कराचीत गेल्यापासून म्हणा का ह्यातील काही लोकांचे अल कायद्याचे संबध उघडकीस आले म्हणा आता त्यांचे मुंबई विमानतळावर कडक तपासणी होते .पांढरा झगेवाला म्हणून विशेष लाड होत नाहीत .

पुष्करिणी's picture

9 Dec 2010 - 9:10 pm | पुष्करिणी

फक्त रंग, वेषभूषा इ. लक्शात घेउन वेगळी वर्तणूक कोणालाही आणि कुठेही दिली जाउ नये. दूतावासातील कर्मचारी या सुरक्षा प्रोसिजर मधून कायद्यानं वगळलेले नाहीत, तरीही ही दुर्दैवी घटना आहे. ऑफिशिअली भारतसरकारतर्फे निषेध नोंदवला जायला हवा पण तरीही मीरा शंकर यांनी 'मी परत इथे कधीही येणार नाही' अशी वक्तव्ये करण्याचे टाळावे.
त्यांना निमंत्रित केलेल्या आणि त्यांच्या बरोबर असलेल्या इतर लोकांनी निषेध नोंदवला आहेच आणि रीतसर क्षमाही मागितली आहे ( त्यांचा झाल्या घटनेशी काहीही संबंध नसताना )

अवांतर : माझे काही अनुभव

मला एकदा हँबर्ग विमानतळावर पासपोर्ट कंट्रोल च्या वेळी रांगेतून वेगळं काढून बाजूला उभं रहायला सांगितलं, मला वाटलं की भाषेचा प्रश्न असावा आणि कोणा आंग्लभाषिक स्टाफला बोलावतील. ५० मिनिटांनी मीच आठवण करून दिली तर मला तसच जाउ दिलं.

एकदा बेलफास्ट ला गेले असताना बरोबर असणार्‍या सग्ळ्या आशियाइ वर्णाच्या लोकांना पासपोर्टवर ठपाठप शिक्के मारून, चेहर्‍याकडे एक कटाक्शही न टाकता जाउन दिलं. पण त्याच वेळी विमानातल्या इतर स्पेसिफिक नावं, तोंडावळा असणार्‍या
(आयरिश कॅथोलिक) लोकांना पद्धतशीरपणे वेगळं काढून स्ट्रीप सर्च केलं गेलं.

अजून एका टूरमधे बाकीचे सगळे सहप्रवासी अमेरिकन होते. एका अमेरिकन आजोबांचं (वय वर्ष ७९ ) ऑपरेशन झालं होतं आणि पायात स्टीलचा रॉड होता, तसं डॉक्टर आणि अमेरिकन दुतावासानं दिलेलं पत्रही होतं. पण प्रत्येक वेळेस त्यांचं स्ट्रीप सर्च होत असे. ते बाकीच्यांना त्रास नको म्हणून इतर सगळ्यांपेक्शा २ तास आधीच निघत.

कधीकधी सिक्युरिटी जाउदे, पासपोर्टवर ठप्पा सुद्धा मारायला कोणी नसतं. लोकंच पोलिसांना शोधत फिरत असतात *.

* डिट्टेल माहितीसाठी श्री. मेवे यांच्याशी संपर्क साधावा.

लोकंच पोलिसांना शोधत फिरत असतात
खूपच सहमत.

शिल्पा ब's picture

10 Dec 2010 - 2:20 am | शिल्पा ब

या video नंतरचा video बघा...गम्मत कळेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 3:53 pm | निनाद मुक्काम प...

हीच योग्य वेळ आहे ह्या लोकांना जगापुढे उघडे करण्याची .
सध्या प्रसारमाध्यमे जगातील त्यांच्या विरुध्ध आहेत .जनमत युरोपातील ह्यांच्या विरुध्ध आहे .व स्वताच्या कट्टर पंथीय पणात वाढ करून हि लोक स्वताच्या पायावर धोंडा पाढून घेत आहेत ,
ह्यांच्या हिरव्या धर्मांध विचारांना लगाम भारतीय व याहुदीच करू शकतात ह्यावर माझे व माझ्या अनेक ज्यू मित्रांचे एकमत आहे .तेव्हा जमेल तशी जनजागृती करणे आपले आद्य कर्तव्य आहे .
आपली प्रतिक्रिया आवडली .

शिल्पा ब's picture

10 Dec 2010 - 11:32 pm | शिल्पा ब

<<<ह्यांच्या हिरव्या धर्मांध विचारांना लगाम भारतीय व याहुदीच करू शकतात

ते कसं?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 6:42 pm | निनाद मुक्काम प...

नवीन लेखाची प्रतीक्षा करा
धीर धरी धीरा पोटी फळे मिळती रसाळ गोमटी
सब्र का फल मिठा होता है

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Dec 2010 - 12:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्यांच्या हिरव्या धर्मांध विचारांना लगाम भारतीय व याहुदीच करू शकतात ह्यावर माझे व माझ्या अनेक ज्यू मित्रांचे एकमत आहे

"तुम्ही आणि साने गुरूजी माझे सगळ्यात आवडते लेखक आहात", हे पुलंचं 'सखाराम गटणे'तलं वाक्य (उगाचच?) आठवलं.

प्रियाली's picture

11 Dec 2010 - 12:25 am | प्रियाली

मला मिभो आणि शम्मी कपूर आठवले. ;)

कृपया, दोघांचा एकमेकांशी संबंध लावण्याचा हेतू नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Dec 2010 - 12:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवती's picture

11 Dec 2010 - 1:37 am | रेवती

अग्ग्ग्ग्ग्ग्ग!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 2:23 am | निनाद मुक्काम प...

प्रश्न चांगला आहे .किंबहुना माझ्या पुढच्या लेखातून हा विषय सविस्तर मांडणार आहे . बाकी आपण परदेशात राहतो भारतात राहून लोकांना कल्पना येणार नाही कदाचित पाकिस्तानी व अरब ह्यांची मानसिकता व माजोरडे पणा व कट्टर वाद ह्यामुळे आशियायी लोकांची प्रतिमा डागाळत आहे . सध्या एवढेच सांगतो धर्मावर आधारित राष्ट्र हि संकल्पना गांधी ह्यांना मान्य नव्हती (म्हणून देशाने सेक्युलर वाद ) निवडला .पण त्यामुळे भारताने ज्यू राष्तांचे अस्तित्व मान्य केले नाही .व १९८९ पर्यत आपले ह्यांच्याशी संबंध नवहते (सरकारी पातळीवर ) ते नरसिंह राव ह्यांच्या लुक वेस्ट हे संपूर्ण वेगळ्या व स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे शक्य झाले .सध्या आपला देश त्यांच्याकडून मुसती सहस्त्रे विकत घेत नाही आहे .तर औद्योगिक दृष्ट्या सुध्धा जवळ येत आहे .सर्वात महत्वाचे त्याची हेर संस्था मोसाद जगातील १ असून सध्या त्यांचे आपल्याला प्रती दहशतवाद व आधुनिक काळातील वॉर ४थ फ जनरेशन ज्याला म्हणतात (जेथे प्रत्यक्ष युद्ध व सैनिकी कारवाई न करता ) ह्यात भारताने इजारेल कडून प्रशिक्षण सुरु केले आहे .अधिक व सखोल माहिती मी लेखात लिहीन एक मात्रा नक्की हिरव्या दहशतवाद हा इजारेल व भारताचा समान दुखरा भाग आहे .व एकत्र येऊनच आपल्याला काहीतरी करता येईल (अमेरिकत ज्यू लोकांची बलाढ्य लॉबी असून बँकिंग व प्रसारमाध्यमे ह्यावर त्यांची पकड आहे )हिलरी ह्यांचा जावई ज्यू आहे .
आज भारतीय कंपन्या व अनिवासी भारतीय हे अमेरिकेत व्यापारात पुढे आहेत .(गुज्जू व ज्यू हे जगातील हिर्याचे मार्केट सांभाळतात ) तेव्हा तुमच्या इथून जगाची सूत्र हलवली जातात त्या वाईट हॉउस ची सूत्रे आपण मिळून घेऊ शकतो (हा पोकळ आशावाद नाही आहे हे माझ्या लेखातून स्पष्ट करेन )

वेताळ's picture

11 Dec 2010 - 1:46 pm | वेताळ

वाईट हॉउस जो पर्यत चांगले हॉउस बनत नाही तोपर्यत जगात शांतता लाभणे कठीण आहे.

विनायक प्रभू's picture

10 Dec 2010 - 12:34 pm | विनायक प्रभू

वरील प्रकाराचा निषेध करणारे
ओबामाला पत्र पत्रकाकांनी लिहावे अशी विनंती.

विजुभाऊ's picture

10 Dec 2010 - 5:38 pm | विजुभाऊ

धन्यवाद मित्रानो ( यात मयत्रीणी सुद्धा आल्या. उगाच जेन्डर बायस्ड म्हणून णीषीध करू णका )
विषेशतः शिल्पा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7075932.cms

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 3:53 am | निनाद मुक्काम प...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7075932.cms
झुकती हे दुनिया झुकानेवाला चाहिये .
हेच खरे आहे .मीरा शंकर ह्याचे चूक का बरोबर हा मुद्दा राहिला बाजूला ( भारताची रोजगार हमी योजना अमेरिकेत धोक्यात येऊ नये म्हणून लगेच माफी मानून मोकळे झाले )असाच मुसाद्दी पणा दाखवून लाशाक्रे तोयबाचे आर्थिक नाकेबंदी केली (स्पेन मध्ये त्यांना रसद पुरवणारे अटकेत )अर्थात अमेरिका व इजारेल व तमाम पाशिमात्या देशासोबत व्यापारी संबंध वाढवून अशाच मार्गाने काश्मीर प्रश्न सोडवावा .(हा प्रश्न वादग्रस्त नाही असे युएन मध्ये नुकतेच जाहीर झाल्याचे वाचून आहे .

उल्हास's picture

11 Dec 2010 - 6:30 pm | उल्हास

तेव्हा त्यांनी भुजबळ वगैरेवर असा मस्तवालपणा करायचा प्रयत्न केला होता

चिंतामणी's picture

12 Dec 2010 - 1:20 am | चिंतामणी

( भारताची रोजगार हमी योजना अमेरिकेत धोक्यात येऊ नये म्हणून लगेच माफी मानून मोकळे झाले )

माफीनामा नको आहे. दिलगीरी व्यक्त करायला हवी आहे. X(