एखादा झकास लेख....

अर्धवट's picture
अर्धवट in जनातलं, मनातलं
21 Nov 2010 - 7:16 pm

रोज दिवसभर काहीतरी सुचत असतं, आज थोडं यावर लिहुया असंही मनाशी म्हणतोही तेव्हा... एखाद्या क्षणी हे अगदी उजळपणे जाणवतं की.. अरे.. हा... हाच.. हाच तर क्षण खूप सकस आहे.. खोल आहे.. किती उत्कट आहे.. आपल्या मित्रांना सांगायलाच हवा.. उलगडायलाच हवा निवांतपणे.. मनात नोंदही होते तशी पण.. पण...

पण एक प्रॉब्लेम होतो.. हल्ली काही लिहायला घेतलं तर पुर्णच करता येत नाही... काहीतरी विचार घेउन कळफलक समोर घ्यावा... तर दोन चार वाक्यं लिहून होतात.. त्यापुढंच वाक्य लिहिता लिहिता विचारांची मालीका कुठेतरी भरकटत जाते.. धडाडती फास्ट ट्रेन.. सुसाट वेगाने रूळ बदलते..

मनाच्या अवकाशात असंख्य रंग उधळले जातात.. नवीन ताल घूमू लागतात.. नवीन खेळ सुरू होतो नव्या गड्यांचा... एका निसटत्या क्षणी जाणवतं बरंका, की काहीतरी चुकतंय.. आपण वेगळे होतो आत्ता .. आत्ता रंग बदलतोय... पण तरीही एखाद्या निसटत्या क्षणी आपणंच देतो भिरकावून स्वत:लाच.. स्वतःच्याच पोकळीत.. मग खरा आनंद असतो.. मुक्त असतो आपण काही क्षण.. निवांत सुंदर फ्रीफॉल.. अलगद उतरणार आपण स्वप्नांच्या मखमली प्रदेशात.. पण असं कोसळताना प्रत्येक वेळेला नाही लागत तो प्रदेश...

जाणवतं की हे कोसळणं थांबवलं पाहिजे.. असं अधांतरी कसं चालेल. घट्ट जाणीव नको का आधाराला, आणि तर्काची बळकट जमीन.. आधार तर शोधायलाच हवा.. धडपड करून

एखाद्या अणुकुचीदार विचारानं सळकन कापला जातो हात.. भळभळता... उगाचच वहावलो आपण.. क्षणांची जादू क्षणाची असते.. आपणच राहीलो असतो जरा खंबीर तर... असं नुसतं कीबोर्डकडं ब्लँक बघावं लागलं नसतं...

झाला असता ना एखादा झकास लेख....

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

विलासराव's picture

21 Nov 2010 - 9:28 pm | विलासराव

झालाय की झकास लेख.

गवि's picture

21 Nov 2010 - 9:44 pm | गवि

jhakas.

पैसा's picture

21 Nov 2010 - 9:54 pm | पैसा

राहू द्या तशाच अर्ध्या... त्या तशाच छान वाटतात.. जसा हा लेख!

धनंजय's picture

21 Nov 2010 - 10:16 pm | धनंजय

झकास जमला आहे.
(ओघात वाटेल तिथे वाहाणारे हे असे लेखन रंजक करणे म्हणजे कौशल्याची कसोटी असते. अशा प्रकारे पूर्ण दीर्घकथा किंवा कादंबरी लिहिण्याचे धाडस थोड्याच लेखकांनी केले आहे, धाडस करून यश मिळवणारे क्वचितच!)

अनुप्रिया's picture

21 Nov 2010 - 11:59 pm | अनुप्रिया

क्या बात है ! अगदि मनातले बोललात.....काही वेळा रंगांचे फटकारे कॅनव्हासवर मारावेत पण मनासारख चित्रच न उमटाव असही होत किंवा काढायच होत एक आणि झाल वेगळच चित्र अशी ही गत होते.
विचारानी मन वेडावत, भांबावत आणि मग वेगवेगळे रंगांचे फटकारे उमटत जातात कधी सुसुत्र कधी विचित्र.
सगळच अर्ध्या उमललेल्या कळीसारख कधी स्वप्नवत कधी बोचलेला एखाद काटा .
सगळ सुरळीत बसल असत तर झाला असता की एक छानसा लेख

स्वानन्द's picture

22 Nov 2010 - 10:31 am | स्वानन्द

अगदी अगदी.. मनातलच लिहीलंय. त्या मनोवस्थेचं आणि त्या 'बॅड पॅच चं अगदी सुरेख वर्णन'