उद्या २६/११! सगळी प्रसार माध्यम ह्या काळ्या दिवसाची आठवण न चुकता करून देतात. २६/११ म्हंटलं की मला गुलाल मधील "शहर हमारा सोयो थो" (http://www.youtube.com/watch?v=a4kSGe0wqbI) हे गाणं आठवतं. (का ते तुम्ही गाणं एकलं तर कळेलच). मग डोकं भनभनलंकी लगेच त्यातलच "सरफरोशीकी तमन्ना" एकतो ( स्वत:वर हसण्याची हिंमत असेल तरच लिन्क क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=qWf1Fe_jPRE ). मग लगेच जैसे थे. (गाणी आवडली म्हणून चित्रपट बघायला गेलात आणि डोकं सुन्न झालं तर मला नावं ठेवू नका)
पण अगदीच काही केल नाही अस नाही हो. नाहि म्हणायला रेडीफवर(http://www.rediff.com/news/2010/nov/24light-a-candle-for-26-11.html) जावून मेणबत्ती जाळून आलो. त्यांनी देशभक्तीचा बाजार मांडलाय (त्या पेजवरच्या बॅनर अॅड्स पहा), मग मी भावनांचा प्रदर्शन मांड्लं तर काय बिघडलं?
असो, देवबप्पा मृतात्म्यांना शांती दे. पण आमच्या निद्रिस्त मना जागं करायचा प्रयत्न करू नकोस, तुलाही जमणार नाही ते. आम्ही झोपेच सोंग घेतलयं- तुझ्याही काही मर्यादा आहेत ह्याची जाणीव करून देण्यासाठी.
विचारजंतु!
प्रतिक्रिया
26 Nov 2010 - 1:10 am | विकास
अरे वा! रीडीफ मधे अजूनही मेणबत्त्या जाळणे चालूच आहे? शिवाय आम्ही विसरणार नाही आणि क्षमा देखील करणार नाही असे देखील म्हणलेले आहे. हा नक्कीच फरक आहे. त्यांचेच भावंड असलेल्या येथील वृत्तपत्रात (इंडीया अॅब्रॉड) तर यावेळेस "पाकीस्तान'ज लाईज नेल्ड" असे मुखपृष्ठावर म्हणलेले आहे.
इतके सर्वांनी केले तरी हरकत नाही. जोपर्यंत २६/११ ही राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर केली जात नाही आणि "२६/११ सेल्स" दुकानात दिसत नाहीत तो पर्यंत सर्वकाही चालूंदेत..
26 Nov 2010 - 1:26 am | रन्गराव
मेडियावाले लई चालु आहेत. आता सगळ जळजळीत लिहितील. मग अजून मेणबत्त्या पूर्ण जळायच्या आत ह्यांचा चालू होईल "अमन की आशा"! आणि मग ते आतीफ असलम चा कार्यक्रम भारतात करून पैसे मिळवतील. आणि आपण सगळा अभिमान घरात ठेवून तिथ जावून हातपाय हलवून आपल्या मोठ्या मनाच आणि उदार मतवादाचं प्रदर्शन करून येवू.
26 Nov 2010 - 4:30 am | उल्हास
आदर्श सारखी इमारत उभी करुन २६/११ चे स्मरण केले जाईल
काळजी करु नये
26 Nov 2010 - 12:02 pm | अमोल केळकर
२६/११ च्या हल्ल्याला आज २ वर्ष पुर्ण झाली. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व शहिदांना विनम्र श्रध्दांजली !!!
अमोल केळकर
26 Nov 2010 - 3:17 pm | विकास
आपले राजकारणी खूपच जागृत आहेत. त्यामुळे त्यांनी काळवेळ बघून आर्थर रोड तुरूंग आणि कसाबची कोठडीला भेट दिली...
त्याच बातमीनुसार, मा. विरोधी पक्षनेत्यांनी तर, 'केलेल्या कृत्याचा तुला पश्चाताप होत आहे का?', असा प्रश्न देखील कसाबला विचारला. त्या गरीब बिचार्याने पण उत्तर दिले की, "'मी गरीब कुटुंबातून आलो असून वाईट संगतीमुळे माझ्या हातून हे कृत्य घडले... जो बोया वो काटा'
असे राजकीय नेतॄत्व असताना "राकट देशा कणखर देशा" असे म्हणणे अधिकच योग्य आहे असे वाटले...
26 Nov 2010 - 8:33 pm | शाहरुख
या भेटीचा इतका गवगवा का ?
27 Nov 2010 - 4:11 am | विकास
या भेटीचा इतका गवगवा का ?
माहीत नाही. मात्र जेंव्हा अधिक विचार केला तेंव्हा अजून एक विचार डोक्यात आला: कुठल्याही गुन्हेगारास तुरूंगात असताना, वकील अथवा नातेवाईक नसताना, केवळ लोकनिर्वाचीत राजकारणी म्हणून भेटून देणे हे कायद्यात बसते का?
(हा "शाहरूख" ना प्रतिप्रश्न म्हणून प्रतिसाद नाही, गैरसमज नको. :) )
27 Nov 2010 - 8:36 am | नितिन थत्ते
मला वाचलेल्या बातमीतून आठवते ते म्हणजे आबा आणि खडसे तुरुंगाची पाहणी करायला गेले होते. (तुरुंगाची पाहणी करायला विरोधीपक्षनेते कशाला? असा प्रश्न विचारू शकता). कसाब तेथेच होता म्हणून त्यालाही भेटले. त्याचे डिस्टॉर्शन करून दोघे कसाबला भेटायला तुरुंगात गेले असे झाले आहे.
26 Nov 2010 - 3:22 pm | अविनाशकुलकर्णी
आपण सारेच फार दिखावा व ढोंगी झालो आहोत....मोठे पोस्तर्स..गाणी..मेणबत्या..भाषणे..चर्चा....
26 Nov 2010 - 4:00 pm | रन्गराव
>>आपण सारेच फार दिखावा व ढोंगी झालो आहोत....मोठे पोस्तर्स..गाणी..मेणबत्या..भाषणे..चर्चा....
सत्य आहे!
26 Nov 2010 - 5:20 pm | विनायक प्रभू
मेणबत्ती वाल्यांचा धंदा वाढतोय ना?
कुणाचे तरी चांगले होतेय ना?
असु दे.
26 Nov 2010 - 7:20 pm | मदनबाण
आपले राजकारणी एक नंबरचे षंढ आहेत...असेच अतिरेकी येत राहतील आणि हल्ले होवुन निष्पाप लोक मारले जातील.
कसाबची कसली चौकशी करतात ?
इतके होउन सुद्धा आमचे राजकारणी इतके निबर झाले आहेत की आता राम प्रधान समितीने जो गोपनिय अहवाल दिला होता त्याच्याकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केल्याचं उघडकीस आलं आहे.
यांना अशोक चे अशोकराव हा स्वतःच्या नावात बदल करायला वेळ मिळाला पण इतक्या महत्वाचा अहवाल मात्र दुर्लिक्षितच राहिला.
संपूर्ण वॄतांत इथे वाचता येइल :--- http://www.ibnlokmat.tv/showstory.php?id=134302