व्हिक्टर माईक सिएरा..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
26 Nov 2010 - 11:57 am

एक दोन दिवसांपूर्वीच (नवीन वर्ष सुरु व्हायला महिन्याहून जास्त असताना..) मला मिपावर डायरी भेट देण्यात आली. आमच्या हपीसात अजून क्लायंटसाठी डायर्‍या ऑर्डरही झाल्या नाहीयेत. ही एफिशियन्सी मिपामित्रांकडून आमच्या हपीसकडे कशी वळवावी याचा विचार करत होतो. पण आमच्या मिपामित्राने ही गंमत असून ती तशी चालतेच, आणि मी पोस्टे टाकत रहावीत अशी पोच मला दिल्याने मी आज पुन्हा एक कॉपी पोस्ट (स्वत:चीच टाकत आहे.)

कालच पोस्टे टाकणे बंद करत आहे असं म्हणूनही आज टाकतोय, यात प्रमुख उद्देश हा आहे की, मिपामित्राच्या या संदेशाचा स्वीकार मोकळेपणाने करून, आणि उगीच पराचा कावळा करुन आखडूपणा करण्याची माझी मनापासून इच्छा नाही हे दाखवणे आणि मिपा परिवाराचा सदस्य बनताना इथल्या गोष्टी समजून घेत जाणे.

परासाहेब..वाचा हेही आणि काढा मापं.. :-)
.......................................................................

"कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है.."

..मग झालंच सुरु ते सगळं.. ..

...परवा म्हणजे लिटरली परवा विमानात सीट आणि दीड वर्षाचं स्वमूल घट्ट पकडून बसलो होतो..

..खूप पूर्वी म्हणजे लिटरली खूप पूर्वी मी सेलम नावाच्या शहरात विमान उडवायला शिकलो होतो..

वैमानिक म्हणून नोकरी करण्यापर्यंत ते आलं नाही.. पण गाफील क्षणी सरकारनं चक्क मला प्रायव्हेट पायलट लायसेंस दिलं सुद्धा..

त्या वेळी विमान उडवणं हे एक वेड होतं.. छंद होता..आणि परिस्थितीनं मला त्यात करीअर करता आली नाही म्हणून त्यावेळी दुर्दैव ही वाटलं होतं..नुसती रिस्क असती तर घेतलीच असती.. घेतलीच होती..

..पण पैशाचं फार मोठ्ठं सोंग आणणं अशक्यच नव्हे तर मूर्खपणाचं असतं.. विशेषत: पैसे आई बापाचे असतात तेव्हा..आणि लो बजेट विमान प्रशिक्षण असं काही मजेशीर प्रकरण अस्तित्वात नसताना..

ते मरू दे.. पण खूप वर्षं इतरच फिल्डमधेनोकरी केल्यावर आता विचित्रपणे वाटतं की ही छान गोष्ट छान आठवण म्हणून राहिली आणि रोजचा कंपलसरी "जॉब" बनून गतरस (!!) झाली नाही हे बरंच..

एकट्यानं पहिल्यांदा विमान घेऊन उडणं म्हणजे "सोलो" ...

सोलो मिळणं म्हणजे प्रत्येक ट्रेनी पायलटचा मोक्ष क्षण..

पंधरा सोळा तास होतकरू शिक्षकांबरोबर उडून झाल्यावर मी "उपसोलो" झालो.. लिंबू टिंबू फ्लाईट इंस्ट्रक्टर बाजूला पडले आणि स्वत: म्हातारा मला सोलो चेकसाठी घेऊन जायला लागला..

म्हातारा खिडकीत बोटं घालून खाली बघत बसायचा.. आणि मला प्रसंगोपात्त मांडीवर फटके द्यायचा..

लहानशा जागेत इतर कुठे फटके देणं शक्य नव्हतं..

मी फ्लाईट कंट्रोल्स घट्ट पकडून बसायचो..स्ट्राँग होल्ड हवा..पाय ही रडर पेडलवर घट्ट रोवलेले.. एकच तारा समोर आणिक.....

..फटाक..

..म्हातारा माझ्या हातापायावर फटके मारायचा..आणि म्हणायचा "relax..लूज..व्हाय आर यू सो स्टिफ??"

"हँडल हर टेन्डरली.."

"हैव यू हँडल्ड अ सिक्स मंथ ओल्ड बेबी?? ट्रीट हर दॅट वे..!!"

बाळ हातातून निसटू नये इतकं घट्ट पकडायचं पण त्याच्या नाजुक अंगावर वळ पडतील इतकं घट्ट नाही..क्या बात है..

मधेच एकदा विक्षिप्त म्हातारा लांब कुठेतरी उडत उडत घेऊन गेला आणि मला डोळे बंद करायला लावले..

मग नुसतंच खूप उलटसुलट विमान उडवत राहिला..कोलांट्या मारल्यागत..नंतर म्हणतो कसा की आता डोळे उघड..

डोळे उघडले तर खाली मस्त हिरवागार सीन.. वा..!!

पण नाही.. माझं सुख तीन सेकंद टिकलं..

म्हातारा मला म्हणाला "नाऊ टेक मी बॅक टू एअरपोर्ट.."

मी ठार झालो.. मी कसलेच लँडमार्कस लक्षात ठेवले नव्हते..मी हरवलो होतो..

खूप अंदाजपंचे विमान हाकत एअरपोर्ट शोधायला लागलो..

खूप वेळानंतर धुरकट हवेतून लांबवर एक जमिनीचा भादरलेला पट्टा दिसला..

मी तोच रनवे असल्याचं प्रतिपादून तिकडे सरकू लागलो..

जवळ आल्यावर ती एक खाण किंवा फॅक्ट्री असल्याचं दिसलं..

म्हातारा चिडकट नजरेनं माझ्याकडे बघत बसला होता..

शेवटी मीच काहीतरी झापडिंग करून एअरपोर्ट शोधून काढला..खूप चेंगटपणानं..अर्ध्या एक तासानं..

"इफ द फ्युएल टँक वोज नॉट फुल , यू वुड हॅव डाईड टुडे.. !!"

म्हातारा शुभ वदला..

नंतर दोनच दिवसात म्हाताय्राला नवीन बाधा झाली..

पुन्हा दूर घेऊन गेला.. आणि पुन्हा मी खाली पसरलेला निसर्ग पाहण्यात गर्क झाल्याबरोब्बर अचानक त्यानं इंजिन बंद करून टाकलं.. मी फाटलो..

इग्निशन की काढून त्यानं शांतपणे खिशात टाकली..

म्हणाला.."इंजिन हँज फेल्ड..फ्लाय बॅक टू एअरपोर्ट.."

विमानाचं नाक झपाट्यानं जमिनीकडे झेपावायला लागलं..एकच इंजिनवालं छोटं विमान ते..

मला हादरलेला बघून त्यानं म्हटलं.."डू द एमर्जंसी चेक्स.."

मी मँन्युअलची पानं पालटू लागलो..राम राम राम..

म्हातारा म्हणाला.."विदाऊट इंजिन शी हॅज टर्न्ड इनटू अ ग्लायडर नाऊ..यू नीड टू कन्वर्ट युअर आल्टिट्युड़ इनटू डिस्ट्न्स..अँड यू मस्ट रीच एअरपोर्ट इन दैट डिस्ट्न्स..."

मग म्हाताय्रानं मला बाहेर बघायला सांगितलं..

जंगलातून कुठून तरी धूर वर येत होता..त्याच्या दिशेवरून वाय्राची दिशा कळली..

विमान कोसळायला सुरुवात झाली होती..आता त्या कोसळण्याचीच शक्ती वापरून मला कोसळण्यापासून वाचायचं होतं..

जीव वाचवण्याची वाट काढायला म्हाताय्रानं त्या दिवशी शिकवलं..

नंतर त्यानं मला सोलो ही दिला.. सोलो देण्याच्या दिवशी एअरपोर्टच्या वाटेवर त्यानं एका मंदिरात नमस्कार केला..(भयंकर जोखीम हो..!!)

थरथरत्या हातानं मी पायलट इन कमांड म्हणून पहिला फ्लाईट प्लॅन साईन केला..

प्रीफ़्लाईट चेक केला.. देह कॉकपिट च्या आत चढवला..

"सेलम ..विक्टर माईक सिएरा.."

"विक्टर माईक सिएरा..सेलम..गो अहेड.."

"सेलम.. विक्टर माईक सिएरा रिक्वेस्ट परमिशन फॉर सर्किट्स अँड लँडिंग ड्यूरेशन थ्री जीरो मिनिट्स..एन्ड्युरंस जीरो फोवर जीरो जीरो..वन ऑन बोर्ड.."

"विक्टर माईक सिएरा..सेलम..यू आर क्लीअर्ड फॉर सर्किट्स अँड लँडिंग..क्यू एन एच 1030..रनवे जीरो नाईनर..अलाईन रनवे अँड कॉल फॉर टेक ऑफ़.."

कधी रनवे वर आलो कळलंच नाही बाबा..

"विक्टर माईक सिएरा..सेलम..यू आर क्लीअर्ड फॉर टेक ऑफ़..क्यू एन एच 1030"

नंतर थ्रोटल आत दाबताना 108 BHP च्या लायकोमिंग इंजिनची ताकद हातात थरथरली..

टेक ऑफ़ नंतर ती ठरलेली टेकडी..खुणेची.. तिथे पोचेपर्यंत बरोब्बर हजार फूट चढून झालेले असतात..

..ती टेकडी आली की उजवीकडे वळायचं..

टेकडी आली तेव्हा आल्टिमीटर बघितला..

बाप्पा.. दोन हजार फूट चढलो इतक्यात ??

वळण्याची वेळ चुकली की..

च्यायला.. बरोबर.. म्हातारा नव्हता ना आज..वजन कमी झालं होतं..म्हणून...

आणि म्हातारा नाही म्हटल्यावर मी ही आत्ता आल्टिमीटर बघितला..? इतक्या वेळानं ?? बेफिकिरपणे..?

सतत बघत रहायला नको??

इथे माचोगिरीला जागा नाही..

".. देअर आर नो ओल्ड अँड बोल्ड पायलट्स.. द बोल्ड पायलट्स नेवर लिव्ह टू गेट ओल्ड.."

"..व्हेन देअर इज डाऊट देअर इज नो डाऊट.."

"युअर पॅसेंजर्स बिलीव्ह यू..."

"लुक एट द अल्टिमिटर..लुक एट द जायरो..लुक एट व्ही.ओ.आर..लुक एट कंपास..लुक एट ऑइल प्रेशर..लुक एट इंजिन टेंपरेचर..लुक एट होरायझन.."

नजर फिरत राहिली पाहिजे.. बी एलर्ट..

...आत्ता इंजिन बंद झालं तर कुठं उतरायचं? शेत ? नदी? मैदान..? बघत रहा.. बी एलर्ट कॅप्टन ..!!

म्हाताय्राची एकदम आठवण झाली..

मग पुढचं सर्व मस्त झालं..

विमान जमिनीजवळ येताना पडणाय्रा पोटातल्या खड्डयाच्या सूक्ष्म जजमेन्ट्वर लँडिंग केलं.. कापसागत.. अल्लाद..

इंजिन बंद केलं..उतरलो.. डोळे भरलेच होते..

इतर पोरांनी मला बाहेर काढून धुतलं.. कपडे फाडले.. जल्लोष केला..

म्हातारा विमानतळाच्या एप्रनवर येऊन उभा होता..

त्याचे पाय धरले..दुसरं काही सुचेना..

"नो नो.. डोंट शो युअर फीलिंग्स..कीप देम इन युअर हार्ट.." म्हातारा मला उठवत म्हणाला..

....

येस सर.!!
.....

येस सर.!!... मी आज कार चालवतानाही स्पीडोमीटर, इंजिन टेम्परेचर गेज आणि ऑइल इंडिकेटर आळीपाळीनं बघत राहतो..वेडं साहस करत नाही..

माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..!!

नोकरीविचार

प्रतिक्रिया

पियुशा's picture

26 Nov 2010 - 12:00 pm | पियुशा

झक्कास!

लैययययय भारी गवि.
खुप वेगळ्या प्रकारचे लेख लिहितात तुम्ही.
तुम्हाला IAF ची काही माहीती असेल तर त्या बद्दल सुद्धा वाचायला आवडेल.
सुखोई, मिग, मिराज, सुर्यकिरण फक्त नाव ऐकुन आहोत.

एअरफोर्स बेसवर (सिव्हिल एअरलाईन ऑपरेशन्समधे) दीडेक वर्ष काम केलंय. तेव्हा या सर्वांशी जवळून संबंध आला.

बघू, जमतंय का त्याविषयी काही..मुळात ते वाचनीय व्हायला पायजेल..

Dhananjay Borgaonkar's picture

26 Nov 2010 - 12:22 pm | Dhananjay Borgaonkar

आरे वाह्..मग तर लिहाच. होईल आपोआप वाचनीय.
भारतीय बनावटीची विमान, रशियन बनावट, फ्रान्स बनावट सगळ्यांबद्दल लिहा.
बरीच माहिती मिळेल.

मृत्युन्जय's picture

26 Nov 2010 - 12:16 pm | मृत्युन्जय

मस्त हो गवि.

जागु's picture

26 Nov 2010 - 12:19 pm | जागु

माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..!!

बापरे काही खर नाही तुमच्या मित्रांचे.

माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..!!

बापरे काही खर नाही तुमच्या मित्रांचे.

..................
माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..

आणि

"मित्रांचे"? ... "काही खरे नाही?"

संदर्भ लागेना झालाय ताई..

सुधीर काळे's picture

26 Nov 2010 - 4:35 pm | सुधीर काळे

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति.. पाहिजे!
'भवंति' हे अनेकवचनी रूप आहे. 'अनर्थः' हे एकवचनी आहे व 'अनर्था:' हे अनेकवचनी आहे.

गवि's picture

26 Nov 2010 - 4:50 pm | गवि

केले..
धन्यवाद..

नगरीनिरंजन's picture

26 Nov 2010 - 12:25 pm | नगरीनिरंजन

अत्युत्तम अनुभव! रोमांच उभे राहिले अंगावर. गाडी चालवतानाही फाटणारे आम्ही विमानाच्या गोष्टी ऐकूनच/वाचूनच थरारतो. :-)

विजुभाऊ's picture

24 Oct 2013 - 7:36 pm | विजुभाऊ

हा खरी गवि टच. साला स्वतः जगला असावा असा ल्हितो हा माणूस.

गणेशा's picture

26 Nov 2010 - 12:25 pm | गणेशा

वेगळा आणि सुंदर लेख ...

"वेड साहस करत नाही.." हे वाक्य ही खुप आवडले

स्वाती दिनेश's picture

26 Nov 2010 - 12:34 pm | स्वाती दिनेश

व्हिक्टर माइक सिएरा आवडला,
स्वाती

गवि's picture

26 Nov 2010 - 12:39 pm | गवि

थँक्स..

बादवे, VT-CMS असं माझ्या त्या सी-१५२ एअरक्राफ्टचं रजिस्ट्रेशन होतं.

म्हणून कॉल साईन व्हिक्टर टँगो, चार्ली माईक सिएरा (इंटरनॅशनल फोनेटिक्स प्रमाणे).

प्रत्यक्षात इतकी मोठी साईन प्रत्येक वेळी कोणी म्हणत नाहीत.

V-MS इतका पार्ट घेऊन व्हिक्टर माईक सिएरा म्हणतात..

हे कदाचित तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल..तरीही उगीच..

यशोधरा's picture

26 Nov 2010 - 12:52 pm | यशोधरा

केवळ झक्कास!
गवि, पायलट कोर्सबद्दल सविस्तर माहिती लिहाल का?

मी या सगळ्यातून फार पूर्वी गेलोय. तेव्हा मी सगळे पेपर पास केले होते. ते त्यावेळी तरी खूप अवघड असायचे. ८०% पासिंग मार्क्स होते आणि बरेचजण तिथेच अडकायचे. आता सुलभ झाली असेल असे वाटतं.

आर टी आर (रेडिओटेलेफोनी - एअरो) लायसेन्स ही त्यासाठी (कमर्शियल लायसेन्ससाठी) लागतं. त्याची परीक्षा प्रत्येक वेळी बदलत्या ठिकाणी (दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई) असायची. त्यात दोन स्टेप्स असून तिथे पास होणे हे सी.ए. होण्यासारखं अवघड होतं.

अजूनही आहे. म्हणून अनेक ट्राय मारून आणि चारीधाम हिंडून निराश झालेली पोरं यू के ला जाऊन (सोपी) परीक्षा देऊन ते लायसेन्स घेऊन येत असत. यू के चं इकडे मान्य आहे. परीक्षा मात्र दसपट सोपी आहे.

मी सुदैवाने सर्वच बाबतीत इथेच आणि पहिल्या प्रयत्नातच पास झालो. पण पुढे या फिल्डला इतके वाईट दिवस आले की ज्याचे नाव ते.

आता जोरात आहे म्हणेपर्यंत कोसळायला लागतं हे फिल्ड. इकॉनॉमी खूप सेन्सिटिव्ह आहे एअरलाईन बिझनेसची.

कोर्स पूर्ण होईपर्यंत गणितं बदलून जातात.

पूर्वी कमर्शियल लायसेन्स ५-६ लाखात होऊन जायचं. आता वीस लाख +

लगेच नाही लागली नोकरी तर आपल्या खर्चाने ते लायसन्स जिवंत ठेवायला लागतं. क्लबमधेउड्डाण करत राहून..

मध्यमवर्गाचे काम नव्हे.

....

धन्यवाद, हे चांगलेच आहे पण असे नाही. सगळी माहिती. कोर्स करण्यासाठी काय पात्रता हवी? शिक्षण किती हवं?
किती काळाचा कोर्स आहे? वगैरे वगैरे.

स्टुडंट पायलट लायसन्स:
(आता ही परीक्षा क्लबचे चीफ इन्स्ट्रक्टरच घेतात आणि लायसेन्स फ्लाईंग क्लबमधेच मिळतं. तोंडी परीक्षा किंवा लेखी, अ‍ॅज पर चीफ्'स चॉईस. कॉकपिट चेक (बसता येणे, सर्व उपकरणांपर्यंत हातपाय पोचणे इ.)
|
|
प्रायव्हेट पायलट लायसन्स:
-मेडिकल एक्झाम, पॅअनेलिस्ट डॉक्टरपैकी एकाकडून
-पीपीएलचे पेपर्स
अ)एअर नॅव्हिगेशन, हवामानशास्त्र, एअर रेग्युलेशन्स (कायदे) यांचा कंबाईन्ड पेपर. (८०% ला पास)
ब) टेक्निकल (जनरल आणि स्पेसिफिक [उडवत असलेल्या मॉडेलचा]असे दोन पेपर) (८०% ला पास)
क) एफ आर टी ओ एल (रेडिओचे लायसेन्स्. हल्ली परीक्षा क्लबमधेच होते.)
ड)पन्नास तास उड्डाण. (सी १५२, सी १७२, पुष्पक, पायपर अ‍ॅझ्टेक किंवा तत्सम विमाने क्लब्जमधे असतात.)
ई)तीस तास (लेटेस्ट चेक करावे लागेल) एकट्याने उड्डाण. (सोलो)
फ)किमान दोन क्रॉसकंट्री उड्डाणे आणि आपला मूळ एअरपोर्ट सोडून दुसर्‍या एअरपोर्ट वर दोन फुलस्टॉप लँडिंग)
ग) प्रत्यक्ष फ्लाईंगची टेस्ट (स्टॉल्स, रिकव्हरी आणी इतर मॅनूव्हर्स)

|
|
कमर्शियल पायलट लायसन्स
अ) सीपीएलचे पेपर्स एअर नॅव्हिगेशन, हवामानशास्त्र, एअर रेग्युलेशन्स (कायदे) यांचे सेपरेट पेपर्स (८०% ला पास) टेक्निकल - जनरल आणि स्पेसिफिक दोन पेपर्स
ब) आर टी आर (रेडिओ लायसेन्स) वायरलेस प्लॅनिंग अँड को-ओर्डिनेशन विन्ग (दिल्ली) यांकडून.
क)पीपीएलच्याच पुढे एकूण १५० तास उड्डाण. (पूर्वी भारतात २५० आवश्यक होते)
ड) क्रॉस कंट्री, नाईट फ्लाईंग आणि इन्स्ट्रुमेंट फ्लाईंग (डोळ्यावर हूड लावून पूर्ण कॉकपिट इन्स्ट्रुमेंटस वर विसंबून फ्लाईंग, यांचे ठराविक तास)
ई) फ्लाईंग टेस्ट.
फ) उच्च दर्जाची मेडिकल टेस्ट (दिल्ली किंवा बेंगलोरच्या एरोस्पेस मेडिसिनच्या स्पेशल फॅसिलिटीत जाऊन्..प्रदीर्घ आणि अवघड..)

|
|

मग बेसिक ट्रेनी पायलट्च्या नोकरीचा शोध. हल्ली मिळते असे ऐकतो.

न मिळाल्यास स्वखर्चाने लायसन्स करंट ठेवणे. कार लायसन्ससारखं हे वीस वर्षं चालू राहात नाही. ते व्हॅलिड ठेवण्यासाठी ठराविक फ्लाईंग अवर्स दर वर्षी / सर्व लायसेन्स रिन्यू करत राहणे/ सर्व मेडिकल्स अद्ययावत करत राहणे..

आणि नोकरीत नंबर लागावा म्हणून अ‍ॅडिशनल मल्टिइन्जिन रेटिंग (किमान आवश्यक फ्लाईंग करून, प्रॉपेलरवाले बीचक्राफ्ट पायपर सेनेका आपल्या देशात किंवा एकदम जेट - बोईंग / एअरबस ( अर्थात परदेशात..) रेटिंगचा छाप आपल्या बेसिक सी पी एल वर मिळवणे या सर्वांची रनिंग कॉस्ट फार आहे.

हुश्श दमलो टाईप करून..

स्पंदना's picture

26 Nov 2010 - 12:45 pm | स्पंदना

छान लिहीलय. काहीतरी वेगळ.

गांधीवादी's picture

26 Nov 2010 - 1:03 pm | गांधीवादी

लेख नेहमीप्रमाणेच मजेदार.

अवांतर :

मी आज कार चालवतानाही स्पीडोमीटर, इंजिन टेम्परेचर गेज आणि ऑइल इंडिकेटर आळीपाळीनं बघत राहतो..वेडं साहस करत नाही..

माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी..!!

'मी' आजही देश चालविताना 2G स्पेक्ट्रम, CWG, आर्थिक घोटाळे, गैरव्यवहार, जागतिक भ्रष्टाचार इंडिकेटर यांच्याकडे ढुंकूनही बघण्याचे वेड साहस करत नाही....

माय हायकमांड बिलीव्ह मी..!!

गवि's picture

26 Nov 2010 - 1:09 pm | गवि

:-)

Pearl's picture

26 Nov 2010 - 1:24 pm | Pearl

सही.. मस्तच लेख. १दम इन्टरेस्टिंग. वाचायला सुरु केला की सम्पुर्ण वाचल्याशिवाय थांबावेसे वाटत नाही इतका उत्कंठावर्धक. सत्यकथा आहे ना?

अतिसत्य...
कथा नव्हे.. घटना, अनुभव..
धन्यवाद..

Pearl's picture

26 Nov 2010 - 1:37 pm | Pearl

wow. thats gr8

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Nov 2010 - 1:25 pm | बिपिन कार्यकर्ते

दिलदारपणा आवडला.... लेखन तर झक्कासच!

खूप धन्यवाद बिपिनजी..

इन्द्र्राज पवार's picture

26 Nov 2010 - 1:44 pm | इन्द्र्राज पवार

गगनविहारी यानी 'गगनविहारी' (च) हे नाव ब्लॉग सदस्यत्वासाठी का घेतले त्या मागील इतिहास या धाग्यामध्ये सापडतो. आज ते 'हवा हवाई' करीत आहेत की नाही याची कल्पना नाही पण मनाने ते त्या विश्वात किती रमले आहेत याची झकास प्रचिती त्यांच्या शब्दाशद्बातून येते. मला तर ते 'पायलट' पेक्षा त्या क्षेत्रातील एक चांगले 'लेक्चरर' वाटतात. इंग्रजी विषयाच्या पाचापैकी एकाच निष्णात लेक्चररची आम्ही आतुरतेने वर्गात वाट पाहात असे, इतके सुंदर प्रभुत्व होते त्यांचे इंग्रजी कवितेवर....असे वाटायचे की आता 'बेल' होऊच नये....कविता का शिकलो ते कवितेमुळे की त्या लेक्चररमुळे असे वाटे...त्याच चालीवर श्री.गगनविहारी यांच्यी लेखनीची जादू भासते....अगदी त्यांनी वाचकाला त्या गगनसफरीवर नेले असे म्हटले तरी अतिशयोक्ती होऊ नये.

लुधियानाच्या सिव्हिल एरोड्रमशी अ‍ॅफिलिएशन असलेल्या लुधियाना अ‍ॅव्हिएशन क्लबमध्ये तुमच्यासारखाच एक मनोज बात्रा नावाचा माझा मित्र होता. तो SPL आणि PPL दोन्ही प्रमाणपत्रे ए ग्रेडमध्ये मिळवूनही आम्हा मित्रांना पार्टी द्यायला तयार नव्हता...म्हणायचा..."सालो, मन्ने फिक्र है CPL की, और क्रॉस कंट्री टेस्ट की....और तुम लोग बात कर रहे हो ओपनर की !" ~ त्यावेळी हे क्रॉस कंट्री काय समजले नव्हते....पुढे मनोजही ससेक्सला गेला व तो विषयही राहिला.

शक्य झाल्यास या पायलट करीअरमधील क्रॉस कंट्री ट्रेंनिंगवरही थोडक्यात माहिती मिळावी...ग.विं.कडून.

इन्द्रा

(जाताजाता : तुमची सध्याची जी "स्वाक्षरी" ची Signature आहे...तीऐवजी ती "माय पॅसेंजर्स बिलीव्ह मी" जास्त सूट होते तुम्हाला...!!)

मी पीपीएल वरच थांबलो.
नंतर एअरलाईनमधेच ऑपरेशन मॅनेजर टाईप नोकर्‍या केल्या.
तेव्हा इन्डस्ट्रीचे वाईट दिवस होते.

आता खूप वर्षे दुसर्‍याच फिल्डमधे आहे. आता तर मेडिकलही पास होईन की नाही शंका आहे.

रिन्यू करायचं आहे पी पी एल्..छंद म्हणून फ्लाईंगसाठी .. बघू.

सविता's picture

26 Nov 2010 - 1:49 pm | सविता

झकास........

इंटरनेटस्नेही's picture

26 Nov 2010 - 2:08 pm | इंटरनेटस्नेही

अतिशय रोमांचकारी व चित्रदर्शी वर्णन.. आवडले! असेच लेखन येऊ देत, मिपा तुमच्या लेखनाने समृध्द होत आहे!

चिगो's picture

27 Nov 2010 - 1:26 pm | चिगो

खुप मस्त... एकदम बढीया.

प्रमोद्_पुणे's picture

26 Nov 2010 - 2:19 pm | प्रमोद्_पुणे

एकदम मस्त..

sneharani's picture

26 Nov 2010 - 2:28 pm | sneharani

मस्त अनुभव कथन!!

सोत्रि's picture

26 Nov 2010 - 3:06 pm | सोत्रि

खुपच सुरेख लेखन.
तुमच्या शैलीचा 'पंखा' झालेला....

नंदू's picture

26 Nov 2010 - 4:04 pm | नंदू

अजुन एक सुंदर लेख.

हल्ली लॉग ऑन केल्यावर तुमचं काही नविन लिखाण आलंय का ते आधि बघतो.

प्राजक्ता पवार's picture

26 Nov 2010 - 4:10 pm | प्राजक्ता पवार

छान लिहलय .

निशांत५'s picture

26 Nov 2010 - 4:15 pm | निशांत५

"नो डाऊट" थरारक...........व्हेन देअर इज डाऊट देअर इज नो डाऊट.....रोमांच उभे राहिले अंगावर.

रेवती's picture

26 Nov 2010 - 7:05 pm | रेवती

छान लिहिलय.

विलासराव's picture

26 Nov 2010 - 11:02 pm | विलासराव

झालाय हा लेख.
तुम्ही लिहा हो आम्ही आहोतच वाचायला.

मृदुला's picture

27 Nov 2010 - 4:43 am | मृदुला

लेख आवडला. रोचक झाला आहे.
स्वमूल आणि गतरस शब्द आवडले. :)

निनाद's picture

27 Nov 2010 - 5:38 am | निनाद

ब्लॉगवर आधीच वाचले होते पण तरीही वाचायला मस्त वाटले.
चित्रदर्शी संवाद आणि वाचकाला अलगद फिरवून आणणारेआणणारे... आवडले!

jaypal's picture

27 Nov 2010 - 10:26 am | jaypal

शाहरुख's picture

27 Nov 2010 - 11:29 am | शाहरुख

कडक !!

(आर.टी.ओ. पास) शाहरुख

सुधीर काळे's picture

27 Nov 2010 - 12:13 pm | सुधीर काळे

झकास लेख, गगनविहारी-जी!
सांगलीत एक ’काव्यविहारी’ नावाचे कवी आमच्या आजोबांच्या वाड्यात रहायचे. त्यांचे खरे नांव बहुदा ’गद्रे’ असे होते!
तुमच्या ’टोपणनाव’वरून त्यांची आठवण झाली.

उल्हास's picture

27 Nov 2010 - 7:24 pm | उल्हास

वाचताना पण माझे पाय लटपटले

लगे रहो

मी-सौरभ's picture

28 Nov 2010 - 11:17 pm | मी-सौरभ

सही लेख...
त्या म्हातार्‍याच नाव काय होत?

ते महत्वाचं नाही..त्याच्यामधे "गुरु" आहे. नाव देऊन त्याला असा मातीच्या माणसांत आणून काय करु?

समीरसूर's picture

29 Nov 2010 - 1:05 pm | समीरसूर

खूप सही लेख. आणि वेगळा विषय. अभिनंदन!

धमाल मुलगा's picture

29 Nov 2010 - 1:32 pm | धमाल मुलगा

मजा आली वाजायला.

एकदम कडक आहे हा अनुभव. आम्ही च्यायला, दुचाकीच्या परवान्यासाठीची परिक्षा देताना आरटीओसमोर फाफललो, विमानाची तर काय अवघड गोष्ट असते राव! :)

सखी's picture

29 Nov 2010 - 10:50 pm | सखी

लेख आवडला, वाचायचा कसातरी राहुन गेला होता. अजुन वाचायला, माहीती करुन घ्यायला नक्कीच आवडेल त्यासाठी पुलेशु.

इतक्या सगळ्या परीक्षांतुन, सगळे व्याप सांभाळून, तसेच खर्चिक मेळ घालुन - पायलेटला मिळणारे मानधन तुम्हाला योग्य वाटते का?

भटक्य आणि उनाड's picture

24 Oct 2013 - 8:11 pm | भटक्य आणि उनाड

झकास लेख...अभिनंदन!!!! लिहित रहा..

अमेय६३७७'s picture

25 Oct 2013 - 3:40 pm | अमेय६३७७

सुंदर लेख. शैली आवडली. फोरसीथ आणि बाख यांचे वैमानिकी लिखाण वाचताना मजा यायची, तशाच धाटणीचे लेखन मराठीत पहिल्यांदाच वाचतोय. "वाचनीय व्हायला पाहिजे " हेही पटले.

पिलीयन रायडर's picture

25 Oct 2013 - 4:47 pm | पिलीयन रायडर

उत्खनन सप्ताह सुरु आहे काय?
जोरात खोदकाम होऊ द्या !!!!