अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
16 Sep 2007 - 5:21 pm

मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू करून तमाम मराठीप्रेमी जनतेची बौध्दिक आणि वैचारिक भूक भागविण्याचे महान कार्य सुरू केल्याबद्दल तात्या सरपंचांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

या संकेतस्थळामुळे मराठी लेखनास आसुसलेल्या सृजनशील व्यक्तिंना कोणत्याही फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल आणि इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता येईल.

त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्‍या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा.

आम्हीही एक मिसळपाव व चहा हादडून मस्तपैकी तंबाखूपान लावून येतो. आल्यावर पुढील लेखन करू.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत

वावरशुभेच्छा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Sep 2007 - 5:31 pm | विसोबा खेचर

फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल

हा हा हा! अरे बाबा एक वेळ प्रशासकीय धोरणात्मक दबाव परवडला! इथे तर आख्खी पंचायत समिती आहे. च्यामारी एकदम पाच पाच प्रशासकच सोडतो आता एकेकाच्या अंगावर! ::))

असो, जोक्स अपार्ट. धोंड्या, इथे आलास त्याबद्दल तुझे आभार.. तुझ्या गझला आणि तुझे ज्योतिषविषयक लेख लिही आता इथे निवांतपणे आणि वाचकांच्या प्रश्नांना, शंकाकुश़ंकाना न भडकता, न वैतागता उत्तरं दे!

त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्‍या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा

आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे संकेतस्थळ चालणार आहे, भरभराटीस येणार आहे हीच नम्र जाणीव आहे!

तात्या.

रोहिणी's picture

17 Sep 2007 - 9:52 am | रोहिणी

तात्या,
मिसळपावच्या संकेतस्थळाबद्दल तुझे अभिनंदन व शुभेच्छा.
रोहिणी

सर्किट's picture

17 Sep 2007 - 10:41 am | सर्किट (not verified)

व्वाटेल तिथे तोंड घालणार्‍या सर्किटाला इथे न येऊन कसे चालेल ? हे तर तात्यांच्या घरचे कार्य !!! आम्ही येथे नारायण म्हणून वावरणार !
"शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे.."
"तो आचारी आला नाही, अजून ?"

- सर्किट

दिगम्भा's picture

17 Sep 2007 - 6:54 pm | दिगम्भा

तात्या,
हाटीलात खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, मसालेदार, चमचमीत, तिखटजाळ, आंबटगोड, आंबटढाण, गोडमिठ्ठ, व्हेज-नॉनव्हेज सर्व प्रकारचे पदार्थ हवेत हं.
- दिगम्भा

टग्या's picture

18 Sep 2007 - 5:58 am | टग्या (not verified)

पहिल्यांदीच ऐकतोय! (अर्थात कल्पना वाईट नाही म्हणा...) ;-)

- टग्या.

रंजन's picture

18 Sep 2007 - 12:25 am | रंजन

मिसलिइचि क्रउति कुथे आहे?

उपाशी बोका's picture

18 Sep 2007 - 6:00 am | उपाशी बोका

तात्या,
मला मसाला दूध हवे बरा का !
उपाशीबोका

गुंडोपंत's picture

18 Sep 2007 - 8:00 am | गुंडोपंत

वा धोंडोपंत,
आगदी मनातलं बोललात!

आपला
गुंडोपंत

धोंडोपंत, खरे तर तुम्ही 'मिपा'चे सभासद आहात हे मी विसरूनच गेलो होतो! बर्‍याच दिवसांनी चक्कर टाकलीत?
पण तुमचे मत पटले व ते ऐकून 'मस्त' वाटले!
'गझला (गझलियात)' येऊ देत. मी एक धागा सुरू केला होता तो आता खणून काढतो व त्याला पुन्हा कार्यरत करायचा यत्न करतो.
पुनश्च धन्यवाद

डॉन मध्ये न्युज आली का २००७ ची ?

प्रियाली's picture

1 Nov 2010 - 10:07 pm | प्रियाली

बर्‍याच दिवसांनी चक्कर टाकलीत?

धोंडोपंतांची चक्कर काही दिसली नाही आणि २००७ ते २०१० या कालावधीला बर्‍याच नाही पण काही वर्षांनी असे नक्कीच म्हणता येईल. :)

श्रावण मोडक's picture

1 Nov 2010 - 10:18 pm | श्रावण मोडक

अगागागा... काळेसाहेब काय हे?

वयानुसार होतं असे कधी कधी ;)

काळेकाका,

गोठुस्करदादा मोड >>काय हो,आज सकाळीच का ?<< मोड संपला.