आज लेक शाळेतुन जरा तडतडतच घरी आली.
बायकोने विचारल 'काय झाल गं? एवढी वैतागली का आहेस?'
लेक "तो यश सारखा मला 'आय लव्ह यु' म्हणतो."
बायको पण दचकली (लेक यत्ता पहिलीत आहे.)
पण सावरुन म्हणाली "नक्की काय करतो वर्गात, तुला त्रास गेतो का?"
लेक "त्रास नाही देत. मदत करतो. कधी मी क्रेयॉन्स विसरले, पेन्सिल/इरेझर विसरले तर तो लगेच देतो. पण दुसर्या कुणाला माझ्या बाजुला बसु पण देत नाही."
बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला.
बायको : "आता मला सांग तो नेहमी मदत करतो तर तो तुला आवडत नाही का?"
लेक : "अग पण तो केवडुसा आहे. माझ्या चिन पर्यंत पण येत नाही."
बायको पुन्हा स्तब्ध.
प्रतिक्रिया
8 Oct 2010 - 3:36 pm | इंटरनेटस्नेही
फुलटु करमणुक झाली... मिपाच्या अनुभवी पालकांकडुन अजुन किस्से अपेक्षित आहेत!
(सिंगल आणि सरळमार्गी, म्हणुन पालकत्वाचा अनुभव नसणारा) इंट्या.
8 Oct 2010 - 3:57 pm | परिकथेतील राजकुमार
अच्छा म्हणजे जे पालक होतात ते वाममार्गी असतात काय ?
8 Oct 2010 - 4:21 pm | Nile
तसं नाय रे परा, पालकत्वासाठी जे काय असावं लागतं (पण जे सरळ नसतं) ते त्याच्या कडे नाहीए इतकंच त्याला म्हणायचं आहे.
-मार्गाप्रमाणे अॅडजस्ट होणारा, सर्वमार्गी.
8 Oct 2010 - 4:27 pm | परिकथेतील राजकुमार
__/\__
8 Oct 2010 - 7:12 pm | मृत्युन्जय
अरारारा. लैच घाण मारली. सिक्सर हो.
8 Oct 2010 - 7:16 pm | मृत्युन्जय
अरारारा. लैच घाण मारली. सिक्सर हो.
9 Oct 2010 - 1:33 am | इंटरनेटस्नेही
मला असे म्हणायचे आहे की, ....
जाउंदे काही फायदा नाहीये स्वत:ला एक्सप्लेन करुन.. लोक अजुन चुकीचा अर्थ काढतील.. :(
9 Oct 2010 - 2:44 pm | कवितानागेश
माझ्या ४ वर्षाच्या भाच्याला त्याच्या ३० वर्षाच्या मामाशी आणी ६० वर्षाच्या आजीशी लग्न करायचे होते, अगदी हटून बसला होता .....
नुकतेच त्याला कळले होते की लग्न झाले की आयुष्यभर एकत्र रहावे लागते!
मामाला आणी आजीला आपल्याबरोबर अडकवण्याचा सोप्पा उपाय!
7 Dec 2010 - 2:07 am | नेत्रेश
प्रतिसाद ९९
7 Dec 2010 - 2:08 am | नेत्रेश
अभिनंदन!
26 Apr 2012 - 9:06 pm | यकु
भन्नाट किस्से आहेत एकेकाचे !!
_____/\____ !!!!