एक होता विदूषक

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
29 Nov 2010 - 12:21 pm

एक आटपाट नगर होते. नगर तसे संपन्न, नगराला लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला होता. खरेतर सरस्वतीने जरा सढळ हातानेच इथे खर्च केला होता. नगरात मोठा मोठे थोर कलाकार, वादक, लेखक, कवी, गायक, नकलाकार निवास करत होते. ह्या हरहुन्नरी लोकांना त्यांच्या राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यात देखील मोठे नाव होते, सन्मान होता. ह्या अशा नगरात काही नगरकंटक देखील होते पण ते सुग्रास जेवणात मेथीचा खडा यावा इतपतच, आणि खरेतर आरोग्याला गरजेचे.

ह्या नगरात एक विदूषक राहायचा. आपली कामे सांभाळून झाली की मग नगराच्या मुख्य चौकात यावे आणि खेळाला सुरुवात करावी हा त्याचा नेहमीचा उद्योग. कधी नकला कर तर कधी विनोद सांग, कधी कोणाचे विडंबन करून लोकांना हसव अस त्याचा उद्योग, खरेतर छंदच म्हणाना. ह्या बदलात दोन कौतुकाचे बोल आणि पाठीवर एखादी शाबासकीची थाप ह्याशिवाय आधिक कसलीच अपेक्षा विदूषकाने केली नाही. आटपाट नगराचे नाव मोठे व्हावे, त्यात आपला थोडा हातभार लावावा अशीच कायम त्याची इच्छा.

एक दिवशी अचानक चक्रे फिरली आटपाट नगराच्या राजाला पदावरून पायऊतार व्हावे लागले. नवीन राजा सिंहासनावर आरूढ झाला. जुना राजा मोठा दर्दी, हरहुन्नरी. तोंडाचा थोडा फटकळ पण योग्य माणसाची कदर जाणणारा होता. स्वतः एक कलाकार असल्याने साहित्याची, कलेची जाण असणारा होता. नवीन राजा देखील मोठा हरहुन्नरी, कलेची जाण असणारा पण कामात व्यस्त असणारा होता. जुन्या राजाकडे एकाच राज्याची जबाबदारी होती मात्र नवीन राजाकडे अनेक राज्यांच्या जबाबदाऱ्या असल्याने नवीन राज्याला देण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध न्हवता. नवीन राज्याची घडी आपणाला हवी तशी बसवण्यासाठी मोकळा वेळ मिळेपर्यंत जुन्याच राजाच्या मंत्रिमंडळाकडे कारभार सोपवावा असे नवीन राजाने ठरवले. थोडेफार जुजबी बदल करून त्याचे जुन्याच मंत्र्यांकडे राज्याचा कारभार सोपवून टाकला. झाले इथेच एका दुष्टचक्राची सुरुवात झाली....

जुन्या मंत्रिमंडळात काही सभासद ज्येष्ठतेमुळे काही निष्ठेमुळे तर काही त्यांच्या ज्ञानामुळे सामील करण्यात आले होते. नवीन राजाने सर्वांना तसेच कायम ठेवले आणि वर काही अधिक अधिकार देखील बहाल केले. मंत्रिमंडळातील काही चाणाक्ष सदस्यांनी हि कशाची नांदी आहे ते ओळखले आणि आपला पूर्वीचा स्वभाव बदलून जनतेशी अगदी आपुलकीने वागायचे धोरण सुरू केले. काही मंत्री हे सत्ता असली काय नसली काय, कायमच चांगुलपणाने वागणारे असल्याने त्यांना विशेष असा फरक पडलाच नाही. मात्र अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या काही मंत्र्यांना मात्र स्वर्ग जणू दोन बोटे उरला. आपल्याला मंत्रिमंडळात कायम ठेवून वर विशेष अधिकार दिले हा आपल्या ज्ञानाचा आणि ज्येष्ठतेचा अधिकारच होता असेच जणू त्यांना वाटू लागले. त्यात राजा अधेमधेच राज्यात येत असल्याने हे मंत्री स्वतःला प्रतिराजाच समजू लागले. पूर्वीच्या मग्रुरीत आणि आकसात आता दुपटीने वाढ झाली. हे सर्व पाहून काही चाणाक्ष मंत्री आधीच मंत्रिमंडळातून आपणहून दूर झाले. पण ह्याचा उलटा परिणाम म्हणजे आता ह्या उद्दाम मंत्र्यांना कोणाचाच धाक उरला नाही. 'हम करे सो कायदा' ह्या प्रकारात राज्याचा कारभार त्यांनी हाकायला सुरुवात केली. वेळेला आडव्या येणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना देखील न जुमानण्याची रीत त्यांनी रूढ केली.

जनता बिचारी राज्याचा उत्कर्ष होत आहे ह्याच समजुतीवर खूश होती. आपण बरे आपले काम बरे.. चार घटका काम करावे दोन घटक विरंगुळा मिळवावा असे त्यांचे नेहमीप्रमाणे जीवन सुरू होते. मात्र अचानक ह्या सुखी जीवनावर संक्रांत कोसळली. अधिकार हातात येताच काही जुने हिशेब चुकते करण्यात गुंतलेले मग्रूर मंत्री आता मोकळे झाले होते. आता ह्या मंत्र्यांच्या गटाने आपला मोर्चा सामान्य जनतेकडे वळवला. हुशार, मनमिळाऊ आणि जनतेच्या मनात आपले स्थान राखून असलेल्या कलाकारांवर त्यांनी वेचून वेचून हल्ले करायला सुरुवात केली. ह्या कलाकारांच्या गायन, वादन, लिखाण ह्या सारख्या कलांवर बंदी आणण्यात आली. कधी सरळ सरळ तर कधी उघडपणे त्यांच्या अपमानास सुरुवात झाली. ह्याचवेळी आपल्या बगलबच्च्यांना मात्र सुरक्षीतपणे पंखाखाली घेण्यास हे मंत्री विसरले नाहीत.

ह्यासर्व प्रकारापुढे शरणागती पत्करून काही कलाकारांनी आपल्या कलेलाच तिलांजली दिली तर काहींनी दुसऱ्या नगराची वाट धरली, तर काहींनी मंत्री गटाला खूश करणारे लेखन, गायन, वादन सुरू केले. आजूबाजूच्या ह्या परिस्थितीत विदूषक अजूनही जनतेसाठी थोडाफार विरंगुळा निर्माण करत होता. विदूषक त्याचे काही मित्र अजूनही ही परिस्थिती बदलेल, निदान आपल्या सारख्या अतिसामान्य माणसांना तरी त्याची झळ पोचणार नाही अशी आशा करत होते. पण हळूहळू विदूषकाच्या एकेक मित्राचा नंबर लागायला सुरुवात झाली. कधी चोर म्हणून तर कधी नगरी कंटक म्हणून अवहेलना सुरू झाली....

अशाच दूषित वातावरणात एक दिवशी नेहमीप्रमाणे विदूषक आपली कला साकारायला बाहेर पडला. नेहमीप्रमाणे नगराच्या मुख्य चौकात जाऊन त्याने आपला खेळ सुरू केला. हळूहळू नागरिकांची गर्दी होऊ लागली. कोणी ओरडून प्रोत्साहन देत होते तर कोणी विशिष्ट नकलेची मागणे करत होते. कोणी खेळ फसतोय विदूषक चुकतोय असा गल्ला करत होते. एकूण मनोरंजनाची लाट जोरात चालू होती. अचानक 'खेळ बंद करा, खेळ बंद करा' अशा आरोळ्या उठल्या. बघावे तो काही मग्रूर मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे खेळाच्या ठिकाणी हजर झाले होते आणि गलका करत होते. हुशार नागरिक पुढे काय होणार हे ओळखून आधीच मागच्या मागे गायब झाले, तर इतर काही गंमत बघत तिथेच उभे राहिले. विदूषक मोठ्या नम्रतेने मंत्र्यांना समोरा गेला. त्याचे हात जोडून मंत्र्यांना "खेळ आवडला नाही का?" असे विचारले.

"हे पाहा रे दळभद्र्या, ह्यापुढे ह्या मुख्य चौकात कुठला खेळ चालावा आणि कुठला नाही ते आम्ही ठरवणार. तुझा हा खेळ अतिशय हिणकस व निरस आहे तेव्हा तो बंद कर.. बंद कर काय, आम्ही बंद केलाच आहे! तेव्हा चंबूगबाळे आवर आणि चालता हो. " मंत्री गरजले.

"पण मंत्रीजी तुम्ही स्वतः आजवर कधी कुठल्या वाद्याला हात लावला नाहीत की कधी कुठले गाणे गुणगुणले नाहीत. स्वतःच्या पगारपत्रका शिवाय बहुदा कधी काळी तुम्ही कुठे चार अक्षरे देखील खरडलेली नाहीत. असे असताना ह्या कलांचा अनादर करण्याचा, त्यांचा सकस-निरस ठरवायचा तुम्ही प्रयत्न का करत आहात? केवळ सत्तेवर आहात म्हणून? पण मग सामान्य जनतेला काय हवे आहे ते तिला कधी ठरवायला मिळणार? " विदूषकाने नम्रतेने विचारले.

"सामान्य जनतेला काय हवे आणि काय नाही ते आम्ही ठरवणार! कारण ह्या सामान्य जनतेचे स्वामी आम्ही आहोत. ह्या पुढे जनतेने काय वाचावे, ऐकावे आणि पाहावे हे आम्ही ठरवणार. जे आम्हाला योग्य वाटेल तेच जनतेसाठी योग्य. आणि तुला जर येवढीच फुशारकी असेल तर तुझे ते थोबाड रंगवण्याचे साहित्य घे आणि दुसऱ्या नगराकडे कुच कर. तिथे तुझ्या ह्या फालतू कलेचे कदाचित होईल कौतुक. "

मंत्र्यांच्या ह्या बोलाने वर्मी घाव घातल्यासारखा विदूषक कळवळला. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य फुटले.. जे थांबता थांबेना.

"काय रे नकल्या, तू काय वेडा झालास का काय? "

"नाही मंत्रीजी. मी विचार करत होतो की तुम्ही आत्ताच म्हणालात की कदाचित दुसऱ्या नगरात माझे कौतुक होईल, माझ्या फालतू कलेचे कौतुक देखील होईल. ह्याचाच अर्थ, फालतू का होईना पण माझ्या जवळ काही कला तरी आहे. ह्या नगराबाहेर ओळखणारे चार जण तरी आहेत. पण तुमचे काय मंत्रीजी? ह्या नगराबाहेर काळे श्वान तरी तुम्हाला ओळखते का? नगराबाहेरचे सोडा मंत्रीजी पण अहो कालच्या राजाची परिस्थिती बदलायला जिथे आज वेळ लागला नाही तिथे तुमचे काय? उद्या जेव्हा ह्या पदावरून पायऊतार व्हावे लागेल तेव्हा ज्या मिजाशीने ह्या जनतेत वावरत आहात तीच्या समोर खंबीरपणे उभा राहायची ताकद तुमच्यात असेल का? आज ज्यांची तोंडे रंगवत आहात त्यांच्या तोंडासमोर उभे राहायची तरी हिंमत अंगात असेल काय? वेळ बदलायला वेळ लागत नाही मंत्रीजी. आज ज्यांच्यावर वार करत आहात, उद्या वेळ बदल्यावर त्यांचे वार झेलायची देखील तयारी ठेवा. तेव्हा हात पाय थरथरू देऊ नका. संधी प्रत्येकाला मिळते, आणि ज्यादिवशी तुमची वेळ बदलेल त्या दिवशी सगळ्यात पहिला वार ह्या विदूषकाचा असेल. "

येवढे बोलून अतिशय शांतपणे विदूषक आपल्या घराकडे मार्गक्रमण करू लागला.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

29 Nov 2010 - 12:37 pm | विजुभाऊ

चला पॉपकॉर्न घेऊन या
लेखातली भाषा काही लोकांना चांगली झोंबणार
लेख इथे किती वेळ टिकतोय ते पहायचे.
सम आर मोअर इक्वल च्या जमान्यात इतका मोकळेपणा ?

अप्पा जोगळेकर's picture

29 Nov 2010 - 6:27 pm | अप्पा जोगळेकर

लेख इथे किती वेळ टिकतोय ते पहायचे.
अगदी अगदी. हाच विचार करतोय. पर्‍याचा टार्‍या तर होणार नाही ना असा विचार करतोय.

मी-सौरभ's picture

29 Nov 2010 - 7:11 pm | मी-सौरभ

होऊ नये म्हणून शुभेच्छा....
राजा तूच आता तारणहार.....

नरेशकुमार's picture

29 Nov 2010 - 12:44 pm | नरेशकुमार

congres आहे हे सरकार. खरच वाईट वाटत, ते. असे इथे मान्ड्तात.

नरेशकुमार's picture

29 Nov 2010 - 12:47 pm | नरेशकुमार

विदूषकआने क्रन्तिवाद आनि गान्धिवाद एकत्र करुन करावा. मजा आवेल.

स्पंदना's picture

29 Nov 2010 - 12:52 pm | स्पंदना

>>>जुना राजा मोठा दर्दी, हरहुन्नरी. तोंडाचा थोडा फटकळ पण योग्य माणसाची कदर जाणणारा होता. स्वतः एक कलाकार असल्याने साहित्याची, कलेची जाण असणारा होता>>>>

पराशी सहमत.

परा भाउ चरचर कापत गेलाय लेख . आणखी एक लिहायच राहिल तुमच सर्वात खोल ज्ञानी विदुषक असतो, अन म्हणुनच तो जनतेला हसवु शकतो.

स्वानन्द's picture

29 Nov 2010 - 12:56 pm | स्वानन्द

वा व्वा ! अतिशय बाणेदार उत्तर दिले विदुषकाने!... चांगला होता बिचारा :(

अवलिया's picture

29 Nov 2010 - 1:02 pm | अवलिया

विदुषकाच्या आत्म्याला सद्गती लाभो.

आत्म्याला सद्गती?

अहो विदुषक तर घरी गेला अस म्हणतात पराभाउ!

ह एक प्रश्न राहिला विचारायचा पराजी ' विदुषकाला तो विदुषक आहे हे माहीत होत का? की आपण बोलेल त्याला, करेल त्याला लोक हसतात , याचा मद चढुन तो समान्य जनांच्या टोपल्या उलट , सरळ चाललेल्ल्याला टांग घाल असे उद्योग करायला लागला होता? नाही. काय होत कधी कधी माणसाला विसर पडतो आपण कुठे आहोत वा आपण सामान्य जनांना छळुन , आपल्या लोकप्रियतेचा अवास्तव फायदा घेत आहोत. मग कुणाला टोमणे मार , कुणी नवीन आला त्याला फुकट धमकाव असे प्रकार कधी कधी होतात. जरा सव्विस्तर लिहिल तर आम्ही सामान्य जन निवाडा करु.

सविता's picture

1 Dec 2010 - 4:38 am | सविता

ह्याबद्दल १०००००% सहमत....

स्वतःला विदुषक म्हणवणारे बर्‍याच वेळा.... नगरात नवीन येणार्‍या लोकांना पायात पाय अडकवून पाडणे...आणि बघ्यांचा हशा मिळवणे इत्यादी कामात व्यस्त दिसतात.

विनायक प्रभू's picture

29 Nov 2010 - 1:07 pm | विनायक प्रभू

हम्म

ढब्बू पैसा's picture

29 Nov 2010 - 2:04 pm | ढब्बू पैसा

एकदम तिखट लेख!

मन१'s picture

29 Nov 2010 - 2:23 pm | मन१

आपलाच मनोबा.

सिद्धार्थ ४'s picture

29 Nov 2010 - 5:37 pm | सिद्धार्थ ४

details मिळ्तील का?

राजा's picture

29 Nov 2010 - 2:42 pm | राजा

तेव्हा चंबूगबाळे आवर आणि चालता हो.
म्हणजे काय हो ? चपला घालुन का ?

नितिन थत्ते's picture

29 Nov 2010 - 2:47 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.
मंत्रीमंडळ सोडलेले मंत्री कोण हे कळले नाही.

अवलिया's picture

29 Nov 2010 - 3:03 pm | अवलिया

हेच म्हणतो.

स्वगत - जुने मंत्री अजुन कार्यालयात येवुन फायलींवर शेरे मारतात किंवा पानं गहाळ करतात अशी "आदर्श सोसायटी" फायलींबाबत तक्रार पोलीसांकडे आलेली आहे

इंटरनेटस्नेही's picture

29 Nov 2010 - 3:08 pm | इंटरनेटस्नेही

कथा अतिशय आवडली. कथेची भाषाशैली, प्रतिमा-रुपक अत्यंत योग्य, कथा परिकथेतील राजकुमार यांच्यासारख्या एका एक्सपर्ट लेखकाने लिहल्याचे प्रत्येक शब्दाशब्दातुन जाणवते आहेच.

काही विशेष आवडलेली वाक्ये:

जुना राजा मोठा दर्दी, हरहुन्नरी. तोंडाचा थोडा फटकळ पण योग्य माणसाची कदर जाणणारा होता. स्वतः एक कलाकार असल्याने साहित्याची, कलेची जाण असणारा होता.

वेळ बदलायला वेळ लागत नाही मंत्रीजी. आज ज्यांच्यावर वार करत आहात, उद्या वेळ बदल्यावर त्यांचे वार झेलायची देखील तयारी ठेवा. तेव्हा हात पाय थरथरू देऊ नका.

संधी प्रत्येकाला मिळते, आणि ज्यादिवशी तुमची वेळ बदलेल त्या दिवशी सगळ्यात पहिला वार ह्या विदूषकाचा असेल.

राज्याची दिवसेंदिवस अधोगती होत चालली आहे त्याला बर्‍याच अंशी हे मंत्रीमंडळ आणि त्याही पेक्षा जास्त त्यांची बगलबच्ची मंडळी कारणीभुत आहेत असे मला देखील वाटते.

-
(स्पष्टवक्ता) इंटरनेटस्नेही.

आत्मशून्य's picture

29 Nov 2010 - 5:09 pm | आत्मशून्य

:.....

निवेदिता-ताई's picture

29 Nov 2010 - 5:35 pm | निवेदिता-ताई

एकदम छान............

प्राजक्ता पवार's picture

29 Nov 2010 - 5:44 pm | प्राजक्ता पवार

लेख छानंच .

'संधी प्रत्येकाला मिळते, आणि ... '
- सहमत .

डावखुरा's picture

29 Nov 2010 - 5:58 pm | डावखुरा

थोडं फार समजतंय....

पर्नल नेने मराठे's picture

29 Nov 2010 - 6:30 pm | पर्नल नेने मराठे

परा तुझ वय किति लिहितोस किति.....

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 5:20 am | मिसळभोक्ता

आज पहिल्यांदा चुचु ताईंशी सहमत असे लिहायची वेळ आलीये.

आमोद शिंदे's picture

29 Nov 2010 - 7:15 pm | आमोद शिंदे

या सग्ल्याला कारन चोता दोन आह्ते.
विदुश्काला मन्त्रि बन्वुन सुधिर्कान्चे बोदि गार्द नेमावे अनि तान्ना दहश्त करनारेन्चा बन्दोब्स्त करावा. औलियाला विदुस्काचा पिए बन्वावे.
नविन काय्दा करवा.
"दहश्त मुक्त मिपा: दहश्त करनार्य्स १०० रु दन्द. दाख्वनार्स २० रु बक्शिस."

इंटरनेटस्नेही's picture

30 Nov 2010 - 2:15 am | इंटरनेटस्नेही

वरील प्रतिसादातील विदुषकाला मंत्री करावे या मागणीशी १००.००% सहमत.

-
इंटेशकुमार जोशी.
मुंबई प्रदेश उपाध्यक्ष, आटपाट दुर्लक्षित पँथर.

अप्पा जोगळेकर's picture

30 Nov 2010 - 8:31 am | अप्पा जोगळेकर

विदुषकाला मंत्री करावे या मागणीशी १००.००% सहमत.
तसं झालं तर विदूषकाने पदाच्या हावेसाठी हा खेळ मांडला असं म्हणायचं का?

इंटरनेटस्नेही's picture

30 Nov 2010 - 1:23 pm | इंटरनेटस्नेही

अजिबात नाही. पण मला वाटतं की विदुषकला कसली हाव आहे त्या पेक्षा मंत्री आणि त्यांच्या बगलबच्च्यांचे गैरवर्तन हीच या कथेची थीम आहे. तेव्हा आपले प्रतिसाद देखील या थीमला अनुसरुनच असावा ही नम्र विनंती. उगाच खोचक बोलुन आम्हा पदाधिकार्‍यांच्या भावना दुखावु नयेत ही विनंती.
-
इंटेशकुमार जोशी.
मुंबई प्रदेश उपाध्यक्ष, आटपाट दुर्लक्षित पँथर.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Nov 2010 - 7:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हेच प्रसंग त्या मंत्र्याने कसे सांगितले असते असा विचार करतो आहे.

नितिन थत्ते's picture

30 Nov 2010 - 8:20 am | नितिन थत्ते

शिवाय नव्या राजालाच हे असे हवे असेल तर काय?
नवा राजा व्यस्ततेच्या 'कारणाने' (पक्षी = नावाखाली) दुर्लक्ष करत असेल तर?

अवलिया's picture

30 Nov 2010 - 3:49 pm | अवलिया

बाब्बो ! वेगळाच विचार.

ह्याला मिपालिक्स असे म्हणावे काय?

राजेश घासकडवी's picture

30 Nov 2010 - 3:54 pm | राजेश घासकडवी

ह्याला मिपालिक्स असे म्हणावे काय?

कदाचित मिपालिटिक्स म्हणता येईल :)

अवलिया's picture

30 Nov 2010 - 3:55 pm | अवलिया

मिपाट्रिक्स कसा वाटतो ?

क्रेमर's picture

30 Nov 2010 - 2:29 am | क्रेमर

परा यांनी मी न पाहिलेल्या 'एक होता विदुषक' या सिनेमाचे परीक्षण लिहिले आहे असे वाटले. नंतर हा सिनेमा पाहिलेला आहे असे लक्षात आले.

मुक्तसुनीत's picture

30 Nov 2010 - 2:53 am | मुक्तसुनीत

"मेटा" या अर्थी "परा-विदूषक" या चित्रपटाचे परीक्षण असेल ;-)

नंदन's picture

30 Nov 2010 - 3:14 am | नंदन

मेटाकुटील असा एक इंग्रजी-मराठी जोडशब्द (उदा. आक्टान्वये) या निमित्ताने सुचला ;)

मुक्तसुनीत's picture

30 Nov 2010 - 3:37 am | मुक्तसुनीत

यालाच आंतरजालीय परिभाषेत "मेतकूट" जमविणे असे म्हणत असावेत.
- फ्यामिन् आक्टान्वये पास झालेला.

राजेश घासकडवी's picture

30 Nov 2010 - 2:56 am | राजेश घासकडवी

मला 'एक होता विदुषक' नावाच्या मिरासदारांच्या अप्रतिम कथेचं रसग्रहण असावं असं वाटलं होतं.

मुक्तसुनीत's picture

30 Nov 2010 - 3:35 am | मुक्तसुनीत

मिरासदारांच्या त्या अप्रतिम कथेचे नाव : "कोणे एके काळी"
पी एल/जब्बारच्या चित्रपटाचे नाव : "एक होता विदूषक"
जी ए कुलकर्णींच्या कथेचे नाव : "विदूषक"
राज कपूरच्या चित्रपटाचे नाव : "मेरा नाम जोकर"
;-)

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 5:23 am | मिसळभोक्ता

एक होता विदूषक हा अतिशय टुकार पिच्चर होता, असे माझे मत आहे. पण त्यातली नांदी मस्त (शब्दांचा हा खेळ मांडला: गायक चंद्रकांत काळे, रविंद्र साठे, आणि मुकुंद फणसाळकर) ! आणि आनंद मोडकांचे संगीत छान, महानोरांची गाणी छान ! पण पुलंनी कथेचा चो केलाय. लक्षा, प्रभावळकर जेमतेम. असो.

मुक्तसुनीत's picture

30 Nov 2010 - 5:50 am | मुक्तसुनीत

एक होता विदूषक चे लिखाण टुकार आहे याबद्दल आपण एकदम सहमतोत ! ;-)

हा चित्रपट पहाताना तीन वेळा संपलाय असे वाटले होते.
त्यातील पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना हे गाणे मस्तच.
बतावणीतील पत्रकाराची जोक ही खासच

चिंतामणी's picture

30 Nov 2010 - 8:47 am | चिंतामणी

आणिबाणीनंतरच्या निवड्णुकीत महाराष्ट्राच्या लाडक्याव्यक्तिमत्वाने जी धमाल उडविली, त्यामुळे वैतागुन मा. यशवंतरावानी त्यांना उपहासाहाने "विदुषक" म्हणले होते.

(हे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे कोण हे सुज्ञास सांगणे न लगे)

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2010 - 8:54 am | नगरीनिरंजन

ही माहिती इथे देण्याचे प्रयोजन कळाले नाही. महाराष्ट्रात किती थोर्थोर विदूषक होऊन गेले असं काही सुचवायचं आहे का?

चिंतामणी's picture

30 Nov 2010 - 3:07 pm | चिंतामणी

इथल्या विदूषकाची तुलना महाराष्ट्रात होऊन गेलेल्या "थोर्थोर" विदूषकाशी केली आहे असे आपणास वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

(प्रश्ण मला होता की मुक्तसुनीतला होता हे न समजल्याने मी उत्तर दिले. मुक्तसुनीतकडुन हवे असल्यास तसे लिहावे)

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 6:03 am | मिसळभोक्ता

दरम्यान सदर लेखाचा सारांश हा जुन्या राजाने नेमलेल्या मंत्र्यांना नवीन राजाने मंत्रीपदात कायम ठेवल्याने विदुषक निराश झालेला आहे, असा दिसतो.

विदुषकाने कर्करोगग्रस्त महिलेला मदत केली होती का ? किंवा तीन टक्क्याने मंत्र्यांनी गुंतवणूक केली, ती विदूषकाने केली का ?

आमच्या माहितीनुसार विदूषकाने एक टेम्पररी राजा जवळ केला, आणि दोघांनी मिळून दुसर्‍या संस्थानात इथल्या जुन्या राजासारखीच लुबाडणूक केली. आणि इकडे मंत्र्यांच्या नावाने बोम्बाबोंब सुरू केली. खरे ना ?

ही उत्तरे मिळाल्याखेरीज वरील कथेविषयी काही लिहिता येणार नाही.

अप्पा जोगळेकर's picture

30 Nov 2010 - 8:38 am | अप्पा जोगळेकर

विदुषकाने कर्करोगग्रस्त महिलेला मदत केली होती का ? किंवा तीन टक्क्याने मंत्र्यांनी गुंतवणूक केली, ती विदूषकाने केली का ?
एका वेगळ्याच पैलूवर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद.

आया समय बडा बेढंगा
आज आदमी बना लफंगा
छल और कपट के हाथों अपना
बेच रहा इमान

हे गाणं आत्ताच ऐकलं.

विकास's picture

30 Nov 2010 - 8:38 am | विकास

ह्या प्रतिसादाला मिभोलिक्स असे म्हणता येईल का? ;)

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 8:48 am | मिसळभोक्ता

म्हणायचे असेल तर म्हणा बापडे.
पण जेव्हा खरेच मिभो लीक्स, तेव्हा पटकन दूर पळा, हा अनाहूत सल्ला ;-)

बेसनलाडू's picture

30 Nov 2010 - 8:52 am | बेसनलाडू

पण जेव्हा खरेच मिभो लीक्स, तेव्हा पटकन दूर पळा, हा अनाहूत सल्ला ;)
मिभो leaks की licks?? केव्हा पळायचे ते निश्चित ठरवायचे असल्याने विचारत आहे.
(पलायनवादी)बेसनलाडू

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 8:54 am | मिसळभोक्ता

दीर्घ...

ह्रस्व असल्यास तुला कदाचित पळायची गरज नसावी, बेला ;-)

बेसनलाडू's picture

30 Nov 2010 - 8:56 am | बेसनलाडू

ह्रस्व असल्यास तुला कदाचित पळायची गरज नसावी, बेला ;)
अच्छा अच्छा! नक्की ज्यांना पळायची गरज असेल, त्यांना सावध करायला बरे!
(सावध)बेसनलाडू

विकास's picture

30 Nov 2010 - 8:58 am | विकास

मिभो leaks की licks?? केव्हा पळायचे ते निश्चित ठरवायचे असल्याने विचारत आहे.

=)) माझा मुद्दा समजला असेल अशी आशा करतो... तो leaks संदर्भातच होता, तेंव्हा पळण्याऐवजी झाडावर बसायचे ठरवले तरी चालेल. :-)

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 9:14 am | मिसळभोक्ता

मिभो पहिल्यांदा झाडावर असतात, तेव्हा झाडापासून दूर पळणेच श्रेयस्कर !

असो, पण जोक्स अपार्ट. एकदा साला आम्ही लीक केले तेव्हापासून साबुदाणा खिचडी खायला कुणीच नॉर्थ कॅरोलायनाला जात नाहीये.

स्वानन्द's picture

30 Nov 2010 - 11:25 am | स्वानन्द

चांदी की डाल पर
सोने का मोर, सोने का मोर
ताक झाक ताक करे नीचे का चोर..

नरेशकुमार's picture

30 Nov 2010 - 1:29 pm | नरेशकुमार

एक होता विदूषक.
होता कि जिवन्त आहे अजुन ?

सेरेपी's picture

1 Dec 2010 - 12:57 am | सेरेपी

हम्म...

सुहास..'s picture

20 Jun 2011 - 9:51 am | सुहास..

छान च कान पिळला की हो ;)

माझीही शॅम्पेन's picture

21 Jun 2011 - 10:44 am | माझीही शॅम्पेन

वाह वाह !

____/|\_____

पुढे काय झाल ?

सुहास..'s picture

4 Oct 2011 - 3:58 pm | सुहास..

त्यात राजा अधेमधेच राज्यात येत असल्याने हे मंत्री स्वतःला प्रतिराजाच समजू लागले. पूर्वीच्या मग्रुरीत आणि आकसात आता दुपटीने वाढ झाली. हे सर्व पाहून काही चाणाक्ष मंत्री आधीच मंत्रिमंडळातून आपणहून दूर झाले. पण ह्याचा उलटा परिणाम म्हणजे आता ह्या उद्दाम मंत्र्यांना कोणाचाच धाक उरला नाही. 'हम करे सो कायदा' ह्या प्रकारात राज्याचा कारभार त्यांनी हाकायला सुरुवात केली. वेळेला आडव्या येणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना देखील न जुमानण्याची रीत त्यांनी रूढ केली. >>>>

खुप छान

नाही मंत्रीजी. मी विचार करत होतो की तुम्ही आत्ताच म्हणालात की कदाचित दुसऱ्या नगरात माझे कौतुक होईल, माझ्या फालतू कलेचे कौतुक देखील होईल. ह्याचाच अर्थ, फालतू का होईना पण माझ्या जवळ काही कला तरी आहे. ह्या नगराबाहेर ओळखणारे चार जण तरी आहेत. पण तुमचे काय मंत्रीजी? ह्या नगराबाहेर काळे श्वान तरी तुम्हाला ओळखते का? नगराबाहेरचे सोडा मंत्रीजी पण अहो कालच्या राजाची परिस्थिती बदलायला जिथे आज वेळ लागला नाही तिथे तुमचे काय? उद्या जेव्हा ह्या पदावरून पायऊतार व्हावे लागेल तेव्हा ज्या मिजाशीने ह्या जनतेत वावरत आहात तीच्या समोर खंबीरपणे उभा राहायची ताकद तुमच्यात असेल का? आज ज्यांची तोंडे रंगवत आहात त्यांच्या तोंडासमोर उभे राहायची तरी हिंमत अंगात असेल काय? वेळ बदलायला वेळ लागत नाही मंत्रीजी. आज ज्यांच्यावर वार करत आहात, उद्या वेळ बदल्यावर त्यांचे वार झेलायची देखील तयारी ठेवा. तेव्हा हात पाय थरथरू देऊ नका. संधी प्रत्येकाला मिळते, आणि ज्यादिवशी तुमची वेळ बदलेल त्या दिवशी सगळ्यात पहिला वार ह्या विदूषकाचा असेल. "

आज बोल्ड केलेला परिच्छेद प्रकर्षाने आठवला !!

मदनबाण's picture

4 Oct 2011 - 4:32 pm | मदनबाण

आज बोल्ड केलेला परिच्छेद प्रकर्षाने आठवला !!
यकदम करेक्ट ! ;)
काही ओकार्‍या काढणारे आयडी फार माजलेत खरे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Oct 2011 - 6:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ओ मदनबाण काका, मला पण समजावा ना. आमले तर काई समजूनच राहिले नाही ना.

काही जण भांडून राहिले आहेत हेच कळले. पण नक्की कोण कुणाच्या बाजूने भांडतो आहे. कुठला टोमणा कुणाला आहे, का आहे हेच कळत नाही. उणीदुणी कुणाची काढली हे कळलेच नाही तर त्याचा उपयोग तरी काय, म्हणतो मी !!! ;-)

सूड's picture

5 Oct 2011 - 8:30 am | सूड

प्र का टा आ

सुहास..'s picture

4 Oct 2011 - 6:59 pm | सुहास..

काही जण भांडून राहिले आहेत हेच कळले. पण नक्की कोण कुणाच्या बाजूने भांडतो आहे. कुठला टोमणा कुणाला आहे, का आहे हेच कळत नाही. उणीदुणी कुणाची काढली हे कळलेच नाही तर त्याचा उपयोग तरी काय, म्हणतो मी !!! >>>

किती किती ती निरागसता ;)

अवांतर : राक्या(ममो) आला असेल ऑनलाईन, त्या घाटीला ईचारा ;)

किती किती ती निरागसता
पकाका मोड वॉन :--- हॅ हॅ हॅ ;)

आशु जोग's picture

4 Oct 2011 - 11:46 pm | आशु जोग

परिकथेतील राजकुमार
>> ह्या नगराबाहेर काळे श्वान तरी तुम्हाला ओळखते का?

हे छान
आता उद्या सकाळी सगळेजण तुम्हाला लाइनीत सलामी देणार बघ

तुम्ही वेगळाच भाषिक अलंकार आमच्यासमोर ठेवला आहे

तिमा's picture

28 Nov 2011 - 6:53 pm | तिमा

काहीतरी जळतंय आणि कुठेतरी पाणी मुरतंय एवढंच कळलं.

- मानसिकराव रिटार्डणे