थांबलेली सांज,
कातरवेळ...
मनात तूच..
तसाच नेहेमीसारखा !
तेच जीवघेणं हसू ,
तीच बेफिकीरी.
त्या बेफिकीरीची भुरळ,
ते गुंतत जाणं...नकळत !!
ते बहाणे, ती धडपड, ती धडधड...
भेटण्यासाठी.
मग कबूली, ते उमजणं, समजून घेणं
तो बहर, तो मोहर....
सार्याल जगाचा विसर !
पावसातलं भटकणं,
चांदण्यातलं भिजणं,
कवितेतलं रमणं,
डायरीतल्या गुलाबाच्या पाकळ्या....
...
..
अन् अचानक...
अचानक तुझं हरवणं ..
मग तुझं अस्तित्व
फक्त फ़ोटोतलं,
आठवणीतलं, स्पर्शातलं !
तो पाऊस, ते चांदणं, त्या कविता….पाकळ्या,
सारं काही पोरकं,
तुझ्याशिवाय !
आता सांज डोळ्यात,
रात्रीच्या प्रतिक्षेत
आणि रात्र.... रात्र तुझ्या चांदण्यात !
जयश्री अंबासकर
प्रतिक्रिया
13 Nov 2010 - 1:14 pm | बेसनलाडू
कविता छान आहे. जयश्री अंबास्करांच्या लौकिकाशी इमान राखणारी! आवडली.
(वाचक)बेसनलाडू
यावरून आम्हाला आमची एक लांबलेली सांज आठवली.
(स्मरणशील)बेसनलाडू
13 Nov 2010 - 7:28 pm | धनंजय
+१
13 Nov 2010 - 6:42 pm | चित्रा
पण
मग तुझं अस्तित्व
फक्त फोटोतलं
हे जरा मला नाही आवडले. आठवणीतलं, स्पर्शातलं यावरून थोडी कल्पना करता आली असती असे वाटले.
अर्थात तरी कविता छानच आहे.
13 Nov 2010 - 8:23 pm | राघव
मनातले चांगले उतरवलेले आहे! आवडले. :)
16 Nov 2010 - 2:09 pm | गणेशा
आवडली कविता
24 Nov 2010 - 1:27 pm | जयवी
धन्यवाद लोक्स :)
24 Nov 2010 - 2:25 pm | जागु
मस्तच.