डिसक्लेमर :- आधी कधीतरी लिहिलेल्या काही कवितांपैकी ही माझी एक "खाजकविता". खाजकविता म्हणजे कविता करण्याची खाज तर सुटली आहे पण विषय वा कल्पना मिळालेली नसल्याने सुचेल/दिसेल त्या विषयावर केलेल्या कविता.
वाचा आणि विसरुन जा प्रकारच्या कविता.जस्ट लाईक फास्टफूड आयटेम्स.
दर्जा/काव्यमुल्ये बद्दल हाताचे घडी अन तोंडावर बोट!.
..दाढी आणि खाज..
-------------------------------
खाजेचं आणि दाढीचं
असं काय आहे नातं ..
काही विचार करताना नेमकं
दाढीतच का बोट जातं....
काहींची बोकड दाढी
काहींची कोरलेली मस्त..
दाढीत बोट घातलं की ह्यांना
नाही नाही ते कसं सुचतं..
कुठं भलत्याचं ठिकाणी..
सुटते जेव्हा खाज..
खाजवतानाच आपल्याला
वाटत राहते लाज..
पण दाढीचं तसं नसतं
एक बोट नेहेमी दाढीत रुतलेलं असतं..
थोडंसच फिरवले कि ते..
आपण कसे वाटतो विचारवंत..
दाढीवाला नेहेमी वाटतो कसा
व्यासंगी पंडित गाढा
"किस" पाडणारा..
काढणारा अर्क किंवा काढा..
चांगली मोठी दाढी आता
मी ही वाढवावी म्हणतो..
खाजवत खाजवत तिला.
काही कविता करेन म्हणतो..
तुम्हाला ही वाटेल मग..
काहितरी गुढ कविता असेल ..
दाढीतलं खाजवणारं एक बोट माझं
तुम्हाला पुन:पुन्हा फसवेल...
-----
(क्लीनशेव्ड) योगेश
प्रतिक्रिया
18 Nov 2010 - 9:11 am | स्पंदना
(क्लीनबोल्ड) अपर्णा
18 Nov 2010 - 10:09 am | राजेश घासकडवी
"किस" पाडणारा..
तुम्हाला 'कीस पाडणारा' म्हणायचं आहे का? :)
लिहिण्याची गरज नव्हती. इतक्या सोप्या शब्दात तुम्ही लिहिलंय त्याअर्थी तुम्हाला दाढी नसणार हे ओळखलंच होतं.