स्वातंत्र्योत्तर भारत

प्रमोद सावंत१'s picture
प्रमोद सावंत१ in जनातलं, मनातलं
30 Oct 2010 - 5:04 pm

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या विकासाठी स्वप्न प्रत्येकाने पाहिले. त्यानुसार दिशा आखण्याचा प्रयत्नदेखील नंतरच्या काळात होत गेला. पंडित नेहरूंनी धरणे, पोलाद कारखाने व उच्च अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांची निर्मीती करण्यावर भर दिला. इंदिरा गांधींनीं लहान गावांपर्यंत बँका नेल्या. हरिक्रांतीचा मार्ग दाखविला. राजीव गांधीनीं संगणक, दळणवळण क्षेत्रात क्रांती केली. देश आधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू लागला. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाला. जीवनाश्यक वस्तुंची कमी झाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून खेडी एकमेकांशी जोडली. गावातील शेतकऱ्याला शहरातील बाजारपेठेशी जोडले गेले. डॉ. मनमोहन सिंग यांनादेखील रोजगार हमी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, ग्रामीण विकासाच्या योजना आखल्या. प्रत्येक पंतप्रधानांच्या कारकिर्दीत प्रयत्न होउनही आज सहा दशकांनतरही ठराविक लोक तुपाशी खातात आणि बाकीचे उपाशी रहातात अशी परिस्थिती का यावी?
संदर्भ- एका दिशेचा शोध, लेखक- संदिप वासलेकर, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे २०१०
वासलेकरांनी आपल्या पुस्तकातील उपरोक्त परिच्छेदात स्वातंत्र्योत्तर भारताच्या नेतृत्वाखाली झालेला विकास अगदी समर्थपणे मांडला आहे. वेगवेगळ्या पंतप्रधानांनी आपापल्या कारकिर्दीत निरनिराळ्या प्रकारे देशाला विकासाचा मार्ग दाखविला. परंतु देशापुढे असणाऱ्या समस्या मात्र बदलल्या नाहीत. आज भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असला तरी कित्येक लोक मात्र उपाशीपोटी झोपतात. उदारीकरणामुळे उद्योग वाढले खरे पण कुशल कामगारांअभावी बेकारी तशीच राहिली. आजही ३० ते ४० टक्के लोक दारिद्र्यरेषेखालीच राहतात. जरी आपण लोकशाही म्हणत असलो तरीही सत्ता ही मूठभर लोकांच्या हातातच आहे. या सर्व परिस्थितीस काही घटक कारणीभूत आहे. जसे वाढती लोकसंख्या, दर्जेदार शिक्षणाचा अभाव, बेलगाम भ्रष्टाचार, मूल्यांपेक्षा व्यक्तिपूजेस आलेले महत्त्व. या व अशा अनेक कारणांमुळे ठराविक लोक तुपाशी खाऊन इतर लोक उपाशी राहतात, असे मला वाटते.

धोरणलेख

प्रतिक्रिया

प्रमोद सावंत१'s picture

4 Nov 2010 - 4:03 pm | प्रमोद सावंत१

कसले आव्हान?

अविनाशकुलकर्णी's picture

4 Nov 2010 - 8:34 pm | अविनाशकुलकर्णी

लोक तुपाशी खातात आणि बाकीचे उपाशी रहातात
अहो दादा १३० कोटी लोक..दररोज लाखोनी लोकसंख्या वाढणार..त्याला आळा घालण्या साठी ना प्रबोधन ना कायदे..
कुठलेही सरकार येवु देत काय कपाळ फोडणार?

संदिप वासलेकर या माणसाने तुमच्यावर चांगलीच जादु केलेली दिसत आहे

अविनाशकुलकर्णी's picture

4 Nov 2010 - 8:35 pm | अविनाशकुलकर्णी

लोक तुपाशी खातात आणि बाकीचे उपाशी रहातात
अहो दादा १३० कोटी लोक..दररोज लाखोनी लोकसंख्या वाढणार..त्याला आळा घालण्या साठी ना प्रबोधन ना कायदे..
कुठलेही सरकार येवु देत काय कपाळ फोडणार?

संदिप वासलेकर या माणसाने तुमच्यावर चांगलीच जादु केलेली दिसत आहे