तो कवी..ती कवियित्री..
-------------------------------------
तो कवी थोर बंडखोर..ती हळवी कवियित्री..
हात एकमेका हाती देवुन हसली मग नियती..
त्याच्या कवितेत..भरक़टलेल्या दिशा,निखळणारे तारे,
तिच्या कवितेत..भिजलेल्या उशा अन पिसाटलेले वारे..
तिच्या कवितेत किणकिणतो..रात्रभर चुडा..
त्याच्या कवितेत किरकिरतो..सदा रातकिडा..
तिच्या कवितेत असतो..स्वप्नांचा सुंदर गाव..
ह्याच्या पाठीवर बसतात..नेहेमी घावामागुन घाव..
रात्रभर तळमळुन बिचारी..वाट पाहुन झोपते...
तिची झोपमोड करतो हा नेहेमी पहाटे पहाटे...
त्या वळणावर वाट पाहते ती त्याची बिचारी..
रणांगणावर उपसत असतो हा तेव्हा तलवारी..
मोगर्याच्या शेजेवरती ही बिचारी बसते झुरत..
सरणावरती मरणाची हा वाट पाहत असतो घोरत...
तरीही दोघांचे पटते..जरी चिडतात..वैतागतात..
रात्र रात्र दोघेही..कविता ऐकवत जागवतात...
तसे होत नाही फार काही लग्नानंतर नऊ महीन्यांनी..
बाहेर पडतो एक कवितासंग्रह ("रणांगणावरील श्रुंगार" नावाचा किंवा "श्रुंगारातील रण" नावाचा)मिळुन रचलेला दोघांनी..
--------योगेश .
प्रतिक्रिया
9 Dec 2010 - 11:31 pm | योगप्रभू
कवियित्री असे लिहिल्याबद्दल शाळेत मराठीच्या बाईंनी माझा कान ओढला होता. 'कवयित्री' लिहायचे असे बजावून सांगितले. त्यावर वैतागून मी म्हणालो, 'हा काय त्रास आहे! परटाची परटीण, कुंभाराची कुंभारीण, गुरवाची गुरवीण तर मग कवीची कवीण का नाही?' त्यावर दुसरा कान ओढून बाई म्हणाल्या, 'या सगळ्याजणी त्या त्या बलुतेदारांच्या बायका आहेत. पण कवयित्री म्हणजे कवीची बायको, असे नाही. कविता लेखन करणारी महिला ही कवयित्री म्हणून ओळखली जाते.' :)
9 Dec 2010 - 11:46 pm | मेघवेडा
कडक! आवडलेच! मस्तच लिहिलंय. विषयही उत्तम! 'रणांगणावरील शृंगार' आणि 'शृंगारातील रण' दोन्ही कल्पना भारी!
10 Dec 2010 - 12:10 am | प्राजु
मस्त आहे कविता!
10 Dec 2010 - 2:19 am | राजेश घासकडवी
मस्त कविता.
10 Dec 2010 - 3:53 am | शुचि
तुमच्या सगळ्या कविता आवडतात.
10 Dec 2010 - 4:08 am | धनंजय
मजा आली.
10 Dec 2010 - 8:52 am | स्पंदना
तिच्या कवितेत किणकिणतो..रात्रभर चुडा..
त्याच्या कवितेत किरकिरतो..सदा रातकिडा..
हा हा हा !
10 Dec 2010 - 1:04 pm | गणेशा
योग्या जबरी एकदम ...
पुन्हा तुझ्या कविता वाचायला मिळत आहे हे खुप मोठे भाग्य आहे गड्या ..
येवुदे आनखिन