आला थंडीचा महिना

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
8 Dec 2010 - 12:48 pm

णमस्कार्स लोक्स ,

पार नोव्हेंबर उजाडला तरी ह्या वाह्यात पावसाने नुसता उच्छाद मांडला होता. दसर्‍याला पाउस ? हाईट म्हणजे दिवाळीतही पाऊस झाला. त्यामुळे बर्‍याच लोकांचे फटाके वाकस होऊन फुसके निघाले. त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला. ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल .

अरे नोव्हेंबरात काय पाऊस पडायचा असतो का? प्रत्येक ऋतुला चार-चार महिने वाटुन दिलेले असताना असं एकाने दुसर्‍याच्या क्षेत्रात घुसखोरी करुन वातावरणिक अवांतरगिरी करणं मला खरोखर न रुचणारं वाटलं. त्यातही पावसाळा म्हणजे आमचा णावडता ऋतु ( काही विशेष प्रसंग सोडले तर :) ) किचकिच , चिकचिक , कपडे सुकत नाहीत , कोंदट वास येतो , न मी फेड अप झालेलो !

जुन मधे सुरु झालेला पाऊस साधारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत निरोप घेतो , आणि त्याने तो घ्यावा अशी आमची इच्छा असते. कारण त्याणंतर जो ऋतु येतो तो आमच्या मनाला फार गुदगुल्या करणारा आणि अंगावर शहारे उभे करणारा असतो. ती गुलाबी थंडी अनुभवावी ती आमच्या पुण्यातंच. लखणौची थंडी मजे ऐवजी सजा असते. तर फॉरिन ची थंडी आम्ही अनुभवली नसल्याने त्यावर भाष्य नाही. आमच्या अफ्रिकेत फक्त ड्राय आणि वेट हे दोन च ऋतु असत तर वातावरण नेहमी थंडगार आणि पोषक असलं तरी त्यात पुण्यातल्या थंडीचा गोडवा नाही , असे आमचे वैयक्तिक मत आहे .
त्याला कारणही तसंच असावं , अवघं जिवन ( लगेच "जिवन" वगैरे वर गप्पा मारायला ह्याची काय पण्णाशी उलटलीये काय ? अशा फालतु कमेंटला आम्ही नाशिक फाट्यावर मारतो ) पुण्यात गेलं. त्यातही बालपणी रहायचो ते एका खेडेगावात. तेंव्हा काय कॉलन्या आणि फ्लॅटचं लोण तिकडेतरी पसरलेलं नव्हतं. तुळस लावायला देखील ओढ्याकडेच जाणे ओघाने आलेच. मग ते सकाळी सकाळी पडलेलं दव , गवतावर जमा होत असे आणि मस्त गार गार गुदगुल्या करत असे ( कुठे ? असे प्रश्न व्यनि तुन विचारावेत म्हणजे मोकळेपणाने बोलता येइल ) सगळी कडे धुकं पसतलेलं असायचं १० -१५ फर्लांगावरचंही काही दिसायचं नाही एवढं दाट धुकं हो ! हल्ली फक्त दिल्लीतंच पडतं ( हे काँग्रेसवाले काय काय हिरावणार आहेत अजुन आमच्याकडुन ? ) डबड्यात पाणी देखील थंडगार असायचे . एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची. पण खुप मज्जा यायची. घराजवळचा सगळा बालचमु जमुन बाभळीच्या शेंगा ,नारळाचे सोललेले सोलपटं , कागदं -कपटे , फेकलेले कापडं पासुन ते कोणत्यश्या टायर पासुन जे काही जळाऊ वाटेल ते भंगारवाल्या सारखं गोळा करुन आणुन आम्ही शेकोटी पेटवायचो . त्यावर हात धरताना जी गर्मी लागायची त्यातलं सुख हल्ली कुठे भेटत नाही , कुणास ठाऊक कुठे हरवलंय. बाबा घराच्या अंगणातंच बंब पेटवायचे. हो , तो आमचा खाणदाणी बंब . त्यासाठी लाकडं गोळा करायला परवाणगीने मस्त रानात उंडरायला भेटायचं. बंबातुन ते वाफाळतं गरम पानी घेत, तिथेच भिंती नसलेल्या फक्त एक आडवा दगड ठेवुन तयार केलेल्या स्नानगृहात अंघोळ घ्यायची. त्यातही केवढा आनंद ? मधेच थंडी वाटावी आणि लगेच गरम गरम पाण्याचा तांब्या डोक्यावर उलटा करावा. आणि अंघोळ झाली की कुडकुडत दातांचा आवाज करत .. "ए$$$$$$$$$ आई$$$$$$$$ , टावेल दे$$$$$$$ " म्हणुन गावगर्जणा करावी. मग बराच वेळ ते कुडकुडनं चालुच असायचं. पॅराशुट हा एकंच ब्रांड माहिती होता. तो हिवाळ्यात गोठुन जायचा. मग तो बाटलीतुन निघत नाही म्हणुन बाटली उन्हात ठेवणे किंवा बंबाच्या पाण्यात बुडवुन ठेवणे इत्यादी न्युटनपेक्षाही मोठे शोध लावल्याच्या अविर्भावात नुस्तं केसांन्नाच नाही तर हातापायाला भरपुर तेल चोपडायचो. लाईफबॉय ह्या साबणात एकाच युज नंतर काळ्या माणसाला देखील पांढरा शुभ्र करण्याची क्षमता असुनही हे फेयर अँड लव्हली वाले का आपला कॉपीराईट घेऊन बसलेत असं कुतुहल त्या काळी वाटायचं. शनिवारी सकाळची लवकर शाळा असायची. शणिवार आम्हाला खास प्रिय होता कारण ११ वाजताच शाळा सुटली की गावभर उंडरायला मोकळे होत असु . मग आठवड्याच्या इतर दिवशी जशी प्रार्थणेच्या वेळी सावलीतली जागा मिळवण्यासाठी झटपट असायची ती शनिवारी उन्हातली जागा मिळवण्यासाठी व्हायची . कधी काळी एम्.सी.सी. (महाराष्ट्र कॅडेट्स कोर्स का काय ) चं काय तरी फॅड आलं होतं. सकाळी सकाळी आमचे पि.टी. मास्तर डकवॉक, मार्चिंग वगैरे काय काय प्रकार करायला लावतसे. चुक झाली की नायलॉन ची दोरी चप्प्प्प्कन अंगावर वळ उमटवत असे, थंडीत तो अचुन बोचायचा न बराच वेळ दुखायचा.

काळ बदलला , मोठे झालो ( हसु नका ,कॉपीराईटेड "मोठे झालो" नाही ) कधी काळी इंजिनियरिंगला असतांना रात्र थोडी सोंगे फार असंत . परिक्षा जवळ आल्या की पी.एल. च्या काळात मित्राला बोलवुन भर हिवाळ्याच्या कुडकुडत्या रात्री टेरेस वर अभ्यासाचा घाट घातला जायचा. त्यासाठी मग तात्पुररा तंबु तयार करणे , शेकोटीची व्यवस्था करणे ( मग त्या शेकोटीत नुकत्याच संपलेल्या सबमिशनच्या फाईलींची होळी करणे) एकदा तर आमच्या टेरेस चा दरवाजा रिपेयर करण्यासाठी काढुन ठेवलेला , त्याच्या फळ्या वेगळ्या झालेल्या. तो बाद झालाय आणि एक नविन दरवाजा बसवला जाईल ह्या समजुती खाली आम्ही तो दरवाजा हळु हळु करुन आख्खा जाळुन टाकला होता ( नंतर काय झालं हे सांगायला नको ) . रात्री च्या थंडीत फक्त कपाळापासुन हनुवटीपर्यंत शरीर बाहेर ठेउन बाकी दुलई मधे गुंडाळुन अभ्यासाची नाट़कं केली. एम-१ एम-२ च्या तयारीला हातात हातमोजे घालुन गणितं सोडवली. हळुच शेजारच्या पोरी काय करतात हे चोरुन पाहिलं ;) परिक्षेला बाईक वर जाताना हात गोठले की ते गाडीच्या इंजिनाजवळ नेऊन उब घ्यायचो न असंच बरंच काही.

हल्ली शेकोटी करत नाही. गिझर वर तापलेल्या पाण्यात अंघोळ करतो . पांढरा करणारा लाईफबॉय पाहुनही वर्ष लोटली. पॅराशुट ची जागा हेयर जेल ने घेतली तर मॉइश्चरायझींग क्रिम्स वगैरेंचे लोण आले , उकललेल्या ओठांसाठी लिपकेयर आले. :) जिवणशैली बदलली , राहिल्या त्या आठवणी .

ऋतु तर बाकी २ पण आहेत. पण आमचा लोभ फक्त हिवाळ्यावर. रडत खडत का होईना पुन्हा एकदा हिवाळा सुरु झालाय. लेख टंकताना बोटं कशी गारठलीत , वरचं सगळं डोळ्यांसमोर तरळुन गेलं तर !!
हॅपी हिवाळा दोस्तांनो !!

नृत्यसद्भावना

प्रतिक्रिया

अवलिया's picture

8 Dec 2010 - 12:49 pm | अवलिया

सुधारलं रे पोरगं सुधारलं!

टारझन's picture

8 Dec 2010 - 1:05 pm | टारझन

कोणी विषयाला धरुन का प्रतिसाद देत नाहीये ?
नान्याचा एक reply सुद्धा subject ला धरुन नसतो. हो आता तुम्ही तुमचे कसले ते आंदोलन करत असाल तर ...

- पर्ल हार्बर

अवलिया's picture

8 Dec 2010 - 1:22 pm | अवलिया

टारझन साहेब, आपण ज्या पद्धतीने आपली मते सुस्पष्ट व ठामपणे मांडता ते पाहुन कौतुक वाटते. आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे.

लिट्ल बॉय

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 7:23 am | शिल्पा ब

काय ती चर्चा इथे करा म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल.

सुहास..'s picture

8 Dec 2010 - 8:29 pm | सुहास..

थंडीच्या दिवसातल्या काही आठवणी, त्यातल्या त्यात पुण्याच्या गुलाबी थंडीतल्या !!

हॉटेलात असताना,शिवाजीनगर ला बारा-एक वाजता कामावरुन परतलो की होळकर ब्रिजवरुन घरी न जाता मुद्दामुन स्टेशनला जायच.सायकल थेट स्टेशनच्या मागल्या बाजुला असलेल्या पुलाखाली. लिंबाच्या झाडाखाली, अण्णाच्या काळवंडलेल्या टपरीसमोर वाफाळलेल्या चहाचा पहिला घोट घेताना मस्त फील यायचा. वर एक छोटी फोर-स्केयर !!
सकाळच्या शिफ्टला असताना शाळेत चाललेले,रंगबेरंगी स्वेटर्स घातलेल्या टिन-एजर पोर-पोरी, लहान-लहान मुले आजही आठवतात.पहाट मार्गी लागल्यासारखी वाटायची. कॉलेजचा तर रंगच गुलाबी असायचा.

पुढे 'माझी बेवडेबाजी' च्या पहिल्या पर्वात असाच डि-मेलो किंवा अश्विनीवर जायचा योग यायचा. संध्याकाळच्या गारव्यात रम,गम आणि हम मध्ये वेळेचा थांगपत्ता लागायचा नाही . गाडी चालविताना हाताची बोटे देखील गारवठायची. पण त्यातही मजा वाटायची.

आजही मला थंडी वाजते,पण ती एसीची. त्यात काय मजा !
बंगलोरात काल बर्फ पडला, पण आम्ही होतो आमच्या खुराड्यात (पुण्यात असतो तर गाडीला किक मारली असती अन...)

टारझन's picture

8 Dec 2010 - 9:53 pm | टारझन

सुपर लाईक. !

स्मिता.'s picture

9 Dec 2010 - 10:49 am | स्मिता.

लेख मस्त झालाय. शाळेच्या दिवसातल्या आणि विशेषकरून इंजिनियरिंगच्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या.

ते एम. सी. सी. चे फॅड आमच्याकडे पण होतं. रविवारची सकाळची मस्त साखरझोप सोडून शाळेत जायचो चरफडत...
आणि इंजिनियरिंगच्या डिसेंबरातल्या परीक्षा तर पुण्याच्या थंडीत स्वेटर घालून, दुलई पांघरून आणि चहा पिताना झोप काढत अभ्यास करून दिल्या आहेत :)
-------------------------------------------------

अवांतर : बंगलोरात काल बर्फ पडला???!!!
काय सांगताय काय? मला कसं नाही कळलं ते? कुठल्या भागात?
म्हणा आम्ही पण खुराड्यातच होतो, त्यामुळे नसेल लक्षात आलं.

अवांतर : बंगलोरात काल बर्फ पडला???!!!

हो मंग !! आपले सुहास.. राव रात्रीच्या पार्टीसाठी सायकल वरुन बर्फ घेऊन चालले होते , स्पिडब्रेकर वरुन पडले .. तसा बर्फ पण पडला !!
सुहास..राव चु.भु.द्या.घ्या.

सर्व मायबाप वाचकांचे आभार . सविताच्या अपेक्षा पुर्ण करु न शकल्याचे शल्य बोचत राहिल ! पुढच्या लेखात अपेक्षा पुर्ण करु असे आश्वासन देऊन आभारप्रदर्शन संपवतो.

- ( पांढरी शाई म्हंटलं की ह्यांनी हायलाईट करुन पाहिलंच पाहिजे .. )

नरेशकुमार's picture

10 Dec 2010 - 6:23 am | नरेशकुमार

-( का करे, आदत से मजबूर हय )

बंगलोरात काल बर्फ पडला???!!! >>>

चिन्नास्वामीला भारत वि. किवीजच्या फट्याक करून चाललेल्या मॅचमध्ये अर्ध्या भारताने पाहिले असेल ते !!

@टार्‍या !!

हा हा हा

पार्टी नाही, प्यार्टी ! प्यार्टी !

नन्दादीप's picture

8 Dec 2010 - 12:58 pm | नन्दादीप

>>>>त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला. ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल .

हा..हा.. हा......भारी......

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2010 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार

'कडक' लेखन रे टारबा.

एकदम जुने दिवस आठवुन गेले :)

पुण्यातली थंडी हा आमचा पण वीक पॉईंट.
डोळे बंद ठेवूनही पुण्यात नेलेत तर पुण्याची हवा मी ओळखू शकतो.
अत्यंत वाचनीय लेख.

विजुभाऊ's picture

8 Dec 2010 - 1:31 pm | विजुभाऊ

डोळे बंद ठेवूनही पुण्यात नेलेत तर पुण्याची हवा मी ओळखू शकतो.

बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.

चिंतामणी's picture

8 Dec 2010 - 2:47 pm | चिंतामणी

बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.

पुण्यातील कुठल्या भागात आहोत. पण अख्या मुंबईत ह्या पेक्षा भारी वास येत असतो.

कल्याण ते CST सकाळी लोकल ने प्रवास केला , तर रेल्वे रुळांच्या दुतर्फी "खो खो" चे महा भव्य सामने भरलेले दिसतात ..................

मृत्युन्जय's picture

8 Dec 2010 - 5:54 pm | मृत्युन्जय

एक दुरुस्ती हे मुंबैत जागोजागी दिसते. गोदीमार्गे फोर्ट कडे गेलात तरी खाडीच्या बाजुने हेच दृष्य दिसते. आजुबाजुला मिठाचे ढीग देखील दिसतात. म्हणजे पांढरे ढीग असतात. माझा असा समज आहे की ते मीठ असते. चु भु द्या घ्या.

गवि's picture

8 Dec 2010 - 5:57 pm | गवि

कोणी मुंबईला भिकार म्हटलं की आपण दहा भिकार म्हणावं..

मुंबईविषयी अभिमान बाळगलाच पाहिजे असं नाही. म्हणजे मुंबईकर होण्यासाठी ही अटच नाहीये मुळी. ती अट पुण्याला..तिथे अभिमान पाहिजे..

- पु.ल. देशपांडे.

;)

मृत्युन्जय's picture

8 Dec 2010 - 6:03 pm | मृत्युन्जय

:). मला अगदी हेच आठवत होतं लिहिताना

हे लाख बोललात !!
अशा चर्चा सुरु झाल्या की हे वाक्य आठवतंच !!

माझा असा समज आहे की ते मीठ असते. चु भु द्या घ्या

हॅ हॅ हॅ

तिमा's picture

8 Dec 2010 - 7:24 pm | तिमा

आणि त्यांना आपण खो ही देऊ शकत नाही.
आमच्या मुंबईत फक्त दोनच वास येतात. एकतर सेंटचा किंवा गुवाचा. पण हे वास फक्त मुंबईबाहेरच्या लोकांनाच येतात कारण मुंबईकरांची नाके मरुन कैक वर्षे लोटली आहेत.

नंदन's picture

9 Dec 2010 - 1:13 am | नंदन

>>> पण हे वास फक्त मुंबईबाहेरच्या लोकांनाच येतात कारण मुंबईकरांची नाके मरुन कैक वर्षे लोटली आहेत
--- 'वासां'सि जीर्णानि यथा विहाय? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2010 - 6:10 pm | परिकथेतील राजकुमार

बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.

सहमत आहे.
पुण्याबाहेरुन आलेल्या काही लोकांमुळे झालय बघा हे सगळे :) येवढा त्रास असुन हे लोक अजुन पुण्यातच का खितपत पडतात काय माहिती ? जावे काश्मिरात, कन्याकुमारित :) गेला बाजार गुजरातेत तरी जावे.

येवढा त्रास असुन हे लोक अजुन पुण्यातच का खितपत पडतात काय माहिती ? जावे काश्मिरात, कन्याकुमारित गेला बाजार गुजरातेत तरी जावे

फक्त हगायला काश्मिरात?

राव रास महाग पडेल हो............
त्यापेक्षा लोकल कामंच बर......... ;)

अरे अरे पुण्यात वासाला सुद्धा नाक मुरडायचे नाही असा दंडक आहे की काय?
असो.
आता ठरवतोच णव्या व्हर्ष्यात पुण्यातल्या कुठल्याच गोष्टीना णावे ठेवायची णाहीत.
अवांतर : पुण्यात हल्ली पुरुषानी अंगभर सोने मिरवायची फ्याशन बोकाळली आहे. ( सहज पहायला जावा संगमवाडीत व्होल्वो जेथून सुटतात तेथे एक गृहस्थ अंगावर असेच किमान सात आठ किलोचे दागिने घालून बसलेले असतात )

चिंतामणी's picture

9 Dec 2010 - 1:37 pm | चिंतामणी

आता ठरवतोच णव्या व्हर्ष्यात पुण्यातल्या कुठल्याच गोष्टीना णावे ठेवायची णाहीत.

ही भीष्मप्रतीज्ञा आहे का? की अणेकजन दरवर्षी "सिग्रेट" अन "दारू" सोडायचे ठरवात (आनी फेल होतात) तसला संकल्प आहे?

<<<व्होल्वो जेथून सुटतात तेथे एक गृहस्थ अंगावर असेच किमान सात आठ किलोचे दागिने घालून बसलेले असतात )

महाभारतातली फ्याशन परत आणत असतील

sneharani's picture

8 Dec 2010 - 1:04 pm | sneharani

मस्त लिहल आहेस.
बालपणीच्या बर्याच आठवणी जाग्या झाल्या विशेषतः खोबरेल तेलाची!
:)

नगरीनिरंजन's picture

8 Dec 2010 - 1:06 pm | नगरीनिरंजन

कंसातल्या कुरकुरीत शेंगदाण्यांमुळे लेखाचा चिवडा लई चटकदार झाला आहे. :)
त्यातही "वातावरणिक अवांतरगिरी" वगैरे शब्द खरपूस भाजलेल्या खोबर्‍यासारखे. (हा चिवडा खाऊन वायूप्रदूषण होणार नाही हे नक्की).
अजून लिहा.

-(हिवाळा आवडणारा) गारझन

नितिन थत्ते's picture

8 Dec 2010 - 1:06 pm | नितिन थत्ते

मस्त लेख.

(आमच्या आवडत्या पावसाळ्याला नावे ठेवल्याबद्दल णिषेध).

बेसनलाडू's picture

8 Dec 2010 - 1:22 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

गणपा's picture

8 Dec 2010 - 1:11 pm | गणपा

छान :)

मृत्युन्जय's picture

8 Dec 2010 - 1:22 pm | मृत्युन्जय

उत्तम.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Dec 2010 - 1:22 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच! स्मृतिरंजक लेखन तुझा स्ट्राँगपॉइंट आहे. परत एकदा सिद्ध केलंस.

आमची शाळा सकाळी ७.१५ ला असायची. त्याकाळी मुंबईत पहाटे थंडी असायची. शाळेत जाताना रस्ताभर तोंडातून वाफा काढत जायचं. शाळेच्या एका बाजूला काही गावठी अशी घरं होती. त्यात एक गोठा होता. शेणाच्या गवर्‍या टाकून केलेली शेकोटी रात्रभर जळून मग नुस्ता धूर ओकत बसलेली असायची. तो धूर आणि थंडीमुळे आलेलं धुकं यामुळे सगळं वातावरण अगदी गूढ वाटायचं. त्यात परत सकाळी पहिला तास मास पीटीचा असायचा बरेच वेळा. शाळेत जाताना घातलेला स्वेटर काढून टाकायची पाळी यायची पीटीची धावपळ करून. एकदम फ्रेश वाटायचं.

थोडा मोठा झाल्यावर माळव्यातली थंडी बघायचा योग आला २-३ वर्षं. (एकदा अलाहाबादची पण बघितली.) त्या साईडला थंडी हा स्पेशल खाऊपिऊचा मोसम. अंधार लवकर. मग बाहेर पडायचे. सराफ्यात जाऊन हादडायचे. सावकाश घरी येऊन मग गप्पा हाणून झोपायचे. जेवण झाले की थंडी जास्त वाजते आणि पोटातून वाजते हे ज्ञान तेव्हाच मिळाले. आम्ही जेवायला बसायच्या आधी (दुपारीही) गाद्या / दुलया जय्यत तयारी करायचो. जेवण झाले रे झाले की मी आणि ताई डायरेक्ट दुलईखाली. आई बिचारी बेसिक मिनिमम झाकपाक करून मग यायची दुलईच्या आत. तव्यावरून काढलेली पोळी / गरम केलेलं तूप पानात यायच्या आत थंड होण्याचा चमत्कारही इथेच अनुभवला. स्वर्गच होता तो.

मग पुढे आखातातली थंडी बघितली. नुसती बघितली नाही तर चांगली हाडात जाऊन पोचली. उत्तर आखातात (सौदी / कुवेत) वगैरे भागात थंडी मजबूत. त्यात परत सन्नाट वारे. वाळूची / धूळीची वादळं. हे वादळ केवळ अनुभवायचा प्रकार आहे. सगळी घरं / कार्यालयं एसी असल्यामुळे अगदी हवाबंद असायची. पण त्यातूनही धूळ आत यायची आणि दिवसातून २-३ वेळा घर साफ करायला लागायचं. सतत वाहणारी जोरदार हवा त्या लहान फटीतूनही रामसेचित्रपटासारखा आवाज करत घुसत असायची. थंडीचे कपडे नीट असे त्याचवेळी वापरले जास्त. बोचरी थंडी. माळव्याच्या थंडीपेक्षा वेगळीच. माळव्यातली थंडी गुलाबी, सुखकारक. आखातातली मात्र एकदम त्रासदायक.

अवांतर: माझे लग्न ठरले तेव्हा माझ्या नात्यातल्या एका पोक्त बाईंनी 'उन्हाळ्यात अजिबात लग्न करू नकोस, थंडीचा मौसमच पाहिजे' असे बजावून सांगितले आणि मी ते अगदी मनापासून अंमलात आणले... त्या बाई आता आपल्यात नाहीत पण माझा दुवा कायमचा घेऊन आहेत. ;)

प्रदीप's picture

8 Dec 2010 - 7:21 pm | प्रदीप

लेखावरील तसाच तालेवार प्रतिसाद. दोन्ही आवडले.

तव्यावरून काढलेली पोळी / गरम केलेलं तूप पानात यायच्या आत थंड होण्याचा चमत्कारही इथेच अनुभवला.

ह्यावरून आचार्य अत्र्यांच्या एका विनोदाची आठवण झाली. 'मोरूची मावशी' मधील एक पात्र 'लंडनमधील थंडी' विषयी वर्णन काहीसे असे करते: ' अहो, थंडी, थंडी म्हणजे किती असावी? नुसता शब्द तोंडातून बाहेर पडला रे पडला की त्याचे बर्फ झालेच समजा!'

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Dec 2010 - 8:35 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद हो दा!!!

दिपक's picture

8 Dec 2010 - 1:24 pm | दिपक

क्लास लेख !!

थंडीसारखा बोचरे चिमटे काढुन हसवणरा तसाच शेकोटीसारखा आठवणींच्या मायेची ऊब देणारा.

छोटा डॉन's picture

8 Dec 2010 - 1:26 pm | छोटा डॉन

मस्त लेख आहे रे टारबा,

साला थंडीची आम्हाला एकच गोष्ट वारंवार आठवते ती म्हणजे रोज सकाळी झोपेतुन उठताना 'अजुन अर्धा तास झोपलो असतो तरी चालल' ही इच्छा होते.
तुमच्या त्या शेकोट्या वगैरे सगळे मान्य असले तरी निवांत झोपुन राहण्यासारखे सुख कशातच नाही ;)

- छोटा डॉन

सूड's picture

8 Dec 2010 - 1:33 pm | सूड

छान लेख !!

योगेश सुदाम शिन्दे's picture

8 Dec 2010 - 1:35 pm | योगेश सुदाम शिन्दे

गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ...
इकडे चेन्नैत ४ उन्हाळे असतात...
सध्या पहिल्या उन्हाळ्यात पाउस पडतोय...
हल्ली कुठल्या सीझन मध्ये कुठला सीझन मिक्स होईल सांगता येणे कठीण आहे बाबानु...
तव्हा तुमी मजा लुटा हिवाळ्याची ...

सूड's picture

8 Dec 2010 - 1:35 pm | सूड

छान लेख !!

योगेश सुदाम शिन्दे's picture

8 Dec 2010 - 1:38 pm | योगेश सुदाम शिन्दे

गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ...
इकडे चेन्नैत ४ उन्हाळे असतात...
सध्या पहिल्या उन्हाळ्यात पाउस पडतोय...
हल्ली कुठल्या सीझन मध्ये कुठला सीझन मिक्स होईल सांगता येणे कठीण आहे बाबानु...
तव्हा तुमी मजा लुटा हिवाळ्याची ...

आत्मशून्य's picture

8 Dec 2010 - 2:33 pm | आत्मशून्य

जबराट झाला....

आत्मशून्य's picture

8 Dec 2010 - 2:34 pm | आत्मशून्य

जबराट झाला.... आणी हो तूम्हल पण णमस्कार्स

इंटरनेटस्नेही's picture

8 Dec 2010 - 2:53 pm | इंटरनेटस्नेही

लेख आवडला, मस्त आहे. टारझन यांचा हात स्मृतीरंजनात्मक लेखनात कोणीही धरु शकणार नाही.

हा प्रतिसाद देताना मी केलेलं शीघ्र काव्य:

तु थंडी मी वोडका,
तु संधी, मी चान्स मारु का? ;)

-
(महाकवि) इंटेश.

नगरीनिरंजन's picture

8 Dec 2010 - 3:30 pm | नगरीनिरंजन

>>टारझन यांचा हात स्मृतीरंजनात्मक लेखनात कोणीही धरु शकणार नाही.
सहमत आहे.
विशेषतः "एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची. पण खुप मज्जा यायची." असं वर्णन केल्यावर तर त्यांचा हात कोणीही धरणार नाही. ;-)

इंटरनेटस्नेही's picture

8 Dec 2010 - 4:08 pm | इंटरनेटस्नेही

=)) =)) =))

आमोद शिंदे's picture

8 Dec 2010 - 9:42 pm | आमोद शिंदे

सहमत आहे. त्याही पुढे जाऊन मी असे म्हणून इच्छीतो की हातच काय, टारझन ह्यांचे कशातच कुणीही काहीही धरू शकणार नाही.

टारझन's picture

8 Dec 2010 - 10:00 pm | टारझन

अरे अरे भरेल ... ...... भंर्रलं .. सांगत होतो जास्त पुढं नगं जाऊस ...लवकर धु .. नैतं वाळेल =))

पियुशा's picture

8 Dec 2010 - 3:37 pm | पियुशा

मस्त मस्त मस्तच! :)

प्राजक्ता पवार's picture

8 Dec 2010 - 4:30 pm | प्राजक्ता पवार

छान :)

सूर्यपुत्र's picture

8 Dec 2010 - 6:07 pm | सूर्यपुत्र

की-बोर्डावर बोटं सहजपणे थिरकली की.... नेहमीप्रमाणेच खुमासदार लेख.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Dec 2010 - 6:45 pm | निनाद मुक्काम प...

@तर फॉरिन ची थंडी आम्ही अनुभवली नसल्याने
हि अनुभवायची नाही साहेब भोगायची असते. .
मुंबईत एकेकाळी थंडी असावी ह्या संशयास वाव आहे कारण शाळेत शिकलेलो मर्ढेकरांची पितात सारे गोड हिवाळा हि नितांत सुंदर कविता .
सध्या नवीन घरातून आल्प्स दिसतात .(तेच ते यश व करण आपल्या सिनेमातून नेहमी दाखवतात ते ) आम्ही पाणी देखील त्याच्या वितळलेल्या ग्लेसियर चे पितो .(निदान त्या कंपनीचा तसा दावा आहे .)
लेख मस्तच झालाय
त्यावरून गाणे सुचले (थंडीचा महिना झटापट शेकोटी पेटवा .सख्याला निरोप पाठवा .मला लागलाय खोकला )
किंवा आताचे माघाची हि थंडी जीव माझाला जाळी
घेऊ नका राया आता राया तुम्ही रोज रात पाळी.
उणे १० मध्ये काकडत सभोवतालीचे जग पांढरट झाल्याचे पाहून टक्कुर अमंळ फिराया लागलाय .

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 7:32 am | शिल्पा ब

आपण परदेशात असून बाटलीतले पाणी पिता अन घरातून कुठलासा डोंगर दिसतो याची दखल घेतली आहे.

स्पा's picture

9 Dec 2010 - 9:02 am | स्पा

+१

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 12:18 am | निनाद मुक्काम प...

त्याचे काय आहे येथे पाणी ३ प्रकारात मिळते १) स्टील म्हणजे साधे २) स्पार्कलिंग म्हणजे वायुमिश्रीत अर्थात बुद्बुड्याचे म्हणजे सोड्यासारखे ते आम्ही बाटलीतून पितो (साध्या पाण्याच्या वाटेला युरोपियन सहसा जात नाही .३) फ्लेवर मिश्रित म्हणजे ह्या पाण्यात स्ट्रो बेरी अथवा लिंबाची व अनेक प्रकारच्या फळांची चव असते .तेही हौस म्हणून पितो कधी कधी दिवसाचा अर्धाहून जास्त काळ पंचाताराकीत वातावरणात काम करताना जातो .तिथे सर्व फुकट असते .(म्हणजे आमच्या बापाचे )मग घरी आल्यावर तेच चोचले आम्ही पुरवायचा प्रयत्न करतो )
बाकी लहानपणी डोंबिवलीच्या गच्चीतून र मुंब्र्याचा डोंगर दिसायचा .दिसायचा त्या डोंगरावर एक मंदिर आहे .(आता पक्की पायवाट आहे )पूर्वी लहानपणी कच्या वाटेवरून जायला खुप धमाल यायची

रामदास's picture

8 Dec 2010 - 7:10 pm | रामदास

झाल्यामुळे हिवाळ्याच्या फारशा आठवणी काही सांगता येणार नाहीत .
पण त्यांचा एक मित्र म्हणायचा त्या ओळींशी ते सहमत आहेत.
जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर
आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को
औंधे पड़े रहे कभी करवट लिये हुए
दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन...

आमच्या अफ्रिकेत फक्त ड्राय आणि वेट हे दोन च ऋतु असत हे गमतीदार वाक्य आहे.
टारझन ,अभिनंदन .सुंदर लेख आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Dec 2010 - 8:36 pm | बिपिन कार्यकर्ते

जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर
आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को
औंधे पड़े रहे कभी करवट लिये हुए
दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन...

वाहव्वा!!!

विकास's picture

8 Dec 2010 - 11:41 pm | विकास

अगदी हेच गाणे मला असे वाचताना/अनुभवताना आठवते. विशेष करून आता आजूबाजूला बर्फ असला की, मात्र त्यातील "बर्फिली सर्दीयोंमे किसिभी पहाड पर, वादी मे गुंजती हुई खामोशिया सुने, आँखोमे भिगे भिगे से लमहे लिये हुए..." ह्या ओळी एक अस्वस्थता आणतात.

मुंबईकरांची थंडी आणि पुणेकरांचा पावसाळा अंमळ गंमतशीर असतात असे वाटते...

बाकी हा लेख नृत्य आणि सद्भावना या कॅटॅगरीज मधे का टाकला आहे बरे?

नंदन's picture

9 Dec 2010 - 1:19 am | नंदन

ह्याच ओळी आठवत होत्या, लेख वाचताना. बाकी शनिवार सकाळच्या पीटीच्या तासाचा जाचपण तसाच.

अवांतर - १९८९-९० च्या सुमारास मुंबैत सुद्धा चक्क १० डिग्री सेल्सियस पर्यंत तपमान गेल्याचं आठवतं.

चांगलं लिहिलयस रे टार्‍या!
खी खी करून हसत होते.
पावसाळा म्हणजे आमचा णावडता ऋतु ( काही विशेष प्रसंग सोडले तर )
हे विशेष प्रसंग कोणते बुवा?
खाणदाणी बंब
खी खी खी
टेरेसचा दरवाजा जाळायचं काम फक्त तूच करू शकतोस.
निदान विचारायचं घरी ......

स्पंदना's picture

8 Dec 2010 - 8:24 pm | स्पंदना

थंडीत आमची शाळा बाहेर भरायची. मजा यायची. भरीत भर म्हणुन पी टी करुन अंगात ली थंडी घालवायचा दुष्ट प्रयत्न आमचे सर करायचे. हॅ थंडी काय घालवायची गोष्ट आहे? अरे ती तर अश्शी हात काखेतघालुन स्वतःच स्वतःला गच्च पकडुन ठेवायची गोष्ट आहे नाही का?

लेख अप्रतिम!

मेघवेडा's picture

8 Dec 2010 - 8:34 pm | मेघवेडा

छान :)

ऋषिकेश's picture

8 Dec 2010 - 10:06 pm | ऋषिकेश

अरेच्या .. टारोबा गेल्याचे जसे मला जालावर येणे जमत नसताना घडले तसेच त्याचे येणे घडलेले दिसते.
असो.. री-वेलकम :)
लेखन आवडले.. (फक्त टार्‍याच्या मानाने अगदी 'साजुक' लेख आहे :) )

माजगावकर's picture

8 Dec 2010 - 11:24 pm | माजगावकर

एकच नंबर लेख!!

त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला.

( कुठे ? असे प्रश्न व्यनि तुन विचारावेत म्हणजे मोकळेपणाने बोलता येइल )

एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची

हापिसात लोकं बघायला लागली राव माझ्याकडं... :)

धनंजय's picture

9 Dec 2010 - 12:53 am | धनंजय

हिवाळ्याच्या शुभेच्छा.

गोव्यात (बहुधा डिसेंबर १९८३ मध्ये) एकदा भल्या पहाटे १८ डिग्री सेल्सियस तापमान होते, ते मी खुद्द अनुभवलेले आहे. हिवाळ्यात रोज सकाळी आई अंगावर बळेच स्वेटर घालत असे. थोड्याच वेळात घाम फुटे आणि स्वेटर काढून टाकावा लागे. त्या दिवशी अगदी शाळेत पोचेपर्यंत मी स्वेटर काढून टाकला नाही! अशी शोल्लेट थंडी. आणि तुम्ही कसल्या गप्पा मारून र्‍हायला राव!

संदीप चित्रे's picture

9 Dec 2010 - 1:05 am | संदीप चित्रे

पुण्याच्या गुलाबी थंडीची मजाच वेगळी असते यार !
पण मित्रा, पुण्याचा पाऊसही तेवढाच रोमँटिक आहे रे...
च्यायला इथे पाऊस पडला की हाडापर्यंत थंडीच जाते !!

ठीक ठाक.... नेहमी सारखा नाही जमला........

तुमचे याच्यापेक्षा जास्त चांगले स्मृतीरंजनात्मक लेखन वाचले आहे..... त्यामुळे अपेक्षा कदाचित जास्त आहेत...

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 7:35 am | शिल्पा ब

आधी मला वाटलं मला लागलाय खोकला या लावणीवरच लेख लिहिला आहे काय..आपले स्मृतिरंजन आवडले.

गुंडोपंत's picture

9 Dec 2010 - 8:59 am | गुंडोपंत

जिवणशैली बदलली , राहिल्या त्या आठवणी . अगदी खरं बोललास रे टारोबा! छान जमला आहे लेख. आवडला.

आमच्या नाशकात नोटांचा छापखाना.
तेथे प्रेस चे कामगार नाशकाची कडक थंडी पळवायला चक्क नोटा जाळायचे.
म्हणजे नोटांची शेकोटी. हल्ली करतात की नाही माहिती नाही पण २० वर्षांपूर्वी तरी करत.
हल्ली थंडीही तशी राहिली नाही म्हणा...

राजा's picture

9 Dec 2010 - 10:43 am | राजा

गुंडोपंत साहेब माझ्या महिती प्रमाणे प्रेस चे कामगार थंडी पळवायला नोटा साईड ने कट करताना जो भाग शिल्लक रहायचा ती उरलेली (Side Scrap) जाळायचे. नोटा नाहित उगाच गैरसमज नको.

नोटप्रेस शेजारी राहिलेला व नोटप्रेस बघितलेला
आपला
राजा

गुंडोपंत's picture

9 Dec 2010 - 10:59 am | गुंडोपंत

मी प्रेस मध्ये कधी काम केले नाही. काही जण होते पण त्यांची आपली मैत्री पिण्यापुरती... त्यात आइकलेल्या गोष्टी. त्यामुळे सत्यते विषयळेशंका घ्यायला रास्त जागा आहे.
निट प्रिंट न झालेल्या नोटा जाळायचे अशी माझी आपली ऐकीव माहिती.

तुम्ही पाहिल्या असतील तर तुमचे खरे!
माझी काही हरकत नाही. :)

तेथे प्रेस चे कामगार नाशकाची कडक थंडी पळवायला चक्क नोटा जाळायचे.
म्हणजे नोटांची शेकोटी. >>>>>>>>>>
>>>>>>>>>>

??????????? !!!!!!!!!!!!!!!!!
Ripley's Believe it or not?

बद्दु's picture

9 Dec 2010 - 11:31 am | बद्दु

हिवाळ्यातली भट्टी जशी हवीहवीसी वाटते तसाच वाफाळलेला चहा सुद्धा..चहाचा उल्लेख न आल्यामुळे अंमळ निराश झालो. बाकी भट्टी छान जमली.

प्रभो's picture

9 Dec 2010 - 12:46 pm | प्रभो

मस्त बे!!!

उपास's picture

10 Dec 2010 - 8:28 am | उपास

मस्तच टार्‍या..
पुण्यातली थंडी अनुभवलि (आणि उपभोगलीही) एक वर्ष.. सकाळी कडक थंडीत ४ वाजता पेठेत अमृततुल्य पिऊन.. जवळच्या गल्लीतल्या पारिजातकाच्या दवात भिजलेल्या सड्याचा मनसोक्त वास घेतला की बाईक टाकायची सिंहगडाच्या पायथ्याशी.. वाटेत गावात पेटलेल्या बंबांवर हात गरम करुन घ्यायचे.. तेथे पोहोचलं कि चढायला सुरुवात करायची आणि सूर्योदयाची मजा लूटत वरती सरबताला गडावर साडे सहा पर्यंत पोहचायचं.. ह्याच नाव ते..
बरं, पण पाऊस म्हटला तर मुंबईचाच.. तो खवळलेला समुद्र, उस्ळणार्‍या लाटा, नरीमन पॉईंटचा बांध... के सी कॉलेज चुकवून तेथे पावसात केलेले कित्येक उद्योग इसका तो कोई जवाब नाही.. मुंबईचा पाऊस पहायाचा असेल तर अमिताभ आणि मौसमीच्या 'रिमझिम गिरे सावन' मध्ये.. अहाहा क्या कहने!!
तुझे लेख नेहमिच नॉस्टेल्जिक (अचूक मराठि प्रतिशब्द?) करतात बघ..