उन्हाळ्यातले थेंब
(तिहेरी तिहाई)
*
तापली धूळ बसून
पानावर नक्षी दिसते
सुकल्या दवाची
*
*
*
*
*
लाल धूळकण
वाहातायत सैरभैर
खार तुषार
*
*
*
*
*
ऊन धुळीत थेंब
कोळपली पालवी वाफवून
मलूल करतात
*
*
दवाचा एक बिंदू
पानाला लोंबतो
तसा जड नाही तो
*
*
*
*
*
मागे ठिबक ठिबक
समोर ओढ्याचे पात्र
आहे भेगाळ
*
*
*
*
*
ऊन धुळीत थेंब
चुरचुरून वाफ झालेले
मातीचे मोती
*
*
सूर्य उगवला
दवाची उठलेली वाफ
कोरड पांघरते
*
*
*
*
*
निरभ्र निळे
नभ भगभगते
मृद्गंध उठला
*
*
*
*
*
ऊन धुळीत थेंब
आषाढ दरवळतो
भर वैषाखात
*
*****************************************************
Summer Droplets
(Triple triplets)
*
The hot dust settling
Traces patterns on leaves
Of long dried dew
*
*
*
*
*
Red dust particles
Swirl helter skelter
Spraying embers
*
*
*
*
*
Sprinkles on hot dust
Steam up the browned trees
The leaves wilt more
*
*
A drop of dew
Hangs from a leaf tip
Too light to drop
*
*
*
*
*
Drip drip somewhere
Here the brook's bed
Is cracked earth
*
*
*
*
*
Sprinkles on hot dust
Sizzle and hiss and steam
Rolling brown pearls
*
*
The sun arisen,
The dew is misting up
The parched scene
*
*
*
*
*
A cloudless blue
Smoldering hovers above
An earthy fragrance
*
*
*
*
*
Sprinkles on hot dust
Smell of cool monsoon
And dampen summer
*
*****************************************************
(हायकू हा जपानी काव्यप्रकार शांताबाईंनी आणि अन्य कवींनी मराठीत रचला आहे. येथे मी मूळ जपानी नियमांप्रमाणे रचना करतो आहे, त्यामुळे काही फरक आला असू शकेल. यात जास्तीत जास्त ३ ओळी असतात, आणि १७ मात्रा असतात. स्वयंपूर्ण कडव्यात केवळ मूर्त नैसर्गिक विषय हाताळले जातात. अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे. तरी वाचकाच्या अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे. वाटल्यास वरील ९ स्वतंत्र हायकू म्हणून वाचावेत. वाटल्यास आडव्या पंक्तीत लिहिलेल्या, वाटल्यास उभ्या रांगांमध्ये लिहिलेल्या, तीनतीन कडव्यांच्या तीन कविता म्हणून वाचाव्यात. काही भाषांतरे मराठीतून इंग्रजीत आहेत, तर काही उलट दिशेने.)
प्रतिक्रिया
29 Nov 2007 - 9:44 am | सर्किट (not verified)
क्या बात है धनंजय !!!!!!
हृदयविकाराविषयी संशोधन करता करता, असले शब्द तुमच्या मेंदूला स्फुरतात, ह्याचे किती कौतिक करावे तेवढे थोडेच....
सूर्य उगवला
दवाची उठलेली वाफ
कोरड पांघरते
क्या बात है !!!!!
- (दिगभ्भांपाठोपाठ धनंजयचा मेजर फ्यान) सर्किट
29 Nov 2007 - 9:52 am | जुना अभिजित
तापली धूळ बसून
पानावर नक्षी दिसते
सुकल्या दवाची
या पेक्षा जास्त शब्दांची गरज वाटत नाही.
अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे.
हा काव्यप्रकार तरी सुटला म्हणायचा प्रेमभंगविरांच्या तावडीतून.
अभिजित
29 Nov 2007 - 10:32 am | मनिष
निरभ्र निळे
नभ भगभगते
मृद्गंध उठला
(अजून एक फ्यान्) मनिष
29 Nov 2007 - 10:41 am | किमयागार (not verified)
कविराज,
शब्द त्रिकुटे थोडीशी आतून आलेली न वाटता मेकॅनीकल वाटली इतकी माफक तक्रार सोडली तर कलेचा तुम्ही अतिशय उच्च अविष्कार घडवला आहे.
तिकडे तत्वांना गद्ध्याच्या **त सारुन ढोंगी राजकारण खेळणारे बेगडी राजकारणी आणि त्यांची प्यादी, अपशब्द चिखल फेकाफेकी आणि मी पणाचा असह्य दर्प मारणारे 'सो कॉल्ड' तंत्रज्ञ आणि त्यांचे फॅनक्लब ह्या सगळ्या गदारोळात आपला पांढरा शुभ्र स्वच्छ शर्ट तुम्ही भट्टीतून आणल्यासारखा सुरकुत्या विरहीत कसा काय ठेवता बुवा?
-कि'गार
****************************************************************
अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?
30 Nov 2007 - 7:35 am | धनंजय
एकच उत्तम हायकू लिहायला (आणि एक लिहून झाल्यावर थांबायला!) आध्यात्मिक पोच लागते. म्हणजे वर्षांच्या विचाराचा अर्क अल्पाक्षरात, पण उत्स्फूर्त असा सांगावा लागतो.
इथे संच बनवणार असे आधी ठरवल्यामुळे काही थोडी कडवी उत्स्फूर्त आहेत, आणि काही त्या अनुषंगाने विचाराअंती रचलेली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ओतीव पेक्षा घडीव आकृती दिसते. अभिप्रायाबाबत धन्यवाद.
29 Nov 2007 - 11:10 am | आनंदयात्री
मातीचे मोती
जियो धनंजय जियो !! अत्यंत सुंदर कल्पना, नवीन आहे.
अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे.
अगदी खरे.
धनंजयराव, मानले बुवा तुम्हाला, ते आधी केलेले क्लिष्ट गोष्टीचे भाषांतर अन आता ही हायकुची मेजवानी !! धन्यवाद.
(धनंजय फ्यान क्लबात सामील)
प्रसाद मुळे
ता.क. आमच्या जापानी जाणकार गँगला ही लिंक पाठवायला विसरलो नाही :)
29 Nov 2007 - 11:10 am | आजानुकर्ण
ऊन धुळीत थेंब
चुरचुरून वाफ झालेले
मातीचे मोती
अप्रतिमच!
(धनंजयांचा सर्वात जास्त फ्यान) आजानुकर्ण
29 Nov 2007 - 11:17 am | विसोबा खेचर
तुझ्या प्रतिभेला दंडवत रे बाबा! फारच सुंदर आणि कल्पक लिहिलं आहेस..
तुझ्यासारख्या प्रतिभावंताचा मिसळपावला अभिमान वाटतो...!
अजूनही लिही, अगदी भरपूर लिही, मनमुराद लिही, हीच तुला रिक्वेष्ट...:)
तात्या.
29 Nov 2007 - 11:18 am | बेसनलाडू
अजूनही लिही, अगदी भरपूर लिही, मनमुराद लिही, हीच तुला रिक्वेष्ट...:)
सहमत आहे . म्हणजे जरा दर्जेदार मराठी संकेतस्थळावर वावरतोय, असे तरी वाटेल :)
(सहमत)बेसनलाडू
29 Nov 2007 - 11:30 am | विसोबा खेचर
म्हणजे जरा दर्जेदार मराठी संकेतस्थळावर वावरतोय, असे तरी वाटेल :)
अरे बेसनाच्या लाडवा, मिसळपाव दर्जेदारच आहे तेव्हा त्यात वेगळं काय वाटायचंय? :) ते जर दर्जेदार नसतं तर तिथे तुझ्यासारखी, धन्याशेठसारखी प्रतिभावान लोकं आलीच नसती! काय खरं की नाही? :)
हां परंतु या संस्थळाचं नांव 'मिसळपाव' असल्यामुळे इथे काहीच वर्ज्य नाही. भल्याबुर्याची, दर्जा-दर्जाहीनतेची ही एक मिसळच आहे! :)
असो, आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :)
तात्या.
29 Nov 2007 - 11:33 am | आजानुकर्ण
असो, आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :)
कुठे थांबावे हे कळणे हेच सर्वात महत्त्वाचे.
- आजानुकर्ण
29 Nov 2007 - 11:41 am | बेसनलाडू
आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :)
--- बघताना आकाराने तिरके तिरके चालतील हो ;) पण 'तिरके' नकोत ;)
('तिरका')बेसनलाडू
कुठे थांबावे हे कळणे हेच सर्वात महत्त्वाचे.
--- सहमत.
(सहमत)बेसनलाडू
29 Nov 2007 - 11:48 am | सहज
ह्या थेंबांनी अजुनच तहान जागवली.
अगदी मनमुराद चिंब भिजवले गेलो तरी देखील...
सुरेख!
29 Nov 2007 - 1:34 pm | नंदन
हायकू. डी. एफ. सी. (धनंजय फॅन क्लब) मध्ये मीही सामील :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
29 Nov 2007 - 2:42 pm | विसुनाना
मी आणखी एक सदस्य...
मानले बुवा! धनंजय ही एकच व्यक्ती नसून लेखक, कवी, भाषांतरकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ यांची सिंडीकेट आहे असे वाटू लागले आहे. :)
उत्तम हायकूमाला...
29 Nov 2007 - 9:25 pm | कोलबेर
मानले बुवा! धनंजय ही एकच व्यक्ती नसून लेखक, कवी, भाषांतरकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ यांची सिंडीकेट आहे असे वाटू लागले आहे. :)
(डी.एफ्.सी लाईफ मेंबर) कोलबेर
29 Nov 2007 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धनंजयराव,
हायकु आवडले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
30 Nov 2007 - 1:02 am | चित्रा
मस्त. आवडल्या हायकू.
30 Nov 2007 - 7:24 am | धनंजय
अहो इतके नका हरभर्याच्या झाडावर चढवू! पुढचा प्रयोग पडला की सरासरी पुन्हा मध्यावर येईल :-)
पण चांगल्या अभिप्रायाने उत्साह वाढतो हे मात्र नक्की. मनापासून धन्यवाद.
30 Nov 2007 - 7:49 am | सर्किट (not verified)
धनंजय,
आमच्या अभिप्रायाने आपला साहित्यिक उत्साह वाढतोय हे खरे.
पण आम्हाला येत्या पाच-दहा वर्षांत हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यात आम्ही दगावलो, तर ह्या उत्तेजक प्रतिसादांना आम्ही दोष देणार हे नक्क्की ! नरकातून काहीतरी स्फोटक लिहू मिसळपावावर (नाहीतरी इथले *** सदस्य नरकातच असतील, तेव्हा)!
कारण ह्याच उत्तेजक प्रतिसादांमुळे आपण *आमच्या* हृदयाविषयी संशोधन रहित करून असे हायकू/भषांतरे/व्याकरणविषयक लेख लिहीत बसणार, आणि एल डी एल कमी करण्याच्या पद्धतींविषयीचे आपले संशोधन कमी करणार.
ह्या हायकूंनी फार फार तर आमच्या मनाला बरे वाटते. पण आम्ही जगलोच नाही तर कोण आपले हाय्कू एन्जॉय करणार ?
तेव्हा आमच्या जनुकांचा आमच्या एल डी एल चा संबंध, ह्या संशोधनात पूर्ण वेळ घालवा. हायकू काय आम्ही पण करू.
धनंजय रावांचे
हृदय संशोधन संपले
आणि आमचे हृदय निकामी
कसे आहे ??
- सर्किट
9 Dec 2010 - 5:16 am | गुंडोपंत
असे अजून हवे!
हे हायकू परत एकदा वाचून मस्त वाटले...
अधिक लेखनाची वाट पाहतो आहे.
9 Dec 2010 - 10:28 am | राजेश घासकडवी
हायकू (अनेकवचन माहीत नाही...) आवडली.
धनंजयनी म्हटलं आहे की
याही पुढची पायरी मला दिसते. ती म्हणजे काही हायकूंच्या संगमांतून नवीन हायकू तयार होतात. उदाहरणार्थ -
लाल धूळकण
दवाची उठलेली वाफ
मृद्गंध उठला
सूर्य उगवला
नभ भगभगते
भर वैषाखात
ऊन धुळीत थेंब
दवाची उठलेली वाफ
मातीचे मोती
ऊन धुळीत थेंब
वाहातायत सैरभैर
मृद्गंध उठला
तापली धूळ, बसून
कोळपली पालवी वाफवून
कोरड पांघरते
सूर्य उगवला
पानावर नक्षी दिसते
तसा जड नाही तो
अशा तयार केलेल्या सर्वच हायकूंमधून भावगर्भ साक्षात्कार होईलच असं नाही. पण काहींमधून होतो हेच अचंबित करणारं. लाजवाब.
9 Dec 2010 - 10:37 am | स्पंदना
मानल बुवा घासकडवी साहेबांना!
अन हो धनंजयांचा तर अतिशय स्त्युत्य प्रयोग.
9 Dec 2010 - 10:47 am | गुंडोपंत
झकास राजेशराव!
मस्त जमले आहेत, प्रयोग आवडला...
9 Dec 2010 - 11:13 am | कवितानागेश
फार वर्षांनी हायकू वाचायला मिळाले.
छान वाटलं.
तुमच्यासाठी धन्यवादाचा हायकू:
लालबुंद तर्री
गरमगरम मिसळ
शेव ओली पाव ओला
9 Dec 2010 - 3:10 pm | मेघवेडा
बावनकशी सोनं! भारीच! आपणही 'डीएफसी'चं सदस्यत्व घेतलेलं आहे ब्वॉ.
9 Jun 2016 - 11:03 am | उल्का
हायकू विषयी गुगलवताना आपल्या मिपा वरील हा धागा सापडला.
खूप सुंदर!
9 Jun 2016 - 12:28 pm | उल्का
कोणाला हायकू मध्ये रस असेल अथवा जाणून घ्यायचे असेल तर ह्या लिंक्स वाचाव्या.
गुगलवून मिळवल्या आहेत. कष्टाने शोधल्या म्हणून वाटलं इतरांना पण फायदा होऊ दे.
आवड नसल्यास दुर्लक्ष करावे.
हाकानाका. :) (जमतंय की मिपा भाषेत लिहायला)
http://mumbaitarunbharat.in/Encyc/2016/1/23/‘हायकू-.aspx#.V1kMlkThUwg
http://www.mr.upakram.org/node/2342
9 Jun 2016 - 12:35 pm | एस
vaakhusaaaa.
9 Jun 2016 - 12:40 pm | उल्का
ती लिंक ब्रह्माण्ड व्यापायाला गेली.
पूर्वपरिक्षण केलं नव्हतं मी गडबडीत.
हायकू लेख तरुण भारत
आणखी एक लेख
आत्ता होईल नीट अस वाटतंय.
गोंधलाबद्दल माफी असावी.
9 Jun 2016 - 5:17 pm | मारवा
काय सुंदर धागा आहे.
अनेक दिवसांच्या रखरखीत कोरड्या जमिनीवर पावसाचा शिडकावा व्हावा तस वाटल.
आणि आजच्या जुन महीन्यातल्या दिवसात कसला मॅच झालाय धागा.
धनंजय मराठी संस्थळावरील असामान्य प्रतिभेचा माणुस आहे.
अशी प्रतिभा दुर्मिळच
ही उल्का अशीच कोसळत राहो.
9 Jun 2016 - 5:36 pm | उल्का
धन्यवाद!
तरुण भारतचा लेख जरुर वाचा.
आणि हा पण एक