उजव्या सोंडेचा गणपती

शुचि's picture
शुचि in काथ्याकूट
8 Nov 2010 - 8:17 am
गाभा: 

माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , उजव्या सोंडेचा शिळेचा सिद्धीविनायक आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या सोंडेच्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक असते. हे खरे आहे काय?

From zz

प्रतिक्रिया

ए.चंद्रशेखर's picture

8 Nov 2010 - 9:28 am | ए.चंद्रशेखर

गणपतीचे सोवळे कडक असते. म्हणजे काय? लेखिका काही खुलासा करू शकतील काय?

शुचि's picture

8 Nov 2010 - 11:58 am | शुचि

तेच विचारण्याकता हा धागा काढला आहे की नक्की काय कडक असते म्हणजे? पूजेमध्ये फरक आहे की अन्य काही?

ए.चंद्रशेखर's picture

8 Nov 2010 - 12:13 pm | ए.चंद्रशेखर

सोवळे हे एक रेशमी वस्त्र असते ते नेसावयाचे असले तर ते मऊ असण्याची आवश्यकता आहे. गणपती चे सोवळे म्हणजे काय? पूजा करणार्‍याने जर हे काही असे सोवळे नेसणे अपेक्षित असेल तर ते कडक कसे असू शकेल? यात पूजेमधल्या फरकाचा काय संबंध असू शकतो? काहीतरी कुठेतरी गोंधळ होतो आहे.

शुचि's picture

8 Nov 2010 - 12:29 pm | शुचि

http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=JalgaonEdition-13-1...

या लेखात सोवळे हा शब्द वस्त्र या संदर्भात वापरलेला नसून मी वपरला आहे त्या अर्थी वापरला आहे. लेखात खालील वाक्य आहे -

" उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक असते व ते मूर्तीकारालाही पाळावे लागते."

ए.चंद्रशेखर's picture

8 Nov 2010 - 12:31 pm | ए.चंद्रशेखर

तुम्ही काय अर्थाने हा शब्द वापरला आहे ते सांगाना म्हणजे प्रश्नच मिटला.

"सोवळे" हा शब्द येथे बर्‍याच अर्थांनी वापरला गेला आहे मुख्य म्हणजे - त्या त्या देवतेची नित्योपासना, तदनुषंगीक विधी, पावित्र्य, कर्मकांडं , पंचोपचारी पूजा, मूर्ती पूर्वाभिमुख, दक्षीणाभिमुख वगैरे असावी काय आदि गोष्टींकडे लक्ष देणे , स्तोत्राची आवर्तने आदि माझ्या लक्षात येतील तितके मुद्दे.

ए.चंद्रशेखर's picture

8 Nov 2010 - 1:07 pm | ए.चंद्रशेखर

मला आतापर्यंत सोवळे, सोवळी शब्दाचे दोनच अर्थ माहित होते. एक म्हणजे नेसण्याचे रेशमी वस्त्र व दुसरा म्हणजे केशवपन केलेली विधवा स्त्री. शुचि ताईंनी आता या शब्दाचा तिसरा अर्थ सांगितला आहे. या अर्थाचे स्वरूप तर प्रचंड व सर्वव्यापक दिसते आहे. मात्र या अर्थाने हा शब्दप्रयोग कसा करावा हे समजले नाही. असो. धन्यवाद.

वेताळ's picture

8 Nov 2010 - 9:57 am | वेताळ

अतिशय माहितीपुर्ण व सुंदर मुक्तक.....

माहीती देण्यासाठी धागा नसून "चौकशी" या सदराखाली आहे.

वेताळ's picture

8 Nov 2010 - 12:16 pm | वेताळ

पण गणपतीची सोंड उजवीकडे असते अन डावीकडे असते,त्यात देखिल काही गोम आहे ही माहिती ह्या लेखातुन मला कळाली म्हणुन हा लेख माझ्या करिता माहितीपुर्ण आहे.

स्पा's picture

8 Nov 2010 - 10:00 am | स्पा

मूर्ती फार प्राचीन दिसतेय......

शिवाय .. गणपतीच्या बाजूला अजून एका देवीची प्रतिमा दिसतेय......
त्याबाबतीत सुद्धा प्रकाश टाकावा ........

स्पा बरोबर ती मूर्ती प्राचीन आहे. मला "अँटीक स्पिरीचुअल गोष्टी" जमविण्याचा नाद आहे मला ही एका अँटीक दुकानात सापडली. दुर्मीळ आहे कारण पाषाणाची आहे.

ती देवी सिद्धी आहे म्हणूनच त्याला सिद्धी विनायक म्हटले आहे.

प्रशु's picture

8 Nov 2010 - 9:14 pm | प्रशु

ती देवी रिद्धी असावी कारण सिध्दीविनायकाच्या मुर्ती मध्ये गजाननाची सोंड हि उजव्या बाजुस सिद्धी कडे वळलेली असते असे म्हणतात..

शुचि's picture

8 Nov 2010 - 9:18 pm | शुचि

आभारी आहे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2010 - 12:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अनिल अवचट यांचे 'स्वतःविषयी' अलिकडेच वाचलं त्यात त्यांनी त्यांच्या घरातल्या अनेक गंमती लिहील्या आहेत. अनिल व सुनंदा अवचट दांपत्य नास्तिक, त्यामुळे त्यांच्या मुलींना देव-धर्माची ओळख नव्हती. माहितीत कमतरता राहू नये म्हणून दोघांनी मुलींसाठी देव आणायचे ठरवले, हौस मुलींचीच. मग स्नेह्यांकडून देव कुठे मिळतात याची माहिती काढून तुळशीबागेत खरेदीला गेले. मोठ्या मुलीने गणपतीची मूर्ती पसंत केली आणि ती निघाली उजव्या सोंडेच्या गणपतीची! दुकानदाराला एकूणच अवचट कुटुंबियांच्या 'वकूबा'ची कल्पना आल्यामुळे त्याने डाव्या सोंडेचा गणपती घ्यायला लावला. शेवटी अनिल अवचटांनी त्यातही घासाघीस करायचा प्रयत्न केल्यावर दुकानदाराने "देवाची किंमत अशी घासाघीस करून ठरवायची नसते" वगैरे ऐकवलं आणि वाटेला लावलं.

काही दिवसांनी या देवपूजा खेळातून मन भरल्यावर गणपती (आणि धाकटीचा विठ्ठल, दोघेही) इतर खेळण्यांच्या बादलीत जाऊन बसले. अनिल अवचटांच्याच शब्दांत "नशीब तो दुकानदार आमच्या घरी कधी आला नाही!"

मस्त :) छान प्रसंग सांगीतलास. इथे फिट्ट बसतोय. त्या दुकानदाराने उजव्या सोंडेची मूर्ती घेण्यापासून परावृत्त केले तर :(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2010 - 1:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुकानदारानं का परावृत्त केलं हे कारण शुचि, तूच लेखात लिहीलं आहेस, 'सोवळं कडक असतं'. आता मला विचारशील तर गणपतीचं सोवळं कडक असतं का नाही याचं खरं-खोटं आधी ठरवावं लागेल आणि ते ठरवण्यासाठी गणपतीला उत्तरं द्यावी लागतील.
तेव्हा गणपतीबद्दल माहित नाही, पण काही माणसांच्या लेखी उजव्या सोंडेच्या गणपतीचं सोवळं (म्हणजे काय असतं ते ही मला माहित नाही) कडक असतं.

आता अशीच काही माहितीची देवाणघेवाणः
१. ओवळा नावाचं गाव ठाण्याच्या जवळ आहे.
२. 'म्हैस'मधे पुलं "... सुपे, रोवळ्या,फणस, इ.इनी आपल्या जागा सोडल्या" असा उल्लेख करतात. यातल्या 'रोवळ्या' म्हणजे काय?
३. अतिअवांतरः पुलंच्या उल्लेखावरून आठवलं, 'आयुका'त आजपासून १२ नोव्हेंबरपर्यंत पुलंच्या जयंतीनिमित्त पुलस्त्य आठवडा साजरा होणार आहे. यातले कार्यक्रम विशेषतः शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी असतील, पण मोठ्यांनीही जाण्यास हरकत नाही. संध्याकाळी आकाशदर्शनाचे कार्यक्रम होतील. (बाकीच्या भाषांतराचा कंटाळा आल्यामुळे मला आलेलं इमेल तसंच चिकटवत आहे.)

The activities planned are Science experiment demonstrations, Learning how to indulge in basic Astronomy, Story-telling drama about Constellation, Question-Answer sessions, Public talks and exciting Sky Watching sessions with telescopes at night. These activities will repeat daily in a pre planned schedule (given below) from 2:00 pm to 10:30 pm. The venue would be the Chandrasekhar Auditorium and the Science Park of IUCAA.

There are no fees charged for any session. However seats for various sessions will be given strictly on first-come-first-served basis until all the seats are taken. For the sky watching session Free passes are being issued, which can be collected from the security office of IUCAA.

IUCAA invite the parents and guardians to bring wards to participate in these activities on any one of these six days according to their convenience.

In case a large group is coming from a school or an organization then they are requested to confirm their participation in advance.

कार्यक्रमाची रूपरेखा

2:00 pm to 3:00 pm : Science Toys Demonstration
3:30 pm to 4:30 pm : Visual Astronomy learning session
5:00 pm to 5:30 pm : Astro-drama – 'Constellation Stories'
6:00 pm to 7:00 pm : Public Lecture by various scientists
7:30 pm to 10:30 pm : Skywatching sessions ( in 1 hr batches )
subject to the weather - in-case of cloudy sky IUCAA plans to conduct extra show on some other day.

Contact IUCAA reception number - 25604 100

In-case of any special request Mr Samir Dhurde / Aparna Joshi may be contacted via above number

सूड's picture

8 Nov 2010 - 1:13 pm | सूड

बांबूने विणलेल्या टोपलीसारख्या पण डब्याप्रमाणे उभ्या घाटाच्या असतात. मुख्यतः कोकणात, तांदूळ धुतल्यानंतर त्यातील पाणी निथळून जाण्यासाठी ते रोवळीत ठेवतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2010 - 1:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"सुड" आणि चंद्रशेखर, धन्यवाद.

(अर्धी-घाटी) अदिती

मृत्युन्जय's picture

9 Nov 2010 - 4:50 pm | मृत्युन्जय

ते Science experiment demonstrations चे वाचुन मला एकदम शाळेतले शनिदर्शन आठवले. आयषॉट सांगतो सगळेजण छातीठोकपणे ४-५ कडी दिसत आहेत म्हणुन सांगत असताना मला मुद्दलात शनिच दिसला नव्हता. नंतर एकदा शाळेतच दुर्बिणीतुन शुक्र दाखवला होता. तो साध्या डोळ्यांनी जितका तेजस्वी दिसत होता त्यापेक्षा दुर्बिणीतुन अंमळ थोडा धूसरच दिसत होता. (कदाचित झोपेची वेळ झाल्यमुळे असेल तसे)

ए.चंद्रशेखर's picture

8 Nov 2010 - 1:12 pm | ए.चंद्रशेखर

रोवळ्या या शब्दाचा अर्थ वेताच्या किंवा तत्सम विणलेल्या टोपल्या असा आहे.

प्रशु's picture

8 Nov 2010 - 1:29 pm | प्रशु

नीट पहाता वरील मुर्तीची सोंड उजवीकडे वळलेली असली तरी तीचे टोक डावीकडे वळलेले वाटते... (मी बघण्यात चुकत असेन तर खुलासा करावा)

बाकी उजव्या सोंडेचा गणपती हा तांत्रिक मार्गाने उपासना करण्यार्यांचा म्हणुन ओळखला जातो असे मागे कुठेतरी वाचले आहे.

शुचि's picture

8 Nov 2010 - 1:59 pm | शुचि

बघते. ही माहीती रोचक आहे. धन्यवाद.

ए.चंद्रशेखर's picture

8 Nov 2010 - 2:06 pm | ए.चंद्रशेखर

पुण्याच्या सारसबागेतील गणपती बहुदा उजव्या सोंडेचा आहे. त्याची पूजा करण्याची पद्धती किंवा वर शुचि ताईंनी सांगितलेल्या असंख्य गोष्टी फारश्या निराळ्या पद्धतीने केल्या जातात असे ऐकिवात तरी नाही. त्यामुळे उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा विशेष पद्धतीनेच करावी लागते असे दिसत नाही.

मी खात्रीपुर्वक सन्गु शकत नाही, पण माझ्या महिती प्रमाणे गणपतिची सोंड ज्या बाजुला आधी वळलेली असते त्या सोंडेचा तो गणपति आहे अस मानतात. त्यामुळे मला वाटत हा गणपति डाव्या सोंडेचा आसावा. (पण नक्की माहित नाही)

शुचि's picture

8 Nov 2010 - 4:52 pm | शुचि

हे माहीत नव्हते.

आळश्यांचा राजा's picture

8 Nov 2010 - 10:27 pm | आळश्यांचा राजा

मला वाटत हा गणपति डाव्या सोंडेचा आसावा.

असंच वाटतं.

बाकी डाव्या/ उजव्या विचारसरणीवरची चर्चा चालू द्या!

बादवे नारळीकरांची "उजव्या सोंडेचा गणपती" नावाची छान कथा आठवली.

विसोबा खेचर's picture

8 Nov 2010 - 2:30 pm | विसोबा खेचर

डाव्या सोंडेच्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय?

शुचिजी,

डाव्या सोंडेचा, उजव्या सोंडेचा.. वगैरे देवांचे प्रकार हे मानवनिर्मित आहेत. काही मंडळींनी बहुधा स्वत:च्या दानदक्षिणेची एक सोय म्हणून हे सारं अवडंबर माजवलं आहे. देव हे 'एक तत्व नाम' आहे आणि पूजा ही पूजा असते व ती मनापासून व भक्तिभावाने केल्याशी कारण..!

देव हा भावाचा भुकेला आहे.. त्याचं सोवळं-ओवळं असणं, ते कडक असणं की मवाळ असणं, इत्यादी सार्‍या गोष्टी माझ्या मते भंपक आहेत..

तात्या.

-- एक तत्व नाम उभे विटेवरी..!

तात्या, ते ख्ररच तसं नसतं वगैरे शुचिताईंनाही माहित असेल की . पण जी काय प्रथा आहे ,रीत आहे , नियम आहे जे काही आहे ते त्यांना माहिती म्हणून हवे असेल. वर अदितीने सांगितल्याप्रमाणे जसे अवचटांनी मुलींच्या माहितीसाठी घरी देव आणले तसेच उजव्या सोंडेचा गणपतीबद्द्ल जे काही विशेष आहे ते माहितीसाठी त्यांना जाणुन घ्यायचे असेल.

विसोबा खेचर's picture

8 Nov 2010 - 7:26 pm | विसोबा खेचर

पण जी काय प्रथा आहे ,रीत आहे , नियम आहे जे काही आहे ते त्यांना माहिती म्हणून हवे असेल.

मीदेखील तीच माहिती दिली आहे..

'एक तत्व नाम..' आणि 'निर्व्याज भक्ति..' हा एकच नियम आहे, रीत आहे..!

बाकी उजवी सोंड, डावी सोंड, अशी सगुण रुपं अनेक असू शकतील. परंतु त्या अनुषंगाने येणार्‍या कडक-मवाळ सोवळं-ओवळं वगैरे गोष्टी केवळ अवडंबर आहे..

'अरे बापरे..! तो तर उजव्या सोंडेचा गणपति आहे.. त्याची पूजा-अर्चा नीट झाली नाही, एकदष्णी, आवर्तनं वगैरे नीट झाली नाहीत तर तो कोपेल..!' अशी मग वर्षानुवर्ष भिती घातली जाते..!

असो..

तात्या.

आत्ताच ग्लोबलमराठी डॉट कॉम या साईट (http://www.globalmarathi.com/GlobalMarathi/20100913/5650305159087210613.htm) वर जाऊन एक लेख वाचला. त्यात म्हटले आहे - 'श्रीगणेशपुराण' आणि 'श्रीमनमुद्गलमहापुराण' या दोन ग्रंथांव्यातिरिक्त शुद्ध निर्गुण गणेशोपासकांसाठी, निष्काम गणेशोपासकांसाठी इतर कोणत्याही ग्रंथांची आवश्यकता नाही. श्रीगणेशपुराण असो की
श्रीमनमुद्गलपुराण दोनपैकी कोणत्याही पुराणात अगदी एका ओळीचा सुद्धा 'उजवा गणपती व डावा गणपती' असा भेददर्शक एकही उल्लेख चुकूनही सापडत नाही. ज्योतिषशास्त्रात जशी पत्रिकेच्या मंगळाची एक अनामिक भीती बसलेली आहे तशीच उपासकांमध्ये उजव्या गणपतीविषयक निरर्थक भीती आहे.

असू शकेल. पण माझ्या मनात ही शंका बरेच दिवस घर करून होती म्हणून येथे मांडली.

वेताळ's picture

8 Nov 2010 - 7:51 pm | वेताळ

आता अजुन एक माहिती द्या हिंदु धर्मात असा कोणता देव आहे का ज्याच्या उपासनेसाठी अटी,सोवळे किंवा अवडंबर माजवले जात नाही.

पण दत्ताचं सोवळं (हाच शब्द मी ऐकला आहे.) खूप कडक असतं वगैरे ऐकून आहे. तसं इतर देवांचं नाही. असंच काहीसं उजव्या सोंडेच्या गणेशमूर्तीचं ऐकलं होतं.

विसोबा खेचर's picture

8 Nov 2010 - 8:01 pm | विसोबा खेचर

हे सारे पसरवलेले गैरसमज आहेत..

'एक तत्व नाम' आणि 'निरलस भक्ति' या दोनच गोष्टी कृपया लक्षात ठेवा..

दत्त, शंकर, विठोबा, गणपति हे सारे एकच आहेत हे कृपया लक्षात घ्या..

तात्या.

वेताळ's picture

8 Nov 2010 - 8:10 pm | वेताळ

त्या देवांच्या पुजार्‍यांचे सोवळे किंवा त्याचा आचार ,त्याचे वागणे अगदीच दुट्टप्पी असते. पण इतरांना तुच्छ समजणे हे तर अगदी साधी बाब त्याच्यासाठी आहे. असल्या लोकाना देवप्राप्ती तरी होते का?सरळा साधा नामस्मरणाचा किंवा भक्तीचा मार्ग सोडुन आडवळणाच्या मार्गाला जाण्यात काय जरुरी आहे?मला एक उजव्या सोंडेच्या गणपतीची मुर्ती भेट मिळाली आहे. गेली ५ वर्षे ती शोकेस मध्ये मस्त दिसते आहे. त्यामुळे इतका विचार करण्याची गरज नाही.

मुक्तसुनीत's picture

8 Nov 2010 - 8:11 pm | मुक्तसुनीत

सहमत आहे.

+१ >> इतरांना तुच्छ समजणे हे तर अगदी साधी बाब त्याच्यासाठी आहे >>

टिउ's picture

8 Nov 2010 - 8:34 pm | टिउ

देव माणसाच्या मनात राहतो, देवळात फक्त पुजार्‍याचे पोट राहते.
- गाडगे बाबा

विसोबा खेचर's picture

8 Nov 2010 - 7:54 pm | विसोबा खेचर

त्यात म्हटले आहे - 'श्रीगणेशपुराण' आणि 'श्रीमनमुद्गलमहापुराण' या दोन ग्रंथांव्यातिरिक्त शुद्ध निर्गुण गणेशोपासकांसाठी, निष्काम गणेशोपासकांसाठी इतर कोणत्याही ग्रंथांची आवश्यकता नाही.

माझ्या मते तर वरीलदेखील दोन्ही ग्रंथांची आवश्यकता नाही.. गणपतिचं केवळ दोन मिनिटांचं मनापासून केलेलं स्मरण पुरेसं आहे..

'गणपति बाप्पा मोरया..' इतकं नामदेखील पुरेसं आहे..! आमच्या ग्यानबा-तुकोबांच्या भागवतधर्मात केवळ नामस्मरण हीदेखील मनापासून केलेली भक्तिच मानतात..

पण माझ्या मनात ही शंका बरेच दिवस घर करून होती म्हणून येथे मांडली.

हे बरीक उत्तम केलंत.. :)

तात्या.

अर्धवटराव's picture

8 Nov 2010 - 11:12 pm | अर्धवटराव

काय झालं काय तात्या तुम्हाला अच्यानक ?? चक्क निरलस भक्ती काय, भावाचा भुकेला काय, एक तत्व नाम काय... दोन पेग व्हीस्की, मासळीचं जेवण आणि तंबाखु पान जमवुन दोन तंबोर्‍यांना आजुबाजुला घेउन कुठल्याश्या रागदरबारीत रमणारा तात्या अच्यानक दोन वाट्या ताक, साबुदाणा खिचडी खाउन, कपाळी बुक्का लाउन हरि हरि करत पंढरीच्या वाटेला जाताना दिसला... अंमळ डोळे पाणावले. वासुनानांना पाठवतोय तुम्हाला परत बोलवायला... अहो काकाजींनी रानडुकराची जबरी शिकार केलीय... जंगी बेत आहे रात्री देवास्करांच्या वाड्यावर.

(न पचणार्‍या गोळ्या घेणारा) अर्धवटराव

विसोबा खेचर's picture

9 Nov 2010 - 10:53 am | विसोबा खेचर

वासुनानांना पाठवतोय तुम्हाला परत बोलवायला... अहो काकाजींनी रानडुकराची जबरी शिकार केलीय... जंगी बेत आहे रात्री देवास्करांच्या वाड्यावर.

सुंदर प्रतिसाद..

नक्की येतो असा गुरुवर्य काकाजींना निरोप द्या प्लीज.. :)

तात्या.

अविनाशकुलकर्णी's picture

8 Nov 2010 - 4:21 pm | अविनाशकुलकर्णी

सोंड उजव्या बाजूला वळलेल्या सिद्धीविनायकांची पूजा प्रामुख्याने तांत्रिक नियमांनी जास्त निबद्ध झाली; कारण बहुतेक गणपती डाव्या सोंडेचेच दिसतात...तांत्रिक लोक तंत्र विद्ये च्या पुजे साठी उजव्या सोंडेच्या गणपतिची आराधना करीत असावेत..असा एक तर्क आहे

मी_ओंकार's picture

8 Nov 2010 - 4:47 pm | मी_ओंकार

आप्पा भिंगार्डे आठवला.

- ओंकार.

उजव्या सोंडेचा गणपती हा जागृत मानला जातो, त्यामुळे त्याच्या संदर्भातील पूजाअर्चा, व्रतवैकल्ये अधिक कसोशीने पालवी लागतात असा समज आहे. मात्र माझ्या मते ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे.

उजव्या सोंडेच्या गणपतीला नॉन-वेज चालत नाही. म्हणजे शुचिताईना सामिष भोजनाचा त्याग करावा लागेल :P

(हे मला सांगण्यात आल्यावर माझे आर्ग्युमेंट = त्याला देऊ नका, तुम्ही खा)

संकेत's picture

8 Nov 2010 - 8:19 pm | संकेत

शुचितै,

तुम्हाला इथे कुणी सांगितले की उजव्या सोंडेचा गणपती लय डेंजर असतो. त्याची कडक उपासना करावी लागते. तसं केलं नाही तर मुलाबाळांच्या जिवावर उठेल. पैसाअडका कमी होईल. आजार येतील तर तुम्ही पाळणार का आचार आणि कर्मकांडे करणार का?

-संकेत.

मूळ हेतू हा होता लेखाचा की उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजाअर्चा कशा प्रकारे करायची ते जाणून घ्यायचं होतं. मग मी प्रयत्न तर नक्कीच केले असते.

संकेत's picture

8 Nov 2010 - 8:26 pm | संकेत

प्रयत्न करायचे म्हणजे तुमचा विश्वासही झाला. तुम्ही अंधश्रद्धा पसरवण्याचा हा उद्योग थांबवावा अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.

मिसळपाव संपादकांनी याकडे लक्ष पुरवावे.

इंटरनेटस्नेही's picture

9 Nov 2010 - 10:53 am | इंटरनेटस्नेही

यात कसला आला आहे अंधविश्वास? कोणी तरी आपले अध्यात्म विषयक प्रश्न विचारले म्हणजे अंधविशास झाला का?
उगाच की बोर्ड बडवु नका!

इंटरनेटस्नेही's picture

9 Nov 2010 - 3:09 am | इंटरनेटस्नेही

यात कसला आला आहे अंधविश्वास? कोणी तरी आपले अध्यात्म विषयक प्रश्न विचारले म्हणजे अंधविशास झाला का?
उगाच की बोर्ड बडवु नका!

इनोबा म्हणे's picture

9 Nov 2010 - 11:51 am | इनोबा म्हणे

एखाद्याने प्रामाणिकपणे त्याची शंका विचारावी आणि इतरांनी त्याच्यावरच आरोप करत कारवाईची मागणी करावी हे जरा अतीच झाले.

मी घरी उजव्या सोंडेची मूर्ती आणली आहे हे ऐकून आईने सल्ला दिला होता मग निदान पूजा तरी करू नकोस. मी करते ते वेगळं. पण मिपावर संशयाचं निराकरण झालं.ज्यांनी कोणी मत प्रदर्शन के ले त्या सर्वांचे आभार

तिमा's picture

8 Nov 2010 - 8:31 pm | तिमा

सर्वप्रथम या विषयावर काहीही पारंपारिक ऐकिव माहिती लिहिली तरी अंधश्रध्दा पसरवण्याचे पातक लागेल. तरी जे ऐकले आहे ते सांगतो.
उजव्या सोंडेच्या गणपतीचे विसर्जन करता येत नाही. (त्यामुळे तो जन्मभर आपल्याकडेच ठेवावा लागतो.) तसेच त्याची कडक सोवळ्यात रोज पूजा केली नाही तर तो कोपतो आणि ज्या घरांत तो आहे त्यांना त्याची वाईट फळे भोगावी लागतात.

माझ्या मते या सांगीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि प्रामाणिकपणे व निस्वार्थी वृत्तीने वागत रहावे. कॉन्शस क्लिअर असेल तर कळीकाळाची सुध्दा भीति वाटणार नाही.

क्लिंटन's picture

8 Nov 2010 - 10:58 pm | क्लिंटन

उजव्या सोंडेच्या गणपतीचे विसर्जन करता येत नाही. (त्यामुळे तो जन्मभर आपल्याकडेच ठेवावा लागतो.) तसेच त्याची कडक सोवळ्यात रोज पूजा केली नाही तर तो कोपतो आणि ज्या घरांत तो आहे त्यांना त्याची वाईट फळे भोगावी लागतात

माझी कडक सोवळ्यात पूजा करा नाहीतर माझ्या कोपाला सामोरे जा असे म्हणणारा आणि मला खंडणी द्या नाहीतर माझ्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्यांना सामोरे जा असे म्हणत खंडणी उकळणारा गुंड याच्यात फरक तो काय? छे हो आमचा देव असा स्वत:च्या इगोसाठी शिक्षा करायला बसलेला नाही.

दगडाच्या मूर्तीची सोवळ्याने पूजा करा किंवा करू नका किंवा श्रीराम लागूंप्रमाणे "मी एका दगडापुढे उभा होतो त्या दगडाला लोक पांडुरंग म्हणतात" असे म्हणा देव आपल्याला केवळ ’त्याच्या दगडाच्या मूर्तीची पूजा केली नाही’ म्हणून शिक्षा करेल यावर कसा काय विश्वास बसतो हेच समजत नाही.

माझ्या मते या सांगीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि प्रामाणिकपणे व निस्वार्थी वृत्तीने वागत रहावे. कॉन्शस क्लिअर असेल तर कळीकाळाची सुध्दा भीति वाटणार नाही

अगदी असेच.

(देवावर विश्वास ठेवणारा पण दगडाच्या मूर्तीत देव नाही असे मानणारा) विल्यम जेफरसन क्लिंटन

ईन्टरफेल's picture

8 Nov 2010 - 8:42 pm | ईन्टरफेल

ताई मुर्ति कुठलिही आसोदे
तीच्या समोर दोन मिनीटे
डोळे मिटुन हात जोडुन उभे रहा
जि मुर्ती तुमच्या डोळ्यासमोर
(येथे आपल्या आईची मुर्ती देखिल } येईल
तीला मनापासुन नस्कार करा
बघा! आत्म शांती जरुर मिळेल
बाकि सब झुट हे

एक ....गावरान दगड ( शेंदुर नसलेला )

कर्मकांडाशिवाय आपण जगू शकत नाही. रोजच्या त्याच त्या गोष्टींत आपण काहीतरी एक्सायटिंग शोधतोच ना? मग उजव्या सोंडेचा गणपती, उजव्या वळणाचा शंख, एकमुखी रुद्राक्ष,शनि अशा ब-याच गोष्टींना असा जरा "कडक असतं बरं का" चा तडका दिला जातो. थ्रिल हो शुचि ताई..थ्रिल..

अविनाशकुलकर्णी's picture

8 Nov 2010 - 9:23 pm | अविनाशकुलकर्णी

उजव्या सोंडेच्या गणपतीला नॉन-वेज चालत नाही

आपण बहुतेक संकष्टीला "खिम्याच्या २१ मोदकाचा नैवेद्याचा घाट घातलेला दिसतोय..

मेघवेडा's picture

8 Nov 2010 - 9:25 pm | मेघवेडा

बरंच कुटून झालेलं आहे. उजव्या सोंडेच्या गणेशाचं सोवळं कडक असतं ही ऐकीव माहिती आहे पण त्यामागच्या शास्त्रार्थाबद्दल माहिती नाही. त्यामुळे त्या बाजूस जाणे टाळतो.

माझा अध्यात्माचा अजिबात अभ्यास नाही मात्र आणखी एक मुद्दा मांडावासा वाटला म्हणून सांगतो. तो म्हणजे 'ओंकारप्रधान रूप गणेशाचे/ ॐकारस्वरूपा' अशा शब्दांत गणेशाला ज्या कारणे वर्णीले जाते ते, अर्थात श्रीगणेशाचं ॐकारस्वरूप. गणेशाचा मंत्रसुद्धा "ॐ गं गणपतये नमः" असा आहे अर्थात बीज 'गं' हे आहे. तर गणेशाच्या सोंडेला नेहमीच गकार असतो. सोंड उजवीकडे वळलेली असो डावीकडे वळलेली असो, तिला असलेल्या गकाराशिवाय गणेशाचं ॐकारस्वरूप हे अपूर्ण आहे. सोंड उजवीकडे वळली तर उजव्या सोंडेचा डावीकडे वळली तर डाव्या सोंडेचा असं मानण्यात येतं. उजव्या सोंडेच्या मूर्तींमध्ये सोंडेचा गकार स्पष्ट दिसतो तर डाव्या सोंडेच्या मूर्तीतही सोंडेचं टोक हे गकारातच असतं. लालबागचा राजा असो की अष्टविनायक असोत, शुंडागकाराशिवाय गणेशाचं ॐकारस्वरूप अपूर्ण आहे हेच खरं.

आणखी जाणत्यांना विचारून काही माहिती मिळाली तर कळवतोच. विषय इंटरेस्टिंग आहे.

फार छान माहीती! हे माहीत नव्हतं.

शुचीच्या गणपतीची सोंड वरच्या गणपतींसारखीच वळलेली दिसतेय...म्हणजे उजव्या कि डाव्या कुठल्या सोंडेचा आहे तो गणपती?

अविनाशकुलकर्णी's picture

8 Nov 2010 - 9:33 pm | अविनाशकुलकर्णी

उजवी सोंड आणि डावी सोंड यांचा भावार्थ
उजवी सोंड : उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणमूर्ती ऊर्पâ दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तीशाली असतो. तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही अर्थी उजव्या सोंडेचा गणपति ‘जागृत’ आहे असे म्हटले जाते. दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप-पुण्याची छाननी होते; म्हणून ती बाजू नकोशी वाटते. मृत्यूनंतर दक्षिणेकडे गेल्यावर जशी छाननी होते तशी मृत्यूअगोदर दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास (किंवा झोपतांना दक्षिणेकडे पाय केल्यास) व्हायला लागते. दक्षिणाभिमुखी मूर्तीची पूजा नेहमीसारखी केली जात नाही; कारण दक्षिणेकडून तिर्यक (रज) लहरी येतात. अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे सात्त्विकता वाढते व दक्षिणेकडून येणार्‍या रजलहरींचा त्रास होत नाही.
डावी सोंड : डाव्या सोंडेचा गणपति म्हणजे वाममुखी गणपति. वाम म्हणजे डावी दिशा किंवा उत्तर बाजू. डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे, ती शीतलता देते. तसेच उत्तर बाजू अध्यात्माला पूरक आहे, आनंददायी आहे; म्हणून बहुधा वाममुखी गणपति पूजेत ठेवतात. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गणपति’)

अशा गबाळ अंधश्रध्दा सगळीकडेच आहेत.
जैनांच्या तीर्थंकरांच्या बाबतीत तर मूर्तीचे डोळे उघडे आहेत की झाकलेले यावर आधारीत राहून पुजा करणारे दोन वेगळे पंथ आहेत.
हे डोळे झाकलेल्या मूर्तीची पुजा करणारे लोक डोळे उघडे असलेल्या मूर्तीकडे बिलकुल फिरकत नाही.
आता मूळ महावीरानं डोळे कधी झाकले असतील, कधी उघडे ठेवले असतील - पण नाही!
श्वेतांबर आणि दिगंबर ते तर वेगळेच !

तसं पाहायला गेलं तर गणपतीनेपण (तो झाला असलाच तर! कारण मूळ माणसासारखे डोके असलेला गणेश, त्याला पुन्हा हत्तीचे तोंड बसवण्याची सर्जरी महादेवरांवानी कशी केली, चार हात कसे आले वगैरे भानगडी आहेत ) सोंड कधी उजवीकडे वळवली असेल कधी डावीकडे!
हत्ती नाही सतत सोंड फिरवत राहात?
एवढं सिरीयस घेण्यासारखं काय आहे त्यात?

अविनाशकुलकर्णी's picture

8 Nov 2010 - 10:07 pm | अविनाशकुलकर्णी

अशा गबाळ अंधश्रध्दा सगळीकडेच आहेत..
मान्य नाहि.................हे वाचा..
....................................................
अमेरिकन जेनेटिक असोसिएशनचे एक शास्त्रीय नियतकालिक (जर्नल) निघतेThe journal of heredity त्याच्या 75:152-154-1984 या अंकात मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या alain fo corcos यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता.त्या लेखाचे नाव होते.Reproduction and heredity beliefs of the hindus based on their sacred books.'
या लेखात मनुस्मृती,वराहमिहीराची बृहतसंहीता आणि मुख्यत्वे बृहदारण्यक उपनिषदाच्या संतानोत्पत्तीसाठी विशिष्ट प्रकारच्या आहाराची गरज असल्याचे सांगितले आहे.
बृहदारण्यक उपनिषदात म्हटले आहे की, १) एका वेदाचे ज्ञान असलेल्या पूर्णायू गौरवर्णीय पुत्रप्राप्तीसाठी दूध, भात आणि तूप असे भ्जन स्वत: आणि आपल्या पत्नीने घ्यावे.
२) कपिलवर्णीय ,दोन वेदांचे ज्ञान असलेल्या पूर्णायू पुत्राच्या प्राप्तीसाठी दहीभात आणि तूप असे भोजन पती पत्नींनी घ्याचे.
३) तीन वेद जाणणार्‍या श्यामवर्णीय पुत्रप्राप्तीसाठी पाण्यातील भात अआणि तूप असे भोजन पत्नीबरोबर घ्यावे.
४) पूर्णायू विदुषी कन्याप्राप्तीसाठी तीळ आणि तांदळाची खिचडी करून पत्नीला खाऊ घालावी
५) आपला पुत्र चारही वेदांत पारांगत व्हावा व प्रसिद्ध विद्वान व्हावा अशी इच्छा धरणार्‍यांनी उडीद व तांदळाची खिचडी करून, त्यामध्ये ॠषभ नावाचे औषध मिसळून पत्नीसोबत खावी..
फ़्रांस आणि कॅनडाच्या फिजिशिअन्सच्या अभ्यासातून हे सत्य आहे हे सिद्ध होते
विशिष्ट आहार विहारामुळॆ होणार्‍या परिवर्तनामुळे एक्स आणी वाय या शुक्राणूंच्या मिलनप्रक्रीयेवर परीणाम होत असावा.
या अभ्यासावरून असे दिसते की, प्राचीन उल्लेखांची उपेक्षा न करता त्यामध्ये महान सत्य दडलेले असेल असे मानावे लागेल.त्यांचे ज्ञान आपल्याला नाही आणि ते झाल्यावर कदाचित मानवाचे अधिक कल्याण साधणॆ शक्य होईल.

ठीक आहे!
अमेरिका, फ्रान्स, कॅनडामध्ये या संशोधनावर आधारीत राहून नवे गणपती किंवा तसलेच प्रकार जन्माला येण्याची वाट पाहु!
नाही आले, तर संशोधन बोगस किंवा यूसलेस!

वेताळ's picture

8 Nov 2010 - 10:28 pm | वेताळ

आपल्या वेदात व उपनिषिदात सगळे शोध लावुन झाले होते. फक्त ते नजरेसमोर पाश्चात्य लोकांनी आणले.तुम्ही आता खुप खुप वेदांचे वाचन करा व कोणता तरी नवा शोध लावा.तुमच्या कडुन खुप अपेक्षा आहेत.

शिल्पा ब's picture

9 Nov 2010 - 5:18 am | शिल्पा ब

रोचक!! मला तर डाव्या सोंडेचा का उजव्या हे कधीच कळत नाही...काहीही असो, आरती केली अन शेवटी मोदक किंवा शिरा मिळाला कि आपले काम झाले...

परिकथेतील राजकुमार's picture

9 Nov 2010 - 11:16 am | परिकथेतील राजकुमार

नेहमीप्रमाणेच 'अँटीक स्पिरीचुअल धागा'.

खूप छान.

ऊजव्या सोंडेचा गणपती धर्मनिरपेक्ष असतो.. डाव्या सोंडेचा गणपती कट्टर मुलतत्त्ववादी असतो..

(भगवा दहशतवाद = डाव्या सोडेचा गणपती ? )

kamalakant samant's picture

10 Nov 2010 - 10:03 am | kamalakant samant

मूळ चैतन्य एकच्,त्याचे आविष्कार अनेक.
आपण भेद करु नये.इतर देवता॑बद्दल पण भिन्नता आढ्ळेल.
१-एकमुखी दत्त,तीन मुखी दत्त इत्यादि.
२-काळा राम्,गोरा राम्,धनुर्धारी राम्,सि॑हासनाधीश राम इत्यादि.
रुपे अनेक आहेत पण चैतन्य एकच.
आपला शुद्ध भाव असणे गरजेचे.