मदत

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
23 Nov 2010 - 12:17 pm

नमस्कार मंडळी,

आज आपल्या मदतीची, मार्गदर्शनाची, आणि प्रोत्साहनाची मदत प्रकर्षाने जाणवतेय. त्याचसाठी हा पत्रप्रपंच!

आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो. मी गेली ६.५ वर्षे तंत्रलेखन (टेक्निकल रायटिंग) या क्षेत्रात काम करत आहे. पुण्यातील एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी गेली ६.५ वर्षे या क्षेत्रात काम करत असून सध्या मी सीनियर काँटेंट लीड या पदावर कार्यरत आहे. त्या आधी मी जालन्यातील एका कंपनीमध्ये आणि पुण्यातील एका मॅन्युफक्चरिंग कंपनी मध्ये मेंटेनन्स इंजिनीयर म्हणून, नंतर एका छोट्या वितरण कंपनीमध्ये सेल्स इंजिनीयर म्हणून काम केलेले आहे. आतापर्यंत माझा एकूण अनुभव साधारण ९ वर्षे आहे.

मी विद्युत अभियांत्रिकी पदवी चा अभ्यासक्रम २००० साली कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केलेला आहे. लिखाणाची आवड असल्याने मी तंत्रलेखन या क्षेत्रात शिरलो. हे काम करत असतानाच मी बाकीचे इंग्रजी-मराठी लिखाण देखील बर्‍याच प्रमाणात केले. माझ्या या क्षेत्रात ग्राहकाशी आणि संगणकप्रणाली विकसित करणार्‍या निरनिराळ्या गटांशी सतत संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती गोळा करून लिखाणाचे काम करावे लागते. चौकस विचार, उत्तम संभाषण कौशल्य, माहितीचे पृथ्थकरण करून तिचे चटकन आकलन करून घेणे, मग अतिशय सोप्या भाषेत त्या माहितीला कागदावर मांडणे इत्यादी (आणि बरीच) कौशल्ये या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतात. (मी ही कौशल्ये बर्‍यापैकी विकसित केलेली आहेत असे म्हणायला किंचित वाव आहे. :-))

कालानुरुप आता एखाद्या पुढच्या क्षेत्रात जाऊन तिथली आव्हाने पेलावीत असा विचार आता डोक्यात घोळत आहे. तंत्रलेखन या क्षेत्रात एका ठराविक पातळीपुढे जाण्यास अडचणी असतात शिवाय कामाचे स्वरूप जवळपास सारखेच असल्याने आता पुढे जाण्याची वेळ आलेली आहे असे प्रकर्षाने वाटतेय. हळू-हळू तंत्रलेखन हे क्षेत्र कमॉडीटाईझ्ड (मराठी शब्द माहित नाही) होत असल्याने आणि स्वतः संगणक क्षेत्रातली मंडळी लिखाणात तरबेज होत असल्याने आमच्या क्षेत्रातल्या संधी दिवसेंदिवस कमी होत आहेत असा एक समज पसरला आहे. कुठलीही प्रणाली विकसित झाल्यावर ग्राहकानुभव (युजर एक्स्पिरीयन्स) अत्यंत उच्च दर्जाचा असल्यास लिखित स्वरूपातल्या माहितीचे स्थान दुय्यम होते असा एक मतप्रवाह सध्या प्रचलित होत आहे. अर्थात हे सगळे अगदी दृष्य स्वरूपात दिसण्यासाठी बराच कालावधी जावा लागेल हे नक्की. पण आतापासूनच पुढच्या १० वर्षात होऊ शकणार्‍या बदलामुळे पोटापाण्याची जरा चांगली सोय करणे चांगले असा विचार करून मी इतर क्षेत्रांचा विचार सुरु केला आहे. :-)

ब्रँड मॅनेजमेंट किंवा जाहिरात किंवा बिझनेस अ‍ॅनॅलिसिस ही क्षेत्रे मला खुणावत आहेत. ब्रँड मॅनेजमेंट आणि जाहिरात ही क्षेत्रे जरा आवडीची वाटतात. विविध ब्रँडसचा अभ्यास करणे, त्याबद्दल वाचन करणे, जाहिरातींचा अभ्यास करणे, कॉपी लिहिणे, संकल्पनांचा विचार करणे इत्यादी गोष्टी मी आवड म्हणून (स्वतःपुरत्या) करत असतो. आवडीच्या क्षेत्रात पाऊल टाकल्यास यशाची शक्यता वाढते असे म्हटले जाते. बिझनेस अ‍ॅनॅलिसिस हे क्षेत्र पण आव्हानात्मक आहे. ग्राहकाशी संपर्क साधून आणि सतत संपर्कात राहून गरजा जाणून घेणे आणि त्या माहितीचे वहन घडवून आणणे हे या क्षेत्रातले मुख्य काम असे माझ्या ऐकीवात आहे. पण या क्षेत्रात जाण्यासाठी डोमेन ज्ञान, प्रमाणपत्रीकरण (सर्टिफिकेशन) इत्यादी बाबी पूर्ण असणे आवश्यक आहे असेही ऐकले आहे. माझ्या तंत्रलेखनाच्या नोकरीत कामाच्या स्वरूपामुळे डोमेन ज्ञान असे काही मिळवण्याच्या संधी फारशा उपलब्ध झाल्याच नाहीत.

या क्षेत्रातील कुठलाच अनुभव नसल्याने या क्षेत्रांत प्रवेश मिळवणे तसे अवघडच. शिवाय प्रापंचिक जबाबदार्‍या असल्याने 'अ' पासून सुरुवात करण्याची हिंमत होत नाही. माझ्या क्षेत्रात मी आत्मसात केली कौशल्ये या क्षेत्रांत देखील कामात येतील असे मला वाटते.

आपणापैकी कुणी किंवा आपण ओळखता अशांपैकी कुणी जर या किंवा अशा क्षेत्रात काम करत असाल तर कृपया मदत करू शकाल का? आपले अनुभव, माहिती, काही उपाय, सल्ला अशी कुठलीही मदत स्वागतार्ह आहे. शिवाय या क्षेत्रांपेक्षा अजून कुठली क्षेत्रे माझ्यासाठी योग्य असू शकतात याचीही माहिती पुरवल्यास मी अत्यंत आभारी राहीन. कुठे तरी सुरुवात करण्याच्या संधींबद्दल माहिती देखील खूप उपयुक्त ठरेल.

आपणास माझ्याविषयी अजून काही माहिती हवी असल्यास कृपया मला संदेशातून नक्की विचारा.

प्रतिसादांच्या अपेक्षेत.

धन्यवाद,
समीर

नोकरीमदत

प्रतिक्रिया

रामदास's picture

23 Nov 2010 - 12:31 pm | रामदास

विविध ब्रँडसचा अभ्यास करणे, त्याबद्दल वाचन करणे, जाहिरातींचा अभ्यास करणे, कॉपी लिहिणे, संकल्पनांचा विचार करणे इत्यादी गोष्टी मी आवड म्हणून (स्वतःपुरत्या) करत
http://www.afaqs.com/ ही लिंक वापरून बघा .

आनंदयात्री's picture

23 Nov 2010 - 12:42 pm | आनंदयात्री

ज्या क्षेत्रात डोमेन नॉलेज जास्त आहेत त्यात 'बिझनेस अ‍ॅनॅलिष्ट' म्हणुन शिरा आणि यशस्वी व्हा, तुमचा अनुभव बघता, तुमच्यासाठी हा राजमार्ग ठरावा.
तसेही या रेसेशनने इंडस्ट्रीत अजाईलचे वारे आणलेय, आणि अजाईलमधे टेक्निकल राईटप काही स्थान नाही.

अर्धवटराव's picture

25 Nov 2010 - 8:45 am | अर्धवटराव

तुम्हाला टॅकरायटींगचा इतका अनुभव आहे... तर तुम्हाला सॉफ्टवेअर क्षेत्राचं आकर्षण नाहि वाटलं का ? टेकरायटींग करता करता सॉफ्टवेअर टेस्टींग ला शीफ्ट होणारे अनेक जण मी बघीतले आहेत. पण सॉफ्टवेअर क्षेत्रात न जाण्याचा निर्णय ठाम असेल तर अभिनंदन :)
जर तुम्ही तुमचे टेकरायटींगचे अनुभव व्यवथीत मांडू शकत असाल, तर पहिले एक पुस्तक लिहा त्यावर. व्यवस्थीत कंपाइल्ड इंफोर्मेशनची प्रचंड मागणी आहे आज. इतके नवीन नवीन आणि कॉम्प्लेक्स टूल्स वापरल्या जातात आजघडीला. त्यांचा वापर करुन त्यात मास्टर व्हायला बर्‍याच लोकांना खूप वेळ लागतो. काहि थोडे जण अश्याने लवकर पुढे जातात. तुमचे पुस्तक या "मास कॅटॅगरी"च्या लोकांना साध्या शब्दात त्या टूल्स चा वापर समजावून सांगू शकले तर हवेच असेल. तुम्हाला ज्या बिझनेस एनालिसीस क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे त्याचा मार्ग सुकर होईल अशाने. तुमच्या पुस्तकातील माहितीला शेंडा आणि बुड मात्र जोडा. म्हणजे ज्या विषयावर लिहीताहात, त्या प्रॉडक्टची गरज कोणाला, का, कशी जाणवली (हा शेंडा)-मध्ये तुमचं टेकराईट्-त्या प्रॉडक्ट च्या वापराने कोणाला कसा, किती फायदा झाला (हे बूड)

ब्रँड डेव्हलपमेंटवर मी फारसं काहि सांगू शकत नाहि. पण एक करता येईल... मोठ्या कंपनीजच्या ब्रँडवर लक्ष्य देण्यापेक्षा आज आपल्या भोवती जे हजारो लघु/मध्यम लेव्हलचे उद्योजक नवीन झेप घ्यायला बघताहेत, त्यांना त्यांच्या ब्रँड डेव्हलपमेंटसाठी मदत करा. तसही तुम्हाला या गोष्टीचा शौक आहे. तेंव्हा सुरुवातीला काहि आयडीया विनामुल्य देउ शकता. पाणि किती खोल आहे याचा अंदाज आला कि त्याची किंमत ठरवून वसूल करा.

शक्य असल्यास गुजरातला जा. तिथे तुमच्या आवडीच्या व्यवसायाच्या संधी प्रचंड प्रमाणात आहेत सध्या...

(वरील पैकी काहिच न करणारा) अर्धवटराव

समीरसूर's picture

27 Nov 2010 - 8:38 pm | समीरसूर

रामदास, आनंदयात्री, आणि अर्धवटराव,

आपल्या मार्गदर्शनाबद्दल शतशः धन्यवाद. याचा उपयोग नक्कीच होईल.

धन्यवाद,
समीर

तुम्हाला जाहिरात क्षेत्रात पुढे जायचे असेल तर अहमदाबादमधील मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन मधून Executive MBA करणे श्रेयस्कर होईल. तो कोर्स १५ महिन्यांचा असतो. त्या कोर्समधून यावर्षीच MBA पूर्ण केलेला माझा एक मित्र आहे. आज जाहिरातींच्या क्षेत्रात mica चे नाव मोठे आहे. तसेच ब्रॅंड मॅनेजमेन्ट मध्ये पुढे करियर करायची असेल तर आय.आय.एम मधून Executive MBA हा एक चांगला पर्याय आहे. हा कोर्सही सुमारे १५ महिन्यांत पूर्ण होतो.त्यात मार्केटिंगचे electives निवडून आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात पुढे जाता येऊ शकेल. हे दोन्ही कोर्स कमितकमी ५ वर्षांचा अनुभव असलेल्यांसाठी असतात.

mica विषयी अधिक माहिती हवी असल्यास व्य.नि वर संपर्क करावा. मी माझ्या मित्राचा ई-मेल पत्ता देऊ शकेन.

क्लिंटन