मी पुरुष बिच्चारा

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
17 Nov 2010 - 5:29 pm

समान संधी मध्ये आजच्या
मी पुरुष बिच्चारा
बस मध्ये चढलो, अन
रीकामी लेडिज सीट दिसली तरी
लोंबकळत तेथेच मी रहातो
वाटल्यास कंडक्टरला विच्चारा

ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो
धक्का तीचा लागतो, पण
विनाकारण ' लाईनमन' होऊन
मार मला खावा लागतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा

वाटत अस्स उठाव अन
निवडून याव आपण
नियम समान करावेत
स्त्री पुरुषांसाठीचे, पण
नेमके तेंव्हा तिथले सीट
स्त्री साठी राखीव असते
काय करणार मी पुरुष बिच्चारा

नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून
लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले
फ़ॉर्म ही भरला, पण
नियमानेच गळा कापला
३० % लेडिज reserved म्हणून
आमचा नंबर waiting list ला गेला
काय करणार मी पुरुष बिच्चारा

तरी एकदा बघा सभेत
मी मलाच बिच्चारा म्हंटलो
तर पहातो काय
स्त्रीयांचा हंडा मोर्चा
अंगावर धावून आला
कारण काय म्हणे तर
अबले पणावर त्यांच्या
आम्ही घाला घातला

आता कसले काय
घरातला हंडा ही
सावधानतेने घेतो
नळाखाली हळूच लावून
लोकमत ची सखी
अन सकाळ ची मैत्रीण वाचत बसतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा

-------- शब्दमेघ

(नोट : कविता पुर्वप्रकाशित )

हास्यकविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

17 Nov 2010 - 5:53 pm | प्रकाश१११

आता कसले काय
घरातला हंडा ही
सावधानतेने घेतो
नळाखाली हळूच लावून
लोकमत ची सखी
अन सकाळ ची मैत्रीण वाचत बसतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा

हे छान लिहिले आहे. छान वर्णन ही परिस्थिती आलीय.
खरेय हे.

नितिन थत्ते's picture

17 Nov 2010 - 5:54 pm | नितिन थत्ते

बसमधील अनुभव.

बसचा सुरुवातीचा स्टॉप.
बस आधीच लागलेली. बसमध्ये चढल्यावर पाहिले तर. प्रत्येक खिडकीपाशी (राखीव असलेल्या आणि नसलेल्या) एक एक स्त्री बसलेली अशा साधारण ८-१० खिडक्या (सिंगल) ऑक्युपाईड. म्हणजे पुरुषाला खिडकीपाशी बसायचे असेल तर पार मागे बसायचे.

मागे बसायचे नसेल तर राखीव नसलेल्या पुढच्या सीटवर बसणे कायदेशीर दृष्ट्या शक्य आहे. पण त्यासाठी खिडकीपाशी आधी बसलेल्या स्त्री शेजारी बसायला हवे. तेथे बसायला गेल्यावर त्या स्त्रीचा तिरस्कारयुक्त कटाक्ष. "बाकी एऽऽऽवढ्या सीट रिकाम्या असताना माझ्याशेजारी बसायला आलाय, लोचट मेला!!!!" असे सुचवणारा. :(

आणि ही परिस्थिती रोज....

बिच्चारे पुरुष !!!!!!

धमाल मुलगा's picture

17 Nov 2010 - 6:00 pm | धमाल मुलगा

झकास लिहिलंय राव :)
मजा आली.

बाकी आता तुम्ही हंडा मोर्चा आला की तो कसा सांभाळायचा ते पहा बुवा. ;)

पैसा's picture

17 Nov 2010 - 7:32 pm | पैसा

गरीब बिच्चार्‍या पुर्षांवरील अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल तुझं अभिनंदन गणेशा! आम्हा पाशवी स्रियाना या काव्यामुळे नाण्याची दुसरी बाजू कळली हो!

तुम्ही ही कविता आधीही मिपावर टाकली होतीत का? असो, छान आहे. आवडली. कदाचित मी अशीच दुसरी कविता वाचली असेल.

युयुत्सुंच्या च्या नावावर हा धागा असायला हवा होता...

प्राजु's picture

17 Nov 2010 - 10:06 pm | प्राजु

कालाय तस्मै नम:!! चालायचंच!!
छान कविता.