(........आकाशाशी जडले नाते !!)

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
23 May 2008 - 5:58 pm

(........आकाशाशी जडले नाते !!)

प्रभुश्रीराम, गदिमा, सुधीर फडके यांची माफी मागुन हे विडंबन--

-----------------------------------------------------------------------------

आकाशाशी जडले नाते, जेट एअरवेजचे !
टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

गोयंकाने सहज उचलिले वीर इंडियन्सचे !
पुर्ण जाहले मॅनेजमेंटच्या हेतु अंतरीचे !
कमी जाहले प्रवास भाडे, जो तो झेपावे !!टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

मुग्ध प्रवासी सहज न्याहळी जेट पंखधारी !
नयनांमाजी एकवटुनिया धावपट्टी सारी !
उडू लागले विमान हळू हळू, जो तो आनंदे !!टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

हात जोडुनी म्हणे सुंदरी प्रवास-जनतेशी !
"आज सेवा अर्पियली मी अपुल्या चरणाशी" !
आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने !!टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

झुकले थोडे विमान, प्रवासी घाली सुरपट्टा !
वैमानीकही सुचना देती साथी-दारांना !
त्यांच्या कानी गजर पोचले, विमान लँडीगचे !!टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

असंख्य झाल्या विमानसेवा, असंख्य उड्डाने !
एटीसी( ATC ) ते सिग्नल देती कंट्रोल जीवनाचे !
आकाशाशी जडले नाते ऐसे दुनीयेचे !!! टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

23 May 2008 - 6:59 pm | प्राजु

छान आहे. आवडले.

हात जोडुनी म्हणे सुंदरी प्रवास-जनतेशी !
"आज सेवा अर्पियली मी अपुल्या चरणाशी" !
आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने

या कडव्यात,
आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने
ऐवजी
आनंदाने जाहले डोळे तृप्त जनतेचे

असेही चालू शकेल का?

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

23 May 2008 - 11:25 pm | llपुण्याचे पेशवेll

वैमानीकही सुचना देती साथी-दारांना
च्या ऐवजी
वैमानीकही सुचना देती साथी-सुंदरींना
कसे वाटते आहे. :)
बाकी ही विडंबनात्मक कविता वाचून मस्त वाटले.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

24 May 2008 - 2:03 am | विसोबा खेचर

मस्त विडंबन! चालीतही अगदी छान बसते आहे... :)

केळकरसाहेब, अजूनही येऊ द्या...

तात्या.

अमोल केळकर's picture

24 May 2008 - 8:59 am | अमोल केळकर

आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रिया / सुचना स्वागतार्थ !!!
पुन्हा एकदा धन्यवाद !!

अजिंक्य's picture

26 May 2008 - 10:32 am | अजिंक्य

उत्तम विडंबन!
मूळ गाण्याबरहुकुम आहे!
असेच चालूद्या.