झुरळाने मिशा फेंदारुन एकदा
कविता करायचे ठरवले..
बिळात बिळात मिशा टाकुन.
नुसते विषय हुडकले..
त्याला विषय मिळाले खुप
पण सुचली नाही कविता..
अहो,कविता फक्त करता येते..
दाढी खाजवता खाजवता..
एकदा झुरळाला कशीबशी
एक कविता सुचली..
मिशामिशा फेंदारुन त्याने
झुरळीसमोर वाचली..
झुरळी म्हणाली त्याला..
काय पण हुरळलाय गडी..
अहो...जरा सबुरीने...
कविता केलीये..आता तुम्हाला फुटेल दाढी..
दाढीवालं झुरळ..म्हणताच..
झुरळ दचकलं जाम ..
आपल्या मिशाच बर्या बुवा..
कविता करणे आपले नाही काम..
झुरळाने कितीही मिशा फेंदारल्या
तरी त्याला वाघ होता येत नाही..
दाढी फुटल्या शिवाय कुणाला
कविता करता येत नाहीत..
बोकडाला पण दाढी असते..
ते का कविता नाही करत?
कारण बोकड सदा न कदा
शिंगे असते मारत..
वाघ एवढा शुर.त्याला तर दाढी आणि मिशा...
तो ही का मग कविता करत नाही ..
कारण वाघाला दाढीमध्ये बोट घालुन.
खाजविता येत नाही...
A poets' diellema..
झुरळाने वाचले स्तोत्र..
झुरळाने केली आरती..
तरी पण झुरळाला कविता
करता का आली नव्हती?
आरती करणे नाही हो सोपे
घालुन दाढीत एक हात
कुठे भलतीकडे खाज सुटली तर
वापरायच कुठला हात..
विचार करकरुन झुरळ
जाम थकले..
मिशासकट त्याने त्याचे
सारे पाय टेकले..
एक तर त्याला प्रश्न..
हात म्हणुन वापरायचे तरी काय?
आणि जर काही सुचलेच..
तर खाजवायचे तरी काय?
(मिशीवाला) योगेश.
प्रतिक्रिया
22 Nov 2010 - 5:44 pm | गणेशा
चांगले लिहिले आहे रे .....
22 Nov 2010 - 5:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा ... मस्त!
26 Nov 2010 - 12:43 pm | भाऊ ठाकुर
जरा चालीत सुधारणा, जराशी शब्दांची
.
.
बाकी सगळे ठिक!
26 Nov 2010 - 12:43 pm | भाऊ ठाकुर
जरा चालीत सुधारणा, जराशी शब्दांची
.
.
बाकी सगळे ठिक!
26 Nov 2010 - 12:56 pm | कानडाऊ योगेशु
काय बी समजले नाय बा!
हे म्हणजे एखाद्या न चालणार्या दुकानात गिर्हाईक यावे (ते ही दोनदोनदा) आणि त्याने शंभरचे सुटे मागावेत असा प्रकार झाला.
(दुकानदार) योगेश
26 Nov 2010 - 3:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
26 Nov 2010 - 3:49 pm | छोटा डॉन
>>हे म्हणजे एखाद्या न चालणार्या दुकानात गिर्हाईक यावे (ते ही दोनदोनदा) आणि त्याने शंभरचे सुटे मागावेत असा प्रकार झाला.
=)) =)) =)) =))
एकदम कडक उत्तर, मान गये उस्ताद :)
26 Nov 2010 - 1:45 pm | भाऊ ठाकुर
एखाद्या न चालणार्या दुकानात ....(कवीच्या?)
जे न करे रवी | ते करे कवी | देतो तो शिवी | अस्खलित ||---हे काय ब्वा?
प्रतिक्रिया झेपत नसतील तर कशाला 'रवीला न दिसणारी' बघायला जायची...नसती उठाठेव!
घरच्या घरी लिहावी
स्वतःच वाचावी
आणि फेकून द्यावी
(कळलं की लिहूच... जाऊदे लिहीतोच्..नाहीतर पुन्हा म्हणाल ...काय बी समजले नाय बा!)
कुंडीत
26 Nov 2010 - 8:28 pm | कानडाऊ योगेशु
मी ठार चुकलो भा(ई)ऊ..
तुम्ही तर हफ्ता घ्यायला आलात आणि मी सुट्टे नाहीत म्हणालो...! वर अस्खलित शिवी ही दिली ...माफी असावी..
(चिल्लर कवी) योगेश.
26 Nov 2010 - 9:58 pm | गंगाधर मुटे
पहिले दाढ, मग अक्कलदाढ त्यानंतर दाढी :)