तुझे  माझे  गुलाबाचे
  जुळ्लेच नाही  नाते
  गुलाबाच्या गंधाहून
  काट्याचीच  ओढ वाटे
  मैत्री मध्ये आपुल्या या
  भांडणच होती फार
  रुसुनिया  कित्येकदा
  शब्दांचीच  मारामार
  गुलाबाचे फुल देता
  काटे तुला बोचतात
  शब्द तुझे प्रेममय
  रातदिन टोचतात
  शब्दाविना फुलाविना
  तुझे माझे आहे नाते
 म्हणुनच गुलाबाच्या
  काट्यांचीही  ओढ वाटे
        
  
प्रतिक्रिया
29 May 2008 - 7:33 pm | चेतन
तुझे माझे गुलाबाचे
जुळ्लेच नाही नाते
गुलाबाच्या गंधाहून
काट्याचीच ओढ वाटे
सुंदर लिहलयं
पु. ले. शु.
काटाप्रेमी चेतन
30 May 2008 - 12:40 am | वरदा
शेवटचं कडवं छान आहे