ढकलेले विरोप अर्थातच इमेल फॉरवर्डस

कोलबेर's picture
कोलबेर in जनातलं, मनातलं
8 Oct 2007 - 10:49 pm

मंडळी आपल्या सर्वांना ढकलेले विरोप हे येत असतातच.
अमक्या अमक्याला कॅन्सर झाला आहे त्याला वाचवायला हवे, ह्याला समर्थन असेल तर इथे पेटीशन साइन करा,हा विरोप आणखी १० लोकांना ढकला आणि चमत्कार पाहा असल्या विरोपांच्या ढीगर्‍यात कधी कधी एखादा फालतु न ऐकलेला मस्त विनोद, एखादं सुंदर चित्र, कविता असं काय काय वाचायला/ पहायला/ऐकायला मिळतं. ह्यातलं जे तुम्हाला आवडलं (आणि सार्वजनिक सभ्यतेच्या शिष्टाचारात बसणारं) असं सगळं इथे बिनधास्त डकवा.
आवडलं तर खी खी करू नाही तर सोडून देऊ.

सूचना:- इथल्या पोस्ट्स चे कसलेही शव विच्छेदन अथवा रसग्रहण करण्यात वेळ दवडू नका आवडलं तर +१ :-) नाहीतर -१ :-( इतके भरपूर सांगून जाते.

चलातर मग मीच सुरूवात करतो -

आजच आलेला एक फालतु विनोद :
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ससा आणि कासव यांनी सीईटीची परीक्षा दिली. सशाला ८१ टक्के मार्क मिळाले, तर कासवाला ८० टक्के. दोघांनाही चांगल्या इंजीनियरिंग कॉलेजात प्रवेश हवा होता. पण, कट ऑफ लिस्ट ८५ टक्क्यांवर बंद झाली. सशाला अॅडमिशन मिळाली नाही... कासवाला मात्र मिळाली...

... कशी काय?

....

....

....

....

....

... आठवतं, फार पूवीर् ससा आणि कासवाची शर्यत लागली होती... ती कासवानं जिंकली होती...

... त्यामुळे कासवाला 'स्पोर्ट्स' कोट्यातून सीट मिळाली!!!

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

सर्किट's picture

8 Oct 2007 - 10:54 pm | सर्किट (not verified)

मस्त !

- सर्किट

लिखाळ's picture

8 Oct 2007 - 10:55 pm | लिखाळ

मस्त !
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

विसोबा खेचर's picture

9 Oct 2007 - 7:23 am | विसोबा खेचर

+१ :)

वरूणदेवा, जोक छान आहे!

आता अजून एक -

एकदा एक जपानी, एक अमेरिकन, आणि एक सरदारजी, असे तिघं गप्पा मारत बसलेले असतात.

अमेरिकन म्हणतो, "आम्ही एक असं मशीन तयार केलं आहे की या बाजूने आत बोकड सोडला की त्या बाजूने त्याचं स्वच्छ, साफ केलेलं मटण बाहेर पडतं!"

जपानी म्हणतो, "हे तर काहीच नाही! आम्ही एक असं मशीन तयार केलं आहे की या बाजूने आत बोकड सोडला की त्या बाजूने शिजून, मसाले वगैरे घालून तयार मटण बाहेर पडतं!"

सरदारजी म्हणतो, " हे तर काहीच नाही! आम्ही एक असं मशीन तयार केलं आहे की या बाजूने आत बोकड सोडला की कै मरत नाही कै! तो त्या बाजूने तसाच जिवंत बाहेर पडतो आणि पळत सुटतो!" :))

आजानुकर्ण's picture

9 Oct 2007 - 9:22 am | आजानुकर्ण

नदीला लै पूर आलेला आस्तो.
सीता आनि गीता नदीच्या पल्याड.
सीता पोहत पोहत २ तासात घरी येते.
गीता चालत चालत पूल ओलांडून १० मिनिटात घराला.
तरीबी सम्दे सीतालाच हुशार म्हंतात.

का?

कारन सीताला म्याट्रिकला गीतापरीस जादा मार्क मिलाले आस्त्यात.

सर्किट's picture

9 Oct 2007 - 11:35 am | सर्किट (not verified)

अनेक पोरीबाळींना हा विनोद सांगून आम्ही आमची प्रतिमा उंचावली आहे ;-)

- (इनोदी) सर्किट

सर्किट's picture

9 Oct 2007 - 11:47 am | सर्किट (not verified)

एक ऐकलेला....

एकदा कि नै तीन सरदार असतात. संता, बंता आणी घंटासिंग...
त्यांना खाज येते, की आपण डिटेक्टिव्ह व्हावे...

म्हणून हातात भिंग घेऊन आणि मोठ्ठी काळी टोपी घालून ते एका डिटेक्टिव्ह एजन्सीत जातात..

तिथला मालक म्हणतो, की इण्टर्व्ह्यू तसा खूपच सोपा आहे.. आमच्या धंद्याच्या लायनीत आम्हाला चोरांना ओळखणे हे खूप महत्वाचे असते..

तेव्हा मी प्रत्येकाला एकएक फोटॉ दाखवीन.... तुम्ही फक्त सांगायचं, की त्या फोटोतल्या व्यक्तीला प्रत्यक्षात ओळखायला कुठले फीचर पुरेसे ठरेल ते !!

पहिल्यांदा संता गेला आत.. त्याला एका चोराचा "प्रोफाईल" (साईडने) फोटो दाखवला..
संता: ह्या, अत्यंत सोपे.. ह्या फोटोतल्या माणसाला एकच डोळा आहे.. अत्यंत सोपा आहे हा ओळखायला...

अर्थातच, संताला हाकलून दिले गेले..

मग बंताची पाळी....
बंता: ह्या.. अत्यंत सोपे.. ह्या चोराला एकच कान आहे.. ओळखायला खूपच सोपा...

अर्थातच, बंताला हाकलून दिले.....

मग गेला घंटा..
त्याला पुन्हा तेच छायाचित्र दाखवले.. आणि वरून वॉर्निंग सुद्धा दिली. "तुझ्या मित्रांनी खूप घाईत चुकीची उत्तरे दिलीत.. तू नीट विचार कर... आणि मगच उत्तर दे..."
घंटा (खूप विचार करून) : हा चोर कॉण्टॅक्ट लेन्सेस लावतो....

आता मुलाखतकार बुचकळ्यात पडला... आत जावून त्या चोराची फाईल तपासून आला, आणि थक्क होऊन घण्टाला म्हणाला, "खरंच.. तुला मी डिटेक्टिव्ह म्हणून निवडलं आअहे.. फक्त मला सांग की हा चोर कॉण्टॅक्ट लेन्सेस लावतो, हे तुझ्या उत्कृष्ट बुद्धीने कसे पहचानले ?"

घण्टा: सोपे आहे ! एकच डोळा, एकच कान. चष्मा कसा लावणार ? कॉण्टॅक्ट लेन्सेसच आवश्यक आहेत !!!

कोलबेर's picture

9 Oct 2007 - 11:56 am | कोलबेर

.. संता आणि बंता इंतरवव्ह्यू ला जातात.. प्रथम संता आत जातो -
---------------------------------------------------------------------------------------------
मुलाखतकार : तुझा एक डोळा फोडला तर काय होईल
संता: मी एका डोळ्याने आंधळा होईन
मुलाखतकार : आणि दोनही डोळे फोडले तर?
संता: पूर्ण आंधळा होईन
मुलाखतकार : सही जवाब .. ये नौकरी आपकी
संता खुशीत बाहेर येतो आणि हळूच बंताच्या कानात मुलाखतीतला प्रश्न आणि उत्तर सांगतो.. त्यामुळे अर्थातच खुशीत बंता आत जातो
-------------------------------------------------------------------------------------------------
मुलाखतकार: तुझा एक कान कापला तर काय होईल?
बंता: मी एका डोळ्याने आंधळा होईन
मुलाखतकार : आणि दोनही कान कापले तर?
बंता : पूर्ण आंधळा होईन
मुलाखतकार: दोनही उत्तरे चूक! कान कापल्यावर आंधळा कसा काय होशील?
बंता: दोनही कान कापले तर माझी टोपी डोळ्यावर घसरणार नाही का??

कोलबेर's picture

10 Oct 2007 - 12:31 am | कोलबेर

माइक्रोसॉफ्ट विंडोज मधील काही अगम्य चमत्कार :
------------------------------------------------------------------------------------
१) विंडोज प्रणाली मध्ये कोठेही con ह्या नावाचा फोल्डर करून दाखवा! अशक्य आहे.
२) नोट पॅड उघडा त्यात Bush hid the facts असे टाईप करून ती फाइल कोणत्याही नावाने सेव्ह करा. आता ही फाइल बंद करुन पुन्हा उघडा आणि आपल्या मजकुराचे काय झाले ते पहा!
३) माइक्रोसॉफ्ट वर्ड उघडा त्यात =rand (200, 99) असे टाइप करुन एंटर दाबा.. काय गंमत झाली ती इथे सगळ्यांना सांगा :-)

प्रियाली's picture

10 Oct 2007 - 12:58 am | प्रियाली

१. अशक्य आहे.

२. 畂桳栠摩琠敨映捡獴 हे काय झाले बॉ! - इथे सुरुवातीला बहुधा चीनी* अक्षरे आहेत.

३. =rand(1,1) लिहिले तर एकदाच The quick brown fox jumps over the lazy dog. हे दिसले.

(अचंबित) प्रियाली.

* प्रियालीताईंना चीनी, जपानी, तैवानी मधला फरक कळत नाही.

राजे's picture

10 Oct 2007 - 12:44 am | राजे (not verified)

१. चे उत्तर असे आहे की सिस्टम फाईलचे नाव con असल्यामुळे फोल्डर बनत नाही.
२. हे मात्र जबरदस्तच... सगळेच हाईड जेथे बुश आला तेथे.
३. जबरा.......quick brown fox jumps over the lazy dog.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

विकास's picture

10 Oct 2007 - 12:52 am | विकास

१) विंडोज प्रणाली मध्ये कोठेही con ह्या नावाचा फोल्डर करून दाखवा! अशक्य आहे.
जमले!
२) नोट पॅड उघडा त्यात Bush hid the facts असे टाईप करून ती फाइल कोणत्याही नावाने सेव्ह करा. आता ही फाइल बंद करुन पुन्हा उघडा आणि आपल्या मजकुराचे काय झाले ते पहा!
हा सॉलीड प्रकार आहे!
३) माइक्रोसॉफ्ट वर्ड उघडा त्यात =rand (200, 99) असे टाइप करुन एंटर दाबा.. काय गंमत झाली ती इथे सगळ्यांना सांगा :-)
नाही जमले..

पूर्वीच्या एका व्हर्जन मधे आपण जर "he loves her" असे वर्ड मधे लिहून ऑटो करेक्ट कळ दाबली तर "he loves her and leaves her" असे येयचे!

धनंजय's picture

10 Oct 2007 - 7:51 am | धनंजय

१, २, म्हटले तसे - पण मलाही ३ नाही जमले...

टग्या's picture

10 Oct 2007 - 4:05 am | टग्या (not verified)

> १) विंडोज प्रणाली मध्ये कोठेही con ह्या नावाचा फोल्डर करून दाखवा! अशक्य आहे.
हा बहुधा डॉसच्या जमान्यापासूनचा फेनोमेनॉन असावा. कॉन ही डॉसमधली कन्सोल फाइल आहे (थोडक्यात कळफलकावर दाबलेले सर्व काही), तिचा वारसाहक्क विंडोजपर्यंत आला असावा. (डॉसमधली कॉपी कॉन कमांड आठवा.)

वर दिलेल्या बाकीच्या गमतीजमतींबद्दल कल्पना नाही, पण मला व्यक्तिशः तो मायक्रोसॉफ्टवाल्यांचा आचरटपणा वाटतो.

देवदत्त's picture

11 Oct 2007 - 1:10 am | देवदत्त

ह्या सर्व गोष्टी मजेदार (काही वेळा चुका) वाटतात. पण त्यामागे काही कारणे ही आहेत
१. टग्या ह्यांचे म्हणणे बरोबर आहे.
con हे डॉस संहितेचा एक भाग आहे. ह्याबाबत सविस्तर माहिती येथेमिळेल. ह्याबाबत गंमत बघा. काही विपत्रांमध्ये असे लिहिले होते की हा विंडो़ज मध्ये किडा (बग) आहे. आणि ते का होते हे मायक्रोसॉफ्ट चे सदस्य किंवा खुद्द बिल गेट्स ला ही नाही सांगता आले. :D

२. फक्त "बुश हिड द फॅक्ट्स" नाही तर "aaaa bbb ccc ddddd" , म्हणजेच त्या ३ ४ ३ ५ अशा अक्षर रचनेत असे दिसते. आणि ते फक्त पहिल्यांदा तयार केलेल्या फाईल मध्येच दिसते. अधिक माहिती येथेमिळेल.

३. हे मायक्रोसॉफ्ट ने स्वत: टाकले आहे. माहिती येथे मिळेल.
त्यातील The quick brown fox jumps over the lazy dog. हे वाक्य फाँट फाईल मध्ये ह्याकरीता वापरतात कारण ह्यात A ते Z सर्व अक्षरे येतात जेणेकरून जेव्हा आपण फाँट बदलतो तेव्हा त्यातील सर्व अक्षरे कशी दिसतील हे कळते. [C:\Windows\Fonts मधील कोणतीही फाँट फाईल उघडून बघा :) ] .

अशाच प्रकारे काही इतर गोष्टी असतात त्यांना ईस्टर एग्ग असे म्हणतात. ह्या गोष्टी डेवलपर्स स्वत:च टाकतात. काही वेळा स्वत:ची (चमूची ) नावे दिसावीत म्हणून, काही वेळा गंमत म्हणून... आणि इतर कारणेही असतील.) ऐकण्यात आल्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट ने ह्यावर बंदी घातली होती काही वर्षांपूर्वी.

बाकी मी ही आणखी शोध घेत आहे, जेणेकरून अशी आणखी गमतीदार विपत्रे (त्याचा पंचनामा नव्हे ;) ) येथे देता येईल.

देवदत्त's picture

10 Oct 2007 - 2:20 pm | देवदत्त

चुकले... मी ह्याचे शवविच्छेदन च करून टाकले....
बाकी विचारल्याप्रमाणे २+ :)

चित्रा's picture

10 Oct 2007 - 7:05 am | चित्रा

हे कशाला केले असेल?

Bush hid the facts हे मात्र सही. हे कोणी तरी खास नवीनच तयार केलेले दिसतेय.

भास्कर केन्डे's picture

13 Nov 2007 - 3:19 am | भास्कर केन्डे

मला क्रमांक दोन जमत नाही. ते चार इंग्रजी शब्द टाकून मी एक फाईल तयार करुन बंद केली. पुन्हा उघडल्यावरही ते चारी शब्द जसेच्या तसे दिसतात.
तुम्ही तसे केल्यावर काय होते?

कदाचित आमच्या कंपनीच्या संगणकावर बुश साहेबांचा प्रभाव चालत नसेल.

आपला,
(खिडकीतला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

आनंदयात्री's picture

13 Nov 2007 - 2:46 pm | आनंदयात्री

कॉपी पेस्ट नका करु टाइप करा म्हणजे होइल.

विसोबा खेचर's picture

10 Oct 2007 - 12:43 am | विसोबा खेचर

हा विनोद म्हटला तर 'नॉनव्हेज' या सदरात मोडतो आणि म्हटला तर मोडत नाही! सभ्य, सुशिक्षित, व सुसंस्कृत मंडळींनी वाचूच नये हे उत्तम. वाचल्यास माझी काहीच हरकत नाही!

एकदा एक मनुष्य एका दुकानात जातो आणि म्हणतो, "मला जरा स्त्रियांचे ब्रा दाखवा, पाचशे नग हवेत. काय भाव दिले? एकदम एक्स्ट्रा लार्ज साईज हवा!"

दुकानदार सर्वात मोठ्या मापाचे ५०० नग त्याला देतो.

काही दिवसांनी तो मनुष्य पुन्हा त्या दुकानात येतो आणि म्हणतो, " आता मला १००० नग हवेत. काय भाव दिले? एकदम एक्स्ट्रा लार्ज साईज हवा!"

दुकानात तेवढे नग नसतात, तरीही तो दुकानदार इथून तिथून एक्स्ट्रा लार्ज साईजचे १००० नग कसेबसे जमवतो आणि त्या माणसाला विकत देतो.

पैसे देऊन तो माणूस त्या दुकानदाराला म्हणतो, "मी पुन्हा चारआठ दिवसात येईन. तेव्हाही मला १००० नग ब्रा लागतील. तयार ठेवा!"

तेव्हा तो दुकानदार चकित होऊन त्याला विचारतो, "काय हो, तुम्ही इतक्या भराभर हे ब्रा विकत घेताय, याचं करता तरी काय? एवढ्या कुठल्या एक्स्ट्रा लार्ज साईजच्या स्रिया अचानक तयार झाल्या आणि कुठे?"

तेव्हा तो मनुष्य मिश्किलपणे म्हणतो, "छे हो! मी हे ब्रा कुठल्याही स्त्री करता विकत घेत नाही. मी या ब्रां चे बंद कापून मशिदीच्या बाहेर 'टोप्या' म्हणून विकतो. एका ब्रा च्या दोन टोप्या तयार होतात!" :))

आपला,
(टोपीवाला!) तात्या.

टग्या's picture

10 Oct 2007 - 4:06 am | टग्या (not verified)

सौदा महागात लागेल!

विसोबा खेचर's picture

10 Oct 2007 - 6:47 am | विसोबा खेचर

सौदा महागात लागेल!

तो कसा काय? :)

टग्या's picture

10 Oct 2007 - 10:33 pm | टग्या (not verified)

काय तात्या, साधे कॉस्टिंगचे फंडे लावा की! (हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे काय?)

असं बघा. समजा प्रोसेसिंग कॉस्ट नगण्य धरू. पण तरीही, कच्च्या मालाची किंमत* त्यातून बनणार्‍या विकाऊ तयार मालापेक्षा कित्येक पटींनी अधिक असेल, तर तो सौदा सॉलिड** घाट्यातच जाणार नाही काय?***

- (व्यवहारी) टग्या.

*येथे कच्च्या मालाच्या किमान दर्जाबद्दल काही गृहीतके धरलेली आहेत. उदा. कच्चा माल तुळशीबागेतून उचललेला नसावा, अशी अपेक्षा आहे.
**या शब्दावरील कॉपीराईटबद्दल कल्पना आहे. उल्लंघनाबद्दल संबंधित पार्टीकडून आगाऊ क्षमायाचना.
*** गरजूंनी बाजारात स्वतः जाऊन दालचावलचे - आय मीन कच्च्या आणि पक्क्या मालाचे - भाव माहिती करून घेऊन तुलना करून खात्री पटवून घ्यावी.

विसोबा खेचर's picture

11 Oct 2007 - 1:07 am | विसोबा खेचर

पण तरीही, कच्च्या मालाची किंमत* त्यातून बनणार्‍या विकाऊ तयार मालापेक्षा कित्येक पटींनी अधिक असेल, तर तो सौदा सॉलिड** घाट्यातच जाणार नाही काय?***

नाही. सौदा घाट्यात जाणार नाही. कारण तो मनुष्य ब्रांची खरेदी उल्हासनगरात करायचा आणि त्याच्या टोप्या बनवून वरळीच्या हाजिअलीच्या दर्ग्याबाहेर विकायचा! :)

उल्हासनगरात ब्रा स्वस्त मिळतात, त्या मानाने हाजिअलीच्या दर्ग्याबाहेर मिळणार्‍या टोप्यांचे दर सॉल्लिड आहेत! :)

आपला,
तात्याखान!

टग्या's picture

10 Oct 2007 - 10:23 am | टग्या (not verified)

अशाच धर्तीवरचा एक गुजराती विनोद.

एकदा, जेव्हा इंग्लिश खाडीखालून इंग्लंड आणि फ्रान्सला जोडणारा भुयारी रस्ता खोदण्याचं ठरवण्यात आलं, आणि त्या कामासाठी टेंडरं मागवण्यात आली, तेव्हा आलेल्या असंख्य टेंडरांपैकी संतासिंग, बंतासिंग आणि कंपनीचं टेंडर इतर टेंडरांच्या मानानं तसं थोडंसंच स्वस्त होतं, पण त्यात कामपूर्तीसाठी - आय मीन कामाच्या पूर्तीसाठी - लागणार्‍या वेळेचा मांडलेला अंदाज इतर टेंडरांच्या तुलनेत जवळजवळ अर्धाच होता.

(थांबा. संतासिंग आणि बंतासिंग हे गुजराती नसून सरदारजी आहेत याची प्रस्तुत लेखकास पूर्ण कल्पना आहे. तरीही हा एक गुजराती विनोदच आहे, असा लेखकाचा दावा आहे. योग्य तो खुलासा संपूर्ण विनोद वाचल्यावर आपोआप होईलच, तेव्हा विनोद पूर्णपणे वाचण्याआधीच नसत्या शंकाकुशंका काढण्यात वेळ दवडू नये.)

अर्थात, टेंडराकडे पाहिल्यावर संबंधित अधिकार्‍यांची धारणा हे टेंडर गंभीरपणे घेण्याच्या लायकीचं नाही, केवळ वाह्यातपणा म्हणून कोणीतरी दिलेलं (frivolous) आहे, अशीच झाली. परंतु तरीही, इतरांच्या मानानं केवळ अर्ध्याच वेळेत काम पूर्ण करू शकण्याचा दावा हे लोक नेमके कसे करू शकतात, या कुतूहलापोटी कंपनीचा प्रतिनिधी म्हणून संतासिंगला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. मुलाखत साधारणतः अशी झाली.

मुलाखतकार: मि. संतासिंग, इंग्लंड आणि फ्रान्सला जोडणारा इंग्लिश खाडीखालचा भुयारी रस्ता इतरांच्या मानानं अर्ध्याच वेळेत खोदून देऊ शकण्याचा दावा तुम्ही कशाच्या आधारे करता? तुमची नेमकी योजना काय आहे?
संतासिंग: योजना खास काही नाही, एकदम सोपी आहे. मी आणि माझा पार्टनर बंतासिंग एकाच वेळी खोदकाम सुरू करणार, मी इंग्लंडच्या बाजूनं, तर बंतासिंग फ्रान्सच्या बाजूनं, आणि दोघं भुयाराच्या बरोबर मध्यबिंदूपाशी येऊन मिळणार. बरोबर अर्ध्या वेळात काम होतं की नाही बघा.
मु.: हम्म्म्म्.... कल्पना इंटरेस्टिंग आहे... पण यात चुका होऊ शकतात हे तुम्ही विचारात घेतलं आहे काय? म्हणजे समजा, तुमची दोघांची अलाइनमेंट चुकली, आणि तुम्ही भुयाराच्या मध्यबिंदूपाशी भेटलाच नाहीत, तर काय होईल? त्या परिस्थितीत काय कराल?
सं.: अशा परिस्थितीत काही करण्याची गरजच काय? खोदत जाऊ, काय बिघडलं? तुमचा फायदाच आहे की, तेवढ्याच पैशात दोन भुयारं खोदून मिळतील!

हा विनोद एका गुजराती गृहस्थास सांगितला असता, त्याला यात नेमका विनोद काय झाला हे शेवटपर्यंत कळू शकलं नाही, असं समजतं. सदर सद्गृहस्थाची प्रतिक्रिया: मग? चांगलाच सौदा आहे की! तेवढ्याच पैशात दोनदोन भुयारं - शंभर टक्के नफा!

मनिष's picture

10 Oct 2007 - 12:58 am | मनिष

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मिळालेला एक sms -
"तुम्ही विवाहीत असाल तर कृपया दुर्लक्ष करा, इतर सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!" :)

टग्या's picture

10 Oct 2007 - 4:48 pm | टग्या (not verified)

एकदा एक सरदारजी नदीच्या काठी उभे राहून, आकाशाकडे दोन्ही हात करून, वरती बघत जोरजोरात ओरडताना आढळतात. "या अल्लाह, मेरे पाँच पैसे नदी में गिर गये हैं... या अल्लाह, मेरे पाँच पैसे मुझे वापस लौटा दो!"

येणार्‍याजाणार्‍या समस्तांस अचंबा होतो. शेवटी त्यातला एक जण न राहवून, धीर करून सरदारजींना विचारतोच, "सरदारजी, आप तो सिक्ख हैं... आप अल्लाह को क्यूँ पुकार रहे हैं?"

सरदारजी चिडून प्रश्नकर्त्यावर गुरकावतात, "तो फिर क्या पाँच पैसों के लिए वाहेगुरू को बुलाऊँ??????"

सर्किट's picture

10 Oct 2007 - 10:24 pm | सर्किट (not verified)

+१ +१ +१ !!!

- सर्किट सिंग

चित्रा's picture

11 Oct 2007 - 1:32 am | चित्रा

डिस्क्लेमरः असाच एक अजून कोणाकडून तरी ऐकलेला. कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही!

एकदा एका ब्रिटनमधल्या चर्चच्या शाळेत एक शिक्षिका मुलांना प्रश्न विचारीत असते - जगात सर्वात मोठं कोण? - (व्यक्ती/देव अशा अर्थाने) जो या प्रश्नाचे बरोबर उत्तर देईल त्याला १० पौंड बक्षीस!

एक मुसलमान मुलगा उभा राहतो आणि म्हणतो "अल्लाह". तर ती चूक म्हणते आणि खाली बसवते.
मग एक बौद्ध मुलगा उभा राहतो आणि म्हणतो " बुद्ध". परत ती त्याला खाली बसवते.
आता एक हिंदू गुजराती मुलगा उभा राहतो , आणि म्हणतो " येशू!" तर शिक्षिका फारच खूष होते आणि त्याला बक्षीस देते. आणि विचारते की तू हिंदू असून असं कसं म्हणालास?

तो म्हणतो "खरे तर माझ्या मनातून श्रीनाथजीच (कृष्ण) सर्वात मोठे आहेत, पण काय करणार बिजनेस इज बिजनेस!

देवदत्त's picture

23 Oct 2007 - 11:42 am | देवदत्त

वाचायला मजा आली.

देवदत्त's picture

11 Oct 2007 - 2:42 am | देवदत्त

एक शिकाऊ मुलगा एका कंपनीत नुकताच लागला होता. त्याला कॉफी पाहिजे होती. त्याने फोन उचलला. एका क्रमांकाची बटणे दाबली. आणि म्हणाला "एक कॉफी पाठवून दे".
त्याला उत्तर आले, " गाढवा, तू कोणाशी बोलतोयस ठाऊक आहे का?"
तो म्हणाला, "नाही".
उत्तर आले, "मी ह्या कंपनीचा मुख्य पदाधिकारी आहे."
आता ह्या मुलाने विचारले "तुम्ही कोणाशी बोलताय ठाऊक आहे का?".
उत्तर आले, "नाही"

मुलगा म्हणाला, "बरंय, वाचलो" आणि फोन ठेवून दिला.

...जागेच्या बाबतीत कमीजास्त हे सापेक्ष आहे.

(डिस्क्लेमर: सर्किटरावांच्या त्या लेखाशी याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. केवळ लेखाच्या नावावरून आठवले, इतकेच!)

एकदा टेक्ससमधील एक सधन शेतकरी(?) पूर्व युरोपातून नुकत्याच अमेरिकेस आलेल्या नवरहिवाशास आपली रँच किती प्रचंड आहे हे सांगून 'इंप्रेस' करण्याचा प्रयत्न करत असतो.

'माझी पिकप घेऊन जर मी सूर्योदयाच्या वेळी माझ्या रँचच्या एका टोकावरून निघालो, तर रँचच्या दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत सूर्यास्त झालेला असतो.'

त्याचा श्रोता समजूतदारपणे मान डोलावतो. 'चेकोस्लोवाकियात असताना माझ्याकडेही तसलीच गाडी होती.'

('रीडर्स डायजेस्ट'च्या कोण्या पुरातन अंकातून साभार.)

सर्किट's picture

13 Nov 2007 - 5:20 am | सर्किट (not verified)

जबरा !!!

- सर्किट

गुंडोपंत's picture

13 Nov 2007 - 7:22 am | गुंडोपंत

वाचण्या आधीच सांगतो आहे की विनोद समजल्यास १८ + आहे
पण माझ्या एक मत्रिणीनेच सांगितला आहे म्हणून येथे देत आहे.
कुणालाही दुखावण्याचा हेतु नाही. निव्वळ भाषिक विनोद म्हणून सोडून द्यावा.. न वाचताच 'सोडलात' तरी चालेल. :))

दोन गुजराती भाषीक मैत्रिणी भेळवाल्याकडे जाता नि ऑर्डर करतात

"मने रगडो... अन इने चाट"

--

दोन गुजराती भाषीक मैत्रिणी भेळवाल्याकडे जाता नि ऑर्डर करतात

"मने रगडो... अन इने चाट"

मिसळपावमुळे बरीचशी मंडळी सुधारली, लाईनीवर आली आणि मनातलं बोलू लागली म्हणायची! :)

चांगलं आहे, चालू द्या...

आपला,
(पाणीपुरीप्रेमी!) तात्या.

मिसळपावमुळे बरीचशी मंडळी सुधारली, लाईनीवर आली आणि मनातलं बोलू लागली म्हणायची! :)
म्हणजे आम्ही सुधारलो?????
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ

मग बिघडलो कधी होतो??

आपला
गुंडोपंत

सर्किट's picture

13 Nov 2007 - 9:57 am | सर्किट (not verified)

गुंडोपंत,

आपला विनोद आवडला.

हाच विनोद, "दोन दिवाळी अंकाचे संपादक शक्ति-वेलूंकडे जातात.. " असे म्हणून "रगडो..चाट" देखील छान वाटला असता ;-)

च्यायला हा एटीन+ नाही, १२- विनोद आहे.. ;-)

- सर्किट

अण्णा's picture

13 Nov 2007 - 1:46 pm | अण्णा

विनोद कळाला नाही.
सांगा फोड करून

किमयागार's picture

14 Nov 2007 - 7:03 am | किमयागार (not verified)

वय झालं आता!फोड करुनही दिली असती हो पण तुम्हाला तरीही त्याचा फायदा नाही. मिक्सर मधून फिरवून त्यात पाणी घालून दिलं तरच चावता येइल तुम्हाला. त्यापेक्षा नकोच ना ती कटकट. काय?

इस्कुट's picture

13 Nov 2007 - 7:59 pm | इस्कुट

आता आम्चा पण एक विनोद, अर्थातच ऐकेलेला..

एकदा तीन देशांचे मेजर बोटितुन जात असतात. अमेरीका, रशिया आणि भारत.

अमेरीका वाला म्हणतो, आम्चे जवान जे सन्गेल ते ऐकतात..कोणिही काहीही बोलत नाही. निमुटपणे हुकुम पाळतात.
लगेच आप्ल्या जवानांना बोलावतात..
"चला...पाण्यात उड्या मारा. पाच तास कोणिही परत यायचे नाही"
सगळे उड्या मारतात. पाच तसांनी दमुन्-भगुन परत येतात.
अमेरीकेचा मेजर म्हणतो, "See the daring..."

एवढ्यात खुप जोराचे वादळ सुरु होते...
रशिया वाला आपल्या जवानांना बोलावितो..
"चला...पण्यात उड्या मारा. पाच तास कोणिही परत यायचे नाही"
सगळे उड्या मारतात. पाच तसांएह दमुन्-भागुन परत येतात.
रशियाचा मेजर म्हणतो, "See the daring..."

संध्याकाळ होत असते, आता भारताच्या मेजरची वेळ येते...
तो आपल्या जवनांना बोलवितो..
"चला...पाण्यात उड्या मारा. पाच तास कोणिही परत यायचे नाही"
जवान म्हणतात, "ओ साहेब, काय डोकं-बिकं फिरलय काय? संध्याकाळची वेळ आहे, कुठं रात्री-अपरात्री पण्यात उड्या मारायला लावताय, त्यात ही वदळाची रात्र. सकाळी बघु काय आसेल ते."
भारताचा मेजर म्हणतो, "See the daring..."

राजे's picture

13 Nov 2007 - 10:47 pm | राजे (not verified)

जवान म्हणतात, "ओ साहेब, काय डोकं-बिकं फिरलय काय? संध्याकाळची वेळ आहे, कुठं रात्री-अपरात्री पण्यात उड्या मारायला लावताय, त्यात ही वदळाची रात्र. सकाळी बघु काय आसेल ते."

ते जवान नक्कीच मुंबई-पोलिस खात्यात काम केलेले असणार... हे पक्का..

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

केदार-मिसळपाव's picture

16 Jan 2013 - 3:55 pm | केदार-मिसळपाव

आहे

रमेश आठवले's picture

18 Jan 2013 - 1:47 pm | रमेश आठवले

एक प्रश्न -ढकलेले कि ढकललेले ?
"मने रगडो... अन इने चाट- या ऐवजी -मने रगडो अने एमने चाट - असे असायला ह्वे.
यावरून पूर्वी ऐकलेला एक विनोद आठवला.
एक स्त्री बाजारात किराणा दुकानात लिप्टन चहाचा पुडा मागते. त्यावर, ती गेल्यावर, तिथे असणारा एक शायर म्हणतो--
कहत है भरे बाझार मुझे लीपटन कि चाह

असाच एक (कदाचित) ऐकलेला विनोद:

एकदा एक मुलगा 'अफझलखान वध' नाटकात शिवाजी राजेंची भूमिका करून त्याच आविर्भावात घरी परत येतो. आल्यावर आईला म्हणतो - मासाहेब आम्हास जेवावयास वाढा तो पर्यंत आम्ही शौचास जाऊन येतो. त्यावर आई म्हणते - जरूर जा राजे. फक्त वाघ नखे काढण्यास विसरू नका.

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 6:06 pm | शैलेन्द्र

मस्त..

मुलगा आतमध्ये सेवकास घेवून तर नव्हता ना गेला?

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2013 - 12:53 am | टवाळ कार्टा

:D

बायडी's picture

22 Jan 2013 - 5:15 pm | बायडी

डॉक्टर (इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला): तुमची एक किडनी फेल झाली आहे.

विद्यार्थीः बघा , रिचेकिंगमध्ये निघेल का ??

................................

टीव्ही बघण्यात मग्न असलेल्या बबलूला बाबांनी बळेबळेच झोपायला पाठवलं.

पाच मिनिटांनी..

बबलूः बाबा , मला तहान लागलीय. ग्लासभर पाणी द्या ना आणून.

बाबाः गाढवा. तुला पाय आहेत ना. उठून घे. नाहीतर तिथे येऊन मारेन हं.

बबलूः बाबा मारायला येताना पाणी घेऊन या ना.

.....................................

वडील : या वेळी नापास झालास तर मला यापुढे बाबा म्हणून हाक मारू नकोस .

( परंपरेनुसार आपला मंग्या यंदाही नापास झाला ).

वडील : काय लागला निकाल ?

मंग्या : माफ कर रम्या , तुला बाबा म्हणून हाक मारणं बहुतेक नशिबात नाही रे माझ्या .. .

........................................

मुलगी :- परवा मी एका मुलासोबत बाहेर डिनरला गेले होते.

वकील :- आणि काल ?

मुलगी :- काल दुस-या मुलासोबत डिनरला गेले होते.

वकील :- ठीक आहे , मग आजचा तुमचा काय प्लान आहे ?

दुसरा वकीलः ऑब्जेक्शन मिलॉर्ड.... हा प्रश्न मी आधीच यांना विचारला आहे..

...........................................

एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंड सोबत हॉटेल मध्ये बसलेला असतो . बिअरचा ग्लास हातात घेऊन म्हणतो ..

मुलगा : I love you!

मुलगी : हे तू बोलतोयस का तुझी बिअर बोलतेय ?

मुलगा : मी माझ्या बिअरशी बोलतोय .. तू गप्प बस ..!!!

......................................

शिद's picture

23 Jan 2013 - 9:16 pm | शिद

मुलगा : मी माझ्या बिअरशी बोलतोय .. तू गप्प बस ..!!!

=)) =)) =))