चित्ताकर्षक गोष्टी -१

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
22 Nov 2010 - 7:25 am

दर्शनांवरील लेखमालेने डोके गरगरत असणारच; त्यावर उतारा म्हणून दोन तीन सुरस व चमत्कारिक गोष्टी सांगणार आहे सुरवात माधवीपासून.

गालव हा विश्वामित्रांचा शिष्य.अनेक वर्षे गुरूची सेवा केल्यानंतर त्यांनी गालवाला प्रेमाने निरोप दिला.गालव गुरूदक्षिणा घ्याच असा आग्रह करू लागला. आग्रहाचा हट्टाग्रह झाल्यावर विश्वामित्र चिडले व म्हणाले " श्वेत वर्णाचे व एक कान काळा असलेले ८०० घोडे मला दक्षिणा म्हणून दे." गालव हताश झाला. आपल्याकडे पैसे नाहीत, कोणी मित्र नाही, आता काय करावयाचे ? ही अट कशी पुरी करावयाची ? तेव्हढ्यात त्याला गरुड भेटला व तो गालवाला घेवून निरनिराळ्या देशांना गेला.ययाती राजाकडे गेल्यावर राजा म्हणाला " माझ्याकडे धन नाही व घोडेही नाहीत. पण तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवावयाचे मला पटत नाही. तेंव्हा मी माझी तरुण, लावण्यवती मुलगी, माधवी, देतो. तीला घेऊन तुम्ही कोणत्याही राजाकडे जा. तो तीला पाहून घोडेच काय, सगळे राज्यही देईल. ." दुसरे काही समोर नसल्याने गालव व गरुड माधवीला घेऊन निघाले.प्रथम हर्यश्व राजाकडे गेले. त्याला माधवीचे मूल्य सांगितल्यावर तो विचार करून म्हणाला " माझ्याकडे फक्त २०० असे घोडे आहेत. तेंव्हा माधवीला एक मुलगा होईपर्यंत तीला माझ्याकडे ठेवा आणि माधवी परत घेऊन जा. गरुड म्हणाला " एवडे घोडे तर घे, पुढे बघू." त्या प्रमाणे एक मुलगा होईपर्यंत माधवी तेथे राहिली. नंतर तेथून निघाल्यावर माधवी म्हणाली " एका ब्रह्मनिष्ठाने दिलेल्या वरानुसार मी कितीदाही प्रसूत झाले तरी प्रसूतीनंतर परत कुमारीच होऊन राहीन." याच पद्धतीने दिवोदास व उशीनरा या दोघा राजांकडून ४०० घोडे मिळविले. नंतर गालव गरुडास म्हणाला "तीन चतुर्थांश कामगिरी झाली." गरुड म्हणाला "इहलोकात असे केवळ ६००च घॊडे आहेत. तेंव्हा तू आता विश्वामित्रांकडेच जा व त्यांना विनंती कर की उरलेल्या २०० घोड्यांऐवजी माधवीला स्विकारा." गालवाने तसे सांगितल्यावर माधवीकडे पाहून विश्वामित्र म्हणाले " इतकी दगदग कशाला केलीस? प्रथमच माझ्याकडे आला असतास तर मलाच चार पुत्र मिळाले असते. असो. आता हे ६०० घोडे आश्रमाभोवती सोडून दे व एक मुलगा होईपर्यंत माधवी येथे राहू दे." गुरूला एक पुत्र मिळाल्यानंतर गालवाने माधवीला परत ययातीकडे नेऊन सोडले. पुढे ययाती स्वर्गात गेला, तेथून पुण्यक्षय झाल्यावर पदच्युत झाला व परत पृथ्वीवर आल्यावर माधवी, तीची चार मुले व गालव यांच्या पुण्याच्या योगाने परत स्वर्गात गेला.
तर अशी ही गालवाची ( की माधवीची ?) कथा. उद्योग पर्वात (अ.१०६ ते अ. १२२) नारदाने हट्टाग्रहाचे परिणाम काय होतात हे कळावे म्हणून दुर्योधनाला सांगितलेली. ही कथा वाचून काय वाटते ?
(१) माधवीला कौमार्य परत मिळाले हा भाग सोडा. त्यावर वाद नको. अशा आज न पटणार्‍या अनेक गोष्टी "काव्य" म्हणून स्विकाराव्यात.
(२) इथे माधवी ही एक वस्तू (commodity) आहे का? वडीलांनी सांगितले म्हणून ती मुकाटपणे गालवाबरोबर गेली. समोर आलेल्या चौघांचा स्विकार केला. तेव्हा असे वाटते खरे. पण हे तीने स्वेच्छेने केले आहे. कारण पुढील कथेवरून असे दिसते की ती परत आल्यावर ययातीने तीच्या दोन भावांबरोबर तीने स्वयंवर करावे म्हणून निरनिराळ्या देशात पाठवले. तीला कोणी पसंत न पडल्याने तीने वनवास स्विकारून तपस्येचा निश्चय केला व ब्रह्मचर्य पाळून विपुल तपाचरण केले. तीला कोणतीही लालसा दिसत नाही. तीला स्वेच्छेने वागावयाचा अधिकार आहे व ती त्याप्रमाणे आयुष्यभर जगली.
(३) चौघांनीही एक पुत्र प्राप्त झाल्यावर ( कष्टाने का होईना) तीला गालवाकडे परत दिले.माधवी गेल्याच्या दु:खाबरोबर पुत्रप्राप्तीचा आनंद मिळवला.
(४) या सर्व व्यवहारात गालव, ययाती, माधवी, तीचे चार पती (!) व चार मुले, तसेच समाज यापैकी कोणालाच काही अयोग्य वाटले नाही.धर्माची व समाजाची याला मान्यता होती. तीची चारी मुले सदाचारी, प्रतिष्ठीत राजे होते. (कारण)
(५) वंशवृद्धी ही समाजाची (व म्हणून धर्माची) प्राथमिक व महत्वाची गरज, इतर गोष्टी नंतर ?
(६) आज असे घडले तर समाजाची (धर्माला कोण विचारतो म्हणा)प्रतिक्रिया काय असेल? असावी?
(७) नीति कल्पना इतकी कालसापेक्ष आहे का ?
असो. थोडी अवांतर माहिती. माधवीकडॆ बघून हर्यश्व राजा म्हणतो, " ही कन्या नि:संशय सुलक्षण आहे. सामुद्रिकात सांगितल्याप्रमाणे जे सहा अवयव उन्नत असावे; [तीन पर्याय]{(१) दोन पायांचे तळवे, दोन हातांचे तळवे व दोन स्तन वा(२) स्तनद्वय, नितंबद्वय व नेत्रद्वय वा(३) छाती, कुशी,केश,खांदे,हात व मुख} जे सात भाग सूक्ष्म असावे; (त्वचा,केश,दंत, करांगुलि, पादांगुलि व त्या अंजुलींची पेरे) जे तीन गंभीर असावे (स्वर, मन आणि नाभि);जे पांच आरक्त असावे (हाताचे तळवे, डोळ्यांचे कोंपरे,ताळू, जिव्हा व अधरोष्ठ)ते तसे आहे. " स्त्री सौंदर्याबद्द्सल हे झाले हर्यश्वाचे मत, आपले मत ?

शरद

वाङ्मयविरंगुळा

प्रतिक्रिया

आजही असेच होत असते.
पण स्त्रीला याच्याकडून त्याच्याकडे फिरवले तर त्याला स्कॅण्डल्स/स्कॅम म्हणतात.
उदा. १. औरंगाबादेतील पो.नि. पालवेंची सुरस कथा.
२. मुंबईतील पो.नि. बोरूडेची सुरस कथा.

कदाचित आजच्या लोकांकडे झालेल्या स्कॅण्डल/स्कॅमची चित्ताकर्षक कथा करून पुराणात घालण्याचे कौशल्य नसेल.

ही कथा वाचून काय वाटते ?

ही कथा वाचून एवढेच वाटते की नसते उद्योग करण्याचा, सुंदर स्त्रियांना हवे तसे वापरून वर पुन्हा झाकापाक करण्याचा पायंडा फार्फार जुना आहे.

तीला कोणी पसंत न पडल्याने तीने वनवास स्विकारून तपस्येचा निश्चय केला व ब्रह्मचर्य पाळून विपुल तपाचरण केले. तीला कोणतीही लालसा दिसत नाही. तीला स्वेच्छेने वागावयाचा अधिकार आहे व ती त्याप्रमाणे आयुष्यभर जगली.

कपटनीतीनं लिखाणं करण्याचा कळस! आधीच चार जण झाल्यावर तिला आणखी कुणी पाचवा पसंत पडला नाही म्हणून तिने विपुल तप केले आणि ब्रह्मचर्य पाळले अशी जबानी कोर्टात द्यायला लावा बरं . मा**** साले!

शेवटी असली "काव्ये" सुध्दा गटारात फेकून देण्याच्या लायकीची आहेत.

कपटनीतीनं लिखाणं करण्याचा कळस! आधीच चार जण झाल्यावर तिला आणखी कुणी पाचवा पसंत पडला नाही म्हणून तिने विपुल तप केले आणि ब्रह्मचर्य पाळले अशी जबानी कोर्टात द्यायला लावा बरं . मा**** साले!

अहो तुम्ही असे प्रतिसाद देऊ नका......
नाहीतर हा ID सुद्धा ब्यान व्हायचा... ;)

हो. हो. तीही शक्यता आहे.
पण माझा रोख शरदरावांवर नाही; हे त्यांचे लिखाणही नाही. त्यामुळे ते समजून घेतील.
तसेही ते प्रतिसादकांच्या फारसे नादी लागत नाहीत.
ते जुन्या चित्ताकर्षक कथा फक्त सांगत आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2010 - 1:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीती-अनितीच्या निमित्ताने पुराणकथा-काव्यात येणार्‍या अशा गोष्टी केवळ 'काल्पनिक' म्हणून वाचल्या पाहिजेत असे वाटते.

माधवी ही एक वस्तू (commodity) आहे का ?
सदरील कथेत माधवीचा उपयोग एका वस्तूसारखाच झालेला दिसतो.

माधवीला स्वेच्छेने वागावयाचा अधिकार आहे व ती त्याप्रमाणे आयुष्यभर जगली.

हे काही खरं वाटत नाही.

या सर्व व्यवहारात गालव, ययाती, माधवी, तीचे चार पती (!) व चार मुले, तसेच समाज यापैकी कोणालाच काही अयोग्य वाटले नाही.धर्माची व समाजाची याला मान्यता होती.

आपण म्हणत आहात की अशा गोष्टींना जर समाजमान्यता होती तर तर त्या गोष्टीला अयोग्य म्हणण्याचे काहीच कारण नाही.

(६) आज असे घडले तर समाजाची (धर्माला कोण विचारतो म्हणा)प्रतिक्रिया काय असेल? असावी?

'माधवी' ही उच्च कुळातील आणि श्रीमंत,असल्यामुळे तिचा हा व्यवहार हा उच्चभ्रू लोकांमधे 'दुर्लक्ष' [नजरअंदाज] करण्यासारखी गोष्ट कदाचित झाली असती असे वाटते.

बाकी, हर्यश्वच्या तोंडून स्त्री सौंदर्यांचे वर्णन करतांना स्त्री सौंदर्याचे 'विशेष' काय असले पाहिजे, असते हे साधारणतः लक्षात येते. आपले या प्राचीन विषयावरील वाचनाचा आवाका माहिती असल्यामुळे आपणच नव्या धाग्यात 'प्राचीन काव्यातील स्त्री सौंदर्य' असा विषय घेऊन आम्हा वाचकांना स्त्री सौंदर्यांच्या कल्पनेवर 'लावण्यवतींची' माहिती द्यावी. :)

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

23 Nov 2010 - 8:52 am | स्पंदना

स्वर गंभीर्...कळल
मन गंभीर्.....असलच पाहिजे बापान दान केल्यावर इतक सार सोसण्या साठी त्याची अतिशय गरज होती निदान तिला तरी.
पण
ही नाभी कशी गंभीर अस्ते ब्वा?