आपण नेहमी साडेतीन शहाण्यांबद्दल ऐकतो. कोण होते हे साडेतीन शहाणे?
माझ्या कुवतीनुसार याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला. हे साडेतीन शहाणे म्हणजे पेशवाईच्या काळातील जिवा, सखा, विठा, नाना.
१. सखा : सखारामबापू बोकील - पेशव्यांचे कारभारी - थोरल्या माधवरावांचे प्रथम कारभारी पण राघोबादादांचे खास
२. जिवा: जिवाजीपंत चोरघडे - नागपूरकर भोसल्यांचे कारभारी
३. विठा: विठ्ठल सुंदर - हैद्राबादच्या निजामाचा वजीर
४. नाना: नाना फडणवीस/फडणीस - पेशव्यांचा कारभारी
यातील नाना फडणवीस प्रकृतीने अगदीच क्षीण असल्याने प्रत्यक्ष युध्दात भाग घेत नसत. त्याने कधीही तलवार गाजवली नाही. पण त्यांचा मुत्सद्दी पणा आणि व्यवहार चातुर्य इतके पराकोटीचे होते की कधीही प्रत्यक्ष युद्ध न करताही युद्ध जिंकत असत. पण त्यांच्या युध्दभूमिवरच्या या कमकुवतपणामुळे त्याना अर्धे शहाणे म्हटले जात असे.
या विषयाबद्दल कोणाला अधिक काही माहीती असेल कळवावी तसेच वरील माहीती मधे काही त्रुटी असेल तर ती दूर करावी.
आपला
(साडेतीन शहाण्यांच्या शोधात)
पुण्याचे पेशवे
प्रतिक्रिया
22 May 2008 - 10:10 pm | मन
पेशवे-निजाम यांच्यातल्या लढाईत(बहुतेक उद्गीरच्या) मारला गेला असं वाचल्याच आठवतय.
त्यामुळं त्याची कारकिर्द एकाएकी संपुष्टात आली.
बाकी माझ्या ऐकिव माहितीप्रमाणे
२. जिवा: जिवाजीपंत चोरघडे - नागपूरकर भोसल्यांचे कारभारी
ह्यांच नाव साडेतीन शहाण्यात नसून महादजी शिंदे ह्यांचं होतं.
(ऐकिव माहिती.)
आपलाच,
मनोबा
23 May 2008 - 2:39 am | पिवळा डांबिस
पेशवेसरकार,
"पुण्याच्या" आणि "पेशव्यांना" याची उत्तरं "शोधायचा" प्रसंग का यावा? तुम्हाला माहिती नाही तुमच्या पेशवाईच्या काळात साडेतीन शहाणे कोण होते ते?:))
हर! हर!! काय झपाट्याने बदलत चाललंय पुणं!!!:))
23 May 2008 - 11:09 am | केशवसुमार
तर हे आहेत साडेतीन शहाणे :B
मग दिड शहाणे कोण? :?
(अतिशहाणा) केशवसुमार
स्वगतः मिपाचे साडेतीन दिड शहाणे कोण?:W
23 May 2008 - 12:41 pm | ऍडीजोशी (not verified)
भले ह्यांना साडेतीन शहाणे म्हणून घोषीत केलं गेलं असेल, पण बाकीच्या पुणेकरांनी आम्ही सोडून बाकीचे शहाणे हे मान्य केलंच कसं?
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
23 May 2008 - 8:06 pm | विजुभाऊ
धमु / आन्द्या / इनोबा हे तीन आणि बंगळुरला असलेला अर्धा डॉन्या हे साडेतीन जण
किंवा
डाम्बीस काका / पेठकरकाका / केशवसुमार आणि हमेशा गाभुळलेल्या स्वप्नात असणारे अर्धे विजुभाऊ हे साडेतीन जण
23 May 2008 - 11:18 pm | llपुण्याचे पेशवेll
पण वरील जोड्यांमधे अर्धे, पूर्ण आणि दीड शहाणे कोण? वर्गीकरण कसे करायचे?
(ह.घ्या. हे. वे. सां. न. ल.)
पुण्याचे पेशवे
24 May 2008 - 2:52 pm | छोटा डॉन
विजूभाउ, तुम्ही तर डायरेक्ट आमच्या धोतरालाच हात घातला की राव ...
असो. पहिल्यांदा आज मला कुणी शहाणे म्हणाले मग ते अर्धा का असेना ...
पण मला सांगण्यास आनंद होतो की आमच्या "ऑफीसातला सगळ्यात शहाणा" म्हणून मलाच ओळखतात ...
अर्धा शहाणा छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
23 May 2008 - 8:13 pm | वरदा
"पुण्याच्या" आणि "पेशव्यांना" याची उत्तरं "शोधायचा" प्रसंग का यावा? तुम्हाला माहिती नाही तुमच्या पेशवाईच्या काळात साडेतीन शहाणे कोण होते ते?)
हेच म्हणते...
23 May 2008 - 8:15 pm | मन
धमु ,आन्द्या , इनोबा ,डॉन्या हे दोघे
शिवाय
डाम्बीस काका / पेठकरकाका / केशवसुमार आणि हमेशा गाभुळलेल्या स्वप्नात असणारे अर्धे विजुभाऊ
हे सगळेच अर्धे शहाणे.(कारण ह्यापैकी कुणी लढाई(खरीखुरी, हल्कट आणी बनेल बॉस बरोबरची नव्हे.)
गाजवल्याचं आम्ही ऐकलं नाहीये.पण व्यवहारात हे सम्देच तर्बेज!
अगदि तुमचा नाना फडणवीसालाही उन्निस्-बीस करतील ह्ये सम्दे.
)
(सगळे मिळुन चार शहाणे=८ व्यक्ती.)
म्हंजे पेशवाईच्या अर्धे पाउल पुढेच गेली म्हणा मिसळपाव.
डिस्क्लेमरः-
मर्द मावळे इनोबा ह्यांनी लढाई बद्दल कधिपासुनच बोल्लायला सुरुवात केलिये.
पण अजुन शस्त्र घेतले नसल्याने, तुर्तास तरी ते ही अर्धेच.
आपलाच,
उंटावरचा शहाणा,
मनोबा
24 May 2008 - 6:12 pm | नीलकांत
पेशवाईतील साडेतीन शहाण्यांत विठ्ठलसुंदर येत नाहीत तर महादजी शिंदे येतात असं ऐकून आहे. विठ्ठलसुंदर पेशव्यांचा शत्रु होता. हे साडेतीन शहाणे म्हणजे पेशवाईतील कटकारस्थान जेव्हा आपल्या सर्वोच्च उंचीवर होते तेव्हा मराठ्यांच्या राजकारणात यांचा वकुब होता.
आठवा बारभाई कारस्थान आदी.
ह्यातील नाना फडणवीस हे अर्धे शहाणे होते हे मात्र नक्की. त्याचा निकष म्हणजे तलवार आणि बुध्दी चालवण्यातील वाकबगारी होय.
नीलकांत.
25 May 2008 - 11:29 am | कलंत्री
आपण ध्रुवीकरण फारच लवकर करत असतो. पूर्वीच्या राजकारणात समोरच्या बाजूचा असला तरी त्याची योग्यता जोखत असत. त्यामूळे निजामाच्या बाजूने असला तरी विठ्ठल सुंदराचा उल्लेख शहाण्यात होत असे.
१/४ शहाणा-> कलंत्री
26 May 2008 - 9:14 am | अवलिया
पेशवाईतील कटकारस्थान जेव्हा आपल्या सर्वोच्च उंचीवर होते
राजकारण हे कट कारस्थानानीच व स्वार्थ (देशाचे भले हा पण स्वार्थच असतो) यांनीच भरलेले असते.
राजकारण सरळ सोपे चिमुटभर मीठ उचलुन उपास करुन भजन करुन होत नसते
राजकारणाला इतके सोपे समजणारा समाज जे दुर्देवाचे दशावतार भोगतो ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य १९४७ ते आजपावेतो...असो
चाणक्याचे अर्थशास्त्र वाचा म्हणजे कळेल राजकारण कशाशी खातात
(राजकारणी) नाना
26 May 2008 - 7:27 pm | नीलकांत
अहो नाना,
चाणक्य सोडा हो मला तर तुम्ही लिहीलेला प्रतिसाद सुध्दा समजलेला नाही.
म्हणजे यात पेशवाईतील तीसरा शहाणा कोण? याबद्दल काहीच मत नाही. माझ्या मते ते महादजी शिंदे तर
चर्चा प्रवर्तक व द्वारकानाथजींच्या मते ते विठ्ठल सुंदर होत. याबाबत काही मत देण्याची तसदी केली असतीत तर बरं झालं असतं.
बाकी पेशवाईबद्दल मी जे बोललो त्यात असं रागावण्यासारखं काय होतं बुवा? पहिल्या बाजीराव व चिमाजी आप्पांच्या पेशवाईची वाटचाल माधवरावांनंतर पुढे कशी झाली हे का मी सांगावं आणि तुम्ही ऐकावं असं काही गुपीत आहे का?
असो तुमच्या प्रत्येक ओळीत काहीतरी पुर्वग्रह लक्षात येताहेत. खरं तर यामुळे केवळ मनोरंजनच होतं. कुठे पेशवाई , पुणे आणि कुठे दांडी.
आमच्या बहूमोल स्वातंत्र्यात आणि स्वातंत्र्योत्तर वाटचालीत तुमच्या तत्वज्ञानाला उत्तर पेशवाईपेक्षा जास्त अधोगती दिसते असं मानायचं का?
अहो नाना शोभेल असं शालजोडीतून मारतांना जरा एवढं तर लक्षात घ्याकी ज्यांच्या चिमटीला आणि भजनाला शिव्या घालताय त्याने एकेकाळी सर्वांना आपल्या पंच्याच्या खिशात घातलं होतं की.
असो, गंमत पुरे, तुम्हाला पेशवाईतील साडेतीन शहाणे कोण ते ठाऊक असेल तर येथे द्या की. म्हणजे मला कळू तरी द्या की पेशव्यांच्या विरोधात लढणार्या विराची गणना पेशवाईतील साडेतीन शहाण्यांत कशी होते ती.
अवांतरः हा प्रतिसाद चर्चेशी सुसंगत नाही. तसेच हे माझं मत सुध्दा नाही. चिमटे काढण्याच्या प्रयत्नावर मत तरी काय द्यावे? ही केवळ पिसं काढावी अशी प्रतिक्रिया आहे.
26 May 2008 - 9:15 pm | कोलबेर
नीलकांत राव जबर्या प्रतिसाद.
26 May 2008 - 10:20 pm | llपुण्याचे पेशवेll
नागपूरकर भोसले देखील कधी फारसे पेशव्यांच्या बाजूने नव्हते. पण त्यांच्या पेशव्याचा (दिवाणाचा ) पण उल्लेख साडेतीन शहाण्यातील एक म्हणूनच केला जातो.
कलंत्रीसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या राजकारणात शत्रूचा देखील वकूब जाणून त्याचा योग्य तो मुलाहिजा राखला जात असे.
पुण्याचे पेशवे
26 May 2008 - 9:58 pm | पिवळा डांबिस
अरे बाबा नीलकांता,
इथे शहाणे याचा अर्थ 'मुत्सद्दी आणि वीर' असा अपेक्षित आहे. विठ्ठल सुंदर हा असाच ग्रेट मुत्सद्दी होता तसाच तो रणशूरही होता. म्हणून त्याची गणना पूर्ण शहाण्यात केली गेली आहे. तसेच देवाजीपंत आणि बापू! नानांचं तुला माहिती आहेच.
हे लोकं पेशव्यांच्या बाजूने होते की विरुद्ध हा निकष नाहीये इथे! तसे नागपूरकर भोसलेही (आणि देवाजीपंत) कधी मनापासून पेशव्यांच्या बाजूने नव्हते!!
आम्हाला देवाजीपंत, विठ्ठल सुंदर आणि बापू हे पूर्ण आणि नाना अर्धे हेच साडेतीन शहाणे म्हणुन माहीती आहेत.
महादजी शिंदे त्यात येतात हे तुझ्याकडूनच आज प्रथमच कळतं आहे.....
तेंव्हा तुला जर त्याविषयी काही अधिक आणि खात्रीची माहिती असेल तर दे...
-डांबिसकाका
27 May 2008 - 9:54 am | नीलकांत
डांबीसकाका ,
विठ्ठल सुंदर हा शुर आणि मुत्सद्दी होताच आणि शत्रुच्या शौर्याचा गौरव करणे ही आपली परंपराच होती. त्यात काहीच अडचण नाही. मी महादजींचं नाव या संदर्भात वाचलेलं आठवतं. मी शोधाशोध करतो. आणि जमल्यास संदर्भ देतो.
या साडेतीन शहाण्यांचा उल्लेख नेहमी पेशवाईतील साडेतीन शहाणे असा होतो म्हणून माझा गोंधळ असेल कदाचीत. मी शोध घेतो.
नीलकांत
27 May 2008 - 8:20 pm | llपुण्याचे पेशवेll
नीलकांतराव, जर तुम्ही आप्पा बळवंत चौकात गेलात तर तिथे अनमोल प्रकाशन मधे 'पुण्याचे पेशवे' या नावाचे एक पुस्तक मिळेल. ते प्रा. अरविंद कुळकर्णी यानी लिहीले आहे. त्यात साडेतीन शहाण्यांबद्दल माहीती मिळेल.
पुण्याचे पेशवे
27 May 2008 - 10:34 pm | पिवळा डांबिस
अहो पेशवे सरकार,
तुम्हाला इतकी माहिती आहे ना! आणि तरी तुम्हीच हा धागा सुरू केलांत?
ही काड्या घालण्याची ट्रीक बरी आहे!
आजपासून आम्ही तुम्हाला 'काडीमास्तर' म्हणणार! :))
-डांबिसकाका
27 May 2008 - 11:37 pm | llपुण्याचे पेशवेll
डांबिसकाका तुम्ही दिल्हेले नाव आम्हास बहुत रुचले. असो.
अहो पण मी उल्लेखलेल्या पुस्तकात जेवढी माहीती मी वर लिहीली आहे तेवढीच आहे. त्याव्यतिरिक्त इतर कथा किंवा किस्से नाहीयेत 'साडेतीन शहाण्यांबद्दल'. मला त्याबद्दल अधिक जाणून घेण्यात रस आहे. साडेतीन शहाण्यांनी विशेषतः 'जिवा' आणि 'विठा' यानी रचलेले डावपेच. सखारामबापूंच्या मुत्सद्देगिरीच्या कथा इ. जाणून घेण्यात रस आहे म्हणून हा धागा खरे चालू केला होता. :)
पुण्याचे पेशवे
26 May 2008 - 9:58 am | विजुभाऊ
राजकारण कशाशी खातात ?
राजकारण ही खायची गोष्ट नसावी. अन्यथा मिपा वर इतके सारे पाकशास्त्री आणि खवय्ये आहेत त्यानी कधीच राजकारण हा पदार्थ केला असता.
स्वती रा॑जेश यानी तो पास्त्याबरोबर केलाअसता
स्वाती दिनेश यानी तो ईडलीच्या आंबवलेल्या पीठाबरोबर केला असता
आणि पेठकर काकानी तो कोकणी खखत्यात टाकला असता
विजुभाऊनी आंब्याबरोबर नाही तर चहा बरोबर जोडीला ठेवला असता.
सर्वव्यापी ( परमेश्वरानन्तर एकमेव) प्राजुने त्याचे लोणचे घातले असते.
डॅम्बीसकाकानी तो मांदेली नाहीतर तिसर्यांबरोबर चाखल्ला आसता
तात्याने त्याचे रंगीत फोटो प्रकाशित केले असते.
मला वाटते की राजकारण हा कदाचित खायचा पदार्थ असेल पण वरील सर्व सुगरणे आणि आस्वादाकाना तो अत्यंत भिकार चवीचा वाटत असावा.
7 Jun 2008 - 11:05 pm | मैत्र
तुमची माहिती बरोबर आहे... सखारामबापू, नाना, विठ्ठलसुंदर हे नक्की...
पण मलाही नीलकांताप्रमाणे वाटतंय की जिवा नाही तर महादजी आहेत ...
काही पक्के संदर्भ मिळाले तर कळवेन...
(नावाने) बोकील.. :)