आठवणीन्चा उमाळा दाटून आला की मन गहिवरते
आणि चक्षू आसवान्ना वाट मोकळी करुन देतात.
कोरड्या ओठाण्वरुन जिभ फिरवतान्ना
आसवान्ची खारट चव कळताच मन अजुनच हळवे होते.
डोळ्यात तरन्गणार्या त्या आसवान्च्या पाझरामुळे
वर्तमान धूसर होवून सयीची साय मेन्दूत घट्ट होत जाते.
मनचक्षू स्वैर होतात नी अन्तर्मनाचा ताबा घेवून
हृदयाला आक्रोशाच्या खाईत लोटतात.
हॄदयाची स्पन्दने वाढतात की ते निपचीत होतात
हे कळायच्या आतच एक पिम्पळपान डोक्यावर पडते आणि
आठवणीने ताणलेल्या मनपतन्गाच्या दोर्याला थोडी ढिल मिळते.
ती ढिलही ईतकी की परत तिचाच गुन्ता होऊन
काळजातील काळजीच्या लकेरी कपाळावर
ऊभ्या आडव्या गोन्दणासारख्या
पक्क्या ठाण मान्डून बसतात.
प्रतिक्रिया
6 Nov 2010 - 11:20 pm | माझीही शॅम्पेन
वाह , एकदम छान !