संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'गॉन' हे सासवडहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र वाचतो. काल "पुण्यातल्या सर्वात जास्त सुसंस्कृत लोकसंख्या असलेल्या सदाशिवपेठेतल्या सायबर कॅफेमधुन तीस लाख नीलचित्रपट सीडीज चोरीस गेल्या आहेत" ही धक्कादायक बातमी वाचायला मिळाली.
आजकाल अशा कुठल्याच बातमीबद्दल आश्चर्य वाटेनासे झाले आहे. पण ज्या घटनेमुळे आपल्यावर थेट आपत्ती कोसळू शकते अशी एकादी बातमी वाचली कीं खूप काळजी वाटू लागते!
अशा बातम्या वाचल्यावर "पुण्याची संस्कृती पहिल्यासारखी राहिली नसावी" या पहिल्यापासूनच आपल्या मनात असलेल्या शंकेची ’चुकचुकणारी पाल’ आणखीच जोरात चुकचुकू लागते. कायम संस्कृती रक्षक (हिंदू वा मुस्लिम वा अन्य) एका बाजूला, पोलिस दुसर्या बाजूला, व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारवंत तिसर्या बाजूला आणि शेवटी आपलेच मित्र आणि हितचिंतक जे या गुन्ह्यात सामिल आहेत ते चौथ्या बाजूला असा "चौरंगी सामना" नेहमीच चालू असतो!
आपल्यापुरते बोलायचे म्हणजे या चोरीला गेलेल्या सीडीजपैकी बर्याचशा सीडीज आपल्याच मित्रांच्या संगणकावर चालविल्या जातील व ती पकडून जर आपण ती चोरीची असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर पोलीस "ती आपल्याच मित्राच्या दुकानातील सीडीजपैंकी असावीत" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे!
संपूर्ण वृत्त वाचायचे असेल इथेच देत आहे.
सदाशिवपेठेतुन ३० लाखाहुन अधिक नीलचित्रपट सीडीजची चोरी
पुणे (वार्ताहर ) :- काल रात्री सदाशिवपेठेत झालेल्या जबरा चोरीत ३० लाखाहुन अधिक नीलचित्रपट सीडी चोरीस गेल्या आहेत. सदर सीडीज भक्त प्रल्हाद अशा पुराण कथेच्या आवरणाखाली एका सायबर कॅफेत विक्रीसाठी आणलेल्या होत्या. कॅफेचे मालक उन्हात वणवणकर हे फरार असुन पोलिस त्यांचा तपास करत आहेत असे समजते. याबाबत माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की सदर सीडीज या बंगुळुरु मधील कुख्यात गुंड झुल्फेफार याने पुण्यात काही दिवसांपूर्वी आणल्या होत्या. झुल्फेफार हा सध्या बंगुळुरु पोलिसांनी तडीपार केल्यामुळे पुण्याच्या आसपास वास्तव्यास आला आहे असे पोलिसांनी सांगितले. सदर चोरीमागे खुडूक भुंगा नामक अल्पवयीन भुरटा मुलगा असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यात आढळले असुन पोलिस त्याचा तपास करत आहेत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या बातमीनुसार तो आणि त्याचा साथीदार रुमाल वेगळा यांना प्रभात सिनेमाजवळ पाहिल्याचे समजते.
सदर नीलचित्रपट सीडीज कुठल्या कुठल्या स्त्रोतांमार्फत विकल्या जाणार होत्या याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी ठाण्यात मुख्य वितरण केंद्र असावे असा पोलिसांचा कयास आहे. त्याचप्रमाणे सदर कॅफेमधे मॉरिशसमधील योगी व्योनीबाबा यांच्या सुईत दोरा ओवा या प्रवचनाच्या सीडीजची कव्हर्स असलेल्या काही नीलचित्रपटसीडीज सापडल्याने त्यांच्या पुणे येथील आश्रमाची चौकशी चालू आहे.
या खळबळजनक विषयावर आमच्या प्रतिनिधीने अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या. अखिल भारतीय संस्कृतीरक्षक व प्रख्यात कर्मकांडी श्री पेठेचे कडके यांनी या सीडीजमुळे होणार्या संस्कृती हानीच्या विरोधात लवकरच आमरण उपोषण करणार असल्याचे जेवता जेवता सांगितले. नवनिर्माणासाठी मोडतोड करण्यात कुशल असलेल्या श्री आताहास यांनी आम्ही अशा विषयांवर प्रतिक्रिया देणे बंद केले असे सांगुन प्रतिक्रिया दिली नाही ही बाब विशेष बोलकी आहे. श्री रावण यांच्या मतानुसार किमान तीस लाख बालके आता मोठी होतील ही आनंदाची बाब आहे
प्रतिक्रिया
20 Oct 2010 - 6:50 pm | सुहास..
धन्यवाद!
मी रोजच 'गॉन' वाचतो. तरी ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते. या काळात मी खरे तर कुठे काशी करत होतो काय माहीत
सुहास..
--------------
एक 'प्रल्हादभक्त' पुणेकर या नात्याने सर्व निळ्या चित्रफितींवर बहिष्कार घाला!
20 Oct 2010 - 6:54 pm | सुनील
चष्म्यावरचा फिल्टर आधी काढा पाहू!
20 Oct 2010 - 6:56 pm | शेखर
सहमत. ना॑ना अजुन अशाच बातम्या देत चला व त्याचे विवेचन पण करा. समस्त लोकांना पण फायदा होईल.
21 Oct 2010 - 6:54 pm | चांगभलं
अतिशय भिकार आणि टाकाऊ.. लेख....................
श्री. अवलिया यांच्याकडून हि अपेक्षा नवती........................
20 Oct 2010 - 6:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
20 Oct 2010 - 6:59 pm | गणपा
तुमच्याकडून ह्याच प्रतिसादाची अपेक्षा होती. ती पूर्ण झाल्यामुळे आनंद झाला आणि डोळे आनंदाश्रूंनी डबडबले!
20 Oct 2010 - 7:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रुमाल किंवा कागद मिळणार नाहीत. तेव्हा स्वतःचं स्वतः काय ते पहा ड्वॉल्यातल्या पाण्याचं काय करायचं ते!!
20 Oct 2010 - 7:10 pm | मृत्युन्जय
गणपाला बहुधा हाही प्रतिसाद अपेक्षित असावा. आता तर आसवांचा महापूर येइल.
अवांतरः "ड्वॉल्यातल्य" शब्द काळजाला भिडला एकदम.
20 Oct 2010 - 7:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ए तू लायनीप्रमाणे ये रे इना, उगाच रांग मोडू नकोस. तो गणपा रागवेल आता तुझ्यावर!
20 Oct 2010 - 8:10 pm | मृत्युन्जय
न्हाइ. नाय रागावत तो. सध्या तो खुप भावूक झाला आहे. ड्वाल्यातलं पाणी पुसण्यासाठी रुमाल शोधतो आहे.
20 Oct 2010 - 7:17 pm | गांधीवादी
आसवांचे महापूर उन्हाळ्यात येतील का ?
20 Oct 2010 - 7:16 pm | गांधीवादी
सापडल्या एकदाच्या,
सदाशिव पेठ ब्युरो ऑफ ईन्व्हेस्टीगेषण ( SBI ) ह्यांनी साठा जप्त केलेला आहे. दोषी व्यक्तींना अर्थूर तुरुंगात दिले आहे आणि त्यांना अति तीव्र कडक स्वरूपाचे निषेद खलिते पाठविलेले आहेत.
हा पहा साठा,
20 Oct 2010 - 7:16 pm | अवलिया
ग्रेट !
20 Oct 2010 - 7:19 pm | सुनील
रस्ता पुण्यातील वाटत नाही!
20 Oct 2010 - 7:22 pm | गांधीवादी
पुण्यातील रस्ते, रस्ते वाटतच नाही.
20 Oct 2010 - 7:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुणंच काय, वहानाचा रजिस्ट्रेशन नंबर पहाता हा आपला देशही वाटत नाहीये. इंग्लंड किंवा इतर राष्ट्रकुल देश असावा, वहानं रस्त्याच्या डाव्या बाजूनेच जात आहेत. आपल्यासारखी सगळ्या दिशांनी नाही. ;-)
20 Oct 2010 - 7:24 pm | अवलिया
बापरे म्हणजे सीडीजचा गैरव्यवहार सर्व जगात पसरलेला आहे.
20 Oct 2010 - 7:27 pm | गांधीवादी
ओबामा नोवेंबर मध्ये इकडे येणार आहे तेव्हा त्याच्या कानावर घालीन.
20 Oct 2010 - 7:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
Czech Republic चा आयएस्डी कोड ४२० आहे ... ट्रक तिथूनच इंग्लंडात गेलेला असावा ...
सदाशिव पेठ ते इंग्लंड व्हाया चेक रिपब्लिक हा पराचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे.
20 Oct 2010 - 7:30 pm | सुनील
नोव्हेंबरपर्यंत वाट नका पाहू. आताच पत्र लिहा!
20 Oct 2010 - 7:31 pm | अवलिया
सहमत आहे. एक प्रत मिपावर पण टाका म्हणजे चोपपेस्ते करुन आम्ही पण पाठवु
20 Oct 2010 - 7:37 pm | गांधीवादी
आयला, मला आजतागायत सौ. ना ४ चार ओळींचे लव्ह लेटर सुद्धा नाही खरडता आले, तर मी काय बापडा लिहू त्या ओबामाला पत्र.
पत्र लिहिणे आपला काम न्हाय.
20 Oct 2010 - 7:38 pm | अवलिया
जा जरा पूर्वेकडे !
न जमणारी किंवा रटाळ कामे पूर्वेला आउट सोर्स करुन पूर्ण करुन घेतली जातात.
20 Oct 2010 - 7:41 pm | गांधीवादी
पुण्यातून माझ्या घरापासून मी जरा देखील पूर्वेला चालत गेलो तरी अरबी समुद्रात जाऊन पडेन.
20 Oct 2010 - 7:42 pm | अवलिया
नक्की का?
20 Oct 2010 - 7:49 pm | गांधीवादी
हो मग, कोणत्याही राजकीय नेत्याची शप्पथ घेऊन सांगतो.
बाय द वे,
'ह्या धाग्यावर सिरीयस व्हायचे नाही' असे ठरविले आहे.
20 Oct 2010 - 7:53 pm | मेघवेडा
सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी नकाशासुद्धा उलटाच पाहता का हो तुम्ही? ;)
20 Oct 2010 - 7:54 pm | अवलिया
प्रश्न चुकला. पाय उलटे आहेत का असे विचारायचे होते ;)
20 Oct 2010 - 8:00 pm | गांधीवादी
थांबा वाकून बघतो.
..
..
..
..
..
अरे हे काय मला पायच नाय. त्याच्या ऐवजी ४१.३ हेच आकडे दिसतायेत.
20 Oct 2010 - 8:00 pm | अवलिया
नक्की कुठे पाहिलत?
20 Oct 2010 - 8:08 pm | गांधीवादी
आकाशात ,
आम्ही वाकलो कि आम्हाला आकाशच दिसते, तुम्हाला ?
20 Oct 2010 - 8:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'गांधीवादी' हा माझा आयडी नाही हे इथे जाहीर करू इच्छिते.
20 Oct 2010 - 8:34 pm | असुर
जाहीर खोटं बोलणार्याला/रीला इराण मधे जाहीर फटके देतात म्हणे. अदितीतैंनी काही दिवस तिकडे जाउ नये ही विनंती!
--असुर
20 Oct 2010 - 8:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी काहीही 'बोललेले' नाही!
21 Oct 2010 - 7:18 am | गांधीवादी
हिंदी पिक्चर मधला एक डायालॉक आठवला.
"कितना भी चिल्ला चिल्ला के सच बोलो, झूठ फिरभी छुपेगा नाही."
20 Oct 2010 - 7:42 pm | सूड
अच्छा यांच्या टंकनिकेचं नाव पूर्वा आहे तर !!
20 Oct 2010 - 7:44 pm | नावातकायआहे
श्री. अवलिया यांचा एक कलमी कार्यक्रम.
फट? --> पाचर.
21 Oct 2010 - 1:50 am | विकास
वहानं रस्त्याच्या डाव्या बाजूनेच जात आहेत.
म्हणजे ते पुणेच असणार!
20 Oct 2010 - 8:30 pm | नितिन थत्ते
ठाण्यातून यमन रागाच्या (कव्हरातल्या) सीडीज भरलेले ट्रक गायब झाले होते तेव्हा बाजार उठला होता त्याचं काय झालं?
20 Oct 2010 - 9:51 pm | प्रिया देशपांडे
परमपूज्यांचा विडंबनपर लेख भावला. कॅफेच्या माध्यमातून इंटरनेटच्या प्रसाराचे महत्वपूर्ण कार्य करणारे राजकुमारजी रागावणार नाहीत ही अपेक्षा.
21 Oct 2010 - 1:30 am | इंटरनेटस्नेही
असेच म्हणतो. सीडीजच्या माध्यमातून चुम्माचाटीच्या प्रसाराचे महत्वपूर्ण कार्य करणारे राजकुमारजी रागावणार नाहीत ही अपेक्षा.
(चित्रपट दर्शक) इंट्या.
21 Oct 2010 - 1:36 am | चित्रा
ह्यात धोरण आणि प्रकटन असे वर्गीकरण करण्याचे कारण कळले नाही.
असो.
यात "आपण" कोण? संस्कृती रक्षक का?
21 Oct 2010 - 6:39 am | Nile
हे त्यांच्या वावराच्या धोरणाचे प्रकटीकरण कसेल काय? ;-)
21 Oct 2010 - 9:43 am | ब्रिटिश टिंग्या
काय बोलु? शब्दच संपले!
21 Oct 2010 - 10:36 am | गांधीवादी
एक बाराखडीचे पुस्तक विकत आना ना मग.
21 Oct 2010 - 10:07 am | sneharani
काय बोलू....शब्द नाहियेत.
21 Oct 2010 - 11:45 am | ऋषिकेश
अ रे रे रे काय चालवलयत लेको. धाग्याची पार सदाशिव पेठ करायला घेतलीये.
नानाने दिलेली बातमी जरी चिंताजनक असली तरी आपल्या घराघरांत काय आणि किती दिसतंय ही खरी काळजीत टाकणारी बाब आहे.
तब्बल १६४ नील-एमेमेस मुंबईत फिरत होते त्याचा मिडियाने बाजार मांडला होता. आता सदाशिव पेठ म्हटल्यावर सगळे सोईस्कर रित्या विसरले आहेत.
21 Oct 2010 - 12:13 pm | llपुण्याचे पेशवेll
फारच संवेदनशील धागा आहे. यावर खरोखर नीट विचार व्हायला हवा.
ठाण्यातून मधे काही शिड्या गायब झाल्या त्या कुठे गेल्या? उद्या सदाशिवपेठेत काही झाले तर सुद्धा हे ठाण्याचे कारस्थान आहे असे म्हणु शकते म्हणजेच -
सदाशिवपेठेपुरते बोलायचे म्हणजे या गायब शिड्यांपैकी बर्याचश्या शिड्या पेठांमधेच्(कुठल्या ते कळले असेलच) लावल्या जातील व त्या पकडून जर त्यांनी त्या ठाण्याच्या असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर "ठाणे पोलिस "त्या गायब शिड्यांपैकीच असतील" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवतील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे!
-चावलिया
काही सिड्या नाहीत,
तब्बल १६४ सिड्या भरलेले Boxes गायब झालेले आहेत.
कधी कधी असे वाटते कि हे शहर सोडून दुसरीकडे दूर कुठेतरी जाऊन राहावे. काय कोण जबाबदार असणार आहे लोकांच्या जीवाला इथे ? सरकार काय भरपूर निषेद खलिते घेऊन बसलेली आहे.
-सिंडिवादी
अहो आम्ही पुण्यात साधा नवीन computer घेऊ शकत नाही.....
पुणे काय सोडून जाणार???? कप्पाळ
((((( I .T . मध्ये Career करायला हवा होतं , आत्ता Laptop मधून मस्त Download करून मजा बघत बसलो असतो..... ))))))))))
रात्रीच्या प्रतीक्षेत ....................
-*RA
रविवार पेठ, बुधवार पेठ, पुण्यात इतरत्र, सांगली, मुख्य म्हणजे कोल्हापूर, थोडी कोकण, थोडी चंद्रपूर वगैरे वगैरे मधे अशी बर्यापैकी वाटणी झाली की मग थोडीशी ठाण्याकडे.
म्हणजेच उत्तर आहे - नाही, तीस लाख शिड्या आपल्याकडे आणल्या जाणार नाहीत.
-हवस
21 Oct 2010 - 12:33 pm | गांधीवादी
आता प्रतिसादांना पण नाही सोडणार का ?


-सिंडिवादी
हसून हसून पुरेवाट.
21 Oct 2010 - 1:17 pm | परिकथेतील राजकुमार
इथे WELCOME* मध्ये Career हा बदल कसा वाटतो ?
*WELCOME बद्दला अधिक माहितीसाठी गरजुंनी डान्राव अथवा ब्रिटिश टिंग्याशी संपर्क साधावा.
21 Oct 2010 - 1:30 pm | नरेशकुमार
शीरेस व्हा रे पोरांन्नो, शीरेस व्हा.
21 Oct 2010 - 2:29 pm | नितिन थत्ते
एक देशभक्त म्हणून चिनी नीलचित्रपट सीडींवर बहिष्कार घाला.
21 Oct 2010 - 2:39 pm | अवलिया
=))
21 Oct 2010 - 4:19 pm | इंटरनेटस्नेही
त्यातच खरी मजा आहे!
21 Oct 2010 - 5:20 pm | ऋषिकेश
चीनी निलचित्रसीडी कशास म्हणावे?
चीनी अॅक्टर्स असलेली चित्रपटसीडी? चीनी निर्मात्याची चित्रपटसीडी? का चिनी क्यामेरे वापरून बनलेल्या चित्रपटाची सीडी? का चिनी 'कच्चा माल ' वापरून बनवलेली सीडी? का चीनी प्रेक्षक बघतात अशी सीडी? आणि जर उत्तर हे सर्व असेल तर हल्लीच्या ग्लोबल व्हीलेजमधे कोणताच नीलचित्रसीडी बघायला नको!
21 Oct 2010 - 6:06 pm | नितिन थत्ते
प्रत्येकाने आपले-आपले ठरवावे. आग्रहही मुळीच नाहीं, फक्त एक सूचना (suggestion) आहे.
मी Made in China पुरता हा नियम पाळतो.
21 Oct 2010 - 6:15 pm | नरेशकुमार
तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून आनंद झाला.
एका सिरीयस धाग्याची अशी उडवलेली खिल्ली बघून ड्वॉले पाणावले.
21 Oct 2010 - 7:07 pm | क्लिंटन
काळेकाका ज्या तळमळीने लिहितात त्याची अशी खिल्ली उडविलेली बघून वाईट वाटले. त्यांची मते कोणाला पटोत की नकोत पण त्यांचा हेतू पूर्णपणे प्रामाणिक आहे हे त्यांचे लेख वाचून कळतेच. त्यामुळेच अशी खिल्ली उडविणे समर्थनीय नाही असे मला वैयक्तिक पातळीवर वाटते.
क्लिंटन
21 Oct 2010 - 7:29 pm | नरेशकुमार
क्लिंटन भाव आन काळे काका.
हा धागा आनि त्यावर भल्याभल्यांनी केलेली हुल्लडबाजी सगळं म्हंजी माणूस किती निबर झालाय ह्याचे उदाहरण आहे. तुम्ही मनावर घेऊ नका.
21 Oct 2010 - 7:47 pm | सुहास..
काळेकाका ज्या तळमळीने लिहितात त्याची अशी खिल्ली उडविलेली बघून वाईट वाटले. त्यांची मते कोणाला पटोत की नकोत पण त्यांचा हेतू पूर्णपणे प्रामाणिक आहे हे त्यांचे लेख वाचून कळतेच. त्यामुळेच अशी खिल्ली उडविणे समर्थनीय नाही असे मला वैयक्तिक पातळीवर वाटते.>>>>
कोणीही कोणाच्याही प्रामाणीकतेची पातळी ठरवण्यास कितपत पात्र आहे याची व्याख्या जाणुन घ्यायला आवडेल, काळेकांका विषयी आदर राखुन, एक म्हण आठवली. अति झाल आणी हसु आल !
असो ..
अवांतर : आयआयएम विषयीचा दुसरा भाग लिहीणार होतात ना ?
22 Oct 2010 - 5:55 am | गांधीवादी
>>कोणीही कोणाच्याही प्रामाणीकतेची पातळी ठरवण्यास कितपत पात्र आहे याची व्याख्या जाणुन घ्यायला आवडेल,
हो हो नक्की, नक्की. व्याख्या करा. आणि त्याचे एकक पण ठरवा.
लागलीच हातोहात,आजचे सगळे नेते, राजे महाराजे, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले अनेक महान व्यक्ती ह्यांचे प्रामाणिकपणा मोजून घेऊ.
22 Oct 2010 - 2:23 am | इंटरनेटस्नेही
चिनी 'कच्चा माल ' वापरून बनवलेली सीडी...
(एशियण मालाचा चाहता) इन-हुन-स्नेही.
21 Oct 2010 - 6:07 pm | नरेशकुमार
देशी उपलब्ध आहेत. रेट जास्त पडेल. कोणास हवे असेल तर खासगीत व्यनी करणे.
(मिपा आयडी सुद्धा विकायला आहेत. )
21 Oct 2010 - 7:53 pm | अविनाशकुलकर्णी
हल्ली परा दिसत नाहि मीपा वर..