आज या कातरवेळी तिची आठवण का होतेय?

स्वप्निल मन's picture
स्वप्निल मन in जे न देखे रवी...
15 Oct 2010 - 4:11 pm

तो दिनकर तिकडे जसजसा बुडत चालला आहे
अन् माझा आठवणींचा डोह घुसळला जात आहे

पलीकडे एक सुंदर पहाट फुलणार आहे
इकडे माझ्या आयुष्याची वाट हरवली आहे

इतके दिवस या आठवणी दडपून टाकल्या होत्या
मग आजच का या पुन्हा आठवू पाहात आहेत?

उद्या काहीतरी घडणार आहे का?
माझ्या प्रिय व्यक्तीला काही होणार तर नसेल ना?

देवा, तिला नेहमी आनंदात ठेव
काढत नसेल माझी आठवण तरी सुखात ठेव

माझ्या आठवांच्या लहरी तिच्यापर्यंत पोहोचू नको देऊस
मन माझे रडले तरी तिला ऐकू नको येऊ देऊस

विसरून गेली मला तरी सुद्धा चालेल
पण भेट जर कधी झाली तर ओळख मात्र दाखव

-स्वप्निल

करुणप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

15 Oct 2010 - 4:16 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

....वाचत आहे!

पिवळा डांबिस's picture

16 Oct 2010 - 12:59 am | पिवळा डांबिस

...रडत आहे!!

मी असाच आहे!!

काव्यवेडी's picture

15 Oct 2010 - 10:34 pm | काव्यवेडी

सुन्दर कविता !!! आवडली.

अथांग's picture

16 Oct 2010 - 4:03 am | अथांग

मनातील खळबळ समजतेय, आणि 'सुन्दर पहाट' किंवा 'आयुष्याची वाट' असे सुरेख शब्दप्रयोगही आहेत,पण थोडी विस्कळीत वाटली कविता. मुक्तछंदात वाचायचा पण प्रयत्न केला, परंतु तेवढी भिडली नाही.

तो दिनकर तिकडे जसजसा बुडत चालला आहे
अन् माझा आठवणींचा डोह घुसळला जात आहे

च्या ऐवजी -

तो दिनकर तिकडे (जसजसा) लुप्त होतोय,
माझा आठवणींचा डोह घुसळत जातोय !

पलिकडे एक सुन्दर पहाट फुलतेय,
इकडे माझ्या आयुष्याची वाट हरवतेय !

असं काहीसं लिहीलं तर गेयता येईल, असे मला वाटते.

स्वप्निल मन's picture

16 Oct 2010 - 8:56 pm | स्वप्निल मन

@ अथांग
आभारी आहे. तुमची सुचना खरच खुप मौल्यवान आहे. मी नक्किच प्रयत्न करेन....